Naatyancha pravas books and stories free download online pdf in Marathi

नात्यांचा प्रवास (लेख संग्रह )

नात्यांचा प्रवास

(लेख संग्रह )

अरुण वि. देशपांडे

लेख.१

"आईचे महत्व...!"

मुलांच्या भावनिक जीवनात "आईचे महत्व" खूप असते.

"आई आणि वडील" यांच्यामध्ये मुलांचे जास्त भावनिक नाते",

हे आईबरोबर जोडलेले असते. जन्मदात्या -आईशी " हे जवळचे

भावबंध स्वाभाविक आणि सहजपणाचे असतात.

"आपल्या मुलांवर प्रेम करावे "- हे कधी कुणा आईला सांगावे लागलेले

आहे का ?

आईचे माया , तिचे प्रेम, आपल्या कुटुंबाविषयी तिला असलेली ओढ आणि

काळजी ", या गोष्टी मुलांनाही कळत असतातच ना.! आईची त्याग-भावना ,

आणि निस्वार्थी -प्रेम भावना " या दोन्ही तर साऱ्या जगाने मान्य केल्या आहेत की.

"जगातील सव भाषा मधून, त्यातील साहित्या मधून आईचे महत्म्य आणि महत्व

अगदी मोठ- मोठ्या लोकांनी मुक्त-कंठाने व्यक्त केलेले आहे " हे ही आपण पाहतो.

आईच्या मनातील उत्कट भावनेमुळे "आईचे प्रेम" मुलांना सतत

जाणवत असते. म्हणूनच एखादे घाबरलेले मुल, भीतीने भेदरलेले मुल.

आईच्या कुशीत शिरले की "भयमुक्त होते."

आईच्या मायेच्या स्पर्शाने

हे बाल स्वतःला सुरक्षित समजत असते.

"स्त्री-पुरुष", "आई आणि बाप", या दोन्ही नाते-स्वरूपात ज्यावेळी

मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो", त्यावेळी , मुलांचा योग्य सांभाळ ,

आणि योग्य संगोपन"- बापापेक्षा "- मुलाची आई जास्त योग्य करू शकते ',

यावर नेहमीच एकमत झालेले आहे.

आईच्या मनातील उत्कट भावनेमुळे "आईचे प्रेम" मुलांना सतत

जाणवत असते. म्हणूनच एखादे घाबरलेले मुल, भीतीने भेदरलेले मुल.

आईच्या कुशीत शिरले की "भयमुक्त होते." आईच्या मायेच्या स्पर्शाने

हे बाल स्वतःला सुरक्षित समजत असते.

"स्त्री-पुरुष", "आई आणि बाप", या दोन्ही नाते-स्वरूपात ज्यावेळी

मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो", त्यावेळी , मुलांचा योग्य सांभाळ ,

आणि योग्य संगोपन"- बापापेक्षा "- मुलाची आई जास्त योग्य करू शकते ',

यावर नेहमीच एकमत झालेले आहे.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती -मुलांना आपली आईच महत्वाचे वाटत असते.

मनातले सारे काही सांगायचे ते आईला ..!" हे विश्वासाचे नाते आई आणि मुलातील

भाव-बन्ध अधिक बळकट करणारे आहे.

कुटुंबासाठी सतत झटणारी , निस्वार्थी पणे प्रेम करणारी, सर्वांची काळजी घेणारी आई ,

घराला आपले सर्वस्व मानणारी आई, आणि "आईला आपले सर्वस्व मानणारी मुले

आपल्याला भोवताली दिसतातच की...!

हे असे आहे "आईचे महत्व"..!

***

लेख-२

आठवणीत हरवणे ...|

तुम्हा -आम्हा सर्वांच्या मनात आठवणीच -आठवणी साठलेल्या असतात .

"व्यक्ती तितक्या प्रकृती "- तसे आठवणींचे असते. कुणाच्या आठवणीत

काय असेल ? सांगता येत नाही.

"आठवणीत हरवून जाणे "- हे आपला स्वभाव हळवा असल्याचे लक्षण आहे.

आठवणी ह्या बहुतांशी " आपल्या निकटच्या - आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तीशी

निगडीत असतात. त्या अनुषंगाने घडलेले "प्रसंग किंवा घटना " या आपल्या

मनात , स्मृतीपटलावर कायमच्या कोरल्या गेलेल्या असतात. सहाजिकच त्या

क्षणांना आपण कधीच विसरू शकत नाही."

हे पुन्हा पुन्हा आठवणे सुद्धा मनाला एक हळवे समाधान देणारे सुखच आहे."

मनाच्या हुरहुरत्या अवस्थेत "आठवणीत हरवून जाणे" ही हमखास घडणारी एक

मानसिक प्रक्रिया आहे.

"आपण आपल्यातच हरवून जाणे," आजूबाजूच्या दुनियेचा विसर पडून जाणे " असे

हे आठवणीत हरवून गेल्यावर होऊन जाते.

या आठवणी "कधी डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणाऱ्या असतात, कधी अस्फुट असे

हुंदके घशाशी आणणाऱ्या असतात." तर "कधी आठवणी मनाला नवी उमेद देतात ",

आठवणी पुन्हा ताज्या झाल्या की "मनाला हुरूप आल्या सारखे वाटून जाते."

"जुन्या जखमा कुरवाळीत बसणे..." म्हणजे "आठवणीत हरवून जाणे " एवढेच नसते.

"सहवासात येऊन गेलेल्या माणसांना भरली मनाने आठवणे "-ही सुद्धा आठवणी आहे.

"आपल्या हातून घडून गेलेल्या चुकांपासून बोध घेणे आणि त्या

दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून पाहणे" हे ही घडून जाऊ शकते ते

केवळ "आठवणीच्या पाठबळावर ." कारण त्या घटना , ते घडून घेलेले

प्रसंग " आपल्याला जीवनानुभव " देऊन गेलेले असतात. ते पुन्हा -पुन्हा

आठवणे ' आणि मनाला "नव्याने काही शिकण्यास मिळणे ", हे आठवणींचे

आपल्या उपकारच आहेत ", असे म्हणावेसे वाटते.

"एक- एकट्याचा एकांत - आणि आठवणी" यांचे अतूट असे नाते आहे. दूरवर

नजर लावून विचारात गढून गेलेले कुणी दिसले के समजावे" आठवणीच्या

आठवणीत हरवून गेलेला दिसतेय स्वारी.'!

" आठवणीचे ."-हे येणे

झुल्यावारचे झुलणे

हिंदोळ्यावर झुलावे

मनालागी सुखवावे .......||

हे लेखन वाचून तुम्ही तुमच्या आठवणीत हरवून जाल हे नक्की .

***

लेख-३

बालक - पालक : एका नाजूक नात्याचा हळुवार प्रवास ":

आज काल बालक आणि पालक यांच्या संबंधांबद्दल खूप काही बोलले

जाते.काही बाबा आपल्या मुलांबरोबर अति-शिस्तशीरपणे वागतात

आणि मुलांना सतत धारेवरती धरून धाकाखाली राहिले पाहिजे असे

वागतात.आजूबाजूला पाहिले तर यात थोडे फार तथ्य असावे असे वाटते.

एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे की मुलांना आई-बाबाच्या बद्दल धाक न

वाटता माया आणि प्रेम वाटले पाहिजे.

काही दिवसापुर्वीच्या प्रवासातील हा एक अनुभव ,शेअर करतो ,

आम्ही पुणे -परभणी दौरा करीत होतो.

औरंगाबादहून मराठवाडा एकसप्रेस ने जायचे म्हणून स्टेशनवर आलो तो

तुफान गर्दी.नंतर कळले -आज शाळांच्या सुट्टीचा शेवटचा दिवस. गर्दीच

गर्दी-डब्यात शिरण्यासाठी चेंगरा-चेंगरी करावी लागली. तेव्न्हा कुठे दोन्ही

पायांवर्ती उभे राहण्या पुरती जागा मिळाली या आनंदत प्रवास सुरु झाला.

समोरच्या कोपऱ्यातल्या खिडकीजवळ एक देखणा तरुण आणि त्याच्या

सोबत चार वर्षांचा एक चुणचुणीत छोकरा होता.एवढ्या गर्दीत त्यांचे

एकमेकांशी धिंगाणा करीत ,मस्त बोलणे चालू होते. गप्पा करतांना तो

छोकरा छोटा भीम मधील संवाद अगदी सही सही म्हणून दाखवत होता.

२ तासांचा प्रवास झाला तरी ते दोघे एकमेकाला कंटाळलेले नव्हते उलट नवे

नवे विषय काढून छान टाईमपास करीत होते- हळू हळू आम्हालाही जागा

मिळाल्या मुळे त्या दोघांच्या गप्पात सामील होऊ लागलो. तो गोड मुलगा-

"अथर्व " नाव त्याचे. सगळ्यांचे मनोरंजन करीत होता.

मध्येच भूक लागली असे स्वारीला जाणवले असावे. त्या सोबतच्या तरुणाने

डब्यातून पोळी -भाजी आणि चटणी हातात घेऊन त्याचा एकेक घास अथर्वला

भरवला. न सांडता पाणी पाजले. भरल्या पोटी दोघांच्या छान धिंगाणा सुरु झाला.

एवढ्या वेळात आम्ही "अथर्वचे " दादा-दादी " झालो होतो.

मी त्या तरुणाला विचारले- हा तुमचा पुतण्या की भाचा ?

अहो काका- मी याचा बाबा आणि हा माझा मुलगा आहे'--

का? माझा मुलगा वाटत नाही का?

अरे तसे नाही हो-,मुलाशी इतक्या खेळकर पणाने बोलणारा एक बाबा " मला आज

खूप दिवसांनी पाहायला मिळाला. म्हणून आश्चर्य वाटले आणि आनंद झाला.

आणि एक सांगू का-ही मुले लहान काका, मामा, मावशी, ताई, भैया अशांशी

इतक्या सहजतेने मिसळतात. मलाहे त्या मुळे वाटले तुम्ही याचे काका-मामा असेच

असणार.

बर तुमचे नाव सांगाल काय "? मी विचारले.

मी आतिश. कापड दुकान आहे आमचे.

अरे वा-! मग आमच्या गप्पा सुरु झाल्या .माझेही अनेक परिचित होते या गावी.

मग मी म्हणालो- तुम्ही तुमच्या अथर्व बरोबर इतके छान कसे वागता ?

काका-मी ठरवलय-माझ्या मुलाला माझ्या बद्दल प्रेम वाटले पाहिजे,त्याला भीती वाटली

नाही पाहिजे. आणि स्वामी समर्थ कृपेने माझ्यात खूप चांगला बदल झाला आहे. त्यांच्या

संस्कार-शिकवणीने मी खरेच अमुलाग्र बदलून गेलो आहे.

अगोदर मी कसा होतो -हे कुणाला हि विचारू शकता तुम्ही. आता तसा नाही हा आतिश.

संस्कारांची अशी जादू मला अनोखी वाटत होती. मनाला जाणीव होणे महत्वाचे असते.

आपल्या मुलाशी -अथर्व" बरोबर कसे वागायचे हे आतिश नावाच्या बाबाला अगदी अचूक

उमजेले होते. असेच उमगणे अनेक आई आणि बाबाना आले तर बालक आणि पालक

यांचे नाते अधिक मधुर होण्यास मदत होईल.

आतिश अग्रवाल आणि चि.अथर्व यांची आठवण भेट खास तुमच्या साठी.

***

लेख- ४

हे असे का होते ?

मित्र हो,

आपण सारे सर्वजण सामान्यजन " आहोत, हे मान्य केले की ,बाहेरच्या

जगातील अनेक गोष्टींचे जे अदृश्य असे "दडपण " आपल्या मनावरती आलेले असते

ते कमी होण्यास मदत होते. पण अनके वेळा आपणच आपले स्वतःचे मूल्यमापन करतांना

झुकते माप देऊन, आपल्या बद्दलच्या भ्रामक - कल्पनांना अधिक बळकटी देतो. हे असे का होते ?

तर सभोवतालीच्या वातावरणाचा पुरेसा अभ्यास नाकारता, आणि स्वताच्या मर्यादा न ओळखता ,

चार- चौघात वावरतांना ज्या काही चुका होतात, त्यमुळे आपले वावरणे ,वागणे, आणि बोलणे हे

सारे काही " हास्यास्पद " होऊन जाते.-- हे असे का होते..?

तर, आपण स्वतःला "अभ्यासोनी प्रकटावे " या पद्धतीने सादर करीत नाही. आणि त्यामुळे "चार -चौघात"

फजिती होते". त्यामुळे "प्रसंगी श्रोत्याची भूमिका घेऊन, समोरच्या व्यक्तीची ऐकून घेणे श्रेयस्कर .

अपुऱ्या- माहितीवर आधारित आपले संभाषण ऐकून लोकांची करमणूक होते आहे" ,हे मान्य करण्याची

सुद्धा काही जणांची तयारी नसते.. हे असे का होते ?

स्वतःकडे कमीपणा घेऊन, दुसऱ्यांचे मोठेपण मान्य करण्याची तयारी ज्या वेळी आपल्या मनाचे होईल,

त्यावेळे पासून खूप फरक पडेल. अगोदर श्रोते व्हा , साठ्वेलेले ज्ञान तुम्हाला आपोआपच बहुश्रुत बनवेल.

घाईघाईने स्वतःचे "प्र- दर्शन " करण्याच्या वृत्तीवर अंकुश ठेवता आला तर बरेच .., नसता ,

"अपयश आले के- माझ्याच बाबतीत - हे असे का होते ?" हा प्रश्न सुटणार नाहे.

काय वाटते तुम्हाला -? सांगा बरे ?

***

लेख-५

विद्यार्थी मित्रांनो- अभ्यास असा करावा"..!

शाळेला- कालेजात जाणाऱ्या प्रत्येक मुलाला -विध्यार्थ्याला "अभ्यास" म्हणजे

एक मोठा बागुलबुवा " वाटत असतो. पण मित्रांनो , तुमच्या पुढील यशस्वी -

जीवनासाठी "अभ्यासच अतिशय महत्वाचा आहे." तो केल्या शिवाय परीक्षेत यश नाही ,आणि

परीक्षेत यश नसेल तर ?, जीवनात यश मिळवता येत नाही.

तसे पहिले तर तुम्ही विद्यार्थी अभ्स्यास करीतच असता , पण कधी कुठे चुकते ? कळत नाही.

आणि परीक्षेत कमी मार्क्स मिळाले की "घरात तणावाचे वातवरण असते." शाळेत शिक्षक नाराज, घरी आई आणि बाबा

नाराज " काय करावे सुचत नाही.

अशा वेळी मी तुम्हाला काहे सुचवून पाहतो, प्रयत्न करा- झाला तर फायदाच ,नुकसान नकीच नाही..

मी तुमच्या साठी काही युक्तीच्या गोष्टी सांगतो, त्या प्रमाणे "प्रभावीपणे -

अभ्यास कसा करावा ?' या प्रश्नाचे उत्तर सापडले असे तुम्हाला वाटले तर मला

खूप आनंद होईल.

१. अभ्यासाच्या जागेची निवड.:-

घरतील तुमची आवडती खोली, एखादा कोपरा -खिडकी जवळचा , किंवा किचन

मधील टेबल, किंवा तुमची फेवरिट खुर्ची ,असे काही असले की तुम्हाला कधी ही

अभ्यासाचा मूड " लागतो. असे असेल तर हे जरूर ठरवा, आणि या नेहमीच्या जागी

अभ्यासाला बसल्यावर " छान अभ्यास होतो " हे लक्षात ठेवून ही ठराविक जागा

तुमच्या अभ्य्साची म्हणून निवडा आणि मनापासून इथे अभ्यास करा.

काही मित्रांना अभ्यास करतांना गाणी ऐकणे खूप आवडते, हे देखील वाईट नाही.,पण अभ्यासावर

यांचा विपरीत परिणाम होऊ देवू नका.

काही मित्र इतर गोष्टीत रमून जातात.आणि अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत.

परीक्षेच्या वेळी त्याना "जाग" येते. हे काही उपयोगाचे नाही."तहान लागल्यावर -

विहीर खोदून काय उपयोगाचे ?" त्या साठी असा ऐन -वेळीचा अभ्यास टाळा .

थोडा -थोडा का होईना पण रोज ,आणि नित्य -नेमाने अभ्यास करावा . आणि 'जागरणे

टाळावीत . छान आणि पूर्ण झोप झाल्याने मन ताजे तवाने होते, आणि अभ्यास छान होतो .

म्हणून -थकलेल्या मनाने - आणि पेंगुळत्या डोळ्याने अभ्यास करू नका .त्याचा काही एक

उपयोग होणार नाही .

अभ्यासाचे नियोजन करा :-

एका वही मध्ये/ रजिस्टर मध्ये पुढील आठवड्यात करावयाच्या

अभ्यास कार्यक्रमाचे नियोजन करा.हे नुसते लिहून थांबू नका , तर

त्या प्रमाणे अभ्यास होतो आहे ना ! हे पाहणे गरजेचे आहे.

शाळेच्या वर्गात,आणि कोचिंग क्लासमध्ये सुद्धा नोट्स उतरवून घ्याव्या लागतात.

या नोट्स , आणि हैन्ड-आउट्स, आणि होमेवर्क बद्दल लक्षात ठेवावे लागते.हे सर्व

सुटे-सुटे कागद ऐनवेळी सापडले नाहीत तर टेन्शन येते, असे होऊ नये म्हणून

हे नोटस., पेपर्स . आणि इतर माहितीचे कागद वेगवेगळ्या फोल्डर्स मध्ये क्रमवार

लावून ठेवले तर गरजेनुसार हे शोधणे सोपे होते.आणि गोंधळ टाळता येतो.

अभ्यासाची पूर्व- तयारी ही वर्षभरासाठी करायची असते. हे लक्षात ठेवून सर्व reference ,

संदर्भ, -पेपर त्या-त्या विषयाच्या बाईंडर मध्ये ठेवावे,या कामात कुणाची मदत लागेल तर ,

संकोच करू नका.आणि माहिती झाल्यावर या कामात खंड पडू देऊ नका.

वाचून झालेले धडे , यातील reference / संदर्भ , imp -points ,

imp - chapters महत्वाचे उतारे, हे सगळे स्वतःच्या शब्दात

वेगळ्या कागदावर उतरवून ठेवा , आणि ही लक्षपूर्वक वाचीत जावे,

आणि टिपण्णी मुळे, झालेला / केलेला अभ्यास लक्षात राहण्यास मोठीच

मदत होते.

आपले वर्ग-मित्र आणि इतर मित्र , यांच्या सोबत अभ्यासा बद्दल नेहमी आणि

नियमित चर्चा करावी. अशा परस्पर -चर्चा खूप उपयुक्त असतात .यातून महत्वाचे

संदर्भ मिळतात, कठीण वाटणारे प्रश्न सोडवण्यास मित्रांची मदत होते..

अभ्यासा बद्दल मार्गदर्शन करणार्या संस्था आणि केंद्र ,तेथील

तज्ञांची मदत घ्यावी. मनाचा गोंधळ कमी होण्या साठी हे आवश्यक आहे.

मित्रानो,

अभ्यास करणे"- हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते, आणि पुढील यशस्वी जीवनासाठीचे

ते ध्येय असते." यास्ताही आपल्याला परिश्रम आणि वेळ" -(time & efforts ) यांचा

योग्य समन्वय साधता आला पाहिजे. आणि त्या साठी "अभ्यासाची सवय लावून घेतलीच पाहिजे".

आजकाल दहावीचा विद्यार्थी घरात असला म्हणजे "

घरातील सारेजण "अपेक्षित यशाच्या दडपानाखाली

वावरत असतात.आणि या विध्यार्थ्यावर अनके बंधने

येतात.पण हे बरोबर नाही.पालकांनी संयमाने हे दडपण

हाताले पाहिजे.

आणि विध्यार्थी मित्रा- तू सुद्धा आई-बाबांच्या या बंधनाच्या

विरोधात न जाता "आई-बाबांची तळमळ , त्यांची काळजी

समजून घे.आणि परीक्षेची तयारी चालू आहे, या बद्दल त्यांची

खात्री पटली पाहिजे, या साठी नियमित अभ्यास चालू ठेव,

या मुळे तुझ्यावरची बंधने कमी होऊ शकतील.

पण, विरोधा साठी विरोध" दोघांनी ही करू नये.

"शालेय जीवनातील अभ्यासाची सवय" , ही पुढील शिक्षणाचा

पाया भक्कम करणारी असते. आणि उत्तम अभ्यास म्हणजे उत्तम यश" ,

हे समीकरण सर्वांना आवडणारे असते. मित्रानो - तुमच्या अशा

अभ्यासपूर्ण यशाचा आनंद साऱ्या कुटुंबाला मिळतो., तुमच्या गुरुजनाना आणि,

मित्रांना तुमचे कौतुक असते.

तेव्न्हा - "अभ्यास शिवाय पर्याय नाही"- हे लक्षात असू द्या.

" यशवंत व्हा - गुणवंत व्हा ...!"

नात्यांचा प्रवास

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED