Prem-Kahani books and stories free download online pdf in Marathi

प्रेम -कहाणी

अरुण वि.देशपांडे –पुणे.

मो- ९८५०१७७३४२

प्रेम -कहाणी

------------------------------------------

प्रेमभावना एक आदिम भावना आहे. या भावनेचे सामर्थ्य इतके मोठे आहे की ,प्रेमा साठी काहीही करण्याची

मानसिक तयारी होते ., प्रेम ही श्रद्धा आहे ,, भक्ती आहे , प्रेमात समर्पण असते, प्रेमात मिलनाची फलश्रुती असेलच असे नाही , प्रेमात विरह असतो, वियोग ही असतो. प्रेमातले दोन जीव नदीच्या दोन किनारे असल्यासारखे सारखे असतात, जे असतात सोबत पण कधीच एकत्र न येऊ शकणारे .. ज्यांचे प्रेम सफल ते नशीबवान ,ज्यांचे प्रेम विफल ते आयुष्यभर प्रेमाची वेदना उराशी कवटाळून जगत असतात.सफल न झालेल्या प्रेमाची एक करुण-गाथा आज मी ऐकवणार आहे..

बरोबर पन्नस वर्षे झालीत या प्रेम-कहाणीला ...

कालेजच्या दिवसातील ही कहाणी जणू कालच घडून गेलीं असे वाटावे ,कारण या प्रेम-कहाणीतला राजकुमार ..आज लौकिक अर्थाने "वेडा - दिवाना ,प्रेमभंगाचे दु:खः उराशी कवटाळून जगतो आहे.व्यावहारिक दुनियेत जगावे लागते म्हणून तो जिवंत आहे .तहान-भूक सुटता सुटत नाही ..म्हणून ते ही चालू आहे. मनाने मात्र तो आपल्यात नाही ,तो ,त्याच्या दुनियेत रमलेला असतो. वास्तवातील दुनियेत त्याच्या मनाला अपार अवहेलना सहन कराव्या लागल्या ,,विरोध न जुमानता तो आपले प्रेम मिळवण्यासाठी झगडत राहिला , पण त्याला प्रिय-असलेल्या प्रेमाने जेंव्हा त्याला झिडकारले ..त्याक्षणी तो उन्मळून पडला .

दिवाकर आणि मी ..आम्ही दोघे शाळेच्या दिवसातले मित्र ,दोस्ती अधिकच गहिरी होत गेली ,कॉलेजमध्ये देखील आमची दोस्ती पुढे चालू राहिली .त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा असायचा , इतर मुलं पदवी मिळवून नोकरीच्या गाड्याला जुंपून घेत असत . दिवाकर एक हुशार -अभ्यासू विद्यार्थी नव्हता ,पण तो एक कलावंत होता, खेळाडू होता , वर्गाच्या भिंतीत अजिबात न रमणारा हा कलंदर मुलगा ..स्टेजवर , मैदानवर चमकणारा एक सितारा होता . घरचा श्रीमंत , पुढची काळजी नाही..त्यामुळे कॉलेज म्हणजे त्याच्या साठी एक आनंदवन होते .माझे तसे नव्हते ..पदवीधर होऊन नोकरी मिळवायची आणि वडिलांची जबाबदारी हलकी करायची , .. मला करायची महत्वाची पारिवारिक गोष्ट विसरून चालणार नव्हते

.

दिवाकर माझ्या मर्यादा ओळखून होता . माझ्यावर त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची बळजबरी तो कधीच करीत नसे .त्याच्या उपक्रमात मी सोबत असणे ही गोष्ट त्याच्यासाठी लकी आहे " असे बोलून दाखवायचा ,त्यामुळे त्याच्या नाटकाच्या वेळी , कविता वाचनाच्या वेळी , मैदानातील सामन्याच्या वेळी ..मी हजर असावे अशी त्याची इच्छा असायची.आणि मी अशावेळी त्याला नाराज करायचे नाही .हे ठरवलेले असायचे.

परिचित असणे आणि लोकप्रिय असणे .या दोन गोष्टी वेगळ्या असतात ..कॉलेजमध्ये तर हे जाणवत असते . आमचे कॉलेजचे दिवस पन्नास वर्षापूर्वीचे ..आजच्या सारखे फ्री -वातावरण मुळीच नव्हते ,मुलं -मुली ..एकत्र शिक्षण घेणाचा तो काल जुना नव्हता आणि फार आधुनिक ही नव्हता या वातावरणात ..तणाव नसला तरी मन-मोकळेपणा नव्हता , एक सुरक्षित अंतर सतत असायचे .अशा वातावरणात ज्या मुली मोकळेपणाने वावरत ..सहाजिकच त्या सर्वांच्या नजरेत भरणार्या असत , या मुलींशी आपली मैत्री असावी असे मुलांना वाटत असे. त्यावेळच्या मानसिकते प्रमाणे ..प्रेम करणे , प्रेम जुळणे .या गोष्टींना फारसे महत्व नव्हते . डिग्र्या घेऊन बाहेर पडायचे आणि आयुष्याला भिडायचे ..असा सरळ सरळ मामला होता.

असे असले तरी तारण्य सुलभ भावना आपली जादू दाखवीतच असते . भावनिक आकर्षण , शारीरिक आकर्षण वाटणे या नैसर्गिक भावना आहेत.तरुण मनास यांचे वावडे नसते ..आणि अशा वातावरणात "प्रेमांकुर " उमलत असतात .

कॉलेज -क्वीन होण्याची स्वप्नं पहाणर्या मुलींची संख्या कमी नसते , त्या प्रमाणे मुलींच्या हृदयावर राज्य करणारे चोकलेट-हिरो " चमकोगिरी करीत असतात ..आणि मग प्रेमवीरांच्या प्रेम-कहाण्या कॉलेजमध्ये गाजत असतात

अशा गुलाबी वातावरणातील हे दिवस फुलपाखरा सारखे रंगी-बेरंगी असतात, स्वच्छंदी मनोवृत्ती असते, मनात रम्य स्वप्न असतात ..थोडक्यात "जादुई असे हे दिवस " प्रत्येकाच्या वाट्यास यावेत असे वाटते ,पण तसे होत नसते ,कारण ..प्रेम "होणे हे सहजतेने घडणारी गोष्ट नाही.,दोन मनं जुळून येतात त्याचवेळी प्रेमाचा साक्षात्कार होतो .मनाचा -मनाला होकार " कळतो ..न बोलता ही सारे काही समजून येते ..हे प्रेम असे असते...!

कवी-कल्पना आणि प्रेम -एकमेकाचे छान सोबती असतात ..दिवाकर च्या बाबतीत हा गोड चमत्कार घडून आला ,ज्या दिवशी कोलेज मध्ये "लीना " नावाच्या एका सुंदर मुलीचे आगमन झाले..

ब्रेन विथ ब्युटी " अशी ही लीना .बघता बघता कोलेज क्वीन झाली...चतुर-चाणाक्ष ,बुद्धिमान लीनाला आपल्या सौंदर्याचा अभिमान होता , गर्व होता मुख्य म्हणजे .."हे आपले प्रमुख मोहिनी-अस्त्र आहे" याची तिला पुरेपूर जाणीव होती.

आपले महत्व सर्वांना जाणवावे " याची सतत काळजी घेणारी लीना ..कोलेज मधील सगळ्या उपक्रमात सहभागी असणे "हे कंपल्सरी होऊन गेले .सर असो वा विद्यार्थी ..लीना भोवती भिरभिरणाऱ्या पंख्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच होती.

नाटक आणि वांग्मय -मंडळ " हे दोन विभाग दिवाकरच्या हातात असल्यासारखे होते. ज्या मुला-मुलींना स्टेजवर चमकण्याची इच्छा असे..ते सगळे त्याचे दोस्त असायचे ..दिवाकर या सगळ्या गोष्टी मनापासून एन्जोय करीत असे.

कुणी दुखावले जाणार नाही" असे वागणार्या दिवाकरची हिरोगिरी " सर्वांना आवडत होती.

कविमनाचा दिवाकर , भावनाप्रधान नायकाची भूमिका करणारा दिवाकर ..कोलेज-क्वीन -.लीनाला आवडणार हे सगळेजन गृहीत धरून होते ..आश्चर्य म्हणजे ..असे काहीच घडले नाही ..लीना दिवाकरला अजिबात भाव देत नसे..तिच्या लेखी "दिवाकर एक सामान्य तरुण "या पलीकडे त्याला का एव्हढा भाव द्यायचा ?

लीना तिच्या धुंदीत बिनधास्तपणे वावरत असे.तिच्या सौंदर्याची भुरळ सर्वांना पडली होती.स्वतःच्या फायद्यासाठी ,ती तिच्या इच्छेप्रमाणे ..समोरच्या व्यक्तीशी वागत असे.आणि मनाप्रमाणे घडवून आणीत असे.

तिच्य्वर प्रेम आहे " असे मनोमन कबुली देणारे असंख्य प्रेमवीर कोलेजात निर्माण झाले ..लीनाला हे असे होणे" मनापसून आवडणारे होते ..आपल्या दिसण्यावर ,आपल्या असण्यावर सगळे जग प्फिदा आहे" हे ओळखून त्याप्रमाणे वागणारी ती एक चतुर सुंदरी होती " हे मान्य करावयास काहीच हरकत नव्हती.

एक दिवस दिवाकरने माझ्याजवळ काबुल केले की- तो लीनावर मनापासून प्रेम करतो आहे , तिचे प्रेम आहे की नाही ? हे त्याच्यासाठी महत्वाचे नाही.लीनाने त्याचे अवघे भाव-विश्व व्यापून टाकले आहे.लीना शिवाय तो आता जगू शकणार नाही.

दिवाकरचे हे प्रेम ..तद्दन - "एकतर्फी प्रेम आहे" त्याचा काही एक उपयोग नाही , मी त्याला म्हणालो ..वेडा आहेस तू दिवाकर ..तुझ्याविषयी तिचे काय मत आहे ? याचा विचार कर, तिच्या नजरेत तू एक नगण्य आहेस,एक सामान्य मुलगा या पलीकडे ती तुला ढुंकूनही विचारीत नाही ..यापुढे ही विचारेल .अशी अशा करू नकोस.वेळीच यातून बाहेर पडावेस हे उत्तम.

माझ्या भाषणाचा काही एक परिणाम झाला नाही ...लीनावरच्या आंधळ्या प्रेम-भावनेचा मोठ्ठाच पडदा दिवाकरच्या नजरेवर होता , त्याच्या मनात ..लीना विषयी अपार प्रेम होते ..मी माझ्या प्रेमाशी एकनिष्ठ राहीन" ,एक दिवस लीना माझ्या प्रेमाचा नक्कीच स्वीकार करील" बघशील तू.

ही गोष्ट आमच्या दोघात राहिली असती तर बरे झाले असते "असे म्हणायची वेळ आली...दिवाकर ने आपले लीना-प्रेम वागण्या-बोलण्यातून व्यक्त करण्यास सुरुवात केली ..आणि सार्वजनिक चेष्टेला सुरुवात झाली. लीनाला कुणी हे बोलून दाखवेल असे होणे नव्हते कारण .ती कोणत्या शब्दात समोरच्याला बोलेल ? याची कल्पना सर्वांना होती..त्यामुळे तिच्या वाट्याला जाण्याची हिम्मत कुणी करीत नसे. दिवाकरच्या बाबतीत मात्र सगळा मामला ओपन होता ..खुल्लम -खुल्ला. त्याला आपल्या लीनावरच्या प्रेमाची चर्चा करणे मनापासून आवडत होते ..हे लक्षात आल्यावर तर हरेक जण दिवाकारची मनमुराद फिरकी घेत असे.थोड्याच दिवसात ..लीनाचा - वेडा -प्रेमी ..अशी ओळख दिवाकारची झाली ..ती तशी व्हावी ..या साठी स्वतहा लीना इतरांना प्रोत्साहित करीत असते" ..हे आम्हाला जाणवत होते.

लीनाच्या प्रेमात वेडा झालेला दिवाकर ..हर एक गोष्टी मध्ये लीनास गृहीत धरीत होता . तिच्या पुढे पुढे करीत होता ..स्वतःच्या प्रेमाची खात्री पटवून देण्यात त्याला कमालीचा आनंद मिळत होता ..आणि लीना मात्र त्याला झुरळा सारखे झटकून टाकीत होती ..ती त्याचा अपमान होईल असेच वागत असतांना ..दिवाकर अधिकच वेड्यासारखा वागत राहिला ..कधी कधी आम्हाला त्याची चीड येत असे..दिवाकर मात्र लीनामय होऊन गेलेला होता.

एका उपक्रमाच्या निमित्ताने लीना आणि दिवाकर एकत्र आले ..,दिवाकरला तिचा सह्व्वास लाभणार "या कल्पनेने हर्षवायू होण्याचे बाकी राहिले होते या वेळी माझ्या प्रेमाची जाणीव नक्कीच होईल तिला ,आणि ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार बघ ..! त्याचा हा दुर्दम्य आशावाद पाहून ..मी मनोमन प्रार्थना करू लागलो ..लीनाच्या मनात दिवकर विषयी अनुकूल भावना असू दे. निदान त्याचा अपमान न करण्याची तरी तिला बुद्धी होवो .

...जे घडले ते ..आमच्या तरी काल्पेने पलीकडचे होते ...आम्ही समजत होतो त्यापेक्षा ..लीनाचे वागणे होते ...तिच्या घरातले वातावरण अतिशय मोकळे ..स्वातंत्र्य असलेले होते ...स्त्री-पुरुष मैत्री विषयीच्या तिच्या कल्पना ..बिनधास्त होत्या ..तसेच ती वागते ..तिच्या स्वैर -वागण्याची झलक दिवाकरला पहाण्यास मिळाली .....तिच्या घरी दिवाकर गेला ..त्यावेळी ..लीना आणि तिचा एक नातेवाईक -मित्र आपल्याच विश्वात भान हरपून गेलेल्या अवस्थेत त्यने पाहिले .... दिवाकरला आपल्या बद्दल नको ती माहिती मिळाली " हे लीनाला जाणवले ..पण, याच्या कडून काही धोका नाही" याची तिला खात्री होती.

दुसरे दिवसापासून दिवाकरशी तिने वेगळ्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली ..पहिल्यासारखी वागणूक आता जाणवत नव्हती ..कदाचित दिवाकरने जे पाहिले " त्याची वाच्यता करील की काय ..ही भीती नक्कीच असावी.

दिवाकर मात्र मनोमन दुखावला गेला होता . लीना असे वागणारी असेल ? त्याला खरे वाटत नव्हते ..त्याच्या मनातील प्रेमाचे चित्र ..बेरंगी होऊन गेले ..कशातच त्याचे मन लागेना .त्याची ही अवस्था पाहून लीना अधिकच निर्धास्त झाली ,त्याची मानसिक अवस्था अशीच रहाणे तिच्या साठी जास्त फायद्याचे होते ..

..

एकेदिवशी कोलेज सुटल्यावर ..तिने दिवाकर आणि मला थांबवले ..चहाच्या निमित्ताने आम्ही एकत्र बसलो , लीना आमच्या समोर आहे ..बोलत आहे " दिवाकरला खरेच वाटत नव्हते ..त्याच्या नजरेत लीना विषयी वाटणारे प्रेम दिसू लागले ..तो पुन्हा आपले प्रेम व्यक्त करू लागला ....!

हे पाहून ..लीना संतापली - दिवाकर ..तुला तुझी लायकी काय आहे..हे हजारदा दाखवून दिले , सगळ्यान समोर तू काय आहेस हे जाणवून दिले तरी तुझ्या डोक्यात उजेड पडत नाहीये ..एक लक्षात ठेव ..मी तुझ्यासाठी नाही.माझी स्वप्न ..माझ्या इच्छा ..तुझ्या कल्पनेपलीकडच्या आहेत..तू जर असेच वागत राहिलास तर..मी सगळ्यांना सांगत सुटेन- दिवाकरने वाईट हेतूने माझ्याशी मैत्री ठेवण्याचा प्रयत्न केला ..त्याचा हा हेतू पूर्ण होऊ शकला नाही "म्हणून प्रेमाचे खोटे नाटकं करतो आहे "..

दिवाकर ..माझे हे आरोप सगळ्यांना खरे वाटू शकतात ..कारण..सगळ्यांचा विस्वास माझ्यावर आहे ..तुझ्यावर नाही.तेव्न्हा ..माझा नाद सोडून दे ..!

लीना निघून गेली ..मी दिवाकरकडे पहात होतो ..उध्वस्त झालेला माझा मित्र ..निर्विकार बसून होता ..लीनावर मनापासून प्रेम केले ..या एकनिष्ठ प्रेमाचे फल काय मिळाले ? स्वार्थी लीनाने एक निर्मल भावनेचा पार कचरा करून टाकला ,दिवाकारचे चुकले ..त्याने प्रेम केले ते लीना सारख्या अवगुणी -मुलीवर .जिच्या लेखी प्रेम ही भावना नाहीच , मन "नावाची वस्तू तिच्या जवळ आहे ती फक्त व्यावहारिक जगात वावरण्यासाठी , तिचे सौंदर्य ..ज्याचा उपयोग शारीरिक सुखासाठीच करायचा असतो ..या भांडवलावर आयुष्य मौजमजेचे आहे " अशी धारणा असलेली लीना "मानवी स्वभाव -वृत्तीचे एक उदाहरण आहे..भावना आणि व्यवहार ..याची गल्लत जे करतात ..त्यांना दिवाकारचे उध्वस्त जगणे स्वीकारावे लागते .

दिवाकर पुन्हा उभारी घेऊच शकला नाही ..लीनाच्या बेदरकार वागणुकीचे फटके तिचे तिला सहन करणे चुकले नाही..यथावकाश ..आमच्या आयुष्यातून लीना वजा होत गेली ..पण दिव्कारचे आयुष्य उध्वस्त करून गेली ते गेलीच .

माणसात रमणारा माझा मित्र माणसातून उठला ..एकाकी आणि एकांतवासी जगणे "त्याने स्वीकारले ..त्याच्या प्रेम-कहाणीतला असफल अध्याय ..जीवाला दु:खाच्या खाईत लोटणारा ठरला .इतकी वर्ष झालीत या गोष्टीला ..आज ही मी दिवाकरला न चुकता भेटायला जातो ...सगळे काही हरवून बसलेला माझा मित्र ..एक शब्द न बोलता माझ्याकडे पाहत बसतो ......!

काही वेळाने मी तिथून परत निघतो ..उद्या पुन्हा दिवाकरला भेटायचे असते म्हणून.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED