Fulacha Prayog.. - 17 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 17

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

१७. राज्याच्या दरबारात

सैतानाने माधवाला एका दूरच्या देशात नेले. त्या देशाच्या राजधानीतून ते हिंडत होते. त्यांच्या मूर्ती सर्वाच्या डोळयांत भरतील अशा होत्या. जो तो त्या दुकलीकडे बघे. जशी भीमार्जुनांची जोडी; परंतु सरकारी अधिकार्‍यांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडून नेले. राजासमोर त्या दोघांना उभे करण्यात आले.आपण कुठले?’ राजाने प्रश्न केला.अमक्या ठिकाणाचे असे आम्ही नाही.माधवाने उत्तार दिले.तुम्ही काय करता?’सारे काही करतो.अशक्य गोष्टी शक्य कराल?हो.थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला, ‘सध्या आम्हाला फार अडचण आहे. देशातील चांदी, सोने सारे देशांतरी गेले. तिजोरी रिकामी आहे. काय करायचे अशा वेळी? सांगा उपाय.सोपा उपाय,’ सैतान हसून म्हणाला.सांगा.राजा म्हणाला.कागदी नाणे सुरू करावे. कागदाचे तुकडे घ्यावे. त्यांच्यावर शिक्के मारावेत.हया तुकडयाची किंमत पाच रुपये, हया तुकडयाची पाचशे, असे करावे.सैतानाने सांगितले.खरेच. आमच्या डोक्यात आले नाही. फुकट आहेत आमचे प्रधान. तुम्ही आम्हाला नेहमी सल्ला देत जा. तुम्हाला बंगला राहायला देतो. नोकर चाकर सेवेला देतो. जाऊ नका आम्हाला सोडून.राजा म्हणाला.सैतान व माधव मोठया बंगल्यात राहू लागले. त्यांचा थाटमाट काय विचारता? सारे त्यांना भीत. सारे त्यांना सलाम करीत. ते दोघे रस्त्यातून ऐटीने फिरत जात.एके दिवशी माधव राजाजवळ बसला होता. राजा म्हणाला, ‘माझ्या मनात एक विचित्र इच्छा उत्पन्न झाली आहे. ती तुम्ही पुरी कराल?’हो!माधव म्हणाला.इच्छा अशी आहे की, प्राचीन काळापासून तो आजपर्यत जितक्या सुस्वरूप अशा स्त्रिया हया पृथ्वीवर झाल्या, त्यांचे दर्शन मला व्हावे. माझ्या डोळयांसमोरून त्या सर्व जाव्यातठीक. तुमची इच्छा पूर्ण करीन.

किती दिवसांनी?’चार दिवस थांबा.तोपर्यंत मी प्रचंड मंडप घालायला लावतो. त्या समारंभात सारे येऊ देत. क्षणभर मौज.माधव गेला. त्याने सैतानाला ती गोष्ट सांगितली.कसे काय हे करणार?’ सैतानाने विचारले.ते मला माहीत की तुला? मी राजाला कबूल केले आहे. तू सारे शक्य केले पाहिजेस.माधव बेफिकिरपणे म्हणाला.वाटेल ते तू कबूल करावेस व माझ्यावर जबाबदारी टाकावीस. तुम्ही माणसे म्हणजे विचित्र प्राणी.ते काही असो, कराराप्रमाणे वागा म्हणजे झाले. जास्त बोलण्याची जरूर नाही.तुला थोडे धाडस केले पाहिजे.,करीन.उद्या मध्यरात्री येथून चार कोसांवर असलेल्या जंगलात जा. तेथे पिशाच्चांची वस्ती आहे. ती एकदम तुझ्या अंगावर धावतील; परंतु घाबरू नकोस. सैतानाची शपथअसे म्हण. म्हणजे ती गोगलगायीप्रमाणे होतील. ती हात जोडून उभी राहातील. त्यांना राजाची इच्छा सांग, इच्छा पुरी करण्याचे साधन द्या, असे म्हण. जे देतील ते घेऊन ये.दुसर्‍या दिवशी मध्यरात्री माधव उठला. बाहेर कोल्हे ओरडत होते. अंधार होता. थंडी मी म्हणत होती; परंतु निर्भय माधव जात होता. त्या जंगलाजवळ तो आला. एकदम किंचाळया त्याच्या कानी आल्या. तो चपापला; परंतु पुन्हा पुढे चालला. पिशाच्चे त्याच्या अंगावर धावली. सैतानाची शपथअसे तो म्हणाला. पिशाच्चे शांत झाली.राजाला प्राचीन काळापासूनच्या सर्व सुंदर स्त्रिया बघण्याची इच्छा आहे. ती इच्छा पुरी करण्याचे मी कबूल केले आहे. ती इच्छा पुरी करण्याचे साधन द्या.माधवाने सांगितले.

ही घ्या जादूची कांडी. चल चल चल चल; चल चल चल चल; चल चल चल चल; असे कांडी फिरवीत म्हणा. प्राचीन काळापासूनच्या सर्व सुंदर स्त्रिया एकामागून एक पडदयावर दिसतील व नाहीशा होतील; परंतु एक धोक्याची सूचना लक्षात ठेवा.कोणती?’त्या स्त्रियांची चित्रे पडदयावर पाहाताना तुम्हाला मोह नाही पडता कामा. नाही तर एखादया सुंदर स्त्रीचे लावण्य बघाल व तुम्ही लाळ घोटू लागाल. किती सुंदर, खरेच. किती सुंदर.वगैरे शब्द तोंडातून बाहेर पडता कामा नयेत. केवळ अलिप्त व अनासक्त रीतीने सारे काम करा.हो समजले. जातो मी.सैतानास प्रणाम सांगा.बरे.माधव आला. त्याने राजाला तयार असल्याचे कळविले. दिवस ठरला. त्या दिवशी रात्री हा प्रयोग व्हावयाचा होता. सारा मंडप भरला. उच्चासनावर राजा बसला होता. सरदार, दरकदार, इनामदार, जहागीरदार बसले होते. सामान्य जनताही बसली होती. एकीकडे स्त्रिया होत्या. सर्वांचे डोळे अधीर झाले. समोर रूपेरी पडदा होता. माधव बाजूला येऊन उभा राहिला. टाळयांचा कडकडाट झाला. सारे शांत झाले.माधव कांडी फिरवू लागला. पडद्यावर लावण्यमयी मूर्ती दिसू लागल्या. प्रत्येकीचे नावही लिहिले जाई. सीता, सावित्री, द्रौपदी, दमयंती, रूक्मिणी, मंदोदरी पडद्यावर आल्या व गेल्या, संयुक्ता व पद्मिनी चमकल्या. नूरजहान व मुमताजमहल दिसल्या. हेलेन दिसली. सर्व देशातील सौदंर्य-रमणी येत होत्या व जात होत्या. परंतु एक चित्र आले. अतिमोहक असे ते सौंदर्य होते. माधवाच्या हातातील कांडी थांबली. तो त्या चित्राकडे पाहू लागला. काय सुंदर! ओहो! किती खुबसुरत!असे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. तोच कडाड्कडाड् असा आवाज झाला. जणू शेकडो बाँबगोळेच पडले. राजा नि प्रजा, कोठे गेले सारे? कोठे गेला तो देखावा? कोठे गेली ती राजधानी? कोठे गेला तो माधव? कोठे गेला सैतान? त्यांचे का तुकडे झाले? त्यांच्या का ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या? भयंकर आवाज!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED