TURN ( THE HUNTING ROAD) books and stories free download online pdf in Marathi

टर्न (एक झपाटलेला रस्ता)by sanjay kamble

****


"हे काय झाल माझ्या हातुन..?
 तो जिवंत आहे की मेलाय.? 
माझी बाईक बाजुला पडलीये आणी बाईकच्या आडवा आलेला तो माणुस रस्त्यावर निपचिप पडलाय...अगदी निपचीप, जसा तो मेलाय. आता तो मेलााय की जिवंत आहे हे मला माहीत नाही. पाऊस तर धो धो कोसळतोय आणी ही भयान रात्र.. हे काय घडल माझ्या हातुन... तरी वॉचमन म्हणत होता
 'रात्र झालीये, पाऊस आहे. इथच झोपा, रात्री अपरात्री या रस्त्यावर चित्र विचित्र घटना घडल्या आहेत' 
पन माझ्यात लय मोठा किडा. 'आता मर साल्या'. आता पोलिस कम्प्लेंट होईल, तो माणूस मेला तर भरपाई द्यावी लागेल, बाप रे काय करू आता...?"

   नको नको त्या विचारांनी डोक्यात अक्षरशा: थैमान घातलय, पन पुढ जायच धाडस होत नाही... कारण आजवर अस कधीच झाल नाही, अंधारात समोर काळ्याकुट्ट डांबरी रस्त्यावर काही अंतरावर निपचीप पडलेल ते शरिर पाहुन माझ डोक सुन्न झाल. माझी बाईक काही अंतरावर रस्त्याच्या कडेला चिखलात आडवी पडलीये तर तो आडवा आलेला माणुस बराच मागे पडलाय...

का मी त्या वॉचमनच ऐकल नसेल...? का मुर्खपना केला या पावसात, रात्रीच्या काळोखात बाहेर पडायचा..? 
कंपनीतुन बाहेर पडतानाचा तो प्रसंग  तसाच नजरेपुढ येतोय..........

                *****

(१/२ तासा पुर्वी . बंद आॅफीस च्या दारात)

              नेमका आज घरी जायला उशीर झालाय. रात्र बरीच झालीये म्हणजे आकरा वाजुन गेलेत, त्यात सोबतीला हा पाऊस. नेमका आज रेनकोट विसरलो, म्हणजे विसरलो नाही तर मीच नाही आणला. आज चार दिवस झाले पावसान चांगली उघडीप दिलेली दिवसभर छान सोनेरी उन्ह पडत होती , म्हणुन म्हंटल उगाच कशाला रेनकोटच ओझ, पन आता हा पाऊस बघुन स्वताच्या मुर्खपनाचा भयंकर राग येऊ लागलाय, कंपनीच्या बंद दारात उभ राहुन ,समोर कोसळणा-या या पावसाच्या धारा असहायपने पहातोय. रस्त्यकडेच्या खांबावरच्या पिवळ्या नारंगी प्रकाशात पावसाचे बरसणारे थेंब अधिकच स्पष्ट दिसत आहेत, पन काळोखात पाहील तर फक्त पावसाचा आवाजच तेवढा कानावर पडतोय. आता काळोखात पाऊस दिसत नाही याचा अर्थ तो नाही असा होत नाही..... तो आहे... अगदी मनमुराद बरसतोय....  
आता माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत, एक म्हणजे कंपनीच्या या दारात उभ राहुन पाऊस थांबण्याची वाट पहायची आणी दुसरा पर्याय म्हणजे या पावसाची तमा न करता बाईक काढायची आणी भिजत घर गाठायच... थांबण्यात मुर्खपाना वाटतोय , कारण कमी होईल या आशेने थांबायच तर घरचा रस्ता आहे अर्ध्या तासाचा, तेवढ्यात पाऊस सुरु झाला तरी मी भिजणारच ... तसाच पावसात बाहेर पडलो तोच वॉचमन म्हणाला.
" अरे बाळ... राहुदे जायच.. या खोलीत रहा आजचा दिवस..." वॉचमन आग्रहान म्हणाला.

" नको काका... कमी येईल पाऊस.." मी उत्तर देत बाहेर पडु लागलो,

" बराच पाऊस आहे, माझा रेनकोट घेऊन जातोस का... सकाळी घेऊन ये.." वॉचमन हातातली टॉर्च खाली ठेवत म्हणाला.

"अहो उद्या सुट्टी, कस येणार कामाला...?"
मी पुन्हा उत्तर दीले तसे ते पुढ म्हणाले

" मग जरा पाऊस कमी होऊदे.."

" कमी व्हायची वाट बघत राहीलो तर सकाळ व्हायची..." मी मस्करीच्या स्वरात म्हणालो..

" बर, शिस्तीन जा. पोर्णिमा लागलीये, वाटेत कुणी आडव आल , लिफ्ट मागितली , हात केला तर गाडी थांबवु नको.."

"हो काका.." म्हणत मी बैग पाठीवर अडकवली आणी बाईक सुरु केली, पावसाचा जोर कमी झाल्यासारख वाटल की मी गाडीचा वेग वाढवत होत, पाऊस वाढला की गाडीचा वेग कमी करत होतो, पण काही वेळातच इतका भिजलो की पायातील बुटातही पाणी साठल होत. पन एकसारखी भीती वाटत होती... हो भीती.. रात्रीच्या या भयाण वातावरणात जर कोणी अचानक आडव आल तर...? जस की वॉचमन बोलत होता.. आणी आपसुक नजर आजुबाजूच्या परिसराकडे जायची आणी पुन्हा गाडीचा वेग वाढवायचो... खरतर भुत या गोष्टीची मला भीती वाटतेच, त्यात हिंदी पिक्चर मधली भुत अशीच मध्यरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातुन अचानक बाहेर येतात, त्यात भरीत भर म्हणुन पावसालाही आजच उधान आलय. पन मन घट्ट करून बाईक चालवतोय. आणी येणा-या प्रत्येक वळणावर गाडीचा वेग कमी करत टर्न घेतोय पन न रहावुनही आजुबाजुच्या दाट झाडीत नजर जाते आणी अस वाटत की कुणीतरी या रस्त्याकडेच्या दाट झाडीत लपुन बसलय. जे कधीही माझ्यावर झेप घेईल, अजुन दहा मिनीटांचा रस्ता होता घरी पोहोचायला पन त्या आधी एक असा टर्न आहे जीथ बरेच अपघात झालेत आणी पन्नास एक लोक या वळणावर आपला जीव गमवुन बसलेत, म्हणजे तो टर्नच असा आहे, सुरवातीला घसारती , उतरंड म्हणतात ते पुढ जाल तसा उतार आणखी तीव्र होता होता आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळ त्या वळणावर पुढून येणा-या वहानाचा अंदाज लागत नाही त्यात  वेग कमी करायच्या प्रयत्नात गाडी स्लिप होते आणी थेट समोरून येणा-या वाहनाखालीच, मग काय चेंदामेंदाच. परवाच दोन रायडर्स ना गाडी आवरली नाही , थेट ट्रक खाली, इतकी वाईट अवस्था झालेला की पोलीासांना खिशातील ओळखपत्रही रक्तान माखलेल आणी फाटलेल भेटल, पन बरेच लोक म्हणतात की त्या टर्न ला एखादी वाईट शक्ति आहे जी हे सार घडवतेय. ब-याच लोकांनी रात्री अपरात्री येताना तीथुन कोणीतरी रडण्याचा, ओरडण्याचा , कण्हत असल्याचा आवाज ऐकलाय, काहींना तर रात्री अस जाणवलय की  टर्न च्या आधी दाट झाडीतुन कोणीतरी वेगात बाहेर येण्याचा प्रयत्न करत, जेव्हा आपल लक्ष तीकडे जात तेव्हा टर्नवर येणार वाहन आपल्या लक्षात येत नाही आणी अपघात होतो. काहींनी तर असा अनुभव सांगितला की कोणीतरी रस्त्याच्या डाव्याबाजुने धावत अचानक समोरून उजव्या बाजुला वेगात जातो, आणी मग अॅक्सिडेंट.. एक सांगु, या गोष्टी घटना किंवा एकलेले अनुभव आपल्याला तेव्हाच प्रखरतेने मेंदुत गोंधळ , थैमान घालतात जेव्हा आपन त्या ठिकाणावर पोहोचणार असतो कींवा पोहोचलेले असतो, एरवी सार काही ठीक असत, आणी आता मला तो समोरचा उतार दिसत होता जीथ हे घडत आलाय. पाऊस तर असा होता की जबडा पसरला तरी काही सेकंदातत घोटभर पाणी तोंडात जाईल, गडद्द काळोखात माझ्या गाडीच्या हेडलाईट मधे पावसाचे थेंब स्पष्ट दिसत होते, आणी समोर काळाकुट्ट ओलाचिंब भिजलेला डांबरी रस्ता... गाडीचा वेग तसा नेहमीचा, जास्त कमी नाही आणी समोरून एखाद वाहन आल तरी नियंत्रणात आणता येईल असा वेग, पन न रहावुन रस्त्याच्या डाव्या बाजुला नजर गेलीच. हेडलाईटच्या किंचीत प्रकाशात स्पष्ट अस काहीच दिसत नसल तरी पावसाने भिजलेली झाडे आणी बाजुचा चिखल दिसत होताच. पन टर्न च्या आधी आणी समोरच काही अंतरावर झुडपात कसलीशी हलचाल होत होती. जस कोणीतरी बाहेर येत होत, मी त्या झुडपाकड पहातच गाडीचा वेग वाढवला, जे कोणी होत त्याला पहाण्याइतपत काळीज या परिस्थितीत माझ्याकडे नव्हतच, मी तसाच वेग वाढवत होतो आणी काही अंतरच राहीलेल त्या झुडपाच्या समांतर यायला की वेगात ते बाहेर आल आणी माझ्या काळजाचा थरकाप उडाला, अतिशय वेगात घडलेली ती घटना पाहुन मी गाडीचा वेग आणखी वाढवत तिरक्या नजरेन पाहील तर दोन चार गावठी कुत्री आपसात भांडत त्या झुडपातुन बाहेर झेपावली होती, स्वतावर हसत मी मी किंचीत मागे पाहील तर काळोखात फक्त त्यांचा आपापसात घुघुरण्याचा भुंकण्याचा आवाज तेवढाच येत होत. पन माझा काळजाची वाढलेली धडधड मात्र तशीच होता, आणी मी ती स्पष्ट ऐकु शकत होतो, समोर नजर गेली आणी क्षणात कोणी व्यक्ती माझ्या बाईकच्या आडवी आली, आणी मी त्याला चुकवुही शकत नव्हतो, त्या टर्नला पुढचा डिस्क ब्रेक दाबला आणी गाडी स्लिप झाली मी एका बालुला आणी गाडी एका बाजुला फरपटत जात होती,  तीन चार सेकंद खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर  खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर असा डांबरी रस्त्यावरुन फरपटत जाणा-या माझ्या बाईकचा आवाज या रात्रीच्या भयान शांततेला भेदत होता, आणी पुन्ही रात्रीची ती भयान शांतता पुर्ववत झाली, आणी मघापासुन बाईकवर असताना न येणारे आवाजही स्पष्ट होऊ लागले, पावसाची रिपरीप सुरुच होती तर, रातकिड्यांचा कर्कश्य आवाज चोहीकडे घुमत होता,  भयान काळोखात समोर काही अंतरावर निपचिप पडलेल ते पाहुन हतबल झाल्यासारखा मी जागेवर बसुन होतो, मदतीची वाट बघत, पन ह्या अपघाताला आणी याच्या मृत्युला मी जबाबदार आहे अस स्पष्ट झाल तर मी कायमचा जेलमधे..
पन तो माणुस आहे की या परिसरात वावरणारी भयानक शक्ति....? 
इतक्या रात्री कोण येईल इकडे.. ?
     मरूदे, बाईक घेऊन आपन इथुन वावटुळ झालेल बर, मी उठताच समोरच्या टर्न वरुन एक चारचाकी गाडी येताना दिसतेय तीचा हेडलाईट माझ्या बाईकवरुन त्या माणसावर पडलाय. संपल आता सगळ.. आता ते पहातील आणि...? 
 त्याने गाडी बाजुला थांबवलीये... आठदहा मुल आहेत गाडीत. कदाचीत फिरायला जात आहेत... पटापट उतरुन त्या निपचिप पडलेल्या माणसाच्या भोवती गोळा झालेत... समोरुन आणखी एक चारचाकी गाडी आलीये, त्यातही काही लोक आहेत,  त्या गर्दीत मी पन चालत पुढ जातो, त्या पालथा पडलेल्या माणसाला त्यांच्यातल्याच एकान सरळ केल तर वाईट अवस्था झालेली. डोक डांबरीवर आपटुन फुटलय. अंगालाही जखमा झाल्या आहेत, त्याची अवस्था पहावत नाही मला,
 " ये. जिवंत आहे की मेलाय..?" गर्दीतुन कुणीतरी विचारल,
" कधीच संपलय, डोक रस्त्यावर आपटुन फुटलय... याला कोणीतरी उडवुन गेलाय,"

"ए चला , आपल्या आंगलट यायच.."

" होय रे.... ए बसा गाडीत..."

बाकी सर्वच गाडीत बसले, गाडीच्या हेडलाईट ने रस्ता लख्ख उजळुन निघाला, हेडलाईट चा प्रकाश त्या प्रेतावर ही पडला.. अंगातुन डोक्यातुन वहाणार रक्त पावसाच्या पाण्यात मिसळुन फिक्कट होऊन वहात होत, त्याचा चेहराही किंचीत जखमी झालेला, हातापायांना बरच खरचटलेल, पन मृत्यु झालेला तो डोक फुटुन.. 
घुंईईईईईई आवाज करत दोन्ही गाड्या आपापल्या मार्गाने निघुन गेल्या तसा पुन्हा काळोखाच साम्राज्य पसरल, चिटचीट पावसाचे थेंब वाटेवर , साचलेल्या पाण्यात , चिखलात आपटत होते...मलाही क्षणभर वाटल.... वाटल आपनही निघुन जाव, पन कस जाणार... स्वता:च शरिर त्या डांबरी रस्त्यावर सोडून, तुम्ही तरी गेला असता का...? मग मी तरी कसा जाणार...


समाप्त...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED