ललित - लेख - प्रिय मित्राची अमर - आठवण ! Arun V Deshpande द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ललित - लेख - प्रिय मित्राची अमर - आठवण !

लेख -प्रिय मित्राची “अमर “-आठवण.

ले- अरुण वि.देशपांडे

नमस्कार - परभणीकर मित्रानो आणि वाचक मित्रांनो, मागच्या लेखात १९६४ या वर्षच्या संदर्भातल्या आठवणी शेअर केल्या, मला, तुम्हाला त्या आवडल्या हे तर छान वाटणारे आहेच आहे, पण फेसबुक आणि इंटरनेटवरील माझ्या मित्रांना परभणी -बद्दल वाचून खूप छान वाटते आहे ", तो काल, त्या आठवणी त्यांनाही खूप सुखद वाटल्या "हे मला जास्त मोलाचे वाटते कारण असे काही विस्मृतीले क्षण पुन्हा उजळणी केल्यावार मनाला खूप आनंद देता येतो हा माझा, तसाच तुमचा देखील अनुभव असेल.

माझा त्याकाळातील क्लासमेट, आणि आज ही मित्र असलेला डॉ. अशोक कुलकर्णी शेलगावकर यांनी तर फोन करून सांगितले की आताच सांगून ठेवतोय - तुला परभणीला यायचे आहे - कारण येत्या डिसेंबर महिन्यात परभणीला एक मित्र-मेळावा मी घेतो आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात तुझ्या लेखात तू ज्या मित्रांचे नामोल्लेख केले आहेस ते मित्र तर आहेच या शिवाय अनेक पुराने - दोस्त " असणार आहेत चला, परभणीला येण्याचे पक्के झाले., डॉक्टर अशोक कुलकर्णी तुम्ही खूप मोठा आनंद देण्याचे कार्य करीत आहात, धन्यवाद तुम्हाला.

डावरे चष्मेवाले - मधील श्रीमान विजय डावरे हे देखील माझे जुने -दोस्त-मित्र -फ्रेंड आहेत..लेख वाचून त्यांना खूप छान वाटले.. म्हणाले.. विजय फोटो स्टुडीओ- स्टेशन रोड आठवतो की नाही अरुण ?

विजय हे काय विचारणे झाले राव - या दुकानाने तर आपल्याला मित्र बनवले.. आणि ज्याच्यामुळे अनेक मित्रांना ही जागा कायम आपलेच घर " वाटत असे.. तो. दोस्त- यार.. अमर परिहार..

मित्रांनो आजच्या लेखात या सर्वप्रिय मित्राची आठवण करू या.. अमर परिहार याच्याशी मैत्री नसलेली व्यक्ती ", परभणीच्या सार्वजनिक जीवनात सापडली नसती "असे नक्कीच म्हणता येईल.. अमर तर आमच्या परिवारातील एक मेंबर होता.. यशवंत चौधरी, रविकांत चौधरी.रवी टेलर्स - च्या रोडवर विजय फोटो स्टुडीओ मध्ये -अमर असायचा, अमर दिसायचा, आल्या गेल्याशी दिलखुलास हसून बोलणारा अमर - म्हणजे या रोडवरचा एक स्पीड-ब्रेकर "होता, इथे थांबून मगच पुढे जायचे..हे त्या रस्त्याने जाणार्या-येणार्यांची सवय होती.

मला. १९७० -७५ च्या दरम्यानचे दिवस आठवतात.. मी शनिवारी-रविवार सुट्टी असली की. परभणीला रवी-टेलर्स कडे येत असायचो, हे दोन दिवस. सगळा वेळ अमरच्या विजय फोटो स्टुडीओ मध्ये जायचा, गप्पा, हसणे-खिदळणे. आणि फिल्मी-गाण्यांच्या गप्पा.. या काळात आणि या जागेत. मैफिली इतक्या रंगवल्या की पुन्हा अशा मैफिली कधीच जमल्या नाहीत की रंगल्या नाहीत,

त्यावेळी जवळच अफजल हॉटेल.. तिथला चवदार -आलू-बोंडा, रसाळ गुलाब्जांबू, आणि फर्मास चाय.. दोस्तांनो, काय माहौल असायचा.. बोलता - बोलता खाणे, खाता-खाता गाणे, आणि हसता हसता लोटपोट होणे " असे चित्र हमखास असायचे.

अशा दिलदार मैफिलीतले आम्ही को-मेंबर. विजय डावरे अरविंद वाघमारे, यशवंत चौधरी, रमेश मंगरुळकर, कधी नांदेड हून आलेले मोठे बंधू - सुरेश मंगरुळकर, आणि लोकल परभणी मित्र, एखद्या सोहोळ्याला आवर्जून हजेरी लावावी तसे माझ्या सारखे अनेक मित्र या जागेत येऊन.. "रात्र- जागवित असत ", अशा अनेक "जागल्या - दोस्तांना. अमरच आठवण नक्कीच भारावून टाकणारी असेल.

आबासाहेब वाघमारे. गोविंदराव आळनुरे, डी. आर. चिनके, या गंगाखेडकर मित्रांचे ठेपे अमरचे दुकान असायचे या सर्वांशी माझ्या ओळखी या ठिकाणी झाल्या. अमर आणि त्याचे मित्र.. त्याने जमवलेला त्याचा परिवार ही त्याची मित्र-प्रेमातून कमावलेली "खरी-कमाई " होती असे मला वाटते. यथावकाश अमर ने पुढच्या एका चौकात. स्वताचे दुकान सुरु केले.. अमर फोटो स्टुडीओ.. या नवीन दुकांची जागा भलेही बदलली असेल.. पण.. अमर कडे आवर्जून येणारे दोस्त तेच कायम राहिले.. दिवसे दिवस त्यात भर पडत गेली होती...

यशवंत - रविकांत चौधरी या त्याच्या मित्रांचे मामा -मामी, म्हणून मग माझे आई-वडील. आपोआपच अमरचेपण. मामा-मामी, आणि आमची सर्व फ्यामिली.. त्याची झाली.

१९७७ साली आम्ही - म्हणजे माझे आई-वडील. सेलू च्या हैद्राबाद बँकेत होते, आजोबा-आजीच्या घरी ..माझ्या मुलाचे बारसे झाले.. या कार्यक्रमाला क्यामेरात बद्ध करणारा.. बेस्ट क्यामेरा - मन.. अमर ' होता.. काही दिवसांनी त्याने बाळाला.. फोटो - फ्रेम दिली

त्यावर. एकाच " A" madhye दोन नाव होती.. Amar to Amit...!

अजूनही हा फोटो पाहिला की दिलखुलास हसणार्या अमरचा -सदाबहार चेहेरा नजरेसमोर तरळून जातो.

हैद्राबाद बँक, बँकेतील स्टाफ.. म्हणजे अमरचे सगे-सोयरे असल्या सारखेच होते.. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची खातिरदारी. आणि त्यांची काळजी यजमान असल्या सारखा दस्तूर खुद्द -. अमर घेत असे.. इतकी त्याला -हैद्राबाद बँकेची आणि बँकेला आणि त्याची सवय झालेली होती..… या ऋणानुबंधाच्या गाठी अजूनही आठवणींच्या रेश्मिगाठी सारख्या मनात आहेत..

१९८० च्या दशकात.. परभणीला. कारेगाव रोड- - देशमुख हॉटेल जवळ -श्रीराम नगर.. हैद्राबाद बँकेच्या स्टाफची दुसरी कॉलोनी झाली, " पाण्याच्या टाकीजवळ - ही आमच्या कॉलनीची ठळक खुण आहे. अमरचे मित्र -आबासाहेब वाघमारे यांचा प्लॉट माझ्या शेजारी.,. पुढे या प्लॉट मध्ये घर बांधून माझा शेजारी म्हणून आला.. तो अमरचा धाकटा भाऊ.. ब्रीजनाथ परिहार,.. या पडोसी मुळे- अमरच्या आणि आमच्या मैत्रीतले पारिवारिक नातेबंध अधिक दृढ झाले.. दरम्यानच्या काळात विजय फोटो स्टुडीओ- ते -- अमर फोटो स्टुडीओ "हा अमर या मित्राने केलेला सर्व प्रवास म्हणजे एका व्यक्तीचा आणि, एका माणसाचा सोपी वाट नसलेला एक प्रवास होता. पराकोटीचा आशावाद, आणि जिद्द त्याच्या स्वभावात मी नेहमीच अनुभवली. त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विषयी त्याच्या मनात इतका जिव्हाळा होता की, त्याच्याच दोन मित्रांनी एकमेकाचा हेवा करावा.."हा तर माझ्या पेक्षा जास्त जिगरी आहे की काय अमरचा ?

फोटो स्टुडीओच्या मागेच छोट्याश्या घरात अमर आणि परिवार असायचा.. या घरात येणाऱ्या मानसला नेहमीच ऐसपैस आणि मोकळे वाटेल असा अमरचा पाहुणचार असायचा, पुढे वसमतरोडला त्याचे स्वतःचे मस्त घर झाले.. त्याचा गृहप्रवेश समारंभ. पारिवारिक मेंबर म्हणून आम्ही अनुभवला.

जसे वर्ष जातात, आपणही समोरच्या परिस्थितीनुरूप बदलत जातो, सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या न राहता त्यात ही बदल होत जातो.. असे बदल स्वीकारत पुढे जाणे.आपल्या हिताचे असते... मित्रांनो.. हा अनुभव सिध्द गुरु-मंत्र.. अमर नावाच्या गुरु-मित्रांने.. आपल्याला त्याच्या शब्दातून कधीच न बोलता त्याच्या वागण्यातून दिला आहे अशी माझी भावना आहे.

सतत मुक्तहस्ते आनंद वाटणारा आपला दोस्त अमर, आणि आनंद सिनेमातला. आनंद.. मला तर हे दोघे एकमेकांचे फास्ट--फ्रेंड आहेत असेच वाटत असते.

लेख- प्रिय मित्राची “अमर “-आठवण.

ले- अरुण वि.देशपांडे पुणे.

मो-९८५०१७७३४२