Rahasyamay Stree - 4 books and stories free download online pdf in Marathi

रहस्यमय स्त्री - भाग ४




रेशमा त्याचा जवळ आली.. व त्याचा खांद्यावर हात ठेवून म्हणाली " अजून फक्त चार बाकी आहेत..!!!!"

दिनांक - २७ मार्च २०१८

हे ऐकुन अमर दचकून झोपेतून जागा झाला.... व घड्याळात पाहिलं तर ३:३३ झाले होते.....  अचानक एक अश्रू अमरच्या डोळ्यातून खाली पडला व अमर रेशमाच्या पायथ्याशी बसून रेशमाला एकटक बघत होता....



---------- घटनास्थळी (केसरी लॉज) ----------

हवालदार साने - " साहेब गळ्यावर धार धार वस्तुने वारंवार वार केलेला दिसत आहे , पण का केला असेल हो राजाराम यांचा खून ?? "

" याच तर गोष्टीचा तर आपल्याला पगार मिळतो , चला कामाला लागा ... जवळ पास काही पुरावे मिळतात का ते बघा .!"

साने खाली पडलेले शर्ट चे एक बटण उचलत म्हणाले " च्यायला साहेब हे बटण बघा ??? "

चव्हाण साहेब त्या बटणाला हातात धरून राजाराम यांचा कपड्याला निरखून बघत म्हणाले झटापटीत राजाराम यांचे बटण खाली पडले आहे ..

सहायक पवार मोबाईल मधून त्या सर्व प्रकारचा फोटो काढत म्हणाले ...

" साहेब जर इथ कॅमेरे लागले असते ना तर काम किती सोप्प झाल असत !!! "

" केस जेवढी अवघड तेवढीच ती सोडवायचा आनंद देखील अधिक , समजल का पवार ?? , अन् जर कॅमेरे लागले असते तर माझ्या मित्राचा खून इथ झाला नसता !!! कोणी तरी जवळचाच आहे या मागे !!! चव्हाण बारकाईने टेबल वरील गोष्टी पाहत म्हणाले .

" सुबोध मोहिते ने तर केला नसेल ना खून ??? अर्धा पार्टनर आहे , राजाराम एकटाच होता मृत्यू नंतर पूर्ण पार्टनर तोच झाला असता !!! " पवार आपल तर्क लावत म्हणाला .

" सुबोध नाही करणार असा त्याला बऱ्याच वर्षा पासून ओळखतो मी ... पैशा साठी नाही झाला हा खून , या मागे दुसऱच कारण असावं !! "

जयकांत चव्हाण लॉज चे रजिस्टर चेक करताना नोकराला म्हणाला " लॉज मध्ये जे जे आहेत त्यांना एक एक करून पाठव !!! "

नोकराने जयकांत चव्हाण साहेबांनी सांगीतल्या प्रमाणे तसचं केलं ... रजिस्टर मद्धे असलेल्या सर्वांची चौकशी केली पण सर्वांची उत्तरे काही अश्या प्रकारे होती ...
" साहेब रात्री बाहेर काय होतंय ते पाहिलच नाही ,"
" आम्ही रात्री झोपलो होतो , इथे काय होतंय या बद्दल आम्हला काहीच माहिती नाही " !!!

हवालदार साने - " साहेब कोणीच काहीच पाहिलं नाही , आता पुढे कसं लागेल खूनीचा शोध ??"

जयकांत चव्हाण - खुनी कितीही चलाख असला तरी कुठे न कुठे काही न काही चूक नक्कीच केली असेल ...
           लिस्ट मधल्या शेवटच्या व्यक्तीला बोलवत चव्हाण नोकराला म्हणाले - " छोटू ... बहादुर थापा याला पाठव "

साने - साहेब हे नाव कुठे तरी ऐकल्या सारखं वाटत आहे , पण कुठे ते आठवत नाही ...!!!

नोकर बहादुर थापाच्या खोलिजवळ गेला व बाहेर आला . बाहेर येवून चव्हाण यांना म्हणाला " साहेब बहादुर थापा बहुतेक खोलीत नाही , खोलीचं दार कितीवेळा बदडल पण आतून कोणीच दरवाजा उघडला नाही  !!!

चव्हाण - दुसरी चावी असते ना तुमच्या कडे ???

" हो आहे साहेब " लॉज मध्ये दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता , आत कोणीच नव्हत व आत कोणतीच गोष्ट सापडली नाही ."

यावरून चव्हाण यांचा बहादुर थापा वर संशय बळावला ...

" हे बघ साने भेटला तुझा खुनी !!!  हा खून नक्कीच बहादुर थापा यानेच केला असेल ,"

रजिस्टर मध्ये त्याचा पॅन कार्ड मधील फोटो बघत चव्हाण म्हणाले " राजाराम आयडी सुद्धा नीट बघत नाही राव , दुसरी आयडी घेतली असती तर काम कमी झाल असत , आता काय सर्व आपल्यालाच करावं लागेल ..... साने बहादुर थापा ची माहिती काढा , आणि काहीही कळलं तर तबोडतोब कळवा , बॉडी लगेचच पोस्टमार्टमला पाठवा !!!

------- त्याच सकाळी इस्पितळा मद्धे -------

विशाल सकाळी - सकाळी वर्तमानपत्र घेवून इस्पतळात  आला. अमरला ते वर्तमानपत्र देत आश्चर्याने म्हणाला .
"तू काल ज्या राजाराम पाटील बदल विचारत होतास त्याची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे .. , तू त्यांच्या बद्दल विचारपूस करत होतास , काय काम होत ? "

अमर चेहरा बनवत म्हणाला " काय ?? , कसं झालं हे ?? आणि तुला कालच बोललो मी की सहज विचारलं अस .
खूप वाईट झालं ."

अमर वर्तमान पत्र मध्ये राजाराम बद्दल वाचत होता....

" राजाराम पाटील यांची रात्री बरा ते एकच्या सुमारास एका अज्ञात  इसमाने धारधार वस्तूच्या मदतीने हत्या केली असून, त्या अज्ञात इसमाचा पोलिसांना अजूनही सुगावा लागलेला नाही , त्या इसमाचा शोध पोलीस घेत आहेत . सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा खून एका नेपाळी व्यक्तीने केल्याची आशंका आहे .
जेव्हा सुबोध मोहिते (राजाराम पाटील यांचे पार्टनर तसेच विख्यात बिल्डर) घटना स्थळी पोहचले असता राजाराम पाटील यांचे मृत शरीर तेथे आढळले व त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे . ही केस जयकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. "

अमरला त्याची पुढील दोन नावे सापडली होती. पण अजूनही त्यांना मारण्याचे कारण सापडत नव्हते.

अमरच् वाचून झाल्यावर विशाल अमरला म्हणाला, "बर वहिनीची काळजी घे मी राजाराम पाटील यांच्या अंतिम संस्कार ला जातोय ..."

हे ऐकताच अमर सुद्धा म्हणाला " मी पण येतो तुझ्या सोबत ... बिचारे राजाराम जिवंत असताना नाही भेटता आल शेवटच तर बघून येवू !!!
  विशालला अमर वर संशय येवू लागला होता कारण बायको आजारी असताना दुसऱ्याच्या अंतिम संस्कार विधीला कोणता व्यक्ती जातो . पण विशालला सरळ सांगताही येत नव्हतं म्हणून तो काहीच बोलला नाही .

रेशमा जवळ तिच्या आईला राहण्यास सांगितले व दोघे राजाराम पाटील यांच्या अंतिम संस्कार ला निघाले ...

तेथे राजाराम यांना सोडून गेलेली त्यांची बायको व शहरातील लहान मोठी व्यक्ती शोक व्यक्त करत होते .
सर्वच त्यांची प्रशंसा करत होते . त्यातील एक व्यक्ती " म्हणतात ते खरंच आहे , देव फक्त चांगल्याच व्यक्तींना आपल्या जवळ बोलावतात ... येवढ्या चांगल्या व्यक्तीचा का ठावूक कोणी खून केला असेल ."

हे ऐकुन अमर गहिवरून गेला होता ... केलेल्या कृत्याची त्याला लाज वाटू लागली होती .
तेवढ्यात तेथे इस्पेक्टर चव्हाण आले व ते काही व्यक्तींशी बोलत होते ...

अमर इन्स्पेक्टर सोबत असलेल्या सुबोध मोहिते वर नजर ठेवून होता !!!

सोबत असलेला विशाल इन्स्पेक्टरची मुलाखत घेण्यासाठी तेथे गेला ...

मुलाखती नंतर चव्हाण साहेबांना एक फोन आला ...
" हा बोला साने ...काय फॉरेन्सिक रिपोर्ट आली ???

अच्छा - अच्छा 

थापा बद्दल काही माहिती  ??

" काय म्हणता ..!!! पोहोचतोय मी चौकीत !!! "

सुबोध मोहितेचा निरोप घेऊन चव्हाण पोलीस चौकी च्या दिशेने निघाले ...

चव्हाण घाईघाईने आत आले , आत येताच पवार व साने यांनी साहेबांना कडकडून सल्यूट ठोकला ...

" बोला साने काय खबर ??"

साने - " सर राजाराम यांना मारण्याआधी बेशुद्ध केलं गेलं होत , त्या नंतर त्याच्यावर वार केले गेले "

" थापा बद्दल काही माहिती ?? "

" सर काहीतरी गडबड आहे ," हातातील मिसिंग रिपोर्ट दाखवत साने पुढे म्हणाले " बहादुर थापा याची मिसींग रिपोर्ट ३ महिन्यापूर्वी लायन सेक्युरिटी सर्विस या कंपनीच्या मालकाने नोंदवली होती . अशोक नगर मधील दफनभूमी मद्धे वॉचमन होता ... " तेव्हा खूप चौकशी नंतर सुद्धा त्याचा सुगावा लागला नाही . त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून कळलं की तो नेपाळ मद्धे सुद्धा नव्हता , अचानक पणे गायब झाला आणि काल उगवला ते ही राजाराम यांचा खून करून !!! "

हे सर्व ऐकुन जयकांत चव्हाण यांना घाम फुटला होता , त्यांनी घाम पुसला व तोंडातल्या तोंडात म्हणाले . " हे अशक्य आहे , त्याला तर मी माझ्या हातांनी दफन केलं होतं , त्याची आत्मा तर पुन्हा परत ?? ???
छे ... छे... हे शक्य नाही आत्मा वैगेरे काही नसते . !!!

साने - " काय सर , काही म्हणालात का ??"

चव्हाण - " काही नाही , हा काहीतरी दुसराच प्रकार आहे , "

चव्हाण मनातल्या मनात विचार करत होता " जर हा खून खरंच बहादुर ने केला आहे तर तो कोणालाच सोडणार नाही " !!

या विचाराने त्यांचे डोके काहीच काम करू देत नव्हते . त्यांना आरामाची गरज भासू लागली होती म्हणून
ते आपल्या केबिन मध्ये जाऊन विचारात पडले ...व कोणता तरी विचार करता करता त्यांना डोळा लागला ...

झोपून काहीच मिनिटे झाली होती आणि एकाएक वाजलेल्या फोनच्या रिंग ने त्यांना जाग आली . त्यांनी फोन मद्धे बघितले तर एका एसटीडी चा नंबर दिसत होता . चव्हाण यांना वाटले , एखाद्या खबरीचा फोन असेल म्हणून त्याने तो उचलला ... समोरून एखाद्या नेपाळया सारखा आवाज येवू लागला !!!!
" जर सुबोध मोहिते याला जिवंत बघायचं असेल तर लवकरात लवकर अशोक नगर जवळील दफन भूमी मद्धे ये  "........ व फोन कट झाला !!!

चव्हाण उठले व बाहेर बघतात तर काय सगळी कडे अंधार पसरला होता . त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता की ते ८ तास झोपले होते . चौकीत कोणीच नव्हत म्हणून चव्हाण वारंवार साने यांना फोन करत होते .
पण फोन लागतच नव्हता....

शेवटी कंटाळून एकटेच पोलिस जीप मधून दफन भूमी मद्धे जायला निघाले ...

दफन भूमीच्या बाजूला आपली जीप लावली व आत जाऊ लागले ... मोठ्या मोठ्या धांगा टाकत ते आत पोहोचले  , आत मद्धे एका स्त्रीने सुबोधचे पाय , अमरने हात तसेच बहादुर थापा आपल्या हातांनी जबरदस्ती एका कपमधील द्रव्य सुबोधच्या तोंडात ओतत होता ...

सुबोध जीव तोडून ओरडत होता पण कोणालाच त्याची दया येत नव्हती . हे बघून चव्हाण चे हात पाय गळाले होते . कसं बस करून तो धावयचा प्रयत्न करत होता , मात्र जेवढा तो धावत होता तेवढा त्याच्या जवळ जवळ पोहचत होता .
सुबोध ला विषाचा प्याला दिल्या नंतर बहादूर चव्हाण ला म्हणत होता ...

" जयकांत "
" जयकांत "
" जयकांत "

" आता तुझी बारी "

जयकांत "
" जयकांत "
" जयकांत "

जयकांत साहेब ... साहेब

या आवाजाने जयकांत चव्हाण यांची झोप मोड झाली .

बाजूला असलेले साने म्हणाले " साहेब वायरलेस वर एक बातमी मिळाली आहे ,... सुबोध मोहिते यांचा मृत्यू झाला आहे "

दचकून चव्हाण म्हणाले " मृत्यू नाही खून , विष देवून मारलंय त्याला "

साने - तुम्हाला कसं माहिती साहेब ?? तुम्ही पण ही बातमी वायरलेस वर ऐकली काय ??

चव्हाण - नाही !!! चला कामाला लागा खूप काम करायचे आहेत " !!

---------- पुढील भाग लवकरच ----------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED