Ti Chan Aatmbhan - 8 books and stories free download online pdf in Marathi

ती चं आत्मभान... 8

८. वेगळ्या वाटेवर..

शुभदा दाणी.

प्रत्येक आई आपल्या मुलाच चांगल व्हाव ह्यासाठी झटत असते पण माधवी सारख्या काहीच आया मुलाला वेगळी वाट निवडायला पाठींबा देतात. अश्याच एका वेगळ्या वाटेवर मुलाला पाठींबा देणाऱ्या आईची हि गोष्ट.

आज विस्मयच्या शाळेत ओपन हास होता. विस्मयनी पेपर छान सोडवले होते आणि जेव्हा पेपर घरी मिळाले तेव्हा निबंध वाचून माधवी उत्साहानी बोलायला लागली,

"विस्मय अरे तू तर मराठी मधील निबंध तर मस्त लिहिलास रे! तुझ कौतुक आहे, तू असा विचार करतोस." माधवी त्याची आई कौतुकानी बोलली. पण माधवीला कुठे माहित होत, विस्मयनी जे लिहील होत ते त्याला खरच करायचं होत. विस्मय आईच बोलण ऐकत होता. त्यानी आईला मानेनी नकार सांगितला. आणि तो बोलला,

आई, हा फक्त निबंध नाही. मला खरच सैन्यात भरती होन देश सेवा करायची आहे, निबंधात लिहिल्या प्रमाणे मला भारतीय सेनेत दाखल व्हायचे आहे. फक्त निबंध लिहिण्यासाठी नाही लिहील. मला माहितीये आई, मी आधी कधी ह्याबद्दल बोललो नाही पण माझी खूप इच्छा आहे देशासाठी काहीतरी करायची. मी जेव्हा युनिफॉर्म मधल्या आर्मी ऑफिसर्स ना पाहतो तेव्हा माझी आर्मी मध्ये जायची इच्छा अधिकच प्रबळ होते. माधवी विस्मयच बोलण ऐकत होती. आधी तिला थोडा धक्का बसला. पण माधवी भानावर आली आणि माधवीचा ऊर अभिमानानी भरून आला. आपल्या मुलानी इतका विचार कधी केला असा विचार माधवी करायला लागली. पण तिच्या मनाला घोर लागला होता. मुलाला सैन्यात पाठवण्याचा निर्णय नक्कीच मोठा होता. पण माधवी इतर आयांसारखी कधीच न्हवती.त्याला हो म्हणाव की नाही असा विचार माधवी करत होती. माधवी विस्मय ला काहीही उत्तर न देता जरा वेळ शांत बसून राहिली. आणि ती एका निर्णयावर आली. माधवी वेगळीच होती. सर्वसामान्यांसारखा विचार करणारी ती न्हवती. त्यामुळे विस्मयच्या स्वप्नांना बळ देण्याचा तिने निर्धार केला. मुलाची मोठी स्वप्न पाहून त्याला नाही म्हणण्याच धाडस त्या आईकडे न्हवत. आणि विस्मयला नाऊमेद न करता ती बोलली.

"अरे तू आता फक्त पाचवीत आहेस. थोडा मोठा हो आणि तुझी स्वप्न नक्की पूर्ण होतील. मी सैन्यात प्रवेशाकरीता काय करायला लागेल ह्याची चौकशी करायला लागते.", माधवी म्हणाली, "पण कष्ट मात्र खूप आहेत विस्मय..एकदा निर्णय घेतलास कि मागे मात्र यायचं नाही. धर सोड मला अजिबात आवडणार नाही." त्यावर विस्मय ठामपणे उत्तरला, "आई मी कष्ट करायला तयार आहे हे. मला नेहमीच देशाची सरहद खुणावते. तू काळजी नको करूस. मागे हटणार नाही मी." आईचा आपल्याला पाठींबा आहे हे जाणवल्यावर विस्मय भरभरून बोलायला लागला आणि विस्मयच हे बोलण ऐकून माधवीच्या डोळ्यात पाणीच आल. आणि तिने विस्मयला मिठी मारली. आणि सैन्यदलात भारती होण्यासाठी सगळी माहिती काढण्याचा निश्चय केला.

विस्मय सैन्यात भरती होण्याबद्दल बोलला त्यानंतर माधवीच्या मनात असंख्य विचार होते पण आता ती मागे हाटणार न्हवती. तिने विस्मयच्या बाबांशी चर्चा केली. त्यांचाही मत विस्मय ला जे आवडत आहे ते करू दे असच होत. त्यामुळे माधवीचे विचार अधिकच दृढ झाले, आपला मुलगा वेगळी स्वप्न पाहतो आणि माधवी त्या स्वप्नांना बळ देणार होती. त्यामुळे माधवीने सगळ्या विचारांना मागे टाकत सैन्यभरती प्रक्रिया समजून घेत होती. तिला मुलाच्या स्वप्नांचा हिरमोड करायचा न्हवता. आणि माधवीच्या वाचनात पेपर मधली बातमी आली. माधवी उत्साहानी पेपर घेऊन विस्मय जवळ गेली,

"अरे विस्मय, हे पहिले का पेपर मधे बघ, तुझ्या करीता सुवर्णसंधी छापून आली आहे". विस्मयनी सुद्धा बातमी वाचली आणि त्याचे डोळे लकाकले,

"आई, खरच ग! ही बातमी माझ्यासाठीच आलीये..मी म्हणलो न्हवतो, सैन्यदल मला खुणावत आहे." विस्मय उत्साहात बोलला,

आणि बातमी वाचताच त्या परिक्षेला त्याने बसायची तयारी दाखवली. विस्मयनी बातमी परत एकदा नीट वाचली, त्याची शाळा आता डेहराडून आठवी ते बारावी असेल. आणि महाराष्ट्र राज्यातून फक्त दोन विद्यार्थ्यांची निवड होणार होती. ते वाचून विस्मय थोडा अस्वस्थ झाला आणि त्याची थोडी चलबिचल झाली. माधवीने ते हेरलं आणि तिने विस्मयला प्रश्न केला, "नाही जमणार विस्मय तुला देहरादूनला जायला? मी तुला सांगितलं होत, एकदा निर्णय घेतला कि निर्णयावर नेहमीच ठाम राहायचं. तू ठरवलं आहेस ना तुला सैन्यात भरती व्हायचं आहे मग आता मागे हटायचं नाही. मला माझा मुलगा कमकुवत झालेला चालणार नाही." आईचे धारधार शब्द विस्मयच्या मनात खोलवर गेले आणि तो हसला,

"नाही आई.. मी नाही मागे हटणार! मला एक मिनिट भीती वाटली खरी पण आता मी मागे हटणार नाही. आणि परीक्षेला बसणार. त्यात पास होऊन डेहराडूनला शिकायला जाणार. पण आई, परिक्षेसाठी खूप स्पर्धा असेल ना? माझ सिलेक्शन होईल ना?" त्यावर माधवीनी त्याला खात्री दिली, “अरे आपण तयारी ही मस्त करू. मग तुझ सिलेक्शन नक्की होईल. पाण्यात पडायचं ठरवलं आहेस ना? मग आता मनात कोणतीही शंका नाही ठेवायची विस्मय!!” माधवी विस्मयचा हुरूप वाढवत होती. आणि माधवीला विस्मय जोरदार तयारीला लागणार याची खात्री पटली. पाहता पाहता विस्मय मनानी अधिकाधिक कणखर बनत होता आणि त्याची भारतीय सैन्यात भरती होण्याची इच्छा अधिकाधिक प्रबळ होत होती.

माधवीनी पुण्याहुन पुस्तक आणली. धाडस, आत्मविश्वास वाढवण्यासाठी माधवी आणि विस्मयनी भरपूर कष्ट घेतले. विस्मयनी भरपूर अभ्यास केला आणि कठीण वाटणारी परीक्षा पास केली. विस्मय आणि माधवीच्या कष्टाचं चीज झाल आणि त्याची डेहराडूनला RIMC मधे निवड झाली. विस्मयच्या कष्टांच चीज झाल होत. त्यावेळी विस्मयच्या चेहऱ्यावरचा खूप आनंद झाला माधवी सुद्धा खूप खुश होती पण तिच्यासाठी सुद्धा हा निर्णय खूप मोठा होता. डेहराडूनला जायचा दिवस जवळ यायला लागला तसे विस्मयच्या मनात असंख्य विचार चालू होते. विस्मयच आयुष्य बदलणार होत आणि त्याला सुद्धा त्याची जाणीव होती पण तो निर्णय सर्वस्वी त्याचाच होता त्यामुळे विस्मय मागे हटणार न्हवता. पण मनातल्या शंका त्याची पाठ सोडत न्हवत्या.

“इतके दूर डेहराडूनला कसे जायचे? ट्रेन, बस, कसे जायचे, किती दिवस लागतात? आणि माझ्या जवळ आई बाबा आणि चिन्मय कोणीच नसणार?” विस्मयला अनेक प्रश्न पडत होते. त्याच मन मधेच उदास होत होत पण त्यासाठी देशाची सीमा त्याची वाट पाहत होती त्यामुळे असंख्य प्रश्न तसेच ठेऊन चालायला लागला. आणि चालता चालता त्याला अनेक उत्तर सापड़त होती कारण त्याच्यामागे माधवी खंबीर उभी होती. तिच्या भक्कम पाठिंब्यामुळे विस्मयला कधीही आपल्या निर्णयावर शंका आली नाही.आणि विस्मय अधिकाधिक कणखर बनत होता.

बघता बघता डेहराडूनला जायचा दिवस उजाडला. सगळ कुटुंब डेहराडूनला पोचले. परिसर मस्त होता. तिथे शिरल्या शिरल्या सैन्यातल्या शिस्तीचा अंदाज विस्मयला आला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आल. त्याला अंदाज आला, पुढचा प्रवास सोप्पा नसणारे पण त्यासाठी विस्मयची मानसिक तयारी झाली होती. पण जशी त्याला जाणीव झाली कि आई बाबा आणि भाऊ आता त्याच्यासोबत कोणीच नसणार. तस विस्मयला एकदम भरून आल. माधवीनी ते हेरलं. आणि ती बोलायला लागली,"विस्मय, अजिबात कमकुवत बनायचं नाही. मनात जिद्द असली कि तू वाट्टेल ते करू शकशील." माधवीने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. माधवी तिच काम चोख करत होती. त्याची समजूत काढली आणि जिद्दीनी परिस्थितीला समोर जाण्यासाठी त्याला तयार केल. RIMC मधून जाण्याची वेळ आली तेव्हा मात्र माधवीची खरी परीक्षा होती. डोळ्यात एकही थेंब पाणी न आंत तिला विस्मायला बाय करायचं होत. आणि तिने ते मनावर दगड ठेऊन केल. जड मनानी माधवी आणि सगळे तिथून निघाले. पण खरी कसोटी होती ती बाहेर पडल्यावर. माधवीसाठी पुढचे काही दिवस अवघड होणार होते. लहानपणापासून लाडानी वाढवलेल्या मुळापासून लांब राहायचं ही गोष्ट माधवीसाठी सुद्धा सोपी न्हवती. माधवीसाठी परतीचा प्रवास खूप खूप कठिण होता. विस्मय सोबत नाही आणि विस्मयचा विचार तिच्या मनातून जात न्हवत पण माधवी सुद्धा मनानी खंबीर. तिने मनाची समजूत काढली. तिच्या मनातल्या अनेक विचारांचे काहुर बाजूला सारल. स्वतःला समजावत प्रवास चालू केला. विस्मयच्या निर्णयामुळे तिला विस्मयचा अधिकच अभिमान वाटत होता. विस्मयनी वयाच्या १२व्या वर्षी इतका मोठा निर्णय घेतला होता आणि त्याला होकार देणारी माधवी सुद्धा वेगळीच होती.

बघता बघता विस्मय डेहराडूनला रुळला. वयाच्या बाराव्या वर्षी त्याच्या वर मोठेपण आल. त्याची घराची ओढ कमी झाली आणि त्यानी आपल लक्ष अभ्यासाकडे वळवल. खूप छोट्या वयात विस्मय स्वावलंबी झाला आणि माधवी कणखर बनत होती..

नवीन वातावरण, नवीन परिसर, नवी आव्हान स्वीकारत विस्मय डेहराडून मधे रमला. पोहण्यातील पदक मिळवत होता, अभ्यासात प्रावीण्य ही मिळवत होता. माधवीला मुलाच्या प्रगतीच कौतुक होतच पण माधवी शेवटी आई होती. तिला सतत विस्मायची चिंता खात रहायची. 'तो कसा असेल, त्याला घरची आठवण येते का? पोटभर जेवत असेल का? तब्येत बरी असेल ना?' असे अनेक प्रश्न माधवीला भेडसावत राहायचे पण त्याला उत्तर मिळणं कठीण होत. माधवीसाठी हा कठिण समय होता. तिच्याकडे सुट्टीची वाट बघत दिवस काढ़ने एवढच पर्याय होता.

एक दिवशी माधवी पेपर वाचत बसली होती. तितक्यात फोनची रिंग वाजली. माधवीनी फोन उचलला आणि आवाज ऐकला, "हॅलो आई..." आणि माधवीला भरून आल.

सव्वा महिन्या नंतर विस्मयचा फोन आला होता. माधवीला विस्मयचा आवाज ऐकून खूप आनंद झाला. माधवीला तिचे हुंदके आवरण कठीण झाल होत पण मोठ्या कष्टानी तिने अश्रू आवरले. आणि मनसोक्त विस्मयशी गप्पा मारल्या. विस्मयची खुशाली कळली आणि तिच्या मनाच समाधान झाल. माधवीला सुद्धा विस्मयचे सैन्यात भरतीचे ध्येय साध्य करणार याची खात्री पटु लागली. विस्मय आता काहीतरी मोठ करणार ह्याची तिला खात्री झाली आणि माधवीच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागल.

विस्मयचा पुढचा प्रवास चालू होता. दिवस पटापट जात होते. Vaccation / term करता करता त्याची दहावी झाली. स्विमिंग मध्ये मेडल्स, संतूर वादन, बॉक्सिंग, घुड़सवारी, हॉकी एक ना दोन सगल्या मधे सहभाग घेऊन त्यात बक्षिस मिळवत विस्मयची आगेकुच चालू झाली. तो सगळ्या अर्थाने स्वावलंबी, मोठा होत होता. आता माधवी आणि विस्मयसाठी पुढच लक्ष होत ते NDA मध्ये प्रवेश घेण्याच. NDA मध्ये प्रवेश मिळणं इतक सोप्प न्हवत पण विस्मय माधवीच्या प्रोत्साहनामुळे डळमळला नाही. विस्मयनी NDA ची परीक्षा दिली. प्रवेश मिळतो का नाही ह्याकडे माधवी आणि घरातल्या सगळ्याचं लक्ष लागून राहील होत. विस्मयसाठी NDA मध्ये प्रवेश घेण अत्यंत महत्वाच होत आणि त्यासाठी त्यानी प्रयत्न सुद्धा केले होते. त्याचबरोबर डेहराडून मधल्या अनुभवाची जोड त्याच्याकडेच होती. पण रिझल्ट लागेपर्यंत काही खर नसत. माधवी आणि विस्मय दोघ अस्वस्थ होते आणि NDA चा निकाल लागला, विस्मय ला NDA मध्ये प्रवेश मिळाला होता आणि तो त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. विस्मयला NDA मध्ये प्रवेश मिळाला आणि माधवीला विस्मयच्या कष्टाचं चीज झाल ही भावना जागृत झाली. माधवी खूप खुश होती. ठरवल्याप्रमाणे विस्मयनी सगळे अवघड टप्पे पार केले होते.

विस्मय NDA मधे जॉईन झाला. त्याचे टफ ट्रेनिंग सुरू झाले. सामान्य लोकांना जाणीवही होणार नाही पण विस्मय देशसेवेत रुजू होण्यासाठी झटत होता. आणि मुलाचे कष्ट पाहून माधवी समाधानी होत होती. आपल्या घरातल कोणीतरी देश सेवेसाठी तत्पर आहे हि खरच माधवीसाठी ही अभिमानाची गोष्ट होती. विस्मयच खडतर ट्रेनिंग पूर्ण झाल आणि पासिंग आऊट परेड मधे बेस्ट कॅडेट (छातीवर सिल्वर पिन खोचली गेली) म्हणून त्याच्या नावाचा उलेख ही केला गेला. बेस्ट टॅक्टीक्स चा त्याला पुरस्कार मिळाला तेव्हा तर माधवीचा ऊर अभिमानाने भरून आला होता. त्यावेळी मात्र माधवीनी तिच्या आनंद अश्रूंना थांबवलं नाही. इतके दिवस थांबवलेले अश्रू बाहेर पडत होते. आता विस्मय पुढे देशाची सेवा करण्यासाठी सज्ज झाला होता. पुढे वेगवेगळी आव्हान त्याची वाट पाहत होती. त्यासाठी विस्मय आणि माधवी दोघे तयार होते.

पासिंग आऊट परेड नंतर माधवी घरी आली आणि सोफ्यावर निवांत बसली. तिच्या डोळ्यासमोरून सगळा स्लाईड शो चालू झाला. विस्मयनी लिहिलेला निबंध तिच्या डोळ्यासमोर आला आणि आज ते स्वप्न ती सत्यात उतरलेलं ती पाहत होती. विस्मयनी ठरवल्याप्रमाणे त्याची स्वप्न पूर्ण केली होती. माधवी खूप समाधानी झाली. विस्मय सुद्धा त्याच्या आवडीच्या फिल्ड मध्ये काम करत असल्यामुळे तो सुद्धा खूप खुश होता. आपण विस्मयला आर्मी मध्ये जायला हो म्हणलो ह्या गोष्टी बद्दल माधवीला समाधान वाटत होत. तिच्या चेहऱ्यावर समाधानच हसू उमटलं. विस्मयसारखा मुलगा आपल्या पोटी जन्माला आला अश्या विचारांनी ती जिद्दी आई मनोमन खुश होत होती आणि अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. खंबीर आईचाच तो विजय होता. शेवटी आई जिंकली होती.

शुभदा दाणी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED