#मिटू ( भाग -7) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

#मिटू ( भाग -7)

ही गोष्ट आहे तेव्हाची ..... 


              

   action ..... अहो मॅडम ,

नीट .... नीट समजून घेऊन तो म्हणाला , 

आपल्याला शॉर्ट फ्लिमसाठी रोल प्ले करायचा आहे जरा जबरदस्त आणि झकास 

व्हायला पाहिजे ... 

     ओढणी सांभाळत हात समोर असलेल्या टेबलाला टेकवतच ऋत्विक म्हणाली , 

करा तुम्ही चालू .... 

1 , 2, 3 स्टार्ट action ....... प्ले ! 


    " काय घेशील , चाय कॉपी की ज्यूस नाही म्हणजे घरी जाऊन आपल्याला तुझ्याकडे 

जेवायचंच आहे .... " 

      विनय तिला बोलता झाला . तशी ऋत्विक ही गोंधळलीच काय बोलू आणि 

काय नको असं झालं तिला . रात्रीच थंडगार वातावरण  आणि आजूबाजूचा परिसरात 

झाडाचा फुलोरा सजलेला टेबल पासून दूर दूर उभी ठाकलेली अशोकाची झाड . 

नकळत लक्ष वेधून घेत होती ... उंच वाढणाऱ्या त्या झाडाकडे  ऋत्विक आवासून बघत 

होती .... रात्रीच्या  काळोखातही इथे बसून कृत्रिम उजेडाने का होईना आपण वर 

मान उंचावून वर वर सरळ वाढणाऱ्या ह्या झाडांना बघू शकतो ह्याचं तिला अप्रूपच वाटतं होतं ...

     एक कटाक्ष विनयने ऋत्विककडे बघत तिला म्हटलं , 

" काय बोलवू सांग लवकर  ....." 

" अरे हो " भानावर येत ती म्हणाली ......

" कॉफी .."

विनयने उभ्या असलेल्या वेटरला कॉफीचा ऑर्डर दिला .... 

" मला वाटतं तुला ही झाडं खूप आवडतात ..... कधीचा बघतोय तुझी नजर 

उंचावर .... मी आवडलो नाही वाटतं ! " 

आपली नजर विनयवर रोखून धरत ऋत्विक म्हणाली , 

" नाही नाही .... अश्यातलं काही नाही तुम्ही पसंद येणार नाही कुणाला झालंच मग . "

" असं काय आहे माझ्यात  ? " 

.... हसतच ऋत्विक म्हणाली , " सर्व , स्मार्टनेस , अतोनात श्रीमंती तरीही कसलं 

व्यसन नाही हेच बघितलं ना माझ्या

घरच्यांनी तुमच्यात .... " 

" हो , आणि तुमच्यात माझी पत्नी होण्याची छबी दिसते ..... तुमच्यावर लग्नासाठी 

दबाव तर नाही ना ? ? " 

होकाराच्या आठवड्या नंतरही नकार पचवावा लागेल ह्याची  भीती  होतीच तिला ....  तरीही 

सर्व  सांगून टाकायच आपण हे ठरवलंच मनाशी तिने ... 

" मला काही सांगायचं आहे तुम्हाला ....."

  " सांग ना मग ..... " विनयच्या ओठातून शब्द निघताच ऋत्विकचा फोन वाजला .

तिच्या मॉमचा फोन होता . ऋत्विकने रिसिव्हर कानाला लावला तसाच मॉमचा 

घाबरलेल्या धमक्या ऐकायला आल्या ..... 

" बेटा ऋत्विक , तू  विनयला तुझ्या बद्दल काही सांगितलेलं नाहीन .... हे बघ त्याला 

काही सांगू नको .... लग्न जुडलेलं आहे . "

आणि रिसिव्हर कट झाला .... " हॅलो मॉम हॅलो ....."  ऋत्विकने आपला भेदरलेला आवाज 

ओठानेचं गिळकृत केला .  

" काय झालं .... मॉमचा कॉल होता का ? आपल्याला बोलवत असतील घरी ... तुम्हाला 

काही सांगायचं होतं सांगा निघू मग घरी जायला ..... "


काय सांगावं कळतं नव्हतं तिला ..... तरी ती जे घडलं ते सांगायला तयार झाली 

कारण तिला विनयला अंधारात नव्हतं ठेवायचं नंतरचा निर्णय त्याचा असेल म्हणून 

ती बोलती झाली , 

" विनय ह्या आधी माझं लग्न जुडलेलं होतं ते मोडलं ..... "

"........ काय ? "

" हो , संगाई झाली मुदिखाई झाली आणि तो मला फिरायला घेऊन जायला घरी 

आला  ..... आणि आणि त्या दिवशी माझं सर्वस्व मी गमावून बसली त्यांना मी म्हटलं 

वेळ होते आहे घरी लवकर चला पण नाही , जेवण करून जायचं होतं  ..... घरी निघताना 

अर्ध्या रस्त्यात आमच्या गाडीतील पेट्रोल संपलं .... आम्ही एखादी गाडी येण्याची वाट बघत 

उभे होतो एक गाडी आली . तो पेट्रोल मागायला गेला तेव्हा  गाडीतला एकझन 

उतरून मला छळू लागला .... त्याच्या डोळ्यादेखत त्यांनी कडेला झाडीत नेऊन अत्याचार 

केला पण तो काहीच नाही करू शकला ते चौघे होते हा एकटा पडला ..... पण दोषी 

मीच ठरले त्या रात्री मी त्याच्या सोबत गेली नसती तर ..... तो अनर्थ टळला असता .... 

सर्व काही त्याच्या नजरेदेखत घडून त्यांना माझ्यासोबत आय विटनेस म्हणून यायचं तर 

नव्हतं पण माझ्यावर दुष्कृत्य घडलं म्हणून लग्नही करायचं नव्हतं ..... 

सांगता सांगता डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या होत्या ऋत्विक रडू लागली खूप 

घाबरलेली होती ती ... तो  चाळीस वर्षाच्या पुरुषी चेहरा तिच्या नजरेसमोर घुटमळत होता 

तिला आजही दहा वर्षा नंतर छळत होता ... 

    action कॅमेरा बंद झाला ..... दिप्तीचा चेहरा मात्र लाल झाला होता अजूनही 

डोळ्यात पाणी तरळत होते ... 


" व्वा व्वा दीप्ती मॅडम आपको तो दाद देनी पडेंगी .....इतना अच्छा रोल जो किया आपणे 

वो इमोशनस वो डर का दिखावा क्या खूब निभाई सभी बाते ..... नेक्स्ट रोल कल ! " 

दीप्ती घरी जायला निघाली  .....  आलोक तिला इकडे तिकडे शोधत होता . 

मेन हायवे वर येताच दिप्तीने टॅक्सी पकडली आणि घरी पोहचली .... आलोक आणि दीप्तीची 

ही पहिलीच शूटिंग दरम्यानची भेट ठरली त्या आधी  कधी एकमेकांना बघटलेलं नव्हतं . 

दीप्ती सोबत आलोकला काही बोलायचं होतं ओळख वाढवायची होती पण 

ती निघून गेली तिथून लवकरच .....  

     खरतरं ऋत्विक आणि विनय हे पात्र  घेऊन बनलेली ही शॉर्टफ्लिम दिप्तीला नको होती 


पण तिच्याशिवाय कोणी दुसरी ह्या फिल्मला match होईल हा एक समजच पलीकडे 

डोकाऊ पाहणारा तळघराच्या आत तोच चेहरा त्याला त्याच्या शॉर्टफ्लिमसाठी पाहिजे होता ....


तिच्या मनात साचलेला गाळ काढणे शक्य नव्हतेच कुणाला ....  पंचवीस वर्षाची झाली ती

आलेला पावना पुन्हा परत येईल दारी ही आशाच तिच्या घरच्यांनी सोडून दिली .....


कारण तिचा भूतकाळ तिचं जगणं हिरावून घेत होता .....  ती तर ह्या समाजाच्या नजरेत 

आजही पीडित होती ..... एक बलात्कार पीडित ! 


हा  समाज तिला जगू देत नव्हता ..... 


रोज नव्याने सूर्य उगवायचा .... आजही उगवला .... रात्रौ स्मशानात निखाऱ्यावर पेटणार 

मढ म्हणून ती गतकाळच्या वेदनात आक्रसून जळायची ..... दिवस होताच स्वप्न 

उराशी कवटाळून उठायची .... 


       स्क्रिप्ट हातात घेऊन तिने तिचे संवाद वाचून घेतले आणि सुरू झालं 

lightस , action ..... कॅमेरा ! 

             बसलेला विनय ताडकन चेअर वरून उठला ..... 

" आधी का नाही सांगितलं हे सर्व  माझ्या घरचे लग्नाला तयार नाही होणार .... " 

त्याला बसायला विनंती करून ऋत्विक त्याला म्हणाली , " घरच्यांचा प्रश्न येतोच कुठे 

मी तुमची होणार आहे तुम्ही निर्णय घ्या ..... " 

" घरच्यांचा विरोधात जाऊन मी लग्न नाही करू शकत आणि अशी लग्नाआधीच 

देहभ्रष्ट झालेली मुलगी माझ्या घरच्यांना चालणार नाही ..... " 

     दीप्ती आता पत्रातली कोणी ऋत्विक आहे हे विसरलीच स्क्रिप्ट मधला संवाद मागे 

ओस पडत चालला ..... 

       ती आपल्या जागेवरून उठत विनयला ( आलोक ) म्हणाली , 

" व्वा इतकं शिक्षण घेऊन शिकलात काय तुम्ही ? म्हणे देहभ्रष्ट झालेली मुलगी ..... 

माझ्यावर त्यांनी स्वतःची वासना तृप्त केली ..... ते सर्व निर्दयी आणि नरभक्षक पुरुष होते 

एका स्री देहाला नोचणारे ..... माझं काय भ्रष्ट झालं ?? देह ...... तो त्यांचा त्यांनी भ्रष्ट केला 

एका स्त्री योनीत स्वतःच लिंग खुुपसून .... माझं काय गेलं काहीच नाही .... "

        तिचे हे वाक्य ऐकून प्रोड्युसर शूटिंग ऑफ करायला सांगतो ... वायर कट्ट करायला 

सांगूनही ते हात त्यांचे थबकलेच असते कारण .... स्क्रिप्ट मधला रोल तिला तिथून उठून रडत 


घरी जायला सांगतो .... पण , तस न करता दीप्ती तिला बोलायची वाक्य विसरून जाते 

एवढंच काय तर ती भानावर ही नसते .... तिच्यावर सतत आठ दिवस रेप करणारे तिचे काका 

तिला आठवत होते सख्याच काकाच्या दुष्कृत्यावर पडदा टाकणारे तिचे बाबा एकीकडे तिला 

रडताना दिसत होते ... 

           काय चुकीचं बोलत होती ती जे सोसलं तिने तेच आज एवढ्या वर्षयाची सीमारेखा ओलांडून

ती बोलत होती ....  


".................  हा समाज ही संस्कृती स्त्रीला जेवढं दोषी ठरवते तिच्याकडे एक भोगवस्तू म्हणून

पाहते 

तिच्या भावनांना चरित्र्याला महत्व नाहीच इथे देहाला तिच्या किंमत आहे ..... आणि तुमच्या सारखे 

बलात्कार झाल्यावर तिला देहभ्रष्ट स्त्री म्हणतात तेव्हा ह्या अश्या मागसल्या विचारसरणीच्या 

देशात रोज दिवसाच्या उजेडात अन काळोखाच्या अंधारातही तिच्यावर भररस्तत्यात बलात्कार हे 

होतच  राहणार ..... मलाही अशा भेकडवृत्ती मुलासोबत लग्न करायचं नाही ....."

प्रोड्युसर तिच्यावर भडकतोच .....

" स्क्रिप्टची पूर्ण वाट लावली ....... " पण तिचा हा करारीपणा इतरांच्या नजरेत भरतो .. 

तरी शुटिंग सोडून तिला तिथून निघून जायची ताकीद मिळते .....  ती तिथून डोळ्यातलं पानी 

पुसत  जायला निघते तेव्हा ...... आलोक तिच्या समोर जाऊन तिला म्हणतो ..   



प्लिज you marry me ? मी त्या बनावट कथेतला पात्र नाही   ..... तुझ्या प्रत्येक ऍक्टिगच्या 

बोलण्यात मला जाणवत होतं हे सर्व फेस केलय तू .....  मला त्या घटनेत बळी पडलेल्या 


victimकडे बघणाऱ्याचा दृष्टिकोन बद्दलवायचा आहे ......."


चेहऱ्यावरचे हावभाव टिपत ... दिप्तीने होकारार्थी मान हलवली 


त्या दिवसाची ती 

पुसटशी रेघ तिने हळूच मिटवून टाकली ....... मनात सलणारी जखम ती काय 

नाहीशी झाली ..