#मिटू ( भाग -6) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

#मिटू ( भाग -6)

       बेनाम जिंदगी मे कुछ ऐसेही 
       
       किस्से मजहब तरस्ते हुये 

       रुह को निचोडते है 

      पनाहे अपनेपण की क्या खूब भी 

      क्रूरताने रोंधी है मानवता यहा ! 

                     काय वय असावं तीच ? बारा पंधरा .... 

तारुण्याच्या उंबरठ्यावर पडलेली पाऊले तिच्या जगण्याची दशा मागे खेचत होती ...

आणि ती ... बंद खोलीत स्वतःला बंधीस्त करून घेत जगणारी ! नाही ..... 

दुनियादारीत वावरताना ती मात्र  जखमा खोलवर रुजवंत त्या कोसत जगत होती .

बाप दारोडा  दारू पिऊन यायचा आणि आईला बेदम मारायचा त्याचा माराला 

कंटाळून दोन महिन्याचा मुलगा घेऊन ती माहेरी निघून गेली ... मुलीला 

तिला सोबत नेता आले नाही . 

      आई माहेरी निघून गेल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका गर्ल्स हॉस्टेल मध्ये

टाकले . तिथून तिची शाळाही जवळ होती .  तिचे वडील दर शनिवारला तिला 

होस्टेलवर न्यायला यायचे . दोन दिवसासाठी घरी घेऊन जायचे ....

हल्ली तिच घरी जायच मन नसतानाही नाईलाज असायचा . घरून हॉस्टेलवर

आल्यावर  ती आपल्याच दुःखात असायची .  कुणासोबत बोलायची नाही की 

हसायची नाही हसण तर ती गमावून बसली पण खण्यापिण्याकडेही तीच 

लक्ष नव्हतं . 

        घरून होस्टेलवर ती आली त्या दिवशी तिचं पोट खूप दुखत होतं ... 

पोट दुखतंय म्हणून रूम मधल्या मुली तिला विचारू लागल्या  काय झालं ?? 

तिच्या सहनशीलतेचा विस्फोट झाला होता जणू .... जे घडलं ते तिने सर्व त्यांना 

सांगून दिलं ....

       जन्मदेणारा बापच तिच्यावर अत्याचार करायचा ... आई नसताना आपली वासना 

तो मुलीकडून भागवायचा ... त्या लहानश्या जीवाला किती त्रास झाला असेल ह्याचा 

विचार त्याने केलाच नाही .... 

     तिच्या रूम मधल्या मुलींना हे ऐकूनच खूप भीती वाटली पण त्यांनी 

होस्टेलवर राहत असणाऱ्या वरच्या मजल्यावरच्या मुलीना रूम मध्ये बोलवून 

घडलेला प्रसंग सांगितला .... 

       पण त्या मुलीची हालत तेव्हा पर्यंत गंभीर स्वरूप धारण करत होती . 

कारण तिच्या मर्जीविरुद्ध सतत सात , आठ महिने तिच्यावर आठवड्याला रेप 

व्हायचा तिच्या सख्या बापाकडून ... 

    वॉर्डन पर्यंत ही गोष्ट पोहचली आणि त्यांनी ह्याची दखल घेतली .. 

मुलीवर बापाने बलात्कार केल्याचं सिद्ध तर झालं ... पण , तिची जगण्याची 

काहीच उमेद नव्हती  तिच्या इंटर्नल बॉडी पार्ट मध्ये infection झालं  सतत च्या 

जबरदस्ती मुळे ओव्हरीवर परिणाम पडत गेला ...  ओव्हरी निकाम्या झाल्या . 

तिच्या आईपर्यंत ही गोष्ट गेली तेव्हा पर्यंत तिनेही प्राण त्यागाला होता .....

**********
त्या गल्लीतील गच्चीवर उभ्या असलेल्या कम्बरेला पदर खोचलेल्या ओठाला

लाल गर्द लिपिस्टिक फासून तोंडात पान कोंबून घेत हातवारे करतं रस्त्याने

जाणाऱ्या येणाऱ्यांना आपल्या इशाऱ्यानेच जवळ खेचून घेत होत्या .....

त्यांची जवानी आणि चाल बघून भुरळ पडलेली पन्नास साठ वयोगटातील

पुरुष घरात बायको उपभोगायला मिळायची नाही . म्हणून कुटंखान्यात जाऊन

आपली वासना तृप्त करायचे ..

ती रंडीबाज म्हणूनच बदनाम होती त्या गिराईकांसाठी ....

गैरसमज म्हणू की वास्तविकता ह्यात उचल पडेल एखाद्याला समजण्यासाठी .

त्या आहे म्हणून आज देशातील स्त्रिया मुली सुरक्षित आहे . नाहीतर काय झालं

असतं ??

वाटेत येणाऱ्या जाणाऱ्या मुली शिकारी होऊन लांडग्यांच्या तावडीत फस्त झाल्या

असत्या ....खरंय का हे ? किती टक्के पण ??

रंडीबाज म्हणून घोषित झालेली ती ..... एका रात्रीत तिला तिचा मालक किंवा

मालकीण किती पुरुषासोबत झोपायला लावते ..... ह्याची गिणती होऊ शकत नाही

पैसा पाहून माल बोहल्यावर चढवल्या जातो .... तिच्या चुरडा झालेल्या

भावनांचा विचार शून्यच .....

त्यांच्या मुळे स्त्रिया मुली सुरक्षित राहतात हे अर्धे फसवे वाक्य !

एकविसाव्या शतकात मुलींना चार भिंतीच्या आतही सुरक्षित असताना बघावं ..... 

दिपा आणि बबिता दोघीही सख्या बहिणी अगदी चौदा सोळा वर्षाच्या असताना

अनाहूतपणे ह्या व्यवसायात ढकलल्या गेल्या .... 

दोघीही तलख बुद्धीच्या शिकण्याची इच्छा असूनही शिकता आलं नाही .

पळून जाण्याचा ह्या दोघीने कितीतरी वेळा प्रयत्न केला पण वस्तीच्या

बाहेर पाऊल ठेऊच शकल्या नाही ....

बबिता आता तिशीची झाली होती . पळून जाण्याचा विचार तिने

सोडून दिला होता ... ज्या मुलींना पैशाची खूप गरज भासत होती त्यांच्या

लाचारीचा फायदा घेऊन बबिताही अश्या मुलींना ह्या व्यवसायात घेऊन यायची

आठवडी बाजाराला तिला एकटीला जायची मोकळीक होती ...

नेहमीप्रमाणे बबिता बाजाराला एकटीच गेली . हा नारळीपौर्णिमेचा बाजार

होता . राखीची दुकान सजली होती . त्या दुकानाकडे बघून मनोमन हतबल

होऊन बबिता तिरस्काराच्या दृष्टीने बघत होती .... जिथे माय बहीण नात नसते

शिव्या होतात अश्या जगात ती वावरत होती ... त्या जगण्यात तिने डोळ्याने

वासनेचे पुजारी बघितले फक्त ... राखी वैगरे सणासोबत दूर दूरचा संबंध

नसतो ह्यांचा . 

कधी कधी बबिताला विचार यायचा ह्या जगात चांगली माणसं असतात तरी

काय ? बायका असूनही बायको कडून सुख मिळत नाही म्हणून

चांगले चांगल्या घरचे पुरुष आपल्या सोबत संबंध ठेवताना तिने बघितले .

रोज रात्री सहा सहा माणसांची भूक भागवणारी बबिता . स्वतः मात्र उपाश्यापोटी

पहाटे डोळा लागला म्हणून निजायची तर सातवा कस्टमर तयारच .

स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तू समजून ठेवणाऱ्याला ती परत येऊ नको

म्हणून शिव्या शाप ही घालायची ... पण ते दर आठवड्याला उगवायचेच .

माणसातल भाऊ पण मेलं असावं असं तिला वाटायचं नाही असावं तर ते

स्वतःच्या सख्या बहिणीपुरतं मर्यादित . पण ते ही कुठं असावं ?? ह्या

प्रश्नाने तर तिला कधी कधी झोप यायची नाही ...

" राखी राखी ... राखी घ्या हो बाई ......" असा कंटाळा बसवणारा आवाज

तिच्या कानी पडत होता .... खिन्न मनाने ती त्या गर्दीतून निसटली ..

आणि समोर उभ्या असलेल्या दुर्गा मंदिराच्या पायऱ्या चढत मातेच्या मंदिराजवळ

आशीर्वाद घ्यायला गेली ... आपल्याला भोवळ येत आहे असं तिला जाणवू लागल

विचार चक्र थांबत नव्हतं डोकं गरगरायला लागलं ... मंदिराच्या पहिल्या पायरीवर

विसावा घ्याला म्हणून ती बसली . येणारे जाणारे तिच्याकडे बघून काही हसत

होते काही तिच्या ओठावर फासलेल्या लिपिस्टिककडे बघून तिला

लाली म्हणून खिल्ली उडवत होते . 

त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती आपल्याच विचारात रडत होती .

साडीच्या पदराने डोळे पुसले तिने . आणि मनाशीच म्हणाली , " माझ्या सख्या

भावाने ह्या राखीच्या दिवशीच तर मला ह्या कुंटखाण्यात आणून ठेवले ..." 

तोंडात बळबळतच ती .... मंदिरातून तडक उठत कुंटखाण्याकडे वळली .

तोंडात पानाचा विडा कोंबत ... सारी पुरुष जात भडवी असते म्हणत ती 

गटागटा पाणी पीत समाधानाने त्या पुरुषात एकदा भावाचं नात शोधत होती 

पण तिला अजूनपर्यंत सापडलं नव्हतं ते नातं ! 

नेहमीप्रमाणे आजही नवारी साडी नेसून गालावर मेकअप चढवून 

साऱ्या कस्टमरला ओढवून 

घेण्यासाठी हातवारे करत होत्या ... 

त्यांना आपल्या शराबी नजरेने जवळ खिचून घेत होत्या .... 

रोज संध्याकाळी एक नवी कहाणी ह्या वेश्या वस्तीत जन्माला येत होती 

तिच्या अस्तित्वाला पोखरून घेणारी ... तिचा स्त्री देह चलाखीने लुबाडत तिला 

तीच स्त्रीपण नागवं करून त्या चार भिंतीत तिचा आक्रोश गिळून घेत जन्माला

येत होती एक नवी 

शब्बू , मेहबुबा .... हसनम ..... शबनम