रिलेशनशिप
नाती म्हणतात ना एक विसावा असतो आपुलकीचा त्या नात्यावर आपण
डोळेझाक पणे विश्वास ठेवतो .
एक सत्य घटना काव्या सोबत घडलेली .... आजही ती त्या घटनेला विसरलेली नाही
बारावी झालं आणि ती आपल्या आते भावाकडे शिकायला गेली . आत्या मामाजी
हयात नव्हतेच आते भावाचं लग्न झालेले .... तिची वहीनी 2 , 3 महिण्याकरिता
बाळंतपणासाठी माहेरी गेली होती .
काव्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली होती हॉस्टेल मिळत नव्हत म्हणून
आते भावाने त्याच्या घरी राहायला तिला परवानगी दिली .
तिला ही खूप छान वाटलं . इथे कसलीच आपल्याला उणीव भासणार नाही म्हणून .
काव्याच्या आत्याच अगदी मेनरोडला लागून तीन मजली घर होते . तिथून
कॉलेजला जायला काव्या घरासमोरुनच बस पकडायची .
एक महिना निघून गेला . काव्याला तिथे खूप सेफ वाटायचे . काव्या त्या
वातावरणात आधीच वावरलेली होती पाचवी पर्यंत नंतर काही कारणास्तव
आईच्या नोकरीसाठी काव्याला आत्याच घर सोडावं लागलं .
तेव्हा काव्या तेरा वर्षाची होती .
वहिनी माहेरी गेल्या मुळे काव्याला आतेभाऊ घरी येई पर्यंत एकटीलाच
राहावं लागतं होतं . तो बीजनेस करायचा एकदा घरून सकाळी आठ ला निघाला
की रात्री अकरा बाराच्या दरम्यानच तो घरी पडायचा . तो येई पर्यंत काव्याला त्याची
वाट बघत जाग राहावं लागे .
बिजनेसच्या कामासाठी त्याला मुबंईला जायचे होते .. तो काव्याला म्हणाला ,
" मी इथे माझ्या एका मित्राला ठेऊन घेतो , मला यायला 2,3 दिवस लागतील तेव्हा
पर्यंत माझा मित्र बाहेरच्या हॉल मध्ये रात्री झोपायला येत जाईल . "
काव्याने त्याला नकार दिला ....
" दादा प्लिज नको ना ....मित्राला इथे झोपायला नका बोलवून घेऊ मी दार लॉक
करून राहील एकटी ...."
तीन मजली इमारतीत काव्या लॉक करून एकटी राहायला तयार होती
पण दादाचा कोणी मित्र हॉल मध्ये झोपायला यावा अस तिला नव्हतं वाटत .
तिच्या मनातली भीती तिचा आतेभाऊ ही समजू शकला नव्हता .
दोन दिवसांसाठी कॉलेज पाडून काव्या आपल्या आईबाबच्या गावाला ही जाऊ
शकत नव्हती अभ्यास खुप जाईल असं तिला वाटलं . जवळ आईला बोलवून
घ्यायचं तर आईची तब्येत ठीक नव्हती ती येऊ शकणार नव्हती ... आणि आतेभाऊ
बिजनेसच्या कामासाठी मुंबईला जातो आहे हे आईला सांगितलं तर ती उगाच
टेंशन घेईल म्हणून काव्याने सांगितलं नाही .
तिने आतेभावला सांगितलं त्याला खाली हॉल मध्ये झोपायला नका बोलवू
तर तो तिला म्हणाला ,
" बर माझा मित्र वरच्या बेडरूममध्ये झोपेल ... "
तिने होकार दर्शविला ठीक आहे दादा म्हणून ....
पण , ती त्याला म्हणाली ,
" दादा जाणं एवढं महत्वाचं नाही ना मुंबईला मला इथे एकटीला टाकून .
तुम्ही जवळच्या मित्राला पाठवू शकता ना ! "
ह्यावर तो म्हणाला ,
" काव्या अगं माझा माझ्या मित्रांवर विश्वास नाही ...."
तिला समोर काहीच बोलता आलं नाही ... दादाचा स्वतःच काम करायला
पाठवायला मित्रांना त्यांच्यावर विश्वास नाही ... आणि मला मित्राच्या भरवश्यावर
टाकून जायला तेव्हा त्यांचा मित्रांवर विश्वास आहे का ? तिला पडलेला
प्रश्न खराही होता .
काव्या त्या दिवशी कॉलेज मधून आली ... येताने मोठं बाहेरच गेट उघडताच तीच
वर लक्ष गेलं तर वरचा दार तिला उघडा दिसला . मनात ती विचार करू लागली
दादाचा मित्र तर रात्री वर झोपायला येणार होताना . आता कोण असेल ?
तिच्या दाराच्या आवाजाने तो ही बाहेर आला .. वरच दार लावून तो खालच्या
पायऱ्यांच्या दिशेने येत होता त्याला येताना बघून तिला कळलं दादाचा मित्र आला
आहे . तो खाली उतरत आहे हे बघून तिने काही लक्ष दिलं नाही . बाहेरच्या हॉलच
दार उघडत ती आत शिरली आणि आत शिरताच तिने दार आतून लावून घेतलं .
काव्याची रूम ही सर्व रूम च्या मागे होती जिथे इलेक्ट्रीकल पाण्याच्या मोटरची
बटन होती वर पाणी चढवण्याकरिता . आणि त्याच मागच्या बाजूला रूम जवळ
मोठी टाकी होती .
काव्या कॉलेज वरून आली आणि रूम मध्ये कपडे चेंज करायला गेली .
कॉलेज च शर्ट उतरवून तिने हाताशी टॉप घेतलं तशी तिची नजर खिडकीकडे गेली
तो तिला चोरून बघत होता . तीच लक्ष जाताच तो खिडकीच्या बाजूने हटला .
काव्याचा अंगावर मात्र काटे आले तिने टॉप छातीशी घट्ट पकडून घेतलं आणि आपले
कपडे घेऊन बाथरूम मध्ये चेंज करायला निघाली . तसाच तो तिला टाकीकडे
जाताना दिसला .
काव्याचा तर थरकाप उडाला होता दादाचा मित्र आपल्याला न्याहाळत होता
म्हणून डोळ्यात पाणी दाटल होतं ...
कपडे चेंज करून ती बाहेर आली तर समोरच्या रूम च दार कोणीतरी थोटवत होतं
. तिला वाटलं कामवाली बाई असणार पण ती तर चार दिवस सुट्टीवर होती ना
आणि स्वयंपाक करणाऱ्या काकू काय आताच येणार होत्या . तस पण मी एकटी आहे
माझ्यासाठी मी बनवून घेईल अस तिने सांगून ठेवलेलं . ती दार उघडताच दारासमोर
तो उभा होता तिला काहीही न विचारता त्याने सरळ पाण्याचा मोठा पाईप मागितला
झाडांना पाणी मारायला .... तिने तो पाईप धकवून दार लावून घेतलं .
पुन्हा खिडकीजवळ जाऊन सर्व खिडक्या रुम मधल्या बंद करून घेतल्या आणि रूम
मधले लाईट ऑन करून बसली . कॉलेज वर्क खूप होत पण ती खिडकीजवळ
दिसलेली सावली आणि आपली नजर जाताच त्याच तिथून दूर सरण तिच्या नजरेला
छळत होतं .
सात वाजलेले ती बाहेरच्या हॉल मध्ये बसली हॉलचा दरवाजा लावून
परत दारावर त्याचीच थाप . तिने जाऊन दार उघडताच तो आत आला
आणि तिला म्हणाला ," मला चिकनची भाजी आहे गरम करून दे ." तिला चिकन
आवडत नव्हते आणि गरम पण करून घ्यायचे नव्हते म्हणून नकार दिला तिने .
तर तो सरळ किचन मध्ये गेला आणि त्याने भाजी गरम करून आणली जाता
जाता तो परत मागे वळला फ्रिज मधून पाण्याच्या बाटल्या काढल्या .
आणि दोन बाटली घेऊन आला . हातातली बाटली खाली ठेवत तो
काव्या जवळ जात तिला म्हणाला ," दार लावू नको मी खालीच इथे जोपणार आहे . "
तो काव्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होता .. तो जवळ येताच तिला घामाघूम
त्याचा ड्रिंकचा स्मेल येत होता .
त्याला काव्याने बाहेर पडू दिल आणि तडक जाऊन दार लॉक केलं .
दार लॉक केल्यानंतर तो सतत दोन तास दार वाजवत राहाला .
काव्याला त्याच्या नजरेत भुकेने व्याकुळ झालेला नरभक्षक दिसत होता .
तिला वाटलं दादाला कॉल करून सांगावं अरेरे मला खुप भीती वाटत आहे तुझा
मित्र असा का वागतो आहे दादा ?? पण , तिला हे ही वाटलं माझ्यावर तो
विश्वास करणार नाही ....
माझी काळजी असती तर तो असा मला एकटीला घरात टाकून मित्राला इथे बोलवून
घेत त्याचा भरवश्यावर मला सोडून निघून नसताच गेला .
ती त्या रात्री सख्या भावाच्या नात्यासाठी तर रडलीच कारण तिला सखा दादा नव्हता
आणि ह्या साठी ही रडली जो आतेभाऊ तिला एकटीला टाकून गेला
त्याने तिच्याकडून जबरदस्तीने स्वतःच्या हाताला राखी बांधून घेतली होती .
तिची इच्छा नव्हतीच त्याला राखी बंधायची तरी तो राखी पौर्णिमेच्या दिवशी
राखी घेऊन येत तिला बांधून मागितली ....
पण नातं त्याला जपता आलं नाही ... ती मनाला हा प्रश्न विचारत होती
दादाची सखी बहीण असती तर तो तिला सोडून एवढया मोठ्या घरात मित्राच्या
स्वाधीन करून असा निघून
गेला असता का ? नाही ना !
तो आल्यावर ही तिने त्याला काहीच सांगितलं नाही . वहिनी आल्यावर
तिला वाटलं त्या मित्राचं येन जाणं कमी होईल पण नाही ...
आते भावाने तर तिला वर रूम दिली राह्यला का तर त्याला आणि त्याच्या बायकोला
खाली बारा रूम असूनही तिचा त्रास होऊ नये म्हणून तू वर राहा अस सांगितलं .
आणि तो मित्र काव्याच्या रूमच्या बाजूला येऊन पार्ट्या ड्रिंक करू लागला .
ह्याचा तिला त्रास व्हायचा हे सर्व ती घरी कॉल करून आई बाबाला सांगते म्हणून
त्याने तिचा फोन ही तिला मागवून घेऊ लागला पण तिने तो दिला नाही ....
भीतीच वातावरण आणखीनच वाढत होत आपल्या नातेवाईकांनच्या घरी भीती
नावच वलय आपल्या सभोवताली असते हे सर्व तिला खूप त्रासदायक ठरत होतं
मित्राच्या वाईट संगतीला लागून असलेल्या आतेभाऊ जो एक दिवस राखी
बांधून घेतो तो तिच्या इज्जत मित्राच्या हवाली करायला ही मागे सरत नाही .
काव्याला तिथून निसटायच होत .... त्यांच्या तावडीतून सुटका करून घ्यायची होती
स्वतःवर कोणती आच न येऊ देता .
नाती कितीही जवळची असली तरी त्या नात्याने तिच्याकडे भोग वस्तू म्हणून
बघण्याचा कल अजून बदलेला नाही ..... #रिलेशनशिप