अन्याय Dhanashree yashwant pisal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अन्याय

ही कहाणी आहे अमन आणि आराध्या ची. प्रत्येक कहाणीचा शेवट हा नेहमी गोडच होतो अस नाही. प्रत्येक कहाणीत फक्त प्रेमच असतं अस नाही. ह्या प्रेम कहाणीत काय आहे. ते तुम्ही वाचून सांगा.

अमन आणि आराध्याची ही कहाणी. अमन हा गावातील सरपंचांचा मुलगा. एकुलता एक त्याला तीन बहिणी होत्या. पण जेव्हढा लाड अमन चा व्ह्याचा तेव्हढा लाड मात्र त्याच्या कदचितच बहिणीचा व्हायचा. हवी ती गोष्ट त्याला लागेच मिळे. अमन शाळेत फारसा हुशार नव्हता. जेमतेम मार्क मिळवून तो पास होत असे.

आराध्या ही नुकतीच तिच्या कुटुम्बा सोबत गावात रहायला आली होती. तिचे वडील शिक्षक होते. तीही सुंदर, अभ्यासात हुशार. तिला एक छोटा भाऊ होता. घरात समानतेचे वातावरण होते.

दोघेही आपल आपल आयुष्य जगत होती. पण आराध्याला माहीतच नव्हत की तिच्या आयुषात किती मोठ वादळ येणार होत. आणि ह्याची सुरवात जाली त्यांच्या पहिल्या भेटी पासून. आराध्या आणि अमन मध्ये दोन वर्षाचे अंतर होते. आराध्या आठवीत होती तर अमन दहावीत होता. जेव्हा त्याने आराध्याला पहिले. आणि पहिल्याच नजरेत त्याला ती आवडली. तो येता जाता नुसता तिला पाहत असे, तिच्या घरभ्व्ती नुसत्या चकरा मारणे चालूच होते.

एक दिवशी संधी शोधून त्यानी ह्या विषयी तिच्याशी बोलायचे ठरवले आराध्या शाळेतून घरी जात असतानाच त्यानी तिला अडवून ' त्याच्या प्रेमाची कबुली तिच्या जवळ दिली '. आराध्या ने ह्या विषयी त्याला नकार दिला. आणि ती तेथून निघून गेली. ' अमन.... निराश जाला, हताश जाला. ' पण त्याने जिद्द सोडली नाही. कधी तो त्याच्या मित्रांकडून तिला ' गिफ्ट' पाठवायचा तर कधी'' प्रेमपत्र ''. पण आराध्या प्रत्येक वेळी एकच उत्तर असे नाही. पण अमन तिला न चुकता ' प्रेमपत्र ' पाठवत.

असच एक दिवशी अमन नि तिला प्रेमपत्र लिहिल. त्यानी ते त्याच्या एका मित्रा कडे दिल. थोड्या वेळाने अमनच्या मित्राने ते पत्र अमन कडे आणून दिल. ते पत्र पूर्ण पणे चुरगळलेल होत. अमन पुन्हा नाराज जालता. नेहमी प्रमाणे ह्या ही वेळी उत्तर नाहीच असणार हे त्याने ग्रहीत धरल होत. पण तरीही एकदा उघडून पहावे. म्हणून त्याने ते पत्र उघडून पहिल. ' ' नंतर जे त्याने पहिल ते पाहून त्याला धक्काच बसला' 'आरध्याच उत्तर हो होत '. अमन ला स्वतः वर विश्वास च नव्हता. वर्षभर तिच्या मागे लागल्यावर, पाच हाजार फेऱ्या तिच्या घरासमोर मारल्यावर, हजार प्रेमपत्र लिहिल्यावर. आराध्या शेवटी एकदाची त्याला हो म्हणली. अमन खूप म्हणजे म्हणजे खूप खूष होता. त्याने आराध्या ला भेटायचे ठरवले. तो नेहमी प्रमाणे शाळा सुटायची वाट पाहू लागला. शाळा सुटली, सगळ्या मूल मुली बाहेर पडल्या. पण अमन आराध्या ला शोधत होता. त्याला आराध्या दिसली. दोन वेण्या, शाळेचा पंजाबी ड्रेस मैत्रिणी सोबत ती त्याच्या कडेच येताना दिसली. आता अमन ला दुसरा धक्का बसला. ' साधी नजर ही न टाकणारी आराध्या अमन कडे स्वतःहून येत होती.

अलगद पावले टाकत आराध्या अमन कडे आली. आणि छान गोड हास्य देत ती अमन ला म्हणली ' ' अमन कसा आहेस '. तिसरा धक्का होता अमन साठी, मनातल्या मनातच अमन आरध्याला म्हणला, अजून किती धक्के देशील. ' ' आरध्याने पुन्हा तिला विचारले, कसा आहेस अमन ? यावर भानावर येत अमन तिला म्हणला..... तुला.... तुला.... महित आहे माज नाव. यावर गोड हसत आराध्या म्हणली प्रत्येक प्रेमपत्र तू तुज्या च नावाने लिहितोस ना..... तुजा.. अमन. आता दोघेही हसू लागले.

आता अश्या गाठी भेटी रोज होऊ लागल्या. कधी शाळा सुटल्यावर शाळेच्या परिसरात तर कधी शाळेच्या बाहेर. दोघे ही खूप खूष होते. एक मेकन सोबत. अमन तर हवेतच होता. आता आराध्या शिवाय कोणीचमहत्वाच नव्हत त्याच्यासाठी. अशातच आराध्या तिच्या बाबांच्या सांगण्यावरून एका कोर्स साठी मुम्बई ला गेली. ईकडे अमन एकटाच पडला. त्याला आराध्याची फार आठवण येयी. घरात ही राजकीय वातावरण असल्यामुळे सतत सत्ता ह्या विषयावरच चर्चा होत. अशातच त्याची ओळख नेहाशी जाली. नेहा अमन च्या बाबांच्या मित्राची मुलगी होती. त्याच्या बहिणीची मैत्रीण होती. सुट्टी निमित्त त्यांच्या घरी रहायला आली होती. अमन नेहाला फार आवडला. अमन ला ही नेहा बरी वाटली. दोघे एकमेकाशी भरपूर गप्पा मारत.

एके दिवशी असच गप्पा मारत असताना नेहानी अमनला तिच्या मनातील भावनांन विषयी सांगितले. ते ऐकून अमनला धक्काच बसला. तिला समजवत त्याने हळूच तिला' नाही' हे उत्तर दिले. आता नेहा अमन ला रोज पत्र लिहू लागली. गिफ्ट देऊ लागली. आज ना उद्या तो हो म्हणेल अशी आशा बाळगू लागली. पण प्रत्येक वेळी अमन च उत्तर नाहीच असत. आता मात्र नेहा खूपच नाराज जाली. आणि एक दिवस तिने जोपेच्या गोळ्या खाऊन स्वतःला मारण्याचा पर्यत केला. ह्या गोष्टीवर मात्र अमन फार घाबरला. त्याने तिला आराध्या विषयी सांगायचे ठरवले. पण तिची तब्बेत नाजूक असल्यामुळे डॉक्टरनी तिची काळजी घ्याला सांगितली. आता नेहा च्या ह्या प्रेमप्रकरण बद्दल घरच्यांना कळाले. आणि दोघांच्या ह्या ही घरचे खूप खूष जाले. आणि दोघंचही शिक्षण पूर्ण जाल्यावर लग्न लवुन देऊन असा विचार मांडला. अमन ही नेहावर प्रेम करतो अस ग्रहीत धरल गेल. ह्या गोष्टींवर अमन वडिलांन समोर काहीच बोला नाही. वेळ मिळल्यावर आपणच नेहाशी बोलू अस त्यानी ठरवल.

ईकडे आराध्या ही परत आली होती. तिने अमनच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. आता अमन आणि आराध्या पुन्हा भेटू लागली. कधी कॉलेज मध्ये कधी कॉलेज च्या बाहेर. दोघे ही एक मेकन्च्या प्रेमात जग विसरून गेली. अमननी बऱ्याच वेळा नेहा विषयी आराध्याला सांगायचा प्रयत्न केला, पण हे ऐकल्यावर आराध्या आपल्याला सोडून जायील, अशी त्याला भीती वाटत होती. म्हणून तो दर वेळी विषय टाळायचा.

पण आपण नेहा आणि आराध्या दोघींना फसवत आहे ही भावना ही त्याला जगू देत नसत. दोघी ही त्याच्यावर जिवापाड प्रेम करत होत्या. आणि दोघींनाही वाटे की अमन ' माज्यावरच प्रेम करतोय '. आता अमन स्वतःला त्रास करून घेऊ लागला. तो आता दारू पिऊ लागला. तेव्हढाच विसर म्हणून. हळू हळू तो जुगार खेळू लागला. ही गोष्ट आराध्याला समजली तिला फार वाईट वाटे. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी तो तिच्या समोर ' ' नाही पिणार अस म्हणायचा, आणि प्याचा ' ' . आराध्या ने आता त्याच्याशी बोलणे सोडून दिले होते. तो भेटला तरी ती त्याला न बघताच निघून जायी. अमनला ही गोष्ट अजून त्रास देऊ लागली. तो आराध्या तिच्या मैत्रीण मध्ये गाठून तिच्याशी बोलायचा पर्यंत करे. अमनच्या ह्या वागण्याने आराध्या खूप त्रासली होती.

आता अमन खूप ईकटा पडला होता. आराध्या त्याच्याशी बोलत नव्हती. आणि नेहाला तो टाळू शकत नव्हता. घरी तो ह्या बद्दल काहीच सांगू शकत नव्हता. आणि आता दारू ही त्याला सोडत नव्हती. अशात अमनच्या घरच्यांनी अमनची दारू सुटवि म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यानी त्याला मुम्बई च्या एका हॉस्पिटल मध्ये दखाल केले. तिथे गेल्यावर ही अमन खूप दारू पीत असे. तिथे त्याची ओळख ' शामली ' शी जाली. शामली अमन सारखीच दारूच्या अधीन गेली होती. तिच्या आईवडीलाणी तिची दारू सुटावी म्हणून ईथे आणले होते. हळू हळू अमन आणि शामली ची चांगली मैत्री जाली. अमननी तिला नेहा आणि आराध्या दोघीण विषयी सांगितले. अमनच्या मनाला आता शामली चा आधार मिळाला. हळू हळू अमन दारू प्याच कमी जाला. शामली ही आता तिच्या डिप्रेशन मधून बाहेर आली होती. तीन महिने होऊन गेले होते. अमन आणि शामली आता घरी निघाले होते. शामली ने त्याला घरी यायची विनंती केली. अमननी तिच्या विनंतीला मान देऊन तो तिच्या घरी गेला. ' रात्र असल्यामुळे तू ईथेच राहा. ' अस शामली अमन ला म्हणली. शामलीचे आई बाबा कामानिमित्त बाहेर असल्या मुळे, शामलीला एकट सोडून जाणे अमनला योग्य वाटेना. म्हणून तो तिथेच थाम्बला. पण पुढे हे सगळ होईल ह्याचा विचार अमननी कधीच केला नव्हता. शामली आणि अमन ह्यानी रात्रीच जेवण केल. आणि ते दोघे जोपी गेले.

सकाळी जेव्हा अमन ऊठला, तेव्हा शामली त्याच्या शेजारी जोपली होती. अमन एकदम घाबरला. आणि हे कस जाल ह्या बद्दल विचार करू लागला. तेव्हा शामली उठली. अमन घाबरलेला पाहून तिने कबूल केल की हे सगळ तिनेच केल. कारण तीच अमन वर खूप प्रेम आहे. म्हणून तिने त्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले. अमनला हे ऐकून फार मोठा धक्काच बसला. स्वतःला दोष देत. तो तिथून बाहेर पडला. कधी ही परत न येण्या साठी. शामली ने त्याला अनेक फंड केले, पण त्याने एकाचही ऊत्तर दिल नाही.

अमन तिथून तडक घरी निघून आला. त्याने आता मनाशी ठरवल होत की काहीही होऊ दे. तो आराध्या ला सगळ सांगणार. त्याने वडिलांच्या गाडीची चावी घेतली. आणि तो निघाला. अमन खूप रागात होता. सगळ मनात साठलेले त्या आराध्या जवळ मोकळ करायच होत. त्या नंतर ती जो निर्णय घेयील तो... अमनच्या मनात फार मोठ वादळ आल होत. आणि तो त्याला शांत करायचा पर्यंत करत होता.

अमन आराध्याच्या कॉलेजच्या तिथे आला, खूप वाट पहिल्यानंतर आराध्या आली. पण अमन दिसल्यावर न पाहाताच ती निघून गेली. आज मात्र अमन फार रागावला होता, आता तो कोणाचाच ऐकणार नव्हता. अमन नी गाडी आराध्याच्या दिशेने घेतली. त्याने बळजबरीने तिला गाडीत टाकले. आणि तो निघाला भरधाव वेगात. आराध्या ओरडत होती, पण अमनच लक्ष तिच्याकडे नव्हत. अमन खूप रा

गावला होता. त्याने गाडीचा वेग वाढवला. आणि गावापासून खूप दूर आल्यावर त्याने गाडी थाम्बवाली. आजूबाजूला कोणीच नव्हत. दूर दूर पर्यंत डोंगरच डोंगर होते. अमन गाडीतून बाहेर आला. थोड्या वेळाने आराध्या बाहेर आली. आता पर्यंत आलेला अमनचा राग आता थोडा शांत जाला. अमन आराध्या कडे वळला. त्याने आराध्याच्या डोळ्यात डोळे घातले. त्याला तिच्या डोळ्यात त्याच्या विषयी तिरस्कार दिसला. अमननी तिचा हात हातात घेतला. तो तिच्या पायाजवळ बसला. आणि त्याने तिला सगळ सांगायला सुरवात केली. सांगता सांगता कधी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याचे त्यालाच कळले नाही. शेवटी फक्त तो एवढच बोलला ' ' आराध्या निर्णय आता तुजा आहे ' '. आता त्याला तिच्या डोळ्यात फक्त प्रेम दिसत होत त्याच्या विषयीच प्रेम... जे त्याच्या ही मनात तिच्या विषयी होत.

एकदम भानावर आल्यासारखं करत अमन तिला म्हणला, चल तुला घरी सोडतो. आणि तो निघाला. त्याचा हात हातात घेऊन आराध्या त्याला म्हणाली, माज ऊत्तर नाही ऐकायचे का तुला ? हो, ऐकायचे पण खूप उशिर जालाय. तू उद्या नीट विचार करून मला ऊत्तर दे.

त्याला मधेच थाम्बाव्त ' ' आराध्या त्याला म्हणाली ' ' तू मला एवढ्या दूर का घेऊन आलास. आता जायला घरी किती उशिर होईल, मी नाही जाऊ शकत अशी घरी. ' ' तिच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून अमन तिला म्हणला ' ' आरु, लग्न करशील माज्याशी ? ' ' आराध्याने त्याच्याकडे एक नजर टाकली. स्वतः शीच हसत ती म्हणली....... हो..... ' तीच ही खूप प्रेम होत अमनवर '.

अमन आनंदने उडी मारत, ईथे जवळच माज्या मित्रच घर आहे. तिथे तू थाम्ब. मी सगळी तयारी करतो. उद्या सकाळी लग्न करू. आणि मग घरी जाऊ. घरच्यानच्या पाया पडू, आणि त्याना मनवू. सगळ व्यव्सतिथ होईल, मी नोकरी करीन. तू घर संभाळ. अमनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आराध्या सुखावली.

दोघे जण तिथून निघाले आणि अमनच्या मित्राकडे गेले. तिथे आरध्याला सोडून अमन आणि त्याचा मित्र लग्नाच्या तयारी साठी निघून गेले. अमन जाताना आरध्याला मात्र रडू आले. तिने अमनला घट्ट मिठी मारली. त्यावर तिच्यावर हसत अमन तिला म्हणला, ' ' ये वेडा बाई का रडतेस, आता फक्त हसायच. ' ' आणि तिचा हात हातात घेऊन, आणि तो सोडून तो निघून गेला. अमनच्या मित्रांच्या पत्नीने तिला जेवायला बोलवले. पण आज तिला काही जेवण जाणार नाही म्हणून, ती उपाशी पोटिच जोपली. जोप कसली मनात खूप विचार येत होते. त्या विचारताच आराध्याचा कधी डोळा लागला तिलाच कळला नाही.

अचानक अरध्याला जाग आली. आराध्या जागी जाली. बाहेर उजेड दिसत होता. तिचे लक्ष घड्याळकडे गेले नऊ वाजले होते. ' ' ती जोरात म्हणली अमन आला असेल., आज माज लग्न आणि मी एवढ्या वेळ जोपून राहिले ' '. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अमनचअसेल म्हणून दार उघडायला आराध्या उठली. पण समोरच द्रुश्य पाहून आरध्याला फार मोठा धक्का बसला. समोर अमनचे बाबा होते. आराध्या आता मात्र फार घाबरली. ' ' तिचा घाबरलेला चेहरा पाहून अमनचे बाबा तिला म्हणले ' ' घाबरु नको, मी तुला आणि अमनला नेह्याला आलोय. लग्नच करायच होत तर सांगायच ना. आह्मी लावून दिल असतं. आता तुला मी घरी सोडतो, आणि मग अह्मी येतो स्थळ घेऊन. मी अमनला पण हेच सांगितलय. तो तयार जालाय.

अमन अस कस करू शकतो ? लग्नाचा निर्णय दोघांचा होता, मग हा निर्णय त्याने एकट्याने कसा घेतला. ती शांतीमय शब्दांत म्हणाली ' ' काका अमन कुठंय ? ' ' बाळा.... तो खाली गाडीत बसलाय. अमनचे बाबा आराध्याला म्हणाले. आराध्या पळतच गाडीच्या दिशेने गेली. आत अमन खाली मान घालून बसला होता. आराध्या गाडीमध्ये बसली. तिने दरवाजा आतून लावून घेतला. अमन ' ' अरे, तूजे बाबा काय म्हणतात ? की तू, तीच वाक्य मध्ये थम्ब्वत अमन तिला म्हणला, ' ' हो..... महित आहे मला... जर ते स्वतः हून लग्न लवुन देत असतील तर काय हरकत आहे. ' ' त्याच्या ह्या बोलण्याने आराध्या भम्बव्ली ' ' काय बोलतोस तू अमन ? ' ' त्याच्या पायाजवळ बसत आराध्या त्याला म्हणाली ' ' अमन मी अशी नाही जाऊ शकत घरी. ' ' आणि तुजा जर हाच निर्णय असेल. तर माझा ही एक निर्णय आहे, मला मरून टाक नाहीतर लग्न कर. अमन रागातच तिला म्हणला, होतय ना आता लग्न ? घरच्याच्या संमतीने. अमनच बोलण ऐकून आरध्याला चक्कर आली. आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या समोर तिचे आई बाबा होते.

मुलीची अवस्था पाहून आरध्याचे आई बाबा कोलमडून पडले. आरध्याची आई तर तिला स्वीकारायला तयारच नव्हती. आज आरध्यच्या आई वडिलांना लाज वाटत होती आरध्याला मुलगी म्हणवून घेताना. तेवढ्यात पोलीस आले. आरध्याच्या आईवडिलानी पोलीस कंप्लीट केली होती. आरध्याला पोलीस स्टेशन मध्ये आण्यात आले. समोर पोलीस बसलेले, दूरवर तिचे आई बाबा आणि अमनचे घरचे बसलेले. समोर अमन पोलीसानी विचारले, आराध्या तुला अमनशी लग्न करायचाय. एक ही मिनिटांचा वेळ न दवडता ती.... हो... म्हणाली. आता अमन कडे वळत त्या पोलीसानी विचारले अमन तुला आरध्याशी लग्न करायचय. कानात त्राण आणून आराध्या उत्तरांची वाट पाहत होती.... पाच मिनिट विचार करून अमन बोला.... नाही..... आराध्या अमन कडे पाहातच राहिली, हा तोच अमन आहे का ज्यांच्यावर आपण प्रेम केल. तिच्या समोर जुन्या आठवणी येऊ लागल्या. ' ' शी.... ह्या माणसासाठी आपण आपले आई वडील सोडले. का.... का केलस अमन तू अस ?.... आराध्याच्या डोळ्यात राग, संताप चीड सगळ होती. तिने अंगातील सगळी हिंमत एकवटवली आणि त्याच्या कानाखाली मारली. आणि आराध्या तिथून निघून गेली. तिच्या वडिलानी तिला जवळ घेतल. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि तिला जवळ घेतल. तिने हात जोडून त्यांची माफी मागितली.

त्यानंतर आराध्याच्या आई वडिलांनी तिला आधार दिला. ह्या दुखातुन सावरण्याची शक्ती दिली. आरध्यानी जीव देण्याचा पर्यंत सुध्दा केला. पण तो अयशस्वी ठरला. अमननी हे सगळ केल कारण अमन च्या आई ने विष पिल होत. अमनच्या आईला आराध्या पसंत नव्हती. अमनच आराध्या प्रकरण कळल्यावर नेहाच्या घरच्यांनी नेहाचे लग्न दुसऱ्या मुलाबरोबर लवुन दिल. अमन पुन्हा जास्तच दारू पिऊ लागला. त्याच्या वडिलांच सरपंचपद पण गेल. शामली ही अमनच्या प्रेमात ईताकि वेडी जाली. की तिला वेड्याच्या एस्पितलात दाखिल केल. कधी कधी आपल्याकडून नकळत अन्याय होतो एखादया व्यक्तीवर .... हे आपल्याला फार उशिरा कळत. पण त्या व्यक्तीच आयुष्य पूर्ण बरबाद झलेल असतं......