Rahasyamay Stree - 6 books and stories free download online pdf in Marathi

रहस्यमय स्त्री - भाग ६दिनांक - २८ मार्च २०१८
त्याने डोळे उघडले व पुढे बघताच दचकला !!!
एक व्यक्ती पोलिसांच्या वर्दी मद्धे त्याच्या पुढे उभी होती !!

अमरने आपले डोळे चोळत  वर पाहिलं एक अनोळखी व्यक्ती समोर उभी होती , ती व्यक्ती रेशमाला एकटक पाहत होती व तेवढ्यात विशाल इस्पितळात प्रवेश करत होता !!!

अमरला काहीच समजत नव्हतं !!! पोलिस इस्पितळात आले म्हणजे त्यांना सर्व खुनांबद्दल कळलं असेल , अमरला वाचण्याचा काही एक रस्ता दिसत नव्हता !

त्याला वाटले काल झालेल्या प्रकाराची विशालला जाणीव झाली असावी !!! म्हणून त्याने पोलिसांना येथे आणल असेल !!!

अमर आपला गुन्हा कबुल करणार तोवरच रेशमाच्या आई सोबत बोलत तेथे अक्षय आला व अमरला बघत म्हणाला ... " मी घरी गेलो होतो , काकांकडून कळलं की रेशमाची तबीयत बरी नाही म्हणून इथे आलो , काळजी घ्या रेशमाची "

हे ऐकुन अमर अजुनच गोंधळात पडला " मी घेतोच काळजी पण तू इथे ??? "

" ( अक्षय देवलकर रेशमाचा लहान पणीचा मित्र )
माझी तुमच्याच शहरात बदली झाली आहे !!! , एका मोठ्या बिल्डरची हत्या तसेच लागोपाठ झालेल्या दोन  खुनामुळे माझी इथे खास नेमणूक झाली आहे "

हे ऐकुन अमरच्या जीवात जीव आला , त्याने दीर्घ श्वास घेतला व इस्पितळात आल्या बद्दल त्यांचे आभार मानले पण अक्षय इथे आल्याने तो आतून निराश होता .

अक्षय देवलकर तिथून निघून गेले .

पण विशाल मात्र खूप चिंतेत दिसत होता म्हणून अमरने त्याला विचारले " काय रे आज काही काम नाहीत का तुला ?? येवढ्या टेन्शन मध्ये का दिसतोय ?? "

विशाल - " काही नाही तू विश्वास नाही करणार माझा "

अमर - " बोलशील तेव्हा तर विश्वास करेन ना "

विशाल - " खूप अशक्तपणा जाणवत होता म्हणून रात्रीची खबर/ बातमी न घेताच घरी जाऊन झोपलो , काल झोपेत एक स्वप्न पाहिलं , त्यात मी चव्हाण साहेबांच्या केबिन मध्ये बातमी घ्यायला गेलो होतो , तर तेथे संशयी म्हणून तुझे चित्र घेवून चव्हाण साहेब बसले होते , काहीतरी वार्ता करून ते जेव्हा बाहेर गेले तर त्यांच्या पाठी मी पण गेलो  .... आणि पुढे ....!!

अमर - काय मी संशयी ??? पुढे काय ??

विशाल - काही नाही राहुदे !!

अमर - बोल !!! अशी अर्धवट बोललेली वाक्य ठेवू नयेत ...

विशाल - तुझ्या समोर मी एका धार-दार अस्त्राने चव्हाण यांचा खून केला आणि त्या नंतर तू एक मोठा दगड चव्हाण यांच्या डोक्यात टाकला.!!!

अमर हे ऐकुन पूर्णपणे गोंधळला होता , त्याला पुढे काय बोलावं काय बोलू नये काहीच समजत नव्हते .

तोवर विशाल पुढे बोलला " अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नात जेव्हा मी चौकीतून बाहेर पडत होतो तेव्हा तुझं रेखाटलेल चित्र सुद्धा घेवून बाहेर पडलो होतो . आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळी माझ्या उशाखाली तेच चित्र मिळाल !!!
विशाल हातातील अमरचा स्केच अमरला देत म्हणाला ..

तेवढ्यात विशालला एक फोन आला , त्या फोनमुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता !!! फोन वर त्याने जे ऐकलं त्या धक्क्याने तो अक्षरशा जमिनीवर बसला त्याने फोन कट केला व अमरकडे एक टक पाहत होता .
अमरन ते चित्र खिश्यात लपवून ठेवत होता . अमरला त्याच्या अश्या बघण्याची भीती वाटू लागली होती .  पण मित्र असल्याने अमरने त्याला सावरले व विचारल काय झाल आहे ??

विशाल - एका पत्रकाराचा फोन आला होता , जयकांत चव्हाण यांचे मृत शरीर अशोक नगरच्या दफन भूमी मद्धे सापडला आहे , सकाळी तेथून जॉगिंगला जाणाऱ्या एका माणसाने पोलिसांना याची खबर कळवली , पुढील तपास गावात आलेले नवीन इन्स्पेक्टर अक्षय देवलकर करणार आहेत !! ...

अमर - " काय ??? , तू केलास का हा खून ?? " ( कॉलेजच्या दिवसांत अमर नाटकात वेगवेगळे अभिनय करायचा , त्या अभिनयाची आता त्याला मदत झाली , अमरला सर्व माहिती असून तो विशाल समोर काहीच माहिती नसल्याचा चंगलाच अभिनय करत होता )

विशाल - " कसं शक्य आहे , मी फक्त स्वप्न बघितल होत !!!!
    आपल्याला याची उत्तरे दफन भूमी मद्धे मिळतील , पोलिसांना तेथे काही पुरावे मिळतात का ?? त्यावरून कळेल या खूना मागे कोण आहे !!! "

अमर - " पण रेशमा जवळ तिची काळजी घेण्यासाठी ??? " येवढं बोलून लगेचच अमर बोलला " " रेशमाची आई आहे , चल !!! "

विशालला बर वाटत नव्हत पण नाईलाज असल्याने तो काही म्हणाला नाही ..

अक्षय देवलकर यांना चौकीची चार्ज घेवून काही मिनिटेच झाली असतील अन् आपल्याच सिनीयरच्या मृत्यूची बातमी मिळताच ते ही भयभीत झाले होते .
लागोपाठ तीन खून झाल्याने व खुनीचा पत्ता न लागल्याने सर्वांचे पोलिसांच्या कामावर बोट उचलणे साहजिक होते !!!

अक्षय यांनी रजिस्टर मधील तपशीलची सर्व माहिती वाचली . वाचून साने , पवार , थोरात यांना घेवून दफन भूमीच्या दिशेने निघाले ,

जाताना अक्षय ने साने यांना विचारले " ग्लास कुठून घेतले होते माहिती मिळाली ?? "

साने - " माहिती मिळाली साहेब , पण दिवस भरातून १० - १२ व्यक्तींनी त्याच्या कडून ग्लास घेतले होते त्यात त्याला कोणा कोणाचे चेहरे लक्षात असतील !!! "

अक्षय - " किती निष्काळजी पणा साने !!!! तुम्हीच ठरवलं की त्याच्या लक्षात काहीच नसेल ??? ,
रजिस्टर मद्धे तर लीहल होत तुम्ही त्याची माहिती मिळवायला गेला होतात !! ही माहिती मिळवली ???
बहादुर थापा बद्दल माहिती ??

साने - " नाही साहेब रजिस्टर मद्धे लिहली आहे तेवढीच माहिती मिळाली आहे " ..

अक्षय - " आज पासून माझ्या चौकीत काम करेल त्यालाच जागा असेल नाहीतर बदली करायला वेळ नाही  लागत !!! "

पोलिस जीप मध्ये एकदम शांतता पसरली !!!

अक्षय पुढे पवारला विचारू लागले " काल स्केचं आर्टिस्टला बोलावल होत , कोणाचं स्केच काढण्यासाठी बोलावल होत , मी आलो तेव्हा कोणतेच स्केच दिसले नाही !!! स्केच न काढताच गेला का आर्टिस्ट ?? "

पवार - " चव्हाण साहेब सोबत घेऊन गेले असतील !!"

अक्षय - असतील म्हणजे ??? नसतील गेले तर कुठे गायब झालं ?? 
स्केच आर्टिस्टला बोलवा "

" साने यांनी स्केच आर्टिस्टला फोन केला "

फोन केल्या नंतर , पवार साने यांच्या कानात हळूच कुजबुजले " यांच्या पेक्षा चांगले आपले चव्हाण साहेब होते , !! "

साने - " बघ ना देव पण चांगल्याच व्यक्तींना आपल्या जवळ बोलवतो "

इतका बारीक आवाज सुद्धा अक्षय यांनी ऐकला व म्हणाले " म्हणून खूनिंचा पत्ता लावल्या शिवायच देवाला प्रिय झाले , पोलिसात चांगुलपणा नसला तरी चालेल पण खूनिंना शोधण्याची धमक जरूर असावी " !!

दफन भूमी आली , थोरात यांनी गाडी बाजूला लावली .

दफन भूमीच्या आजूबाजूला असलेला माणसांचा घोळका बाजूला करत अक्षय आत जाऊ लागले ...
आत चव्हाण यांचे मृत शरीर बघून ते थक्क झाले , त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता , कुदळ त्यांच्या शरीराच्या आरपार झाली होती .  बाजूला असलेल्या मोठ्या दगडाला लागलेलं रक्त पाहून त्यांनी अंदाज बांधला की याच दगडाने चव्हाण यांचे डोके ठेचले होते !!!

पवार नेहमी प्रमाणे फोटो घेत होते .

अक्षय ने चव्हाण यांची बॉडी पोस्टमॉर्टम ला पाठवायला सांगितली . सोबत दगड आणि कुदळ फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवायला सांगितला !!!

सर्व दफन भूमी तपासली पण काहीच तपास लागला नाही !!
तेवढ्यात तेथे अमर आणि विशाल पोहोचले !!!

चव्हाण यांचं मृत शरीर बघून विशालला घाम फुटला !! त्यांचे हात पाय थर थर कपात होते . त्याने स्वप्नात बघितल्या प्रमाणेच चव्हाण यांच मृत शरीर तेथे पडले होते !!!

अमरला तेथे बघून अक्षय त्याच्या जवळ पोहोचला व त्याला म्हणाला " तू इथे काय करतोय ??? , जरा रेशमाची काळजी घे !!! देवाच्या कृपेने एवढी चांगली बायको मिळाली आहे तुला , ऐकलं आहे की तू तिच्या जवळ जास्त नसतोस मग असतोस कुठे ?? अखेरचं बँक मद्धे पण शुक्रवारी गेला होतास मग असतोस कुठे??!!! "

अमरला अक्षय आधीपासूनच आवडत नव्हता आणि त्यावर तो त्याला कसं वागायचं याचे सल्ले देत होता हे अमरला सहन नाही झाल म्हणून अमर त्याला म्हणाला " तुला काय करायचंय , माझे वयक्तित आयुष्य आहे तू सांगणारा आहेस कोण ??  !! "

अक्षय - " जर तू नसतास तर रेशमाचे माझ्या सोबत लग्न झालं असतं तिच्या आई वडिलांची मी पाहिली पसंत होतो , तुझ्या अश्या वागण्याने त्यांना ही त्यांची चूक कळली आणि लवकरच रेश्माला सुद्धा कळेल की जेव्हा सर्वात जास्त तिला तुझी गरज होती तेव्हा तू पूर्ण दिवस गायब असायचा "  !!!

अमारचे रेशमावर किती प्रेम आहे हे त्याला अक्षय समोर सिद्ध करायची गरज वाटली नाही म्हणून तो पुढे बडबडला " मी जिवंत आहे म्हणजे अजून रेशमा माझी बायको आहे हे लक्षात असू दे !!! " येवढं बोलून अमर रागारागाने तेथून निघून जाऊ लागला

विशाल पण अक्षय ची मुलाखत न घेताच अमर सोबत तिथून निघू लागला ,!!!

स्वप्नाला खर झालेलं पाहून विशाल इतका गोंधळला होता की त्याला त्याची तबीयत बरी वाटत नव्हती म्हणून तो सरळ घरी निघाला . व अमर इस्पितळात गेला ...

चव्हाण ची बॉडी , दगड व कुदळ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून अक्षय चौकीत आला !!!

चौकीत सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते , अक्षय चौकीत आल्या नंतर देखील त्याला कोणी सॅल्यूट केला नव्हता .
जेव्हा अक्षयने कदम यांना आवाज दिला तसेच सर्व उभे राहून सॅल्यूट करू लागले !!!

अक्षय - कदम चेहऱ्यावर बारा का वाजले आहेत ???

समोरच्या खुर्चीवर बसलेल्या नगरसेवक जवळ हात दाखवत कदम म्हणाले .. " साहेब इतिहासात पहिल्यांदाच अस होत आहे , हे आपला केलेला अपराध कबुल करायला आले आहेत !"

अक्षय - " काय ??? " हे ऐकुन अक्षय ला सुद्धा चांगलाच धक्का बसला होता ते पुढे विचारू लागले  ..
" काय नाव आहे यांचं ???"

कदम म्हणाले " नगरसेवक सुनील तावडे "
यांचे ३ डान्स बार आहेत आपल्या हद्दीत "

अक्षय - अक्षय हसत म्हणाले " साहेब मस्ती करत असतील राजनीती मद्धे कोणीच झालेल्या चुका स्वीकारत नाही " 

यावर सुनील तावडे म्हणाले " मृत्यू पेक्षा जेल मध्ये राहण चांगलं " चव्हाण बोलत होते पण मी त्यांना वेड्यात काढलं , आणि आज जे झालं त्या मुळे माझे डोळे उघडले आहेत !! मी फक्त चौकीत च सुरक्षित राहू शकतो !!! "

अक्षय - " काय केला होता अपराध " ??

---------- पुढील भाग लवकरच -----------


इतर रसदार पर्याय