मात भाग ६ Ketakee द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मात भाग ६

रेवतीची रिक्षा एक स्थिर सुरक्षित अंतर ठेवून सुहास आणि प्रतीकच्या दुचाकीचा पाठलाग करत होती..

अंतर कापले जात होते खरे पण रेवती जागीच थिजल्या सारखी झाली होती.. रेवातीचे हातपाय थरथरत होते.. रिक्षात बसल्या बसल्या विचारांच्या आहारी जाऊन ती आपल्या नखांचे चर्वण करत होती.. मधेच दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून हनुवटीला लावत होती.. मधेच मोबाईल बघत होती.. मधेच रिक्षाच्या पुढच्या काचेतून सुहास आणि प्रतीक यांना घेऊन चाललेली दुचाकी दृष्टीक्षेपात आहे का याची खात्री करत होती..

त्या दोघांना जर कळले की मी त्यांचा पाठलाग करत होते तर काय वाटेल त्यांना..? आपण बरोबर तर करत आहोत ना..?

खरे पाहता ही एक आयती संधीच चालून आली होती रेवतीकडे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.. तिने सुहास आणि प्रतीक कडून सत्य परिस्थिती नक्की काय असावी हे काढून घेण्याचा बराच प्रयत्न केला होता.. पण तिचे सगळे प्रयत्न फोल ठरले होते..

आणि आता ही संधी स्वतःहून चालून आली होती म्हणून चांगले वाटत असले तरी आता पुढे काय होणार.. कोणत्या सत्याचा उलगडा होणार.. का हा सभोवताली पसरलेला संभ्रमाचा काळोख अजूनच गडद होणार या विचाराने ती पार गांगरून गेली होती..

नक्की आपण प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत आहोत की मिट्ट काळोखाच्या दिशेने..?

रेवतीला काही कळण्यास मार्ग नव्हता..

पण आता परिणामांची परवा न करता रेवतीने जे होईल त्याला सामोरे जाण्याची मनाची तयारी केली होती..

थोड्याच वेळात बघता बघता दुचाकीने मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूला असलेल्या गल्लीमधे वळण घेतले.. रेवतीने रिक्षा वाल्याला गल्लीच्या सुरवातीलाच थांबण्यास सांगितले.. तिला कोणत्याही परिस्थितीत सुहास आणि प्रतीकला आपण इथे असल्याचे आत्ता कळावे असे वाटत नव्हते.. सत्य समोर येण्यासाठी ही जी उरली सुरली आशा होती ना कदाचित ती देखील धुळीला मिळेल..

रेवतीने दुचाकीला त्या गल्लीच्या मधोमध स्थित असलेल्या एका मोठ्या इमारतीच्या गेटमधून आत शिरताना पाहिले.. तिने थोडे थांबून रिक्षाला त्या इमारतीच्या दिशेने चलण्यास सांगितले..

दुचाकी थांबली होती त्या इमारती जवळ येऊन रिक्षा थांबली..

त्या इमारतीच्या सभोवताली असलेल्या झाडांमुळे गल्लीच्या सुरुवातीला उभे असताना ती इमारत नेमकी कशाची आहे ते रेवतीला ओळखू आले नव्हते..

रेवती पाहतच राहिली.. ती एका हॉस्पिटलची इमारत होती..

रेवतीच्या मनात नाना तऱ्हेचे विचार येऊ लागले.. परत हॉस्पिटल.. कोणाला बरे नसेल.. काय चालू काय आहे 
नक्की..?

बराच वेळ ती हॉस्पिटलच्या बाहेर उभी होती.. आत जाण्याची तिची खूप इच्छा होती.. पण त्या दोघांनी बघितले तर परत प्रॉब्लेम होईल असे वाटून ती तशीच रिक्षाचा आडोसा घेऊन उभी राहिली..

जवळ जवळ एक तासाने.. रेवतीला ते दोघेही हॉस्पिटलमधून बाहेर येताना दिसले.. रेवतीने त्यांना येत असताना लांबूनच पाहिले आणि तिचा रिक्षाच्या आडूनच त्यांच्या हालचालींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू झाला..

सुहासच्या हातात कसले तरी रिपोर्ट होते.. रेवतीचा संभ्रम वाढतच चालला होता.. ते दोघे आले तसेच दुचाकीवर बसून निघून गेले.. रेवती सद्यस्थितीत फक्त आणि फक्त बघत राहण्यापलिकडे काहीच करू शकत नव्हती.. 

ती अस्वस्थतेला कवटाळुनच.. जिथे दुचाकी पार्क केली होती तिथे आली.. आणि तिथूनच हॉस्टेलवर गेली..

सुहासला विचारू की प्रतीकला.. सुहास काही आपल्याशी नीट बोलेल.. नीट काही सांगेल असे वाटत नाही.. म्हणजे एकच व्यक्ती उरते जी सत्याचा उलगडा करू शकेल..

प्रतीक.. हो तोच सांगू शकेल काय ते.. पण त्याच्याशी कुठे आणि कसे बोलावे याचा विचार रेवती करत होती..

तिने त्याला फोन करून भेटायला बोलावयाचे ठरवले..  

अर्थातच यावेळेस ती काही त्याच्या कॉलेजला जाणार नव्हती..

रेवती सध्या वेगळ्याच मनस्थतीत होती.. त्यामुळे तिचे प्रतीकशी बोलणे झाल्याशिवाय ती काही शांत होणार नव्हती..

“बोल रे प्रतीक.. लवकर बोल.. माझा जीव बसतोय इकडे.. बोल बोल..”