majhi ladhai ajun sampleli nahi books and stories free download online pdf in Marathi

माझी लढाई आजुन संपलेली नाही


'माझी लढाई अजून संपली नाही'

मी प्रियांका.
प्रियांका रेड्डी...
आज मी तुमच्यामधे नाही, पण तुमच्या मधे नाही याचं दुःखही नाही..खरतर मुलगी म्हणून जन्म घेतला तेव्हाच माझ्या संघर्षाची सुरवात झाली... रस्त्यावर येता जाता टवाळखोर मुलांच्या कमेंट, शिट्ट्या, घाणेरडे चाळे सहन करत करत माझ्या निरागस आयुष्याचा शेवट इतका भयानक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
कोण होते ते माझा बलात्कार करणारे...? मुसलमान..? हिंदू...? ख्रिश्चन..? बुध्दिस्ट..? शिख...?
एका बलात्कार पिडितेला विचाराल तर ते होते केवळ 'लिंगपिसाट पुरूष'.. पण बलात्काराला धर्म जोडून माझ्या बलात्काराचही राजकीय भांडवल करत काही गिधाडांकडून माझ्या मृत्यूनंतरही माझ्यावर बलात्कार केला जातोय..
मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षाच नाही... कारण न्याय करण्याईतपत निस्वार्थ , निष्पक्ष काळीज इथं कोणाकडेच नाही, कारण स्वामी चिन्मयानंद बलात्कार करतो, संपूर्ण जग ती व्हिडिओ पहात, तरी त्या नराधमाला वाचवायला रॅली काढली जाते...शीsssssss चिन्मयानंद वर बलात्काराचा आरोप करणा-या मुलीलाच तुरुंगात डांबल जात.. तीलाच वैश्या ठरवायला लोक पुढं सरसावले. म्हणजेच या समाजान त्या बलात्कार करणाऱ्याला बलात्काराच लायसन देऊन टाकलं.
मुलीवर बलात्कार केला, तीने केस केली, पण अपघात भासवून त्या मुली सोबत संपुर्ण परिवारालाच ठार केलं आणि छाती ठोकून निवडणूक जिंकला.. तेव्हाच त्यान बलात्काराच लायसन घेतल.
कुलदीप सेंगर न एका
गोपाल कांडा न गितिका वर वारंवार बलात्कार केला. त्या जाचाला कंटाळून गितिकान आत्महत्या केली, पण 'गोपाल कांडा' छातीठोकपणे निवडणूक जिंकला.. तेव्हा त्यानही छाती ठोकून बलात्काराच लायसन घेतल... गितिकाची आई आजही त्याच्या विरोधात लढतेय.. सेंगर विरोधात लढायला कोणी राहीलच नाही आणी चिन्मयानंद सोबत समाज आहे...
जर या लिंगपिसाट नराधमांविरूद्ध लोक उभे राहीले असते, त्यांना फासावर टांगल असतं तर आज रस्त्यावर उभ्या नराधमाच धाडस झालं नसतं माझ्या सारख्या मुलीवर बलात्कार करण्याच. जीवंत जाळण्याच... पण असं नाही..
आधी मुलगी कोणत्या जाति वा धर्माची आहे...? बलात्कार करणारे कोणत्या जाती धर्माचे आहेत..? आणी मग त्या बलात्काराचा धंदा कसा करायचा..? हे ठरवलं जात... बरं झालं त्यांनी मला ठार केलं. नाहीतर त्या नराधमांनी एकदा माझा बलात्कार केला पण या समाजातील गिधाडांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी रोज माझ्या आब्रुचे धिंडवडे काढले असते...
आज माझ्याही बलात्काराचा धंदा मांडलाय. धर्माचा रंग देऊन,
स्त्रीयांच्या न्याय हक्कासाठी लढणारे मर्द फक्त इतिहासातच ऐकले. आज आहेत ती केवळ गिधाड, एखाद्या मुलीचं, महिलेच शरिर लाळ घोटत पहाणारी गिधाड, खरंतर गिधाड ही उपमा लहान ठरेल. मिशीवर ताव देऊन स्त्री ला आपल्या पायाच्या टाचेखाली ठेवण्याला मर्दानगी समजणारी गिधाडं.
असो... मी सुटलेय.. मला विश्वास आहे त्यांना फाशी झाली असतीच. पण त्यांना पोलिसांनी गोळ्या घातल्या, कारण माझा बलात्कार करणारे कोणी आमदार खासदार, नेते , स्वामी नाहित.. पण आज बलात्कार करणारे बरेच मठाचे स्वामी आमदार, खासदार , मंत्रीपद भोगत आहेत त्या बालात्का-यांच काय...? कोणाची हिंमत आहे त्यांच्या विरोधात आवाज उठवायची...? भर रस्त्यात त्यांना गोळ्या घालायची आहे हिम्मत...? त्यांनी ज्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केल त्या ही झुंज देत आहेत, आणि बलात्कारी मात्र उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत,
जोवर त्यांना शिक्षा होत नाही तोवर हे असंच सुरू राहील...फरक एवढाच असेल की प्रियांका च्या जागी नवीन नाव...
धाडशी व्हा मुलींनो. आणी फुलनदेवी बना. स्वताच्या रक्षणासाठी बाप, भाऊ, नवारा यांच्या वर अवलंबून रहाण्यापेक्षा स्वतासाठी स्वता उभी रहा‌..रस्त्यावरून जाताना कोणी छेडत असेल तर तीथेच गळपट्टी धरून दोन चार मुस्काटात लावा, पुढच पुढं. कोणा पुरूषाकडून न्यायाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा दहा हजाराला देसी कट्टा भेटतो. घ्या आणी अशा नराधमांसमोर उभं राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बंदूक मस्तकावर ठेवा आणि ठोका साल्यांना...
मी संपलेय, पण 'माझी लढाई अजून संपली नाही'


धन्यवाद.


प्रियांका ला भावपूर्ण श्रद्धांजली ???

By Sanjay Kamble


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED