Prastaav books and stories free download online pdf in Marathi

Prastaav

कथा -

प्रस्ताव ...!

  • अरुण वि.देशपांडे
  • ----------------------------------------

    नोकरीच्या निमित्ताने मुलाना आई-वडिलांपासून दूर जावेच लागते ,या दरम्यानच मुलांच्या सहवासाला मुकावे लागते आणि मग या दुराव्याची सवय लावून घ्यावी लागत असते ,आणि हे सर्वांच्या वाट्यास येणारी गोष्ट आहे.

    यात नवे किंवा फार वेगळे असते असेही नाही ,त्यमुळे मुलं मोठी झाली की ,अगोदर शिक्षणाच्या निमित्ताने दुरावतात,

    हा एक टप्पा झाला की लगेच दुसरा टप्पा सुरु होतो -,पुढे नोकरीसाठी म्हणून बाहेर पडायचे असते .जिथे अन्न-पाणी तिथे जायचे ",पिढ्या दर पिढ्या "हेच चालू असते ,. हम दो हमारे दो " अशा पिढीचे प्रतिनिधी असलेलेया अरविंद आणि वसुधा या आई-बाबांच्या वाट्यासही हे आलेले होते .

    अरविंदची स्वतःची नोकरी होती ..त्यामुळे रिटायर होई पर्यंत गाव आणि घर सोडून मुलांनी बोलावले तरी त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता .अरविंद निवृत्त झाले,त्यानंतर वसुधाच्या नोकरीची थोडीच वर्षे शिल्लक राहिली होती..मग, थोडक्यासाठी कशाला सोडायची नोकरी ? त्यात येउ घातलेल्या नव्या वेतन-आयोगाची चाहूल लागलेली ..मग, संभाव्य फायदा सोडून..पदरात नुकसान का पाडून घायचे ? हा व्याहारिक विचार पटावा असाच होता.

    मुलीचे लग्न थाटात पार पडले , लेक-जावई त्यांच्या संसारात रमलेले , मुलगा -किशोर आयटी मधल्या नामवंत कंपनीत ,सुनबाई पण तोडीसतोड तितक्याच मोठ्या पगाराच्या नोकरीत , नातवंडे संपन्न आईबाबांची मुलं ,एकूणच अरविंद आणि वसुधा अगदी धन्य-धन्य होऊन जीवन्तले सुख-आनंद आणि वैभव भोगत आहेत "हे सगळ्यांना दिसत होते.

    पण...म्हणतात ना "दिसण्यात आणि असण्यात फरक असतो ", डोळ्यांना जे दिसते "-ते तसेच असेल ",हा अंदाज चूक ठरू शकतो .

    अरविंद आणि वसुधाच्या आयुष्यात अलीकडे काही घटना अशा घडत होत्या की, दोघे ही चक्रावून गेले होते. अतात्पर्यंत त्यांनी ठरवावे आणि ते तसे पार पडावे " असे होत असे , गेल्या दोन-चार वर्षा पासून मात्र हे चित्र बदलण्यास हळूहळू सुरुवात झाली होती.

    गेल्या वर्षातली गोष्ट - अनिता -त्यांची लेक - स्वभावाने जरा हट्टीआणि हेकेखोर , लहानपणी आणि लग्न होईपर्यंत "लाडक्या लेकीची मर्जी लाडाने सांभाळणे ",आई-बाबा म्हणून ठीक होते .पण, आता लग्न झाल्यावर हट्टीपणा आणि हेकेखोरपणा "कसा चालेल ? तरी बर होते -जगदीश शांत स्वभावाचा ,आणि अनिताच्या तुलनेत समंजस होता.

    अरविंद आणि वसुधा -हे अनिताचे आई-बाबा , त्याचे सासू-सासरे ,या मर्यादेत त्यांच्याशी आदराने वागणे योग्यच होते.

    पण, वसुधाला लेकीच्या स्वतंत्र -सुखी संसाराची स्वप्न पाहण्याची सवय लागली ,मग त्यांची यासाठी घाई सुरु झाली ,साहजिकच अनिता आणि जगदीशच्या संसाराचे संतुलन बिघडण्यास सुरुवात झाली. जगदीशच्या आई-बाबांना लगेच या नव्या वादळाची कल्पना आलीच होती. जगदीशने थेट निर्णय घेत.स्वतःच्या आई-बाबांना कायमचे राहण्यास बोलवून घेत अनिता आणि वसुधाबाईंच्या खेळीला जणू शह दिला .वसुधा या प्रकाराने दुखावली गेली आपल्या लेकीच्या संसारात सुख येता येता राहिले " याची मोठीच रुख-रुख त्यांच्या जीवाला लागली.

    वास्तविक वसुधाचे हे उद्योग अनेकांना आवडले नव्हते ,काहींनी तर स्पष्टपणे सांगून पाहिले - हे बघ वसुधा , मुलीच्या संसारात इतके नाक खुपसू नकोस , ती काय वनवासात आहे का ? चांगल चाललाय न ग तिचं. घर चांगले माणसं चांगली ", मग उगीच कशाला हे करण्याची दुर्बुद्धी सुचलीय तुला ?

    जगदीशच्या हुशारीमुळे आणि अनिताने ऐनवेळी त्याला साथ दिल्यामुळे वसुधाचा हा मनसुबा उध्वस्त झाला तो झालाच , जावईबापू बद्दलची माया कमी झाली नाही ,पण, यापुढे ती वाढणार नव्हती हे नक्की.

    वसुधा रिटायर झालेली नाही "अरविंदच्या दृष्टीने ही गोष्ट मोठी समाधान देणारी ठरली,कारण अनिता-प्रकरण त्यामुळे जास्त चिघळून त्रास होईल असे काही झाले नाही , नोकरीतली शिल्लक राहिलेली वर्ष -दोन वर्ष निर्विघ्नपणे

    पार पडू दे " अशीच सूचना सगळ्यांनी केली तेंव्हा कुठे वसुधाबाई एकाजागी स्वस्थ बसल्या आणि अरविंदने सुटकेच्या नि:श्वास सोडला होता .

    एक जोडपे म्हणून अरविंद आणि वसुधा यांचे परस्परांचे वागणे एकदम विरोधी नसले तरी फारसे अनुरुप ही नव्हते ,पण म्हणतात ना- पदरी पडले -पवित्र झाले" ,असे म्हणून एकमेकांना सांभाळत संसार गाडा रेटत नेणे दोघांना जमत गेले " त्यामुळे चार-चौघात तरी त्यांची नवरा-बायको " म्हणूनची जोडी सामन्य जोडीच म्हणून परिचित होती.

    असे असले तरी जवळच्या मित्र-मैत्रिणीमध्ये आणि नातेवाईकात अरविंद आणि वसुधा हे जोडपे .गर्विष्ठ , अहंकारी ,शिष्ट "म्हणूनच ओळखले जायचे .

    याची कारणे ही होतीच की- मुलगा हुशार , मोठ्या पगाराची मोठ्या शहरात नोकरी , सुनबाई तितकीच मोठ्या पगारावरची नोकरी असणारी , अलिशान flat,, अरविंद-वसुधा मुलाकडे जायचे ते महागड्या गाडीने , किंवा एसी शिवाय नाही , मुलीचे सुखात नांदत असलेले घर , हे सगळे वैभव समोरच्या साध्यासुध्या माणसांना दिपवून टाकणारे असेच होते. लहानशा शहरात -गावात .अरविंद-वसुधा मोठ्या ताठ्याने मिरवत ,.अशा वागण्याने सोबतची माणसे दुखावतात -दुरावतात " याचा विचार करण्याची त्यांना गरज नव्हती.

    असे सगळे छान छान चालू असतांना रुळावरून फास्ट धावणारी त्यांची गाडी एकाएकी बिघडण्याची चिन्ह जाणवू लागली आणि त्यात काही दिवसांपासून तर अरविंदच्या वागण्यात -बोलण्यात खूपच बदल होतो आहे हे जाणवत होते ,आणि या जाणीवेने वसुधा काळजीत पडल्या .

    अरविंद जरा हायपर झाले आहेत, एरव्ही -संतुलित वागणारे पतिराज ,कशामुळे बिथरले आहेत याची कल्पना वसुधाताईंना होतीच .सहवासाने माणूस कळू लागतो असे म्हणतात ते खरेच होते ..अरविंदच्या बदलेल्या मन:स्थितीचे कारण गेल्या आठवड्यात आलेल्या मुलाच्या -किशोरच्या प्रस्तावामुळे -आलेले टेन्शन ..

    तसे म्हटले तर "आई-वडील आणि मुले .यांच्या नाते-संबंधात तणाव येण्याची कारणे फार जगावेगळी असतात असे नाही. पैसा -स्थावर-संपत्ती " हे तर अगदी कॉमन विषय असतात मतभेद होण्यासाठीचे निवृत्त झालेल्या आई-वडिलांच्या गाठीशी असलेल्या पुंजीवर डोळा नसला तरी बारीक लक्ष असतेच मुलांचे .

    किशोरने असाच एक प्रस्ताव ठेवला - आई-बाबा -तुम्ही गावाकडील सगळ्या गोष्टी आता डीसपोज करून टाकण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घ्यावा. ही भिजत घोंगडे ..फार काळ नका ठेवू . तुम्ही नेहमीप्रमाणे नुसता विचार कराल आणि घोळ मिटवणार केव्न्हां ? तुमचा स्वभाव बघता ..प्रत्याक्ष्य कृती करण्यापेक्षा केवळ विचार करण्यातच तुम्ही वेळ घालवाल.

    असे न करता ..आतापासून इथल्या गोष्टीतून मोकळे होण्याची तयारी सुरु ठेवा , आई लवकरच निवृत्त होणार आहे,

    हे लक्षात घेऊन..आत्ता पासून निर्णय घेण्यास तुम्ही सुरुवात करावी.आणि तुम्ही दोघांनी माझ्याकडेच यायचे आहे ",हे मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाहीये.

    एक मात्र महत्वाचे सांगतो- आम्हाला तुम्ही दोघे आमच्या जवळ असण्याची गरज आहे,आमच्या नोकरीच्या व्यापामुळे ,तुमच्या नातवंडांना डे-केअर सेंटर ठेवावे लागते , तुम्ही आलात तर , काही वेळ ते नक्कीच घरी राहू शकतील.त्यांची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर नसेल, पण तुमचा जास्तीत जास्त सहवास पोरांना मिळावा असे आम्हाला वाटते.

    तुम्ही दोघे ही सध्या तय्बेतीने धडधाकट आहात , त्यामुळे थकण्या अगोदर इकडे आलात तर सगळ्याच गोष्टींचे सुख आणि त्यातील आनंद उपभोगता येईल.

    आपल्या गावाकडे अजूनही मोठ्यांच्या मनात घर सोडून -गाव सोडून "जायचे मान्य नसते , आता तसे म्हटले तर,तुमचे मन रमावे असे फारसे तिथे काही नाहीये , तरी , मी घ सोडून जाणार नाही, सुनेच्या हाताखाली राहण्यात कमीपणा असतो" हे आईने पण मनात आणू नये.तुमची सून अशा विचारांची नक्कीच नाही.

    वेळेचे महत्व आणि काळाचे भान ठेवून, स्वतःचे इगो " बाजूला सारून योग्य वेळी माझ्या कडे या ,आम्ही तुमची वाट पाहतो आहोत.

    वसुधा -आपले चिरंजीव काय म्हणतात कळाले का ? आपण जुनाट विचाराचे , इगो असणारे म्हातारे झालोत असे सांगतायत , बरोबर आहे का हे ? तूच सांग .इतके वर्ष इथे आयुष्य जगलो ,इथे माणसात राहिलो ,ते सोडून का जायचे , हात-पाय धड आहेत तोवर कशाला जायचं कुठे ?

    अरविंद असे तिरसटपणाने बोलतील असे वसुधाला अपेक्षित नव्हते . अहो, अजून वेळ आहे ना या गोष्टींना ,आता पासूनच बीपी का वाढवून घेताय तुमचा ?

    आता काही बोलू नका ,शांतपणे घ्या .बघू नंतर .तरीपण माझे मन सांगते ..किशोरच्या प्रस्तावावर विचार करण्यास सुरुवात करावी ..काय सांगावे .आता पटत नाही पण...पुढे....????

    कथा –

    प्रस्ताव

    -अरुण वि.देशपांडे –पुणे.

    मो- ९८५०१७७३४२

    -----------------------------------------------------------------------------------------------------------------

    इतर रसदार पर्याय

    शेयर करा

    NEW REALESED