ताईंन सांगा पदर नीट घ्या ( एका रात्रीचा भुताचा अनुभव ) Sanjay Kamble द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

ताईंन सांगा पदर नीट घ्या ( एका रात्रीचा भुताचा अनुभव )


ताईंना सांगा पदर नीट घ्या'
© By Sanjay Kamble




रात्र बरीच झाली होती. . बाईक वरून तो आपल्या घरी जायला निघाला.... काही दिवसांपूर्वीच
त्याला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी करून तो खुपचं थकुन जात असे. आॅफिसवरून बाहेर पडला त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता.
नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक त्याला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते. तोही त्यांच्या सोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघाला... मुख्य रस्त्यावरून त्यांचे मार्ग बदलत होते..
जो तो आपापल्या निवा-याच्या दिशेने निघुन जाई... नोकरदार मंडळीच शेवटी. कुणाच स्वताच घर होतं तर कोणी भाड्यान रहात असे... तो ही बाईक वरून निघाला.. काही वेळातच तो मुख्य रस्त्यावर आला. रात्र बरीच झाल्यान वाहनांची वर्दळही कमी होती. दिवसा वहानांच्या रांगांच्या रांगा आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढाओढ आता रात्री कुठच दिसत नव्हती की वेगावर कुठलच नियंत्रण दिसत नव्हत.. कधीतरीच एखाद वाहन त्याला समोरून येताना दिसे. किंवा एखाद वाहन त्याला ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसे. आता पुन्हा त्याला हायवे सोडून साधा रस्ता धरायचा होता... थोड पुढे येत त्यान मुख्य रस्ता सोडला... आता कधीतरी दिसणारी वहानांची वर्दळही मंदावली.. आता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो काळाकुट्ट डांबरी रस्ता.. अगदीच एखाद्या अजगरासारखा.. रात्रीच्या काळोखातील ती भयाण जिवघेणी शांतता अगदी असह्य होत होती... पन नाईलाज होता. नोकरी हवी तर शिफ्ट मधे काम करावच लागत... तो आपल्याच विचारात गुरफटला होता आणी रस्ता ओसाड असल्यानं तो अगदी रस्त्याच्या मधोमधच आपली बाईक चालवत होता. तसही कोण विचारणार आहे म्हणा.. मधुन चालवतो की कडेने... एकटं असलं की माणुस हवं तसं वागु शकत.. आणि वागतच.. काही वेळातच त्याचा एकटेपणा नाहीसा झाला. कारण त्याला मागुन येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यामुळ मधोमध जाणारी त्याची बाईक आता एका कडेने चालवू लागला... काही सेकंदात एक दांपत्य असलेली बाईक त्याला ओव्हरटेक करून पुढे गेली... कदाचित नवरा बायको असावेत...
नव-याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळ जैकेट होत तर मागे बसलेल्या महिलेन साडी घातली होती.. पन एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर अगदी पाठीमागच्या चाकाजवळ होता.. वा-याच्या झोक्यासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकुन शकतो. आणि जर तीचा पदर चाकात गुरफटला तर ते त्या महिलेच्या जिवावर बेतू शकतं... त्यानं झटकन आपल्या गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणाला...
"ताई, तुमचा पदर चाकात अडकतोय... तेवढा निट घ्या.."
एवढं बोलून तो त्यांच्या पुढे निघून गेला... एक समाधान होत. छोटीशी का असेना आपन मदत केली ही भावना,
बऱ्याचदा टीव्ही आणि आणि व्हाट्सअप वर अशा घटनांच्या व्हिडिओ लोकांना पाहायला मिळतात... न्युज चॅनलवरदेखील ब-याचदा अशा व्हिडिओ दाखवल्या जातात ज्यामधे मागे बसलेल्या एका मुलीची ओढणी मागच्या चाकात गुरफटली त्यासरशी ती मुलगी जोरात रस्त्यावर आदळली आणी वीस पंचवीस फूट बाईक सोबत रस्त्या वरून फरफटत गेली ओढणीचा फास गळ्यात गच्च आवळला आणि ती बिचारी जागेवरच संपली... अशा एक ना अनेक व्हिडिओ क्लिप आजही नेटवर पहायला भेटतात.. तुम्ही मदत कराल तरच तुम्हाला मदत भेटेल हा निसर्गाचा नियम आहे.. तो ही असाच छोटीशी का असेना पण जमेल ती मदत करायचा... घर अजुन बरच दुर होत आणी गल्लीतली ती भटकी कुत्री कधी कधी गल्लीत रहाणा-या लोकांच्याच अंगावर येत.. त्यांचा बंदोबस्त करायलाच हवा.. तो आपल्या विचारात गुरफटला होता की पुन्हा एक बाईक त्याला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली... त्यानं ओळखल.. टोपी आणि काळ जैकेट.. पन मागे ती महिला..?, त्याची पत्नी नव्हती... त्यानं गाडीचा वेग वाढवला आणी विचारू लागला...
"अहो तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी.., चाकात पदर अडकत होता म्हणून मी सांगितलं होतं.."

काही अंतर पुढ आल्यावर त्या बाईकस्वारान आपली बाईक रस्त्याकडेला घेतली आणि क्षणभर थांबला तशी याने देखील आपली गाडी पुढं नेत रस्त्याच्या कडेला उभी केली..
" काय झालं भाऊ..? तुमची बायको मागे बसली होती ना..त्या कुठ आहेत..?"
तो अक्षरशः थरथरत होता. राहुन राहुन त्याच्या अंगावर शहारा उमटत होता... काहीच न बोलता त्यान मागे रस्त्याकड वळुन पाहिलं. मिट्ट काळोखात बुडालेला तो निर्जन निर्मनुष्य रस्ता अगदीच आक्राळ विक्राळ वाटत होता ... आणि त्या रस्त्याकडे तो अशा आविर्भावात पहात होता की नुकताच तो एका भयाण मरणातुन जिवंत वाचला होता. त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती...
" काय झालं..? तुम्ही इतके का घाबरलात..? पाणी देऊ का..?"
त्यानं आपल्या पाठीवरची बैग काढली आणि पाण्याची बाटली काढून त्यांच्यासमोर धरली तसा तो समोरचा माणूस म्हणाला...

" माझ्या गाडीवर कोण बसलेल तु पाहिलंस..."

" म्हणजे.. ती तुमच्या ओळखीची नव्हती..?"

" मी जाॅबवरून घरी निघालोय.. एकटा.. कोणालाही लिफ्ट पन नाही दिलेली . "

त्या अनोळखी व्यक्तिच बोलणं ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली... हातातील पाण्याच्या बाटलीच टोपन हळुवारपणे काढत स्वताच घोटभर पाणी प्यायला... आता दोघेही मागे त्या भयाण काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहु लागले... दुर काळोखात रस्त्याच्या मधोमध त्यांना एक पांढरी धुरकट आकृती दिसु लागली.. दोघेही धडधडत्या काळजान समोर पाहु लागले तोच मागुन कोणीतरी जोराचा हाॅर्न केला तसे दोघांच्याही काळजाचे ठोके वाढले.. एकमेकांशी काहीच न बोलता दोघेही आपापल्या बाईक वर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघाले... काही वेळातच ती व्यक्ति दुसऱ्या रस्त्याने निघुन गेली... आणि तो ही घरी पोहोचला.. एव्हाना दोन वाजून गेले होते... अंधारूणावर पडला पन काही केल्या झोप येईना...
सताड उघडे डोळे वा-याने हेलकावे घेणा-या खिडकीवरच्या पडद्यावर स्थिरावले होते... आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं असं काही अविश्वसनीय पाहील होत ज्याची आजवर तो थट्टा करत होता...
'एक अघटीत' असंच काहीसं.
राहुन राहुन त्याच्या मनात एकच विचार येत होता आजवर जे घडलं नाही ते आज का घडलं..? रात्री अपरात्री तो या आधीही अनेकदा बाहेर भटकुन कधी कधी पहाटेपर्यंत घराची वाट न बघीतलेली आजच असं का घडलं..? तो भास तरी नक्कीच नव्हता.. कारण त्या दुचाकीवर बसलेली ती महीला, तीची ती शुभ्र पांढरी साडी, हवेच्या झोक्यासरशी वा-यावर हेलकावे घेणारा तीचा तो पदर जसा या खिडकीवरचा पडदा वा-याच्या झोक्याने हेलकावे घेत आहे अगदी तसाच तीचा पदर.. वातावरणातली ही शांतता रोजची असली तरी आज ती अधिकच गुढ आणि जिवघेणी वाटत होती... त्याची नजर बराच वेळ खिडकीवरच्या त्या पडद्यावर स्थिरावली होती.. काहीतरी होतं जे त्या पडद्याला आकार देत होतं... जशी एक अस्पष्ट मानवी आकृती त्या पडद्यावर उमटत असावी असंच त्याला वाटत होतं.. या आधी त्यान कधीच इतकं निरखून पाहिल नव्हत... पन त्याच्या पहाण्यान वा न पहाण्याण त्यांच अस्तित्व संपणार नव्हत.. त्या हेलकावे घेणा-या पडद्याची आता त्याला भीती वाटु लागली.. त्यातच वा-याच्या झोक्याने अधुन मधुन खिडकीच दार आदळत असल्यानं काळजात धस्स होई. तो बेडवरून उठला आणि खिडकी बंद करून घेतली.. मघापासून तो खडखडणारा आवाज आता बंद झाला. शांत अगदी शांत वाटु लागलं. तो बेडकडे फिरला इतक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई त्याच्या अंगावर धावून आली.. छाती फाडून काळीज बाहेर पडावं असा तो घाबरला. आणि झोपेतून जागा झाला. स्वप्न.. एक भयानक स्वप्न...अंग घामान भिजल होतं... कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदुत घर करून बसली होती...

दोन दिवस त्यान कामावर जाण्याच टाळलं पन किती दिवस घरात बसून रहाणार...? नोकरी साठी वर्तमानपत्रात जाहिरात चाळल्या पन व्यर्थ. तिसऱ्या दिवशी धाडस करून तो जाॅबवर गेला पन कामात लक्ष लागत नव्हतं. राहुन राहुन नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती... साडेबारा वाजले... शिफ्ट संपली..जो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडुन लागला पन त्याची पावलं जड झाली होती... गाडीवर बसून किक मारली आणि रस्त्यावर आला. नेहमीसारखीच तुरळक वाहन दिसत होती. आपल्या विचारात तो इतका गुरफटला होता की हायवे कधी संपला हे देखील त्याला समजलं नाही.. पुन्हा सारं काही आठवु लागल तशी एका अनामिक भीतीन त्याच्या काळजाची धडधड वाढु लागली ... तोच मागुन त्याला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि त्यासोबतच त्याच उरलंसुरलं आवसानही गळुन पडला... डोकं सुन्न झाल होत.. आवाज येत होता तो फक्त हृदयाच्या ठोक्यांचा... धकधक धकधक धकधक.. गाडी जवळ आली ... एव्हाना त्याचा चेहरा घामाने भिजला होता. पुढच्या क्षणी ती गाडी त्याला ओव्हरटेक करू लागली.. याने चोरट्या नजरेने पाहील तर गाडीवर दुचाकीस्वार एकटाच होता... त्याच्या जिवात जीव आला... काळजातली भिती आता कमी झाली होती... त्यानं त्या बाईकस्वाराकड पाहिलं आणि किंचित स्माईल दिली... तस बाईकस्वारानेही आपल्या हेल्मेटची काच वर घेतली आणि याच्याकड पहात म्हणाला...
" ताईंना सांगा... पदर नीट घ्या."



समाप्त...