लेख- विनोदवीर - मेहमूद - लेख- विनोदवीर मेहमूद Arun V Deshpande द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेख- विनोदवीर - मेहमूद - लेख- विनोदवीर मेहमूद

लेख- -स्मरण एका विनोद्वीराचे- मेहमूद -

-अरुण वि.देशपांडे -पुणे.


------------------------------ ------------------------------ ----
(हा लेख मित्रवर्य श्री. श्रीपाद कुलकर्णी SRK यांच्या श्रीपाद रेडियोवर प्रसारित झाला आहे. त्यांचे आभार.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


रसिक हो ,मेहमूद -
(२९-०९-१९३२ ते २३-०७-२००४ )
------------------------------ ------------------------------ -----
आज २३ जुलै , लोकप्रिय विनोदी कलावंत , अभिनेता , गायक , निर्माता मेहमूद याची पुण्यतिथी , हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात मेहमूद च्या आठवणी त्याने साकारलेल्या अविस्मरणीय अशा अनेक व्यक्तीरेखांमुळे कायम आहेत.
आपल्या फिल्मी कारकिर्दीत मेहमूद ने ३०० पेक्षा जास्त चित्रपटात ..नायक, सहनायक ,आणि विनोदी कलाकार म्हणून भूमिका केल्या , एक हरहुन्नरी - विनोदी कलावंत म्हणून मेहमूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली .


एक बाल-कलाकार म्हणून मेहमूदची फिल्मी करियर सुरू झाली ..किस्मत " (१९४५)..या फिल्म मध्ये तो बाल-कलाकाराच्या भूमिकेत चमकला . त्या नंतर ." सीआयडी ", दो बीघा जमीन , प्यासा "अशा काही चित्रपटात त्याने किरकोळ भूमिका केल्या , काही सामान्य चित्रपटात मेहमूद नायक म्हणून पडद्यावर दिसला पण नायकाच्या भूमिकेत त्याला रसिकांनी फारसे स्वीकारले नाही ..यातले त्याचे अनेक चित्रपट त्यातील गाण्यांमुळे लक्षात आहेत.
मेहमूदला अफाट लोकप्रियता मिळवून दिली ती त्याच्या विनोदी भूमिकांनी .. विशेषतः हैद्राबाद बोलीचा उपयोग करून मेहमूदने आपल्या विनोदाने कहर केला ..गुमनाम ,साधू और शैतान मधील त्याच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या.


प्रत्येक फिल्मी -कलाकारच्या कारकिर्दीत "फिल्मफेअर अवार्डचे महत्व खूप मोठे आहे. या दृष्टीने मेह्मुद्ची कामगिरी विलक्षणच आहे असे म्हणावे लागेल.१९५४ साला पासून फिल्मफेअर आवार्ड देण्यास सुरुवात झाली सुरुवातीला कॉमेडी -रोल साठी स्वतंत्र अवार्ड नव्हते .. फिल्मफेअर अवार्ड फोर बेस्ट कॉमिक रोल .सुरु झाले ते १९६७ सालापासून .. त्यानंतर या बेस्ट कॉमिक रोल साठी मेह्मुदला तब्बल २५ वेळा नामांकन मिळाले..


१९५८ साली प्रदर्शित "छोटी बहेन " या चित्रपटापासून फिल्मी पडद्यावर मेहमूद चे अस्तित्व जाणवले आणि पुढे कित्येक वर्ष आघाडीचा विनोदवीर म्हणून मेहमूद प्रेक्षकांच्या आवडीचा होता.
१९७० या दशकाच्या अखेरपर्यंत इतर समकालीन विनोदवीर कलाकारांच्या तुलनेत मेहमूद सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेता होता.


फिल्मफेअर अवार्ड आणि मेहमूद
------------------------------ -------------------------
१. फिल्म फेअर बेस्ट सपोर्टिंग अक्टर - १९६३ - मेहमूद फिल्म- दिल तेरा दिवाना .


फिल्मफेअर अवार्ड फोर कॉमिक रोल - मेहमूद
------------------------------ ------------------------
१. १९६३ - फिल्म प्यार किये जा ,
२.१९७० - फिल्म - वारीस ,
३.१९७२ - फिल्म- पारस ,
४.१९७५ -फिल्म- वरदान


विनोदी भूमिकेत त्याची इतकी प्रभावी कामगिरी होत असे की ,,मेहमूदला
१९५९ ते ते १९६६ या दरम्यान त्याला बेस्ट सपोर्टिंग अक्टर साठी नामांकन मिळत गेले ते असे..
१. १९५९ - फिल्म- छोटी बहेन , २.१९६२ - फिल्म- ससुराल , ३.१९६३- फिल्म- राखी ,
४. १९६४ - घर बसा के देखो , ५. १९६६ - गुमनाम .


१९६८ ते १९८३ या पंधरा वर्षांच्या काळात रुपेरी पडदा मेहमूदच्या कॉमेडी रोलने जणू व्यापून टाकलेला होता ,त्याच्यासाठी प्रेक्षक फिल्मला जात असत.
त्याच्या या बहारदार कामगिरी मुळे मेहमूदचे नामाकन बेस्ट कॉमिक रोल साठी होत गेले ते असे..
१.१९६७ - लव्ह इन टोकियो, २. १९६८ - फिल्म -मेहरबान , ३. १९६९ -फिल्म नीलकमल , ४. .१९६९ - फिल्म- साधू और शैतान , ५. १९७० - फिल्म- हमजोली , ६- १९७० - फिल्म- मेरी भाभी ,
७. १९७१ - मै सुंदर हु , ८- १९७३ - फिल्म- बॉम्बे टू गोवा , ९- १९७४ - दो फूल , १०- १९७५ -फिल्म- दुनिया का मेला,
११. १९७५ - फिल्म- कुंवारा बाप , १२. १९७५- फिल्म- कैद , १३. १९७६ - सब से बडा रुपैय्या , १४- १९८०- फिल्म-नौकर , आणि १५. १९८०- खुद्दार .


मेहमूद विशेष-
निर्माता म्हणून मेहमूद ने मध्ये भूत बंगला ' या चित्रपटातून पंचम - आर.डी.बर्मन हा संगीतकार चित्रपट सृष्टीला दिला ,मेह्मुद्च्या छोटे नवाब "या चित्रपटापासून आर.डी.चे संगीत लोकप्रिय ठरण्यास सुरुवात झाली .
२.
पडोसन " हा हिंदी चित्रपट इतिहासात सर्वश्रेठ विनोदी चित्रपट म्हणून ओळखला जातो .हा चित्रपट निर्मित करण्यात निर्माते एन सी सिप्पी सोबत मेहमूदचा सह्बाग होता . पडोसन "मधील मेहमूदच्या मद्रासी -संगीत मास्तर च्या रोल ने धमाल उडवली होती. सोबत किशोरकुमार , केश्तो मुखर्जी , ओमप्रकाश आणि अनेक विनोदवीर या चित्रपटात होते. आर.डी चे संगीत .गीतकार राजेंद्र कृष्ण यांचे एक चतुर नार कर के सिंगार ..या गीतात किशोरकुमार ,मन्ना डे,आणि स्वतहा मेहमूद यांची धमाल पडद्यावर मोठी धमाल उडवते . सुनीलदत्त -सायरा बानो हे नायक- नायिका होते .पण लक्षात राहिला तो मेहमूद अभिनित मद्रासी संगीत - मास्तर .


मेहमूदच्या फिल्म्स चे एक वैशिट्य सांगायचे झाल्यास .चित्रपटात रूढ अर्थाने जे नायक-नायिका असत, त्या जोडी पेक्षा जास्त भाव खाऊन जायची ती ..१. मेहमूद - शुभा खोटे ही जोडी , त्यानंतर - दुसरी जोडी फेमस झाली ती - मेहमूद - मुमताज ही जोडी आणि शेवटी - मेहमूद -अरुणा इराणी ही जोडी तितकीच गाजली.


मेहमूद -शुभा खोटे या जोडीचे चित्रपट -
छोटी बेहन , ससुराल , हमराही , बेटी बेटे , गृहस्थी , भरोसा , सांज और सवेरा , जिद्दी , लव्ह इन टोकियो .


मेहमूदला हिरोच्या बरोबरीने सोलो गीत ,युगल गीत असायची ही सर्व गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत ..
शंकर-जयकिशन , आर.डी. बर्मन , एस. डी. बर्मन लक्ष्मीकांत -प्यारेलाल , कल्याणजी -आनंदजी , रोशन , रवी ,,चित्रगुप्त अशा दिग्गज अशा संगीतकारांनी मेहमूदला सदाबहार गाणी दिलीत .
मन्ना डे, , म.रफी , मुकेश , किशोर कुमार यांनी मेहमूदची सोलो गाणी म्हटली ..तर युगल गीत - लता -रफी , अशा-रफी , किशोर -लता , किशोर-अशा , मन्ना डे- आशा , मन्ना डे- गीता दत्त यांच्या आवाजात आहेत.


मेहमूदच्या काही लोकप्रिय युगल -गाण्याची आठवण -
------------------------------ ------------------------------ -
१.मै रंगीला प्यार का राही- छोटी बहेन -लता मंगेशकर सुबीर सेन , संगीत- शंकर- जयकिशन
२. अपनी उल्फत पे जमाने का - ससुराल - लता- मुकेश , संगीत- शंकर -जयकिशन
३. वो दिन याद करो - हमराही - लता -रफी , संगीत- शंकर - जयकिशन
४. गोरी चलो ना हंस की चाल - बेटी बेटे - आशा - रफी , संगीत - शंकर - जयकिशन
५. आज हु ना आये बालमा - सांज और सवेरा - रफी-सुमन कल्याणपूर , संगीत शंकर - जयकिशन
६. जा जा रे जा दिवाने जा - गृहस्थी - रफी- आशा , संगीत- रवी ,
७. मै तेरे प्यार मी क्या क्या - जिद्दी - मन्ना डे - गीता दत्त , संगीत - एस. डी. बर्मन ,
८. बहारो थाम लो अब दिल - नमस्ते जी - लता - मुकेश , संगीत - जी.एस. कोहली ,
९. तुम्ही मेरे मित हो - प्यासे पंची - हेमंतकुमार - सुमन कल्याणपूर , संगीत- कल्याणजी -आनंदजी
१०. ओ मेरी मैना - प्यार किये जा - मन्ना डे - उषा मंगेशकार , संगीत- लक्ष्मीकांत -प्यारेलाल ,
११.जोडी हमारी जमेगा कैसे - औलाद - मन्ना डे - अशा भोसले , संगीत - चित्रगुप्त
१२. कभी दुष्मनी-कभी दोस्ती - भरोसा - रफी - आशा , संगीत- रवी
१३. मुत्तू कोडी कवाडी हरा .. -दो फुल - मेहमूद -आशा भोसले , संगीत- आर.डी. बर्मन
१४. चंदा ओ चंदा - लाखो मे एक - लता - किशोर , संगीत- आर.डी. बर्मन
१५. दे दे अल्ला के नाम दे ,तुझको अल्ला रख्खे - आंखे - मेहमूद -मन्ना डे-आशा भोसले , संगीत- रवी
१६.जाब जाब हम तुमको देखे है रे .. मस्ताना - लता -किशोर , संगीत- लक्ष्मीकांत -प्यारेलाल
१७. नाच मेरी जान फाटा फत - मै सुंदर हु - किशोर - आशा , संगीत - शंकर -जयकिशन
१८. घुंगरवा मोर छम छम बाजे - जिंदगी - रफी- आशा , संगीत -शंकर- जयकिशन .
***************
मित्र हो , मेहमूद माझा आवडता कलावंत ,२३ जुलै २००४ साली तो आपल्या हजारो चाहत्यांना सोडून गेला ,त्याच्या भूमिका , ताचे चित्रपट आणि लोकप्रिय गाणी हा त्याचा ठेवा आपल्यासाठी आहे.. त्याच्या स्मृतीस हे अभिवादान.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------