रहस्यमय स्त्री भाग - ७ Akash Rewle द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्यमय स्त्री भाग - ७




अक्षय - अक्षय हसत म्हणाले " साहेब मस्ती करत असतील राजनीती मद्धे झालेल्या चुका कोणी स्वीकारत का ?? "

यावर सुनील तावडे म्हणाले " मृत्यू पेक्षा जेल मध्ये राहण चांगलं , बिना भाड्याची खोली अन् फुकटची भाकर " चव्हाण बोलत होते पण मी त्यांना वेड्यात काढलं , आणि आज जे झालं त्या मुळे माझे डोळे उघडले आहेत !! मी फक्त चौकीतच सुरक्षित राहू शकतो !!! "

अक्षय - सुरक्षित म्हणजे ??? मला नाही समजल !!!
तुम्ही इथले नगर सेवक तुम्हाला कसली भीती ??

तावडे - बहादुर थापाची , ३ महिन्यापूर्वी अशोक नगर जवळील दफन भूमीचा वॉचमन मीसिंग झाला असे सांगण्यात आले होते पण तो मीसींग झाला नसून आम्ही चौघांनी त्याला ठार मारले होते व त्याच दफन भूमी मद्धे गाडले होते व आता तो परत आला आहे !!!

अक्षय - चौघांनी म्हणजे ?? अजुन ३ कोण ??
आणि हे कसं शक्य आहे मेलेली व्यक्ती पुन्हा कशी येवू शकते ?? काहीही तावडे साहेब !!!

तावडे - जेव्हा चव्हाण यांनी सांगितलं होत तेव्हा मलाही असच वाटलं होत . पण राजाराम पाटील यांचा खून झाला तेव्हा त्यांच्या जवळ बहादुर थापा याची आईडी सापडली , मग सुबोध मोहिते यांचा खून झाला तेव्हा त्याच्या जवळ बहादुर थापा याच पाकीट सापडल ,
कमाल तर तेव्हा झाली जेव्हा रात्री मला स्वप्न पडल की बहादुर थापा जयकांत चव्हाण यांचा खून करत आहे , अन् सकाळी बातमी ऐकली की जयकांत चव्हाण यांचा खून झाला आहे !! अन् आता माझी बारी आहे !!"
" मला कोणत्याही गुन्ह्यात अडकवा पण जेल मध्ये ठेवा !!"

अक्षय - का मरलात वॉचमन ला ???

तावडे - तो आमच्या कामात अडथळा निर्माण करत होता म्हणून त्याला ठार मारले !!

अक्षय - तुम्हाला जेल मद्धे ठेवण्या साठी एखादा पुरावा मिळेल का ?? कोणी खून करताना पाहिले आहे वैगेरे ??

तावडे - अरे ...!!! पाहिलेल्या सर्व व्यक्ती तर देवाला प्रिय झाले आहेत .!!!
मी स्वतः सांगतोय ते पटत नाही का ??? ,
बर मी त्याला दफन केलेली जागा दाखवू शकतो !!!

अक्षय त्याची फिरकी घेत होते !!! तावडेला गुन्हा कबुल करताना पाहून गाल्यातल्या गालातच हसत होते ,

हे ऐकुन अक्षय म्हणाले " चला पवार बहादुर थापाला घेवून येवूयात "

थोरात चौकीतील खोदण्याचे समान जीप मध्ये ठेवत होते .

अक्षय ने साने यांना सुबोध मोहिते यांच्या कन्स्ट्रक्शन साईट वरील ग्लास ची माहिती काढण्यास पाठवले . व जाताना त्यांना बजावले
" या वेळेस जर कामचोर पणा केला तर नोकरी खाईन मी तुमची " !!!
साने कॉन्स्टेबल - प्रमोद पाठक सोबत बाईक वर बसून चहा बाजाराच्या दिशेने निघाले !!!

हेड कॉन्स्टेबल सलीम यांनी तावडेला जीप मध्ये बसवले . सर्व दफन भूमीच्या दिशेने निघाले !!!

जीप मध्ये अक्षय तावडे ला म्हणाले " तावडे साहेब तुम्ही सांगितल नाही की तुम्ही थापा ला का मारलं ??"

तावडे - " साहेब बोललो ना तुम्हाला , कामात अडथळा निर्माण करत होता !! "

अक्षय - " साहेब मला चव्हाण नका समजू मी देवलकर आहे , ' अक्षय देवलकर ' "

तावडे - " दोन नंबरच्या बऱ्याच धंद्या मद्धे आम्ही चारी जण भागीदार होतो . बऱ्याच व्यक्तीचे मृत देहाची विल्लेवाट लावण्यासाठी आम्ही दफन भूमीचा वापर करायचो पण एकदा असच मृत देह गाडताना त्याने आम्हाला बघितलं आणि नाईलाजाने आम्हाला त्याला मारावे लागले !!! "

रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे थोरात जीप हळू चालवत होता .

अक्षय - " किती मृत देह दफन केले होते तुम्ही ?? "

तावडे - " कधी मोजले नाहीत पण २५-२६ नक्कीच असतील !!! "

अक्षय हा आकडा ऐकुन हादरून गेला होता , सलीम व पवार सर्व ऐकुन अवाक झाले होते ... कारण ते चव्हाण यांना जेवढं चांगलं समजायचे तेवढेच क्रूर त्यांचे कर्म होते हे त्यांना आता कळतं होत !!!

अक्षय - तुम्ही येवढे मृत देह लपवले कोणाला कळलं सुद्धा नाही !! ??

तावडे - " थापाच्या मृत्यू आधी अडचण व्हायची पण जेव्हा त्याचा काटा काडला , त्या नंतर लोकांना त्या जाग्याची भीती वाटू लागली कारण वॉचमन रातोरात गायब झाला होता म्हणून कोणीच तेथे जात नव्हत व नवीन वॉचमन एक दिवस सुद्धा तिथे टिकला नाही त्या नंतर तेथे वॉचमन नसल्याने आमचं काम सोप्पं झाल !!! "

बोलता बोलता दफन भूमी आली , सर्व थापाच्या कबर जवळ जाऊ लागले !!!

तावडे ने सांगितल की त्याला सर्व गाडलेल्या जागा आठवत नाहीत कारण सर्व कबर आधीच्या असलेल्या कबर सोबत मिक्स झाल्या होत्या , त्यातल्या त्यांनी गाडलेल्या व अगोदर असलेल्या ओळखू शकत नव्हता ... दफन भूमीच्या कोपऱ्यात असलेली थापा ची कबर त्याला चांगलीच ठाऊक होती !!

म्हणून तावडे यांनी सांगितलेल्या जागी पवार व थोरात खोदत होते ...

सर्वांनी नाकाला रुमाल धरला , कारण तेथून खूप उग्र वास येवू लागला होता ... जेव्हा त्यांनी खूप खोल वर खोदल तर त्यांना थापाचे मृत शरीर दिसले !!!

हेड कॉन्स्टेबल सलीम यांनी त्या सर्व गोष्टीचे फोटो काढले .

शरीर काही प्रमाणात कुजले होते ... खूप विचित्र वाटत होत !!! ते मृत शरीर त्यांनी बाहेर काढले व जीप मद्धे ठेवले !!! व झालेल्या खड्यात पुन्हा माती भरली !!!

बघता बघता सूर्य मावळत होता , सायंकाळ झाली होती , हळू हळू अंधार वाढत होता व हवेत गारवा निर्माण होवू लागला होता ...

बहादुर थापाचा मृत देह घेवून ते चौकीच्या दिशेने निघाले ...

चौकीला जाताना रस्त्याच्या काही भागात खड्डे झाले होते हेडलाईटच्या प्रकाशाच्या मदतीने त्यांना चुकवत तो जीप चालवत होता ,

असाच एक खड्डा चुकावताना अचानक एक स्त्री त्यांच्या जीप च्या समोर आली . थोरात ला काही कळेल तोवरच त्याने जीप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवली , जीप रस्त्यावरून घरंगळत दुर्दैवाने एका झाडाला जाऊन आदळली !!! भीषण अपघात झाला , पुढे बसलेले अक्षय दूरवर जाऊन फेकले गेले होते , नशिबाने अक्षयला काहीच झाले नव्हते ..

अक्षय जेव्हा जीप जवळ आले तर त्यांनी पाहिलं ...

झाडाला आदळण्यापूर्वी मागे बसलेल्या सलीमने उडी घेतली होती त्यामुळे त्याला थोड खरचटलं होत ,
पवार मागेच बसले होते मात्र त्यांना काहीच झाले नव्हते .

पण तावडे यांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या . कारण झाडाची खोडाच्या बाजूने येणारी एक फांदी जीपची काच तोडून तावडेच्या डाव्या खांद्याच्या आरपार झाली होती , थोरात बऱ्यापैकी वाचले होते , थोरात यांच्यावर जीप ची काच फुटली होती पण सुदैवाने त्याच्या शरीरावर एक जखम सुद्धा झाली नव्हती , !!

वेळ न घालवता अक्षय यांनी इस्पितळात फोन करून रुग्ण वाहिका मागवली . अक्षय व सलीम मिळेल त्या हत्याराने ती फांदी तोडू लागले होते .
तावडे यांचे शरीर फांदीमुळे जीपमध्ये फसले होते !!!

मात्र थोरात ज्या कारणा मूळे अपघात घडला ते कारण शोधत होते . त्यांनी रस्त्यावर पाहिलं तर दूरवर ती स्त्री त्याला दिसली नाही . आता मात्र त्याच्या मनात भीती दाटू लागली होती . व तो ही फावडा घेवून फांदी तोडू लागला होता .

पण पवार तावडे ला वाचवण्यासाठी झाडाची फांदी तोडायला मदत करत नव्हता .

अक्षय त्याच्यावर रागावले " काय रे पवार आम्ही मूर्ख आहोत का ?? इथे आम्ही याचा जीव वाचवायला धडपड करतोय आणि तू तिथे एखाद्या निर्जीव शवा प्रमाणे उभा आहेस "

पवार - " नाही साहेब तुम्ही मूर्ख नाहीत , पण २५ खून केलेल्या या राक्षसाला वाचवायची इच्छा तरी कशी होते तुम्हाला ??? "

अक्षय - " ते कर्तव्य आहे आपले , आणि ते आपण केलंच पाहिजे . पवार तुम्हाला ऑर्डर करतोय मी याला इथून बाहेर काढायला मदत करा !!! "

नाईलाजाने पवार सुद्धा त्याला बाहेर काढण्यासाठी सहकार्य करू लागला ...

अखेर सर्वांना यश आले , तावडे यांचे शरीर जीप मधून बाहेर काढले , फांदी सकट त्याच्या शरीराला रुग्ण वाहिकेतून इस्पितळात दाखल केले ...

३ तास ऑपरेशन चालल्यानंतर डॉक्टर म्हणाले ." तावडे यांना वाचवण्यात यश आले आहे पण त्यांना आय सी यू मद्धे ठेवावं लागेल , ."

अक्षय यांनी चौकितुन गाडी मागवली . थोरात यांना इस्पितळात देखरेख करण्यासाठी ठेवले . व बाकी सर्व चौकीत पुन्हा आले .

पवार यांनी झालेल्या अपघाताचा पंचनामा केला , चौकी मद्धे स्केच आर्टिस्ट आला होता , अक्षय यांनी त्याला काल काढलेल्या स्केच बद्दल विचारलं ...

अक्षय - " काय काढलेले स्केच कुठे आहे आणि कोणाचे काढले होते स्केच तुला काही आठवतं का ?? "

स्केच आर्टिस्ट - " आठवायची काय गरज मी मोबाईल मद्धे फोटो काढला होता त्या स्केच चा !!! "

अक्षय - " काय म्हणतोस !!! दाखव "

फोटो दाखवत असताना स्केच आर्टिस्ट म्हणाला -
" येवढ्या साठी बोलावल होत ??? , कॉल वर विचारलं असत तर व्हॉट्स अॅप केलं असतं साहेब तुम्हाला !!! "

फोटो बघून अक्षयला आश्चर्याचा धक्का बसला , कारण ते स्केच अजून कोणाचे नसून अमरचे होते ...

फोटो बघून स्केच आर्टिस्ट ला विचार त होते , " हे स्केच चव्हाण का काढत होते काही माहिती आहे ?? "

स्केच आर्टिस्ट - " तेवढं काही विचारलं नाही साहेब , आपल जेवढं काम तेवढंच मी केलं ."

अक्षय समोर नवीन प्रश्न होता की चव्हाण यांनी अमरचा स्केच का काढला असेल ??

तेवढ्यात चौकीत साने व कॉन्स्टेबल प्रमोद पाठक तिथे पोहचले . त्यांनी अक्षय यांना सॅल्यूट केले .
अक्षय ने पाहिले की साने यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते , सानेंचा चेहरा खुलला होता .

अक्षय यांनी सानेंना याचे कारण विचारले .
यावर साने म्हणाले " साहेब तुम्हाला जे हवं होत ते मिळालं .... ही त्या दुकानाची व्हिडिओ फुटेज आहे .
यात तो व्यक्ती स्पष्ट दिसतोय ..."

अक्षय देवलकर यांनी ती फुटेज पहिली पण त्या व्यक्तीचा चेहरा नीट दिसत नव्हता कारण त्याचे तोंड दूनकदारा जवळ होते . व जाताना त्या व्यक्तीने कॅमेरा जवळ एक नजर पाहिली एक स्मित हास्य करून बाहेर पडला ... !!!!!

अक्षय देवलकर यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला , त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती . कारण त्या व्हिडिओ मद्धे ग्लास घेताना अमर होता .

अक्षय ने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजत होते . अक्षय वेळ बघत साने यांना म्हणाले .

" साने सकाळी सकाळी अमरला उचला , आज रात्र त्याला त्याच्या बायको जवळ राहू द्या , एक रात्र देवूच शकतो त्याला !!! "

----------- पुढील भाग लवकरच -----------