#मिटू ( भाग -2) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

#मिटू ( भाग -2)

मास्टरबेशन ( भाग - 2 )


नेहा ( बदलेले नाव ) बस ची वाट बघत बसस्टॉप वर उभी होती .

अचानक तीच लक्ष समोर असलेल्या एका टिनपत्राच्या झोपड्याकडे गेलं

समोरचा सुरू असलेल्या प्रकार बघून नेहाला धक्कादायक अंगावर शहारे

बसले  ... चर्रर्र घाम आला ओढणीने घाम पुसत बस लवकर यावी आणि इथून

सुटका व्हावी म्हणून स्वतःच्याच मनाला ती केविलवाणी विनवण्या करत होती .

असं काय दृश्य बघितलं होतं नेहाने ज्यामुळे ती घाबरली होती ❔❔

ते दृशच लाजिरवाण आणि एका स्त्रीला अनामीकपणे त्रासदायक ठरू शकतं .

नेहा 23 वर्षाची तरुणी रोज कॉलेजला जाण्यासाठी त्या बसस्टॉप वरून

बस पकडते .

असा प्रसंग तिच्या वाट्याला किंवा एखाद्या व्यक्तीला नवखाच असू शकतो .

तिला ही हा प्रसंग हे दृश्य डोळ्यात अंजन घालणार होतं .

त्या ताडपत्रीच्या खोलीतून मुलगा तिच्याकडे बघत

हस्तमैथुन करत होता ... नेहाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं बस येईल 

म्हणून ती डोळ्यात पाणी आणत त्या बस येण्याच्या वाटेने बघत होती .

त्या मुलांची कृती थांबली का म्हणून अधूनमधून ती डोकावून त्याच्याकडे बघत होती

पण ती आपल्याकडे बघते आहे हे बघून त्याचा आणखीनच वेग वाढत होता ..

क्षणभरासाठी हे कृत्य म्हणजे नेहाला एखाद्या बलात्कारा पेक्षा ही भयाण 

आणि अंगावर काटे आणार वाटलं ... 

बस येताच नेहा बस मध्ये चढली . तो टीनाचा दरवाजा बंद झाला .

नेहाने त्या बसस्टॉप वर जाणे जरी बंद केले तरी तिच्या मनातून हा 

प्रसंग अद्यापही गेला नाही ....

भूतकाळातील कधीही न मिटणाऱ्या खोलवर जखमासारखा आजही तो प्रसंग ती

घटना ते 

दृश्य तिला झोप येऊ देत नाही ...

     मित्रानो आपल्या मनात अनेक  इच्छा , वासना , प्रेरणा , नैसर्गिक स्वरूपात

निर्माण  होतात आपण त्या इतरांपुढे बोलायचं टाळतो शिष्टसंमत नसल्याने आपण 

ते आपल्या मनात कुठेतरी दाबून ठेवतो  त्या सहजासहजी नष्ट होत नाही ...

परिणाम उद्रेक होतो ...

  नेहसारख्या अनेक मुली ह्या घटना कुणासमोर बोलून दाखवण्यात उचिता न 

समजल्यास मनात कुंडत राहतात आणि मनोविकारच्या बळी पडतात ...हे एवढं 

आत्मघातकी असू शकतं .

   एखाद्या स्त्रीकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून बघणं .. कितपत योग्य वाटतं ?? 

अश्या घटना आपल्या डोळ्यादेखत रेल्वेच्या डब्यातही घडतात .. 

          एकदा सृष्टी आपल्या मोठ्या भावाबरोबर रेल्वेनं कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता जात 
होती ... 

        लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते ती काठावरच बसली आणि तिच्या बाजूला तिचा भाऊ .

त्याचं पूर्ण लक्ष मोबाईल मध्ये गेम खेळण्यात . 
   
     तिच्या बाजूला चार पाच मुलं त्या डब्यात येऊन तिच्या समोरच गर्दी करून उभी राहिली .

त्यातला एक मुलगा सतत तिला रेटण्याचा प्रयत्न करत होता . एकदा तिने रागाने वर मान करून 

त्यांच्याकडे बघितलही पण तो मूर्खांसारखा तिच्याकडे हसत बघत होता ... तिला त्याच्या हसण्यानेही मळमळायला लागलं . 

ती अधूनमधून तिच्या भावाकडे बघत होती पण त्याचं लक्ष मोबाइल मधून निघेना . 

तो मुलगा काही म्हणत नाही आहे ह्याचा अधिकच फायदा घेत होता . आता त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला . हात ठेवल्याबरोबर ती शाहरलीच तो स्पर्श तिला खूप किळसवाणा वाटू लागला .

ती तशीच लगेच समोर सरकून बसली . आणि त्याचा हात झटकून घेतला . 

तो तिच्याकडे बघून त्याच्या पॅन्टच्या चैनीला मधूनमधून हात लावतं होता .. 

सृष्टीने बघितलं त्याचं लिंग ताठर झालं आहे . 

ती घामागून गेली . त्याने परत तिच्या खांद्यावर हात ठेवताच . सृष्टी खूप घाबरली आणि तिच्या 

भावाच्या शर्टला घट्ट पकडून घेत दादा म्हणत रडू लागली .. 

तिच्या भावाला काही कळेना काय झालं हिला असं अचानक रडायला . तिने बोटाच्या इशाऱ्याने त्या मुलांकडे खुणावल  .

  तिच्या भावसही त्याचं ताठर झालेलं लिंग दिसलं . त्याचा चेहरालाल झाला तो तिथून उठला आणि सरळ त्यांची गच्चीपकडून त्याला लोकांत म्हणून लागला ,' बघा बघा ह्या हरामखोरला मुलींकडे असं वाकड्यानजरेने बघून मोठं केलंस न .. ' 

सगळे त्याच्याकडे बघून हसू लागले . काहिक्षणात तो तिथून पळून गेला.

   अविवाहितांसाठी हस्तमैथुन हा वासनापूर्तीचा व ताणतणावाचा निवारण्याचा 

योग्य मार्ग आहे फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये .... कारण तो एखाद्या 

स्त्री च जगणं कायमच हिरावून घेऊ शकतो ...