AGENT - X (4) Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

AGENT - X (4)

४.

एकएका कसायाची आणि सेफची कसून चौकशी होत होती, पण म्हणावं असं महत्त्वाचं काही हाती लागत नव्हतं. त्यांच्याकडील चाकूच काय, पण असणाऱ्या सगळ्या हत्यारांची फॉरेन्सिक कडून तपासणी केली जात होती. डॉग स्कॉडला पण मोठ्या संख्येनं कामाला लावलं होतं. सांगावकरच्या डेडबॉडीची स्मेल कुत्र्यांना देऊन पकडलेल्या लोकांमधून खुनी शोधण्याचा शेवटचा पर्याय हजारे अँड टीमने करून पाहिला, पण असफल ठरले. तरीही हजारे हार मानणाऱ्यातला नव्हता. 'आर्टिकल ४८' च्या अंतर्गत या सगळ्या लोकांना हजारेनं जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं.
पण या सगळ्यांत मिलींद हजारेच्या एक गोष्ट लक्षात आली नव्हती, की खूनी शेफ किंवा कसाईच असावा असा काही नियम नव्हता. एखादी सामान्य व्यक्ती जीला 'चक कट' बद्दल माहिती असेल. तर इन्व्हेटिगेशन भरकवटण्यासाठी त्या व्यक्तीनं असं करण्याची पण शक्यता होती, जी त्यानं लक्षातच घेतली नव्हती.
कारण एखादा सेफ जर खूनी असता, तर त्यानं सगळेच खून त्याच्याकडील चाकूने आणि एकाच पद्धतीने करण्याची शक्यता होती. पण सगळे खून वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले होते...

"या अन्यायाविरुद्ध हजारेंना तुम्ही काहीच बोलला नाहीत?" मी आश्चर्याने मिस्टर वाघला विचारलं.
"कसला अन्याय? बीफ ऍक्ट मला पटतोय अशातला भाग नाही. पण प्रत्येक जीवाला जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका माणसाला. एवढं मी नक्कीच मानतो!" मिस्टर वाघनं मला गप्प केलं.

माझ्यासाठी हा उपहास होता. हे तो व्यक्ती बोलत होता, ज्याला माणसं मारायला खूप मजा येते.
आणि पशु संरक्षण बद्दल बोलायचंच, तर त्यासंदर्भात रीतसर कायदा असून देखील भारत बीफ एक्स्पोर्ट मध्ये बाझील आणि ऑस्ट्रेलिया नंतर टॉपला आहे. आणि हा मिलियन्स ऑफ डॉलर्सचा धंदा आहे. अजूनही...!
असो, मिस्टर वाघ पुढं काय सांगतोय हे ऐकण्यासाठी मी तयार झालो...

मिस्टर वाघ संध्याकाळी ठीक सात वाजता पुष्पक मेस्त्रीच्या घरात होता. वेश एका साधारण व्यक्तीचा. त्यानं मेकअप असा केला होता, की तो पन्नास वर्षावरील एक मुस्लिम म्हातारा वाटावा. सोबत त्यानं काही उच्च दर्जाची हळद त्याला दाखवायला आणली होती.
मेस्त्री मिस्टर वाघला लवकर घालवण्याच्या बेतात होता. म्हणून त्यानं त्याला घरात न घेता लॉन मध्येच बसवलं. त्याच्यासाठी चहा करून आणण्यासाठी पण कोणाला सांगितलं नाही.

(ही गोष्ट खरं तर मिस्टर वाघच्या पथ्यावरच पडली...)

"ती हळद तुम्ही कुठून उत्पन्न केली?" मी अचंब्यानं विचारलं.
"झालास सुरू?" त्यानं वैतागाने विचारलं,
"तू गप्प सगळं आधी ऐकून का घेत नाहीस?"
"सॉरी! पण ज्या - त्यावेळी शंका दूर झालेली बरी!" मी म्हणालो.
"माझी शेती आहे. तिथं हळद देखील पिकवली जाते. औषधांसाठी व कॉस्मेटिक्स बनवणाऱ्या कंपन्यांना आम्ही ती एक्स्पोर्ट करतो."
"मला माहित नव्हतं तुम्ही शेती देखील करता..." मी विचारलं.
"शेती करतो, पण मी नाही. माझी फक्त जमीन असते. राबतो शेतकरीच. सगळं उत्त्पन्न त्यांचंच. मी त्यातला रुपायाही घेत नाही. हळदीचं शेत पण आताच विकत घेतलंय. थँक्स टू मेस्त्री! त्याला भेटण्यासाठी मला ते खरेदी करावं लागलं."
"कसं आणि ते?" मी वैतागत विचारलं.
"आपल्या आजूबाजूला हळद पिकवणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो. त्यांना पर्मनंट बायर मिळवून देण्याच्या आश्वासनावर त्यांच्या शेतजमिनी विकत घेतल्या व त्यांतील बेस्ट क्वॉलिटी हळद घेऊन मी मेस्त्रीकडे पोहोचलो."
"आणि मेस्त्रीची तेवढी हळद घेण्याची तयारी नसेल, तर?" मी शंकीत होऊन विचारलं.
"आय हॅव लॉट्स ऑफ कॉन्टॅक्ट्स सूरज! आणि माझा काय मेस्त्रीला हळद विकण्याचा मेन मोटिव्ह नव्हताच हे विसरू नको. शिवाय त्याला तशी ती विकत घ्यायची इच्छा पण नव्हती. फक्त मेस्त्रीमुळं मला दुसरा एक बिझनेस मिळाला इतकंच. माझी नवी कंपनी व टीम हळदीचा सगळा व्यापार बघते आहे. हळद एक्स्पोर्ट करण्यासोबतच आता आम्ही स्वतः ती प्रोसेस करणार आहोत!"

चला याचा एखादा व्यवसाय तरी कळाला... नवा का असेना! मी मनातल्या मनात म्हणालो.

"तू विषय भरकवटू नको. ऐक!" म्हणत त्यानं प्रोसिड केलं.

"हळदीचा पोत तर चांगला आहे. पण आत्ता डील नाही होऊ शकणार. माझी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट झाली आहे. आता ती रिकव्हरी झाल्याशिवाय मी तुमची हळद नाही घेऊ शकत." सिगरेटचा झुरका सोडत मेस्त्री मिस्टर वाघला म्हणाला.
"मग पर्याय काय..." खोटी नाराजी दाखवत नज़ीम अहमद रुपी मिस्टर वाघनं विचारलं.
"लोणची बनवणारी एक कंपनी माझ्या ओळखीची आहे. मी तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देऊ शकतो, पण चाळीस परसेट माझे असतील." थोडा विचार करून दुसरी सिगरेट पटवत मेस्त्री म्हणाला.
"चाळीस जास्त होत्यात. माझा काय तरी फायदा व्हायला पायजेना साहेब!" मिस्टर वाघ म्हणाला.
"तुमचा माल विकला जातोय. आणि प्रोडक्शन कॉस्ट निघते आहे हा फायदा नाही का? आणि एकदा ओळख झाल्यावर पुढच्या डिलिंगला पुन्हा तुम्ही मला थोडीच विचाराल? तो फायदा तुमचाच नाही का?" धूर सोडत मेस्त्री स्मित करत बोलला.
"तसं नाय साहेब! तुम्हाला हवी त्यावेळी सांगा तुमच्याशी पण व्यवहार करू!" थोडा विचार करून,
"ठीक हाय चालंल!" मिस्टर वाघनं सहमती दर्शवली.
"मी कळवतो तुम्हाला!" मेस्त्रीनं प्रतिक्रिया दिली.
"आताच बघितलंत तर जरा बरं हुईल..." मिस्टर वाघनं विनंती केली.
'काय वैताग आहे?' असा भाव चेहऱ्यावर आणत मेस्त्रीनं त्याच्या ओळखीच्या कंपनीला फोन लावला. आणि नज़ीम रुपी मिस्टर वाघ व त्या कंपनी ओनरची बातचीत घडवून आणली.
"खूप धन्यवाद बघा साहेब." कॉल कट करून मोबाईल मेस्त्रीला परत करत मिस्टर वाघ बोलला.
"ते ठिक आहे, पण माझ्या कमिशनचं विसरू नका म्हणजे झालं!" मेस्त्री तिसरी सिगरेट सुलगावत म्हणाला...
"व्हय व्हय." मिस्टर वाघ कृतज्ञतेचं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला.
"साहेब, आता आपण मित्र झालोत... झालोत ना?"
"हं!" मिस्टर वाघच्या प्रश्नावर मेस्त्री तोंडातील सिगरेट न काढताच हुंकारला. त्या सोबत धूराचा भपकारा बाहेर पडला.
"मग मित्राच्या नात्यानं एक विचारू?"
"हं!" मेस्त्रीनं हुंकारूनचं परवानगी दिली.
"तुम्ही कोणत्या टेंशन मध्ये हाय काय?"
"न... नाही तसं काही नाही!" आता पर्यंत कॉन्फिडन्टली बोलणारा मेस्त्री चपापला.
"नाय आल्यापासून बघतोय तुमी लय सिगारेटी फुकताय. म्हणून आपलं वाटलं..."
"माझी सवय आहे ती?"
"सवय; की गाडी चोरीला गेल्याची चिंता?" मिस्टर वाघनं रोखून पाहत मेस्त्रीवर बॉम्ब फोडला.
"कोण आहेस तू?" मेस्त्रीनं चाचरत पण आवाज चढवून विचारलं.
मेस्त्रीने हा प्रश्न करणं स्वाभाविक होतं.
"घाबरू नका. मी विजय वाघ. पोलिसांसाठी काम करतो. तुमची गाडी, ब्लॅक रेंज रोव्हर काल पोलिसांना सापडली. चोर अमॅच्युअर असावेत बहुदा! कार तर चोरली, पण नंबर प्लेट बदलायला विसरले. पण त्यामुळं तुम्हाला शोधणं सोपं गेलं."
"ती माझी गाडी नाही! माझी गाडी सध्या माझा एक मित्र वापरतोय."
"मला माहिती आहे, ती गाडी तुमच्या एका मित्राने तुम्हाला गिफ्ट दिली आहे. होय ना? पण नाही! ती संदेश चौरसिया या मित्राच्या शोरूम मधून ऑफ द रेकॉर्ड तुम्हीच खरेदी केलीत. आणि त्याला तुम्हाला ही गाडी गिफ्ट स्वरूपात द्यायला तुम्हीच सांगितलंत. टॅक्स वाचवण्यासाठी. त्याचाही फायदा आणि तुमचाही! नाही?! गाडी चोरीला गेली, पण कंप्लेन्ट कशी करणार? केली; आणि आपला दोन नंबर कारभार उघडकीला आला तर? मग काय? म्हणून झंझटच नको, म्हणून तुम्ही गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत केली नाही. एक प्रायव्हेट इन्वेस्टीगेशन फर्म तुमच्या गाडीचा शोध घेतीये सध्या. जीला तुम्हीच कामाला लावलं आहेत."

"त्यानं एका इन्व्हेटिगेशन फार्मला हायर केलंय हे तुम्हाला कसं समजलं?" मी त्याला थांबवत विचारलं.
त्यावर तो हसला. म्हणाला,
"कारण ती माझीच एक फर्म होती!"

बकरा स्वतःहून वाघाच्या तोंडात गेल्याची ही आगळी घटना...

"तुम्ही काय बोलताय मला कळत नाही!" मेस्त्री चिडून मिस्टर वाघला बोलला.
"सोडा! मुद्याचं बोलूया. ही नोटीस!" म्हणत त्यानं पोलिसांची एक प्रत त्याच्या समोर ठेवली. म्हणाला,
"गाडी घेऊन जा. तुम्हाला काही कोणी पकडणार नाही. पण जरा आमचे खिसे गरम करावे लागतील एवढंच!"
"किती?" नजर रोखत मेस्त्रीने विचारलं.
"आता कसं तुम्ही पण मुद्यावर आलात!" मिस्टर वाघ कुटील स्मित करत म्हणाला.
"आकडा!" मेस्त्री आणखीनच मुद्याचं बोलला.
"दहा लाख!"
"हे जास्त होतायत!" तो ठामपणे म्हणाला.
"तुम्हाला गणित समजावतो! तुमची गाडी आहे एक कोटी ब्याऐंशी लाखाची. दहा लाख जर दिले नाहीत, तर एक कोटी ब्याऐंशी जातील. वर इन्कम टॅक्स रेड पडेल ती वेगळीच. त्च्च! स्स्स्स्... सगळंच जाईल! म्हणून दहा लाख ही काही मोठी रक्कम नाही. उलट कमीच आहे. थेंब देऊन समुद्र वाचवाल तुम्ही. आहात कुठे?"
"बरं!" जलफळत नाखुषीने मेस्त्री तयार झाला.
"तेवढी कॅश असेलच घरी!" मिस्टर वाघ हसत म्हणाला.
तसा मिलिंद मेस्त्री उठला आणि आतून पैशाचं एक इन्वेलोप घेऊन आला व त्यानं ते पैसे मिस्टर वाघच्या सुपूर्द केले.
"या कॉपीवर तेवढी सही करा. म्हणजे इन्स्पेक्टरना कळेल आपलं डील झालेलं. आणि तुम्हाला तुमची गाडी मिळून जाईल. हे सगळे मला नाहीत ओ. आम्हा गरिबांना यातून पाच दहा हजारच सुटतात फक्त. बाकी डिपार्टमेंट मधेच वाटून घेतात." मिस्टर वाघ खोट्या नाराजीने म्हणाला.
मेस्त्रीने लगेच सही केली. आणि त्यानं चौथी सिगरेट ओठांत धरली. मिस्टर वाघमुळं मागची सिगरेट जरा लवकरच संपली होती.
"नाईस!" सोफ्यावरून उठत मिस्टर वाघनं त्याच्याकडील लायटरनं मेस्त्रीची सिगरेट सुलगावली. मेस्त्रीचा श्वास-उच्छ्वास रागाने इतका दीर्घ झाला होता, की त्यामुळे नुकतीच पेटवलेली सिगरेट अर्धी संपली देखील होती.
जळलेल्या सिगरेटची राख खाली पडली तसा मिलिंद मेस्त्रीही!
मिस्टर वाघनं त्याच्या समोर सहीसाठी ठेवलेली खोटी प्रत उचलली आणि तो पैसे घेऊन शांतपणे निघून गेला...