रहस्यमय स्त्री - भाग ८ Akash Rewle द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्यमय स्त्री - भाग ८



अक्षय ने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजत होते . अक्षय वेळ बघत साने यांना म्हणाले .

" साने सकाळी सकाळी अमरला उचला , आज रात्र त्याला त्याच्या बायको जवळ राहू द्या !!! "

रात्री १२ वाजून दहा मिनिटांनी अमरला एक फोन येतो...
" तुमच्या फायद्याची एक गोष्ट आहे , मी जे बोलतोय ते ध्यान देवून ऐका .... तू सर्वांना का मारतोय हे माहिती नाही अन् सुनील तावडे तुझ्या निशाण्यावर आहे की नाही हेही माहिती नाही ... जर तुझा बेत असेल त्याला मारायचा तर त्याला जोशी हॉस्पिटल मद्धे २०३ मद्धे ठेवलं आहे आजची रात्र आहे तुमच्या कडे त्याला संपवायला , अजून एक गोष्ट ... सकाळी तुला अटक होईल सावध रहा !!! "

अमरला काहीच समजत नव्हत की कोण अश्या प्रकारे फोन वर झालेल्या खूनाविषयी बोलतोय?? म्हणून त्याने समोरील व्यक्ती ला विचारले ....
" कोण आपण ???? "

समोरून फक्त एवढच उत्तर मिळालं .. " तावडे ला जगण्याचा अधिकार नाही , तू मला त्याचा शत्रू समझ "
आणि फोन कट झाला ...

अमरने त्या फोनवर पुन्हा कॉल केले पण नंबर बंद आहे असं प्रतीत होत होतं "!!!

तो कॉल बद्दल खूप विचार करत होता ...
की ...
ज्या व्यक्तींचे खून कराचे आहेत त्यातला हा चौथा व्यक्ती म्हणजे सुनील तावडे विषयी कॉल होता "
पण हा कॉल कोणी केला असेल ?? मला फसवायला अक्षय ने तर नवीन रस्ता शोधून काडला नसेल ना ??
किंवा हा कॉल विशाल ने तर केला नसेल ना , हे जाणून घेण्यासाठी की तिन्ही खून मीच केले आहेत असे ??
पण विशाल चा आवाज तर वाटत नव्हता !!!
मग कोणी केला असेल फोन ??? त्याला कसं माहिती की खून मी केले आहेत ??
त्याच्या जवळ माझा नंबर कुठून आला ??

तो कोणीही असेल पण त्याला हे कसं कळलं की उद्या मला कैद होणार आहे ??

या सर्वांच्या भानगडीत अमर हे विसरला होता की .,
अमरला ती स्त्री दिसून पाच दिवस झाले होते म्हणजे अजून दोघांना मारण्या साठी फक्त २ दिवस उरले होते .
म्हणून तो आपली पुढील योजना तयार करत होता !!
त्याला अचानक काय झाले माहिती नाही तो उठला व आपल्या कारच्या दिशेने धावला !!!

*** सकाळी ***

सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अमर लॅपटॉप घेऊन लंगडत लंगडत इस्पितळात प्रवेश करू लागला , बाहेरील गार्ड झोपले असल्याने त्याला प्रवेश करायला काहीच अडचण झाली नाही !!!

त्याने आपल्या सोबत लॅपटॉप आणला होता , त्याने लगेचच फेसबुक वर अभिजित पानसे सर्च केले असता , त्याच्या समोर २३ प्रोफाइल आल्या ... त्याला हा प्रश्न पडला होता की आता या २३ प्रोफाइल पैकी नेमका अभिजित पानसे कोणता ???
सर्व २० प्रोफाइल मधील मित्र व माहिती बघून अमर मानसिक रूपाने थकला होता , त्याच्या सय्यम तुटत होता . त्याला या सर्वात २ तास कधी झाले कळले सुद्धा नाही ...

त्याने २१ वी प्रोफाइल पाहिली .
२१ व्या प्रोफाइल मद्धे अभिजित पानसे याची एकच फ्रेंड होती ती म्हणजे स्वप्नाली दिवेकर , त्याने स्वप्नाली चा प्रोफाइल पिक पाहिला , ते पाहिल्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आला होता कारण दफन भूमी मद्धे पाहिलेली रहस्यमय स्त्री अजून दुसरी कोणी नसुन स्वप्नाली दिवेकर होती , म्हणजे रहस्यमय स्त्रीचे नाव स्वप्नाली दिवेकर होते , पण त्याच्या चेहऱ्यावरील आनंद जास्त वेळ टिकू शकला नाही ...

तो प्रोफाइल बघण्यात एवढा मग्न होता की त्याच्या लक्षात ही आल नाही की समोर अक्षय व दोन कॉन्स्टेबल पोहचले आहेत !!!!

त्याने घड्याळात पाहिले तर साडे सात वाजत होते , व त्याच्या आयुष्याची साडे साती सुद्धा सुरू झाली होती ....

अक्षयने एक नजर रेशमाला बघितले व लगेच साने ला म्हणाला , " साने घेवून चला ह्याला " !!!

साने अमरचा मनगट पकडून त्याला सोबत चालायला खुणवत होते ...

अमरने यांचा हात झटकला ,,, आपला लॅपटॉप रेशमाच्या उशाजवळ ठेवला , रेशमाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून तिच्या कानात म्हणाला " मी लवकरच येईन , तू काळजी घे !! आता फक्त एकच बाकी आहे !!!! "

कानात बोलून अमर अक्षयला म्हणाला ...

अमर - " काय केलंय मी ?? कुठे घेवून जात आहात मला ??"

अक्षय - " चौकीत चल कळेल सगळ "

अमर पुढे काही बोलेल तोवर साने त्याचा हात पकडुन बाहेर घेवून जाऊ लागला !!

अमर - " हात लावू नकोस चलतोय ना मी , जर मी काहीच केलं नसेल आणि जर तेथे पोहोचल्यावर समजल की विना कारणाच मला घेवून गेलास , तर बघून घेईन तुला "

अक्षय - " पोलिस विना कारण कोणालाही घेवून जात नाही हे माहितीच असेल , अन् राहिली गोष्ट बघून घ्यायची तर बघू काय वाकडं करशील तू माझं !!! "

अस बोलून अक्षय अमरची कॉलर पकडून जीप मद्धे बसवत होता !!!

सर्व पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले , तेथे विशाल वर्तमान पत्राचा बातमीसाठी कॉन्स्टेबल पवार कडून काल झालेल्या अपघाताची माहिती घेत होता ...

इन्स्पेक्टर अक्षय अमरला अस घेवून येताना बघून त्याला चांगलाच धक्का बसला !!!

अमरला खुर्चीवर बसायला सांगितले , अमरचा होत असलेल्या अपमानाने अमर चांगलाच संतापला होता , पण त्याच्या मनात वेगळीच भीती जाणवत होती मात्र चेहऱ्यावर तो फक्त रागाचे भाव दाखवत होता !!!

अक्षय स्केच आर्टिस्ट ने काढलेले चित्र दाखवत त्याला म्हणाला ..
" जयकांत चव्हाणने तुझे चित्र का काढले ?? हे तू सांगशील की तुझ्याकडून आम्ही बोलवून घेवू ?? "

अमर - " मला काय माहिती जयकंत चव्हाण ने माझं चित्र का काढल ते !!! मी कसा सांगू शकतो ?? तुम्ही त्यांनाच का नाही विचारत ?? "

अक्षय - " तो जिवंत असता तर तुला विचारलं नसत सरळ तुरुंगात मरेपर्यंत ठेवलं असत "

अमर - " मला खरंच याच्या बद्दल कल्पना नाही ,"

विशालला त्या चित्रा बद्दल आठवत होत , त्याने ते चित्र शेवटीं अमरला दिले होते , त्याला माहिती होत की जर तो मद्धे काही बोलला तर अमर सोबत तोही संकटात सापडला असता म्हणून विशालने शांत राहायचे ठरवले !!! पण त्याला कोड पडल होत की स्वप्नात पाहिलेलं चित्र अक्षय जवळ कुठून आल ??? की स्वप्न खर तर झालं नव्हत ???

अक्षय - " म्हणजे तू अस सांगणार नाहीस !!!! , साने तुम्ही आणलेली कालची क्लिप दाखवा !!! "

सानेंनी काल ची क्लिप आपल्या कॉम्प्युटर मद्धे लावली !!!
हे बघून विशाल अजुनच गोंधळात पडला !!
मात्र अमरच्या चेहऱ्यावर आता हसू आल होत , बहुतेक त्याचा डाव मोडला होता !!!

अक्षय - " आता तू हे ही सांगशील की ही व्यक्ती तू नाही आहेस ??? "

अमर पुढे काही बोलेल तोवर अक्षयचा फोन वाजला !!!

तो थोरात चा कॉल होता ...
थोरात - " जय हिंद सर ..."

अक्षय - " बोला थोरात !!!

थोरात - " सर .. मी पूर्ण रात्र आय सी यू बेड नंबर २०३ च्या दरवाजाच्या बाहेरच होतो , कोणी आत गेलं नाही आणि कोणी बाहेर सुद्धा आल नाही ... पण माहिती नाही कसं झालं !!! "

अक्षय - " स्पष्ट बोलाल का थोरात !!!! "

थोरात - " हो सर , रात्री तावडे यांचा खून झाला , सुबोध मोहितेला ज्या विषाने मारलं होत त्याच विषाचा वापर इंजेक्शन द्वारे तावडे यांना मारण्यासाठी केला आहे , आणि त्याच्या ऑक्सिजन ची पाईप सुद्धा कापली आहे !!! "

अक्षय - " काय तावडेचा खून झाला ??? , तुम्ही तेथे असताना देखील !!! , मी पोहोचतोय तेथे कोणाला आत येवू देवू नका आणि कोणत्याच गोष्टीला हात लावू नका !!! "

अमरचं काहीच ऐकुन न घेता अक्षयने कॉन्स्टेबल सलीमला अमरला तुरुंगात ठेवायला सांगितले !!! अक्षय , पवार व साने सोबत इस्पितळाच्या दिशेने निघाले !! घटनेचे छायाचित्र घेण्यासाठी सोबत विशाल पण निघाला !!!

अक्षय इस्पितळांमध्ये 203 रूम नंबर च्या दरवाज्या जवळ असलेल्या थोरातला भेटतात , थोरात त्यांना झालेला प्रकार सांगतो ...

अक्षय आय सी यु मध्ये प्रवेश करतो व बाजूच्या सगळ्या गोष्टी पाहतो !!! बेडवर तावडेचे मृत शरीर होते , कोणीतरी त्यांच्या ऑक्सिजनचा पाईप कापला होता व त्याच्या गळ्याला असलेल्या वणावरून स्पष्ट दिसत होत की कोणीतरी त्यांच्या गळ्यात इंजेकशन खुपसले होते ,
हा जो कोणी व्यक्ती होता तो इस्पितळा मधीलच होता असा समज अक्षय बांधत होता , कारण बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश नव्हता व थोरात दरवाज्याच्या बाहेरच असल्याने अनोळखी व्यक्ती ला प्रवेश का लरण शक्यच नव्हते !!!

अक्षय आपले डोके चालवत होते तेवढ्यात त्यांची नजर इस्पितळात खिडकीवर असलेल्या पडद्यांवर पडली ... ते पडद्याच्या मागे बघतात तर त्यांचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता , त्यांनी थोरात ला आपल्या जवळ बोलावले व ओरडून विचारले ...
" थोरात हे काय आहे ??? "

थोरात - " साहेब काचेचे तुकडे !!! पण इथे कसे ???

अक्षय - " काल खिडकीच्या काचा तुटण्याच्या आवाज नाही आला तुम्हाला ??? !! मनापासून ड्युटी कराल तर आवाज येईल ना !! लाज वाटली पाहिजे तुम्हाला ऑन ड्युटी वर झोपायला , तुमच्या निष्काळजी पणामुळे आज तावडे यांचा खून झाला !!! "

थोरात - " नाही साहेब काल इस्पितळाच्या बाहेर खूप सारे फटाके वाजत होते , किमान १२-१३ मिनिटे वाजत असतील , त्याच दरम्यान ही काच तोडून तो व्यक्ती आत आला असेल व त्याने हे कृत्य केलं असेल म्हणून आवाज नसेल आला !!!"

अक्षय - " आता तरी निष्काळजी पणा करू नका , कुठे फिंगर प्रिंट वैगेरे काही पुरावे मिळतात का ते बघा , खुनी कितीही चलाख असला तरी कुठे ना कुठे तरी नक्कीच चुकतो !!! "

येवढं बोलून अक्षय पुन्हा चौकीत आला .

विशालला वर्तमान पत्राच्या संपादकाचा फोन आल्याने तो फोटो घेवून सरळ ऑफिस मध्ये गेला .

अक्षयच्या डोक्यात हाच विचार चालला होता की तावडेचा खून कोणी केला ???

व त्याच्या समोर एकच उत्तर होत " अमर "

म्हणून पुन्हा अमरची चौकशी सुरू केली !!!!

अक्षय - " काल रात्री कठे होतास ??? "

अमर - " इस्पितळात होतो आपल्या बायको जवळ "

अक्षय - " काही पुरावा ??? की रात्र भर तू आपल्या बायको जवळच होतास ?? !!"

अमर - " इस्पितळाच्या गार्ड ला विचारू शकतोस !! "

अक्षय - " ते तर वीचारेनच पण हे सांग की ते ग्लास आहेत कुठे जे तू सीसीटीव्ही फुटेजमध्ये घेत आहेस !!!
आणि प्लीज आता अस नको सांगूस की तो व्यक्ती मी नाही आहे !!!! "

अमर त्याच्या या प्रश्नावर हसत होता ...

अक्षय - " हसू नकोस मला माहिती आहे सर्व खूनांच्या मागे तुझाच हात आहे , आपला गुन्हा कबुल कर तुझी शिक्षा कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन , शेवटी माझ्या एकतर्फी प्रेमाचा पती आहेस तू !!! येवढं तर करूच शकतो तुझ्या साठी !!! "

अमरचा या वाक्याने राग अनावर झाला आणि त्याने अक्षायची कॉलर पकडली व म्हणाला " आपली औकात बघून बोल !!! , तुला ग्लास हवेत ना चल माझ्या सोबत देतो तुला !!! "

अमर अक्षयला घेवून जाऊ लागला पण अक्षय थांबला व म्हणाला " जर मी माझ्या औकातीवर आलो असतो ना तर रेशमाच्या आयुष्यात मी असतो तू नाहीस , रेशमाच्या आईला अजूनही वाटत मीच तिच्यासाठी योग्य आहे , होतो आणि असेन !!! पण रेशमा तुझ्या सोबत खुश होती म्हणून मी माझ्या औकातीवर नाही आलो "

येवढं बोलून अक्षय अमर सोबत जायला निघाला सोबत पवार सुद्धा होते !!!

अक्षय , पवार व अमर अमरच्या घरी पोहोचले ...

जेव्हा अमरने त्या दुकानातून ग्लास घेतले तेव्हा दुकानातून निघताना त्याने कॅमेरा बघितला असल्याने त्याने सुरक्षेसाठी दूरवर असलेल्या दुकानातून एक्स्ट्रा ग्लास घेतले होते ,

व तेच ग्लास आज त्याने अक्षयला दाखवले , त्यामुळे अक्षयचे तोंड बंद झाले मात्र अक्षयने त्याला एक प्रश्न विचारला " तुझी बायको इस्पितळात ऍडमिट असताना देखील तू तिच्या जवळ न राहता हे ग्लास घेण्यासाठी का गेलास ?? "

अमर - " ग्लास विकत घेणं पण आजकाल गुन्हा झाला आहे का ?? "

पुढे अक्षय म्हणाला " अजून एक गोष्ट राहिली .. काल रात्री इस्पितळातच होतास याच एक प्रमाण दे !! "

अमर अक्षयला घेवून इस्पितळात गेला व तेथे असलेल्या रजिस्टर मद्धे शेवटची एन्ट्री संध्याकाळीच होती व सकाळी पोलिसांसोबत जातानाची होती !!!
( रात्री गार्ड झोपेत असल्याने अमर ह्या ही संकटातून बाहेर पडला )

यावरून हे समजत की अमर इस्पितळातच होता !!!

अक्षय नाईलाजाने तेथून निघून गेले मात्र त्याच्या डोक्यात काही प्रश्न घर करून बसले होते . पहिली गोष्ट अशी की काल जेव्हा अमरला पाहिलं तेव्हा त्यांच्या जवळ लॅपटॉप नव्हता व रात्रभर जर तो बाहेर गेला नव्हता तर आज सकाळी त्याच्या जवळ लॅपटॉप कुठून आला ??
दुसरी गोष्ट अमर लंगडत चालत होता , तावडे दुसऱ्या मजल्यावर होता , वर चढताना किव्वा उतरताना त्याला पायाला काही लागलं असावं , मात्र अक्षय जवळ ठोस पुरावे नसल्याने अक्षय चौकीच्या दिशेने निघाले ....
..... व जाताना पवार यांना अमरवर लक्ष ठेवायला सांगितले!!!!!

अमर पुन्हा लॅपटॉप मद्धे स्वप्नाली दिवेकर बद्दल माहिती बघत होते , अबाऊट मद्धे त्याला स्वप्नाली दिवेकर ची सिस्टर म्हणून अजून एक प्रोफाइल दिसली ...

सिस्टर म्हणजे बहिणीचे नाव होते ' काजल वाघमारे ' !!!!
या सर्वात चांगली बातमी ही होती की काजल वाघमारेच्या Facebook profile मध्ये तिचा कॉन्टॅक्ट नंबर होता !!!!

अमरने लगेचच काजल ला फोन लावला !!!
कॉल उचलताच अमर म्हणाला " आपण काजल बोलताय ना ?? "

काजल - " हो बोलतेय पण आपण कोण ??

अमर - " मी सिद्धार्थ माहात्म्य , तुळींज पोलीस स्टेशन वरून बोलतोय , मला तुमच्या बहीणी बद्दल स्वप्नाली दिवेकर बद्दल माहिती हवी होती त्यांची केस आली आहे आमच्या पोलिस चौकीत ..."

काजल हळू व दापक्या आवाजात बोलत होती - " मी तिची बहीण नाही !!! , ती चांगली मैत्रीण होती माझी "

अमर - " होती म्हणजे ??? "

काजल - " ती घरातून पळून गेल्यापासून तिच्या बद्दल माझ्या कडे जास्त नाही माहिती तिची , "

अमर - " कुठे पळून गेल्या होत्या काहीतरी माहिती मिळेल का ?? "

काजल - " तुम्हाला जे काही जाणायच आहे ते तिच्या वडिलांन कडून जाणून घ्या , ' विनायक दिवेकर ' तुम्हाला ते बोधर गावात मिळतील !!
माझ्या घरी माझे सासू - सासरे आहेत आणि आमच्या घरात काय अख्ख्या गावात तीच नाव ही घेतल जात नाही , मला माफ करा मी काहीच मदत करू शकत नाही तुमची !!!

अमर - " कॉल वर बोलू शकत नाहीत तर मेसेज करून सांगा "!!!

काजल - " मेसेज वर ..... ( काजल विचार करून काही सेकंद थांबून म्हणाली ) .... मेसेज वर नाही सांगू शकणार मी तुम्हाला , जेव्हा बोधर मद्धे पोहचाल ना तेव्हा मला एक मिस कॉल करा मी भेटून सांगिन तुम्हाला !!! "
अमर - " धन्यवाद माहिती साठी "!!!

येवढं बोलून अमर गूगल मॅप वर बोधर् गाव सर्च करून आपल्या कार मधून बोधर गावाच्या दिशेने निघाला , माघे पवार आपल्या बाईक वर त्याचा पाठलाग करत होता !!!!

--------- पुढील भाग लवकरच ----------