#मिटू ( भाग -11) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

#मिटू ( भाग -11)




जगण्याच्या वर्तुळात प्रेम हे प्रत्येक सजीवाला बहाल केलेली अनमोल देणगी ....

प्रेम म्हणजे जीवनाचं मर्म ! त्या वाटेवर मनुष्यानं निरंतर चालतं जावं असं सुखद कर्म ....

जेव्हा एखादा मनुष्य आपल्या अतृप्त इच्छेसाठी एखाद्यावर प्राण घातक हल्ला करतो , तेव्हा त्याच्या माणुसकीवर संदेह निर्माण होतो . 

आपण त्याला क्रूर जनावर किंवा नरभक्षक म्हणून मोकळे होतो . तेव्हा , त्याला जबाबदार तो एकटा नसतोच तर संस्कृतीची थोरवी गाणारे , त्यांना बंधनात अडकविणारा हा समाज ही असतो . 

प्रेमापासून आपल्या अपत्यांना दूर ठेवणारे आईबाबा . त्यांना वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले म्हणजे तोंड काळे करून येणार की काय ?

आणि तस चुकून माकून झालंच तर समाजात ह्यांचं नाक कटणार .. 

मूलं वयात आल्यावर मुलांना मुलीपासून किंवा मुलींना मुलापासून आईबाबा दूर ठेवतातच . शरीर वाढायला लागलं की जबाबदारीने आई मुलीला सांगते आता तू स्कर्ट नको घालू शिवलेस नको घालू बरं ! पाय झाकेल मांड्या गुडघे दिसणार नाही असे पूर्ण कपडे परिधान करायचे . 

त्यांना मुलगा आणि मुलगी ह्या दोन नात्यात मैत्रीची मोकळीक नसतेच . याचं वयात मुलांच्या मानसिकतेवर तारुण्याच्या उबंरठाबाहेर न पडण्याचं दडपणही असतेच कुठेतरी ... 

आजही अशी परिस्थिती आहे मुलं मुली दहावी पर्यंत एकमेकांनपासून लांबच असतात ; म्हणून बहुतेकांना कॉलेज लाईफच आकर्षण असते . मुली मुलांच्या जीवनात मैत्रिणी म्हणून असल्या की त्याच्या मनात त्यांच्याबद्दल मैत्रीची भावना असते .. मनात आदरभाव वाढतो . एकमेकांच्या संम्पर्कात असल्याने वस्तूची देवाण घेवाण वर्गात न समजल्या जाणाऱ्या विषयावर चर्चा होते इथेच आकर्षण हळूहळू नाहीस होते . 

पुरोगामी म्हणविणाऱ्या भारत देशात पुढारलेपणा अजूनही जागच्या जागी थिंगळ घालून आहे . नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची संधी हि गमावलेली आहे ह्याच वाईट वाटतं ... योग्य संस्कार योग्य माहिती जाणून घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे . 

मूल वयात आल्यावर त्याची कृती भावना मन समजून घेणे , प्रत्येक वडिलांनी मुलगा वयात आल्यावर मुलाला लैगिक शिक्षणाबद्दल तर मुलींना आईने योग्य ती माहिती देणे गरजेचे आहे . पण आपल्या संस्कृतीत असं काही घरातल्यानी उघड उघड चर्चा म्हणजे डोक्यावर ताण , कपाळावर शंभर आठ्या येतील . आमच्या काळी हे असं काही नव्हतं , असं सांगितल्या जातं . कारण आधीच्या काळात मुलींचे लग्न बारा पंधरा वर्षातच करून देण्यात कुटुंब आनंद मानायचे ; पण सुरवातीच्या काळात हिंदी चित्रपटातील चुंबनदृश्य बघून कुणाचं कॅरेक्टर बिघडलं असेल असं नाही . लैंगिक शिक्षणाचा रोख स्त्रीपुरुष सबंध कसा ठेवतात . याची मनोरंजक माहिती नसून तो कसा सुरक्षित असावा , त्यातून निर्माण होणारी वैक्तिक , भावनिक , सामाजिक बांधिलकी ह्यावर भर देणारा असावा .असं वाटतं ...

त्यासाठी कुठल्याही बालकातला बदल पालक अथवा शिक्षक ह्यांनी नजरे आड करून चालणार नाही . पालकांनी आपल्या बालकासमवेत वेळोवेळी संवाद साधत राहवं . जेणेकरून त्यांच्या मनात आपल्या पालकांबद्दल विश्वास निर्माण होईल ; पण मुलांच्या मनातले संकोच , त्यांच्या दबलेल्या भावना उघडकीस येतील . जर अशी घटना त्यांच्या सोबत कधी घडलीच , तर ते मोकळेपणाने पालकाना सांगतील . त्यातूनच बालकांच्या मनावर होणारे अनिष्ट परिणाम टाळता येतील . 

मुळात कामभावनेचा उद्रेक कसा हाताळावा , याची व्यक्तिगत व सामाजिक जाणीव नसणं हा आपल्या समाजाला लैंगिक शिक्षणाच्या अभावी ग्रासलेला शापच आहे . बलात्काराच्या वेळी अतिकामभावनेचा स्फोटच होत असतो . पण त्याच वेळेस या उत्पन्न झालेल्या कामभावनेच शमन कुठल्याही परिस्थितीत करायचंच हा अविचारही पेटलेला असतो . हा अविचार एकतर्फी असल्याने त्याच्या मनाच्या पूर्तीसाठी जबरदस्तीच्या वापर करण्याची उचल जेव्हा मन तीव्रतेने घेते तेव्हाच लैंगिक गुन्हेगारी घडते . ही लैंगिक गुन्हेगारी नष्ट करण्यासाठीच मुळात लैंगिक शिक्षण आहे . हे शिक्षण म्हणजे शालेय जीवनापासून विवाह काळापर्यंत टप्याटप्याने योग्य मार्गदर्शन देणे . त्यामुळे निकोप लैगिकतेच भान असणारे सुजाण नागरिक निर्माण होऊन अशा कित्येक स्त्रिया , बालिकांचा व पर्यायानं समाजातील बलात्कार टाळता येतील . 

स्त्रीपुरुषांत असा काय मोठासा फरक आहे , हे म्हणताना जुन्या स्त्रिया मोठं छान वाक्य बोलायच्या ... त्या म्हणत , " पुरुष , पुरुष काय करता , बाईपेक्षा चिमूटभर माती तर त्याला जास्त लागली आहे . " 

मुलांच्या प्रश्नांना कस समोर जायचं याचा हा वस्तुपाठ आहे . या प्रश्नांना घाबरणार्यांनी तो गिरवायला हरकत नाही ..

पालकाइतकीच मला शिक्षकाची महत्वाची जबाबदारी वाटते . शिक्षक हा अर्धा मुलांना घडवणारा पालकच असतो . चित्रपट आणि ब्ल्यू फ्लीम च सोडाच ; पण दूरदर्शनवर दाखवणारी गाणी ती एवढी उत्तान असतात की वयात न आलेल्या मुलामुलींना स्त्री - पुरुष संबंधा विषयीचे आकलन होते . हे असं चुकीचं ' एक्सपोजर ' मग पुढच्या संकटाना आमंत्रण देतं . आजच्या तरुणाला याविषयी कमी माहिती नाही ; पण जी आहे ती हि चुकीच्या पद्धतीने मिळालेली , तो बलात्कार जाणतो , पण त्याला शृंगार ठाऊक नाही ..

एका अर्थानं त्याला प्रश्न नाहीतच ; उलट आपल्याला सार काही ठाऊक आहे असच त्याला वाटतं , वाढत्या वयासोबत त्याच्या मनातली घुसमट जाणून घ्यायला तो सैरावैरा एकांतात नेटचा सहारा घेतो ब्ल्यू फ्लीम च्या वेबसाईट मिळवून तो ते अश्लील पॉर्न बघत स्वतःच्या शरीराला आणि मनाला त्रास करून घेतो . हार्मोन्स पळायला लागतात उसळतात तुमचंच स्वतःच संतुलन बिघडलेलं असते तर ते हार्मोन्स आहे . जेव्हा तुम्ही भावनेच्या ओघातात वहात जाता तेव्हा तुमच्या त्या उसळत्या भावना तुमच्या मेंदूला सूचना देतात आणि मेंदूतली सेक्स हार्मोन सिक्रेट करणारी ग्रंथी 

pituitary gland तुमच्या ब्रेन पार्ट मधून हार्मोन directly सिक्रेशन करते into the bloodstream under the command of the brain. ...



pituitary gland ( सेक्स हर्मोने secret करणारी ग्रंथी ) तुम्ही वरील आकृतीत बघू शकता आपल्या मेंदूत कुठे असते ... 

हार्मोन्स च बिघडणार संतुलन ह्याचे तुमच्यावर वाईट परिणाम पण होऊ शकतात . पण त्या चांगल्या वाईट परिणामाचा आपण विचार न करता त्याच्या आहारी जातोच म्हणून तर म्हटलय सोळावं वरीस धोक्याचं ... प्रसारमाध्यमातून माहिती मिळते ; पण दृष्टीकोन मिळत नाही . अध्यात्मापासून तर विकृती पर्यंतच्या गुढ चर्चा करणारी मंडळी नितीमुल्याचा , समाज घडणीचा विचार करणाऱ्या या अभ्यासकांची , विचारवंतांची या विषयात हस्तक्षेप करण्याची जबाबदारी बनते . मौन बाळगलेला समाज आणि प्रश्नग्र्स्थ झालेली तरुण पिढी माद्क्तेच्या आणि वासनेच्या आहारी जाऊन खिडलेली कोंडी आता फुटायला पाहिजे .. 

लैंगिकतेचा पोत बदलतच नाही . टीका काय त्यासाठी हा समाजवर्ग तर शहामृगासारखा डोक खुपसून बसलेला असतो , मानसिकता बदल्याची असेलं तर आधी स्वतःची मान प्रतिष्ठा आणि चारित्र्याची कल्पना दूर सारत त्या विषयाशी सलंग्न साधलं पाहिजे मोकळा संवाद केला पाहिजे ... ' काम विज्ञान क्लब ' ह्या सारख्या संकल्पना तुम्हाला आम्हाला राबवता आल्या पाहिजे .. याचा विचार व्हावा . 

LGBT ( lesbian, gay, bisexual, and transgender ) छत्राखालील माणसांबरोबर इथवर प्रवास करताना या विषयावर लोकसंखेचा अभ्यास करताना यांचाही समावेश होतो हे विसरून चालता कामा नये . याबदल ची अधिक माहिती मिळत गेली तेव्हा मात्र अभ्यासताना गोची व्हायची हा विषयच असा आहे . मग LGBT चा इशू लक्षात घेताना केवळ लोकसंखेचा विचार करून भागणार नाही . लैंगिकतेच्या बाबतीत सांगायचं झालं तर लेस्बियन ( स्त्री - स्त्री ) हेदेखील नैसर्गिकच असतात . जी ' गे ' ( पुरुष - पुरुष ) टी ट्रान्सजेन्डर ( तृतीयपंथी ) यांच्याविषयी अधिक माहिती त्यांचा सम्बंध प्रामुख्याने लिंग वं लिंगभाव ( जेन्डर आयडेंटीटी याच्याशी असतो . जन्मतः लिंगावरून मुलगा की मुलगी सुचवील जातं ; पण वय वाढत गेल्यावर त्यांना समजायला लागत आपण चुकीच्या शरीररचनेत अडकतो आहोत . खरतर नैसर्गिक बदल हा आवश्यकच असतो . वेळ जशी गती पसंद करते तसचं निसर्ग विविधता . पण लोकांना अजूनही नैसर्गिक गोष्टी साठी झगडाव लागत .. सेक्स ही निसर्गानी मानवाला दिलेली अनमोल शारीरिक प्रक्रिया तरी सेक्स ला घेऊन मनुष्याने किती घोळ केला . सेक्सकडे शृंगार म्हणून न बघता मनुष्याने त्याला शारीरिक भुकेत मोडलं .. निसर्गानेच त्या साठीच स्त्री - पुरुष शरीराची रचना साजेसी केली पण आपण माणूस अहो ना त्याला कृत्रिम दृष्टीत ढकलत ब्ल्यू फ्लीम च्या माध्यमाने नैसर्गिक क्रियेतही घालमेल केली . आपल्या इमोशन्सला अजून सुसाट वेग धारण करून दिला . यावरून लक्षात येते आजही आपण निसर्गाच्या विरुद्ध वागत किती अप्रगत अहो . उदेश हा असतो की , ' बेडरूम ' बाहेरच जग बलात्काराच्या विळख्यात सापडलेल आहे . त्याला कुठेतरी कायमचा थांबा मिळवा . नाहीतर पृथ्वीवर स्त्री - पुरुष प्रजाती आहे तेव्हा पर्यंत बलात्कार हा घडतच राहणार .... 

लैंगिक शिक्षण हे ' मूल्यभारीत ' नव्हे तर ' मुल्यप्रेरित 'असावं .. पालकांनी ही जाणीव आपल्या पाल्यात रुंजवावी तरच भारताचे नागरिक सुजाण बनतील शिवाय कायमचं वंचित आणि नकारात्मक जगण कुणाच्या वाट्याला येणारं नाही ..

मुलांना - मुलीना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवील पाहिजे . मुले ही निरागस असतात . त्यांना आयुष्य फुलवण्याची संधी द्या ! शेवटी चांगल वाईट सांगायला पालक असतातच ... 

स्त्रियांचा आदर करायला शिकवण , मुली - मुलांच्या मनात एकमेकाब्द्ल आकर्षण असतं ते आकर्षण नष्ट व्हावं म्हणून मैत्रीची मोकळीक त्यांना प्रत्येक पालकांनी द्यावी .. 

लैगीक्तेच पूर्ण नॉलेज आहे सेफ्टी आहे अस वाटून शारीरक सम्बंध ठेऊन जवानीची मजा घ्यायची असेलं तर तारुण्य पाण्यात ठेऊन जगायला काहीच अर्थ नसतो .. निसर्ग तुम्हाला बिनधास्त पणे सबंध कधीच ठेऊ नाही देत तो आड लाथ मारतोच ह्या सर्व गोष्टी लग्नानंतर आणि नंतरही भूक म्हणून सेक्सकडे कधीच बघू नये .. वास्तविकतेच भान ठेऊन जगणं हेच सुजाण नागरीक्तेच कर्तव्य नाहीतर पिसाळलेल्या जनावरात आणि मानवात काहीच फरक उरणार नाही ... तुमच्या भावनांवर नियंत्रण असुद्या !!

एका नाजूक विषयाला हाताळताना त्याबद्दल टिकास्त्र्ही असणारच ; पण माझ्या लेखणा मागचा उदेश सुसंस्कृत तरुणाच्या सफल आयुष्याशी हितगुज साधणाराच हा संवाद असतो .... तुमचा अभिप्राय ही नक्की कळवा !!