#मिटू ( भाग -9) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

#मिटू ( भाग -9)

छळाला सुरूवात नात्यातून ?


संयुक्ता इंजिनीयरींगची विद्यार्थींनी ..... आज तीन चार वर्षानंतर भेटली बीई पुर्ण झालं 

म्हणे एवढ्यात माझं डोकं खुप दुखतय गं ... तिचं डोकं दुखण्यामागचं नेमक कारण काय असावं 

डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तिला देणं योग्य ठरावा छे ! टेबलेट घेऊन ताण कमी व्हावा अशातलं 

काहीच नव्हतं ...

वेगळ्याच काही कारणाने स्वतः ला खुप Depress फिल करतं होती ती .....

प्रदिप ( बदलेले नाव ) तिचा हा चुलत मामेभाऊ गेल्या एक वर्षा पासून तिच्या वॉटसअँपवर होता ...

फेसबुक वरून त्याने हिला तिचा वॉटस अँपनंबर मागितलेला आणि तिने देऊनही दिला ...

नातेवाईक आहे ह्या विश्वासाखातीर .....

गेली दहा अकरा महिने झाली तो बोलायचा नाहीच तिच्या सोबत फक्त पोस्ट शेअर करायचा ..

संयुक्ताने त्यांचा नंबरही दादा म्हणूनच सेव केला .... 

तशी ती वॉटस्अँपवर खुप कमी अॉन असायची तीन चार महिण्याच्या काठी एक्साम संपल्यावर .

खुप दिवसाने तिने वॉटस्अँपवर अॉन आल्यानंतर तिच्या मामेभावाने तिला कशी आहे म्हणून 

मँसेज केला ? 

एवढ्या दिवसानंतर मँसेज त्यांचा .... ती ही बोलू लागली छान आहे मी ....

दादा तुम्ही कसे आहात ? त्यानेही तिला मजेत आहे म्हणून मँसेज केला .

तो तिला म्हणाला ,

" कॉल करू का ? " 

तिनेही होकार दिला नोर्मल बोलणं झालं .... मामा मामी कसे आहेत तुमचा जॉब कसा सुरू आहे 

झालं बोलणं .... नंतर तो बोलू लागला वॉटस्अँपवर ही दादा म्हणायची नेहमी त्याला दादा ह्या शब्दा 

शिवाय तिचं वाक्य पुर्ण व्हायचंच नाही ....

त्याने एकदा तिला एक विडियो पाठवला होता दलित महिलेला नग्न करून एक जमावं मारत

होता ..

तेव्हा तिने त्याला मँसेज केला ... दादा कृपया मला असे विडीयो नका पाठवू !

सात महिण्या आधी बोललेले तिचं हे वाक्य तो आज तिला सुनावत होता .. 

म्हणाला ... तुला तसे विडीयो आवडत नाही ना ?? ती म्हणाली नाही . तो म्हणाला वॉटस्अँप 

वर असे विडीयो शेअर होतातच .... ती परत त्याला म्हणाली ... एखाद्या स्त्री देहाची विटंबना होत

आहे आणि मी तसं दृश्य नजरेने नाही बघू शकत ती महिला कोणत्याही जातीची असो ती एक स्त्री

आहे मानव आहे ...

तो फक्त तिला तिच्या ह्या बोलण्यावर छान म्हणाला .... आणि परत तिला म्हणाला 

मागे एका साठ वर्षांचा मुसलिम पुरूषाने एका दोन वर्षांचा मुलीवर बलात्कार करण्याचा 

प्रयत्न केला तेव्हा लोकांनी त्याला बेदम मारलं ..... ती ह्यावर बोलली .... ये चलता रहेगा भाई !

तो हो म्हणाला .....

नंतर तिने नराहून त्याला असा प्रश्न केला ... दादा पुरूष वासनांध का असतात एवढे ??

ती म्हणाली ..

ह्यावर तो बोलला मी तर ऐकलं म्हणे स्त्रीयाचं वासनांध असतात ... ती त्याला म्हणाली 

माहिती नाही दादा पण स्त्रीया कुणाचा जीव घेत नाही ... पुरूषांमुळे तर किती स्त्रीया मरताहेत रोज .

त्याला वासनांध शब्द लागला असावा हे तिला नंतर समजलं त्याच्याच बोलण्यातून .. 

तो तिला म्हणाला ... तुला काही विचारू का तुला माझा राग येईल ? तिला वाटलं काय माहिती 

काय विचारायचंय आहे त्यांना म्हणून ती म्हणाली दादा विचाराना काय ते .... 

त्याने तिला पहिला प्रश्न केला तुला वासना येते ... तिला अजिबच वाटलं जरा कोणी मोठा 

भाऊ असा प्रश्न विचारतो . ती म्हणाली नाही ... तो म्हणाला शक्यच नाही . 

तुला mc येते का ? 

हा त्याचा प्रश्न ऐकून तिला रडूच कोसळलं अॉफलाईन गेली ती .... 

तो तुला वाईट वाटला का माझा प्रश्न म्हणून विचारू लागला .... तिने म्हटलं दादा तुम्ही 

खराब प्रश्न विचारता .... हे काही पण .... त्याने सॉरी म्हणून माफी मागितली .

तिला त्याचं वाईट बोलण लागलं ती म्हणाली मला वाईट वाटलं दादा खुप जास्त ...

तो अजूनच खराब बोलायला लागला .... आणि खुप खराब विचारायला लागला तिला 

mc आल्यावर कस फिल होतं ती म्हणाली काही रोमान्स किडे नाही धावत अंगात ... त्रास होतो 

असे प्रश्न नका करू असं बजावल्यावरही तो तिला म्हणाला ते करतांनी आधी कुणाला छान

वाटतं .

वीर्य आत गेल्यावर मुलींना कसं वाटतं त्या ऐकांतात असल्यावर काय करतात .... तिला किळस 

यायला लागला तिच्या मामेभावावर ती म्हणाली दादा माझं लग्न नाही झालं आणि तुम्ही 

मला असे प्रश्न का विचारता ..... एवढं म्हणूनही तो म्हणाला , " बायकोला खुश कसं ठेवायचं ? "

परत म्हणाला तू मुलगी आहे म्हणून विचारतो .. तिने त्याला म्हटलं लग्न झाल्यावर बायकोलाच 

विचारा ....

संयुक्ता नात्याच्या बंधनात अडकली होती ... तो मोठा होता वयाने म्हणून ती त्याला कमी जास्त 

बोलूही शकत नव्हती ... 

नात्यात लागते म्हणून त्याला ब्लॉकपण नव्हती करू शकतं कारण , तिला तिच्या आईने विचारलं 

असतं तो बोलतो का दादा तर तिने काय उत्तर दिलं असतं ह्याची भिती ब्लॉक केलं म्हणून 

सांगितलं तर का केलं हे विचारणारच म्हणून तिने त्याला ब्लॉक नाही केलं .... वाईट वाटल असं 

म्हटलं म्हणून मात्र त्याने तिला ब्लॉक केलं .... ती मात्र दादा दादा करून त्याच्या समोर गिडगिळत 

होती दादा मला अनब्लॉक करान म्हणून त्याला मँसेज करत होती फोन वर .... मी आईला काय

सांगणार म्हणून ! त्याने तिला अनब्लॉक तर केलं पण तो परत तसचं बोलू लागला घाणेरडं 

संयुक्ता त्यांच्या वाईट बोलण्यात सहभागी नव्हती म्हणून त्याने परत तिला ब्लॉक केलं ....

आता मात्र संयुक्ता विसरली तो कोणी आपला मामेभाऊ आणि नातेवाईक लागतो म्हणून 

त्याला फोनवर मँसेज करून खुप बोलली .....

जो माणुस स्त्रीच्या बोडीपार्ट बद्दलही मनात वाईट विचार आणुन बोलतो ज्याला 

नात्यातला फरक कळतं नाही अशा माणसाला संयुक्ताने दादा का बोलावं ? 

तीने तर त्याला म्हटलं .... तुम्ही वेदनेत स्त्रीचा वासना बघता mc येतांना कसं फिल होतं 

हा प्रश्न कोणता भाऊ आपल्या बहिणीला करतो का ?? तुमच्या सारख्याना तर वासना दिसते

नजरेत घाण भरलेली आहे तुमच्या .... आणि नातं काय असते हे तुम्हाला समजणारं 

नाही म्हणून तिने त्याचे नंबर सर्व डिलीट केले वॉटस्अँप वरूनही ....

आजही त्या माणसाला संयुक्ता समोर यायची लाज वाटेलं म्हणून तो तिला ब्लॉक करतं 

होता आणि त्याला तिच्या कडून पाहिजे तो प्रतिसाद नव्हता भेटतं .... 

तिने त्याचं दिवशी त्याचा सोबत नातं तोडलं ..... पण त्याने विचारलेलं प्रश्न त्याने ती खुप डिपरेस

झाली ती सतत आठ दिवस झालेत तिच्या डोक्यात तेच प्रश्न त्याचं वाईट बोलणं 

तिला छळत होतं ..... फँमिली मधले भाऊ ज्यांना आपण दादा नावाने हाकमारतो 

तेच असे निच वृत्तीचे असतात तर ती बाहेरच्या कोणत्या पुरूषावर विश्वास करू शकेल का ??

नात्याची घुसमट तिला जगू देत नाही ... बहुताशं छळाला सुरूवात नात्यातूनच होते .. 

ह्या सख्या चुलत नात्यापासूनही मुलीनो सावध रहा !

तुम्हाला ही पुरूष कामुक म्हणून मोकळे होतील त्याने शेण खाल्लं तरी चालतं 

ह्या समाजाला म्हणून तुमच्या इज्जतीचा भाजीपाला नका करून घेऊ .....