एक्स्ट्रामॅरीटल अफेअर - एक कथा Dhanashree Salunke द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक्स्ट्रामॅरीटल अफेअर - एक कथा








सकाळचे सव्वा दहा वाजले होते.सूर्याच्या कोवळ्या किरणांने आय.टी पार्क मधील ती काचेची ती नऊ मजली इमारत उजळून निघाली होती.जिगसॉफ्टचे ऑफिस त्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर होते.पंधरा मिनिटांने मॉर्निंग शिफ्टचे काम सुरु होणार होते .अनिशच्या टीम मधले जवळ-जवळ सगळे आले होते.अनिशने आपल्या कम्प्युटरमध्ये लॉग इन करून ठेवले अनो तो लॉक केला.मग तो कॉफी आणायला कॉफी मशीन पाशी गेला .त्याने कॉफी मशीन वरील लाते समोरचे बटन दाबले.कॉफीचा वाफाळलेला मग घेऊन तो परत निघाला.डाव्या हातात घातलेल्या मनगटी घड्याळात त्याने किती वाजले ते पहिले. ऑनवर्क जायला अजून दहा मिनिटे बाकी होती.तो रम्याच्या बे मध्ये आला ती एकटीच तिथे होती बाकी अख्खी बे मोकळी होती.ती बसते त्या जागी जाऊन तो गेला.ती कम्प्युटर मध्ये लॉग इन करत होती.सफेद फोर्मल शर्ट आणि गुढग्या पर्यंत राखाडी रंगाचा स्कर्ट तिने घातला होता.तो डोक्यापासून पायापर्यंत तिला न्याहाळत होता.सावळ्या रंगाच रेखीव सौंदर्य लाभलेली उंचीपुरी, रम्या सहज कोण्याच्याही डोळ्यात भरेल अशीच होती.

“गुड मॉर्निंग ” त्याने तिला विश केले.

“गुड मॉर्निंग अनिश” त्याच्या आवाज ऐकून तिने तिची खुर्ची अर्धगोलाकारत मागे वळवली.

“आज काल तुझा चेहरा बघितल्या शिवाय माझा दिवसच सुरु होत नाही ” कॉफीचा एक-एक घोट घेत

तो नेहमी प्रमाणे फ्लर्ट करू लागला.

“हो का ... ”ती हसत म्हणाली, त्याच तसं फ्लर्ट करणं तिला आवडत होत. बोलताना बऱ्याचदा ती त्याच्या फोर्मल शर्ट मधून आकार घेणाऱ्या मसल्स कडे पहात होती.पिळदार शरीरयष्टी असलेला तिशीतला अनिश दिसायला रुबाबदार होता.

“दुपारी लंच सोबत करूयात ” बे मध्ये कोणी नसल्याने बोलता-बोलता तो तिच्या जवळ जात होता .

“हो चालेल एक वाजता मला पिंग कर मी कॅफेटेरियामध्ये येते ”

“बाहेर जाऊयात ग ते कॅफेतेरीयातल बोरिंग जेवण खाऊन चव गेली तोंडाची”

“ठीक आहे चालेल ”

“आणि थोडा वेळ काढून ये एका तासात नाही होणार जाऊन येण ” त्याने त्याचा हात तिच्या खुर्चीवर जिथे डोके टेकवतात तिथे ठेवला.त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या मानेला होत होता आणि तिला त्यात काहीच गैर वाटत न्हवतं.

“शुअर ” ती म्हणाली . दोघांना एकमेकांच्या शरीराची धग लागतं होती. दोघे एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाहू लागले.मग बेमध्ये कोणीतरी येण्याची चाहूल लागल्याने तो पटकन तिच्यापासून दूर झाला.

“चल मग लंचला भेटूयात... बाय ” तो बोलला आणि तिथून निघाला .त्याचा तसा पळकुटेपणा पाहून तिला हसू आले .

अनिश स्वताच्या बेमध्ये गेला आणि जागेवर जाऊन बसला. दुपारी रम्याने बाहेर येण्यास संमती दिल्याने त्याला हुरूप आला होता.

रम्याला हि कंपनी जॉईन करून एक महिना झाला होता.कंपनीत जवळ-जवळ पाचशे लोक काम करत होते. अनिश आणि रम्या वेग-वेगळ्या टीम मध्ये होते .पहिल्यांदा जेव्हा तिने अनिशला पहिले तेव्हा त्याच्या पिळदार शरीरयष्टी आणि खिलाडु वृत्तीमुळे तो तिच्या चांगलाच लक्षात राहिला होता.नंतर जेव्हा-जेव्हा तिला त्याला पहात असे तेव्हा तो देखील तिच्याकडे पाहतोय आहे हे तिलाजाणवले.एकदा कंपनीची पार्टी होती तेव्हा ते दोघे पहिल्यांदा एकमेकांशी बोलले आणि पहिल्या भेटीतच नंबर देखील एक्सचेंज केले.आपली ओळख करून देताना रम्याने

“आय एम मिस्सेस रम्या पाटील ” अशी करून दिली तेव्हा अनिशचा चेहरा थोडा पडला. तो स्वतः विवाहित असून देखील ज्या मुलीकडे तो आकर्षित झाला आहे ती अविवाहित हवी होती अशी त्याची मतलबी अपेक्षा होती.दोघे विवाहित आहे हे एकमेकांना कळाले असूनसुद्धा दोघे हळू-हळू जवळ येऊ लागले.रम्याचे लग्न होऊन दोन वर्ष झाले होते.त्यांचे अरेंग मॅरेज झाले होते.तिचा नवरा पराग साधासा पण सधन होता.त्याचे बाथरूम हार्डवेअरचे शोरूम होते.हे लग्न होण्याआधी रम्याचा तिच्या बॉयफ्रेंड विराज सोबत साखरपुडा झाला होता .वयक्तिक मतभेदांमुळे तिने तो साखरपुडा मोडला होता.मग आई-वडिलांनी तिचे एक ऐकले नाही आणि पराग पाटीलशी तिचे लग्न ठरवून टाकले.या लग्नानंतर ती नाखूष होती.एकतर मर्जी विरुद्ध लग्न झाले होते आणि तिने कधी परागला समजावून घेण्याचा प्रयत्नच केला नाही.तिच्या मते तो एक बोरिंग व्यावसायिक होता. त्याला आयुष्य कसं जगायचं हे ठाऊक न्हवतं .दोन वर्ष तसेच गेले. आणि मग तिच्या आयुष्यात अनिश आला.सुरवातीला तिला त्याचे फक्त शारीरिक आकर्षण झाले होते. पण त्याच्या खिलाडू वृत्ती आणि काळजी घेण्याचा स्वभाव यामुळे ती त्याच्याकडे आणखीनच ओढली जाऊ लागली.तिला त्याची सोबत हवीहवीशी वाटू लागली.दोघे एकमेकांमध्ये गुंतत गेले.

अनिशचे आई वडील ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांनी अनिशचे लग्न जबरदस्तीने बाविसाव्या वर्षीच लावले होते.त्याचे लग्न होऊन आता आठवर्ष झाले होते. त्याला सहावर्षाचा मुलगा देखील होता.कॉलेजसाठी शहरात आलेल्या अनिशला इथल्याच जीवनशैलीची सवय झाली होती. कॉलेजमध्ये असताना तो शहरातीलच एका मुलीच्या , भार्गवीच्या रिलेशन मध्ये होता.तिच्यासोबत त्याला लग्न करता आले नाही .त्याला तिच्यासारखच जोडीदार हवा होता.शहरी जीवनशैली असलेला.त्यामुळे अतिशय समजूतदार आणि मनमिळाउ असलेल्या राधाशी लग्न करून सुद्धावैचारिक फरकांमुळे त्याला आयुष्यात काहीतरी कमी वाटत होते. भार्गवीच्या सोबत त्याने जसे आयुष्य प्लान केले होते तसे त्याला जगता येत न्हवते.जसे त्याने भरकटलेले मन , सुंदर कमनीय रम्यावर स्थिरावले.भटकणाऱ्या भवऱ्याला जणु हवे असलेले फूल मिळाले.ती दिसायला तर सुंदर होतीच पण तिचा स्वभाव पण लाघवी होता. आधी फक्त शारीरिक आकर्षण होते नंतर मात्र भावनिक गुंता पण वाढत गेला.दोघेही आपआपल्या पार्टनर्सच्या नकळत रात्री बे रात्री फोन वर बोलू लागले चॅटिंग करू लागले.आज लंच करायला बाहेर गेल्यावर गोष्टी आणखीन पुढे जाणार होत्या.

बरोबर एक वाजता ठरल्या प्रमाणे दोघे लंच साठी बाहेर पडले.

“आपण कुठे चाललोय ” रम्याने कार मध्ये बसताच अनिशला विचारले.

“कळेल तुला आणि किती वाजेपर्यंत ऑफिस मध्ये परत जायचय ” त्याने विचारले.

“पाच ” तिने हाताची पाच बोटे दाखवत त्याला खुश होऊन सांगितले.

“ओह हो क्या बात है ” आपल्याकडे बराच वेळ आहे हे कळल्यावर अनिश पण खुश झाला.

कुठलं तरी महत्वाच काम करायचं आहे अशी थाप मारून रम्या ऑफिस मधून वेळ काढून आली होती.अर्धा तासात त्याची कार , समुद्रकिनाऱ्या लगतच्या अतिशय उंची अशा फूड अँड फिस्त हॉटेल जवळ थांबली.

अनिशने कार पार्क केली आणि गाडीतून उतरला. बाहेर जाऊन रम्याच्या इथला दरवाजा खोलला. ती कार मधून बाहेर आली.

“ओह माय गोड धिस इस माय फेवरेट रेस्टोरेंट ” रम्या बोलली.

“म्हणजे तू इथे येऊन गेली आहेस ” अनिशच्या सरप्राइस मधली हवा निघून गेल्याने तो थोडा नाराज झाला.

“हो बऱ्याचदा आलीये पराग सोबत, त्याला पण आवडते हि जागा ”

“काय यार शी माझं पचका झाला ”पराग थोडा नाराज होऊन बोलला.

“बट विथ यु इट्स डिफरेंट” रम्या त्याला बोलली. त्याने तो खुश झाला. दोघे आत जाऊ लागले.हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर काचेच्या भिंतींचे सी व्यू रेस्टोरेंट होते. दुसऱ्या मजल्यावर बंदिस्त कॅण्डल लाईट डिनर तर बाकीचे पाच मजले राहण्यासाठी होते. अनिशने दुसऱ्या मजल्यावरच टेबल आधीच बुक केला होता.दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोघे लिफ्ट मध्ये गेले.लिफ्ट मधून बाहेर येताच एका गुलाबी साडी घातलेल्या सुंदर महिला स्टाफने त्यांना अटेंड केले.

“वेलकम सर ” ती स्मित हास्य करत बोलली .

“हेलो आय एम मिस्टर अनिश ”

“ प्लीस फोलो मी ” असे म्हणत ती त्यांना त्यांच्या टेबल जवळ घेऊन जाऊ लागली.तिच्या जवळ येणाऱ्यांची माहिती असावी.

आत अतिशय शांत वातावरण होते. भरदिवसा अंधार होता.मेणबत्ती आणि अतिशय डीम दिव्यांचा प्रकाश पडला होता.त्या अंधुक प्रकाशात सुद्धा हॉटेलचा दिमाख दिसत होता.अतिशय उत्तम असे फर्निचर होते , सर्वत्र महागडा गालीचा अंथरला होता , छताला काचेचे किमती झुंबर लटकले होते. थ्री पीस आणि बो घातलेल्या टापटीप वेटर्सचा वावर होता.प्रत्येक टेबलाभोवती तीन बाजूला पाच फुट कंपार्टमेन्ट केले होते. त्यामुळे कोणाचा कोणाला डिस्टर्बन्स न्हवता. अनिश आणि रम्या टेबल भोवती समोरासमोर बसले.

“हि इस मिस्टर राहुल हि विल असिस्ट यु फर्दर, एन्जोय युर मिल सर एन्जोय युर मिल मॅम ” असे म्हणत गोड हसून गुलाबी साडीवाली निघून गेली. राहुल त्यांची ओर्डर घ्यायला थांबला.

“वी वूड लाईक टू ह्याव अ बृशेटा ,मशरूम रीसोटो अँड पेन्नी पास्ता ,आणि आणखी काही घेणार तू गं ”

“नको तेवढच बास”ती म्हणाली तो वेटर कडे वळला.

“थीक आहे दॅट्स ऑल प्लीस गेट इस ” ओर्डर घेतल्यावर वेटर निघून गेला.

“अरे फक्त खानाच का नो पिना ” तिने त्याला हाताचा अंगठा ओठाकडे खुणावत विचारले.

“पिना पण आहे ग पण त्याच एक सरप्राईस आहे बी पेशीअअ पेन्नी पास्ता ” तो रम्याला बोलला

वेटर निघून गेल्याने आता तिथे फक्त दोघेच होते.त्या एकांतात दोघे एकमेकांन कडे पाहू लागले.

“मी दुसऱ्या मजल्यावर कधीच नाही आले ,परागला लाटांचा आवाज खूप आवडतो म्हणून आम्ही नेहमी खालीच बसतो, पण वर मला जास्त आवडलं ”

“अच्छा”

“ तुला माहितीये मी एकदा राधाला घेऊन इथे आलो होतो मेनूकार्ड पाहून ती खूप नाराज झाली मला म्हणाली दोन हजार रुपयाला कुठे भाजी असती का ... तिने पार पचका केलता प्लान चा ”

“चिल रे , तिला सवय नसेल पण शिकेल हळू हळू”

“आय डोन्ट थिंक सो आता सहा वर्ष झालीकी म्हणूनच मी तिला बाहेर नेतच नाही सहसा ”

मग बोलता बोलता त्याने , टेबलावरील फुलदाणीतील गुलाब काढला आणि रम्या समोर धरला.

“रोज फोर अ ब्युटीफुल लेडी ”

“थँक यु ” तिने उजवा हात पुढे करून त्याचा हातातल्या गुलाबाचा दांडा धरला, तितक्यात त्याने त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवाला आणि मग गुलाब खाली ठेवत दोन्ही हातात तिचा हात धरून ठेवला. त्याच्या अशा वागण्याने तिने त्याचाकडे रोखलेली नजर लाजून टेबलाकडे वळवली.

“तुझा सोबत खूप वेगळं वाटत मला ,ऑफिस मधून घरी गेलो तरी डोक्यात तुझाच विचार असतो , एका महिन्यात किती जवळ आलो ना आपण ” बोलता-बोलता अनिश त्याच्या हाताची बोटे तिच्या हातावर हळुवार फिरवू लागला.

तिला तो स्पर्श सुखावणाऱ्या वाऱ्याच्या हळुवार झुळूके प्रमाणे वाटला. पहिल्यांदाच त्यांना इतका एकांत भेटला होता.एका महिन्या पूर्वी पासूनच सगळं तिला आठवू लागलं.ती इथवर तर आली होती पण आता तिला आतून काही तरी चुकल्या-चुकल्या सारखं तिला वाटू लागलं.

“अनिश मी अजून कन्फ्युज आहे ..”ती बोलली .दोघांमध्ये कुठल नात रूप घेऊ पहात होत आता हे दोघांपासून लपून न्हवत.

“का ” त्याने टेबल जवळ मान झुकवली आणि तिच्या हातावर कीस केले. त्याच्या त्या कृतीने ती शहारली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तिला हे सगळं हवंहवस वाटत होतं पण आतून अपराधी असल्यासारखं वाटत होतं.हवं आणि नाकोच्या कात्रीत ती सापडली होती. दोघे पाच मिनिटे तशेच एकमेकांकडे पाहत होते. त्यांना आजू-बाजूचा विसर पडला.ते एकमेकात हरवून गेले.ती शांतता चिरत अचानक रम्याचा फोन खनखानला.ती भानावर आली तिने तिचा हात अनिशच्या हातातून सोडवला आणि टेबलवरील फोन उचलला. फोन परागचा होता

“’बोलना पराग ”

“हो जेवले, तू जेवलास ? ”

“ऑफिस मध्येच आहे ”

“चालेल सुटल्यावर कॉल करते ”

“ लव्ह यु टू बाय ” असे म्हणत तिने फोन ठेवला.ह्या क्षणाला तिच्या परागशी गोड बोलण्याने अनिशला राग आला

“फार प्रेम उतू चालेलं फोनवर ” फोन ठेवताच तो रागाने बोलला.

“अनिश.... पराग नवरा आहे माझा ”रम्यापण रागावली.

“हो का ” असे म्हणत तो जागेवरून उठला आणि रम्याच्या बाजूला येऊन अगदी जवळ बसला .त्याने त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्याच्या समोर धरला.

“आणि मग मी कोण आहे ” असे म्हणत त्याने त्याचा हात तिच्या माने भोवती धरला आणि त्वेषाने तिला आणखी जवळ ओढले आणि तिच्या ओठावर ओठ टेकवले , त्याच्या पिळदार शरीराशी एवढी जवळीक पहिल्यांदा झाली होती ती क्षणात विरघळली ते पुन्हा हरवून गेले.काही वेळ फक्त त्यांचे ओठच बोलत होते. काही तरी पडल्याचा आवाज आला आणि ते भानावर आले . रम्याने त्याला तिच्यापासून दूर ढकलले . तो पुन्हा समोर जाऊन बसला.तितक्यात वेटर आला. रम्याची नजर कावरी बावरी झाली होती. ती वेटरला कसं कसं वाढायचं ते बावचळत सांगत होती. अनिश तिच्याकडे एकटक पाहत होता. तिने त्याच्याकडे पहिले तेव्हा त्याने मुद्दाम त्याचे ओठ पुसले.

जेवताना दोघे जास्त बोलले नाही.पाउन तासात त्याचं खाऊन झालं.वेटर आला.

“बिल प्लीस ” रम्या वेटरला बोलावत म्हणाली.वेटरने अनिशकडे पहिले.अनिशने त्याला मानेने जाण्यास खुणावले.वेटर निघून गेला.

“अगं अजून ड्रिंक्स बाकी आहेत ”अनिश बोलला.

“मला नको आपण जाऊया ”

“रागावलीस का ”

“नाही रे पण जाऊयात उशीर होईल ”

“तू बोललीस ना पाचला जायचं ते बघ अजून अडीच तास बाकी आहेत ”

“पण मला कसतरी होतंय ”

“प्लिस ” तो केविलवाणा चेहरा करून तिला थांबण्यास विनवू लागला.

“ठीक आहे कर ओर्डर पटकन ”रम्या थोडावेळ अजून थांबण्यास राजी झाली .

“इथे नाही ग मी म्हणालो होतो ना सरप्राईस आहे ते ”

“ह्म्म ”

मग ते दोघे तेथून उठले. तो तिला घेऊन लिफ्ट पाशी गेला.एक थ्री पीस घातलेला स्टाफ त्यांना घेऊन शेवटच्या मजल्यावर गेला. त्याने रूम नंबर ६०१ चे लॅच चावीने खोलले आणि दरवाजा उघडला .रम्या दरवाज्यातूनच आत पाहू लागली . पांढऱ्या शुभ्र भिंतींची , सुशोभित केलेली खोली अतिशय सुंदर होती. मुख्य म्हणजे खोलीची जी बाजू समुद्राकडे होती तिथे भिंती ऐवजी काच होती त्यामुळे समुद्राचे अत्यंत रम्य दृश्य दिसत होते.काचे वर मोठे-मोठे पडदे होते जे बांधून ठेवले होते. आत एक टेबलवर होता ज्यावर एका भांड्यात बर्फ आणि त्यात वाईनची बाटली होती. शेजारी ताज्या स्ट्रॉबेरीसने भरलेला काचेचा कुंडा होता आणि कडेला दोन काचेचे जाम ग्लास होते

“आय विल सर्व माय सेल्फ यु मे गो ” असे म्हणत अनिशने वेटरला दोनशे रुपये टीप दिली तो निघून गेला.

अनिश रुमच्या आत गेला.पण रम्या तिथेच थांबली.रूमचा तो दरवाजा तिला लक्ष्मणरेषे प्रमाणे वाटू लागला.

ती रेषा पार करणे म्हणजे शील सोडणे होते, धोका देणे होते.का कोण जाने तिला अचानक परागचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला.

“आत येतेस ना ” ती विचारात हरवलेली असताना अनिश तिला बोलला.

“पण ...” रम्या अजून द्विधा मनस्थीतीत होती.

अनिश दरवाज्यात गुढग्यावर बसला आणि त्याने त्याचा हात तिच्या समोर धरला.

“मे आय हॅव अ प्लेजर टू हॅव अ ड्रिंक विथ मोस्ट ब्युटीफुल लेडी आय हॅव एवर मेट इन माय लाईफ ”

तो अतिशय निरागस चेहरा करून तिला विचारू लागला.ती स्वताला रोखू शकली नाही. तिने तिचा हात त्याच्या हातात दिला.तो उठून उभा राहिला.तिने तिचे पाउलं रूमच्या आत टाकले. तिने शेवटी उंबरठा ओलांडला.रूमच दार लावलं गेलं.

आत येताच ती खोली न्याहाळू लागली.काटकोनी आकारात मांडले होते महागडा बेड आणि सोफा रूमची शोभा वाढवत होते. सुंदर पेंटिंग्स आणि वॉल हँगिंगने भिंती सजवल्या होत्या. आणि सगळ्यात आकर्षक म्हणजे समुद्राच नयन रम्य दृश्य.

अनिशने टेबल भोवतालची खुर्ची ओढली आणि रम्या त्यावर बसली तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला.

बर्फाने भरलेल्या भांड्यात ठेवलेली वाईनची थंडगार पडलेली बाटली त्याने टेबल वरील नॅपकिनमध्ये गुंडाळून उजव्या हातात धरली.अनिशने देऊन ठेवलेली सूचनेप्रमाणे वेटरने आधीच बाटलीचे बुच ढिले करून ठेवले होते.त्याने दोघांच्या ग्लासात थोडी-थोडी वाईन ओतली. पारदर्शी लाल वाईनने भरलेला जाम ग्लासचा दांडा धरत रम्याने तो ग्लास तिच्या डोळ्यासमोर धरला.मग ग्लास गोलाकार फिरवला.त्यातली वाईन ढवळली गेली.तिने ग्लास नाकापाशी धरून वाईनचा गंध घेतला.आणि मग वाईन रीचवू लागली.अनिश हातात ग्लास धरून तिच्याकडे पहात होता.

“मघाससाठी आय एम सॉरी पण तू कोणाच्याही जवळ गेलीसना की खूप त्रास होतो मला मग तो तुझा नवरा असला तरी”वाईनचा एक घोट घेत तो बोलला.

“व्हाट डू यु मिन ... तू असं कसं बोलू शकतोस , स्वतः आपल्या बायकोशी आदर्श नवऱ्या सारखा वागतोस ना आणि मी माझ्या नवऱ्याशी तुसड्या सारखं वागू असं वाटतं का तुला” रम्या वाईनचे घोटवर घोट घेत होती.

“तू त्याच्याशी वाईट वाग असं न्हवतं म्हणायचं मला”

“प्रतिक्रिया तर तशीच काहीशी वाटली ”

“रम्या मला जे आतून वाटलं ते तुला सांगितलं, हा पसेसिवनेस , तुझी ओढ कदाचित ह्यालाच प्रेम म्हणतात आय लव्ह यु रम्या आय लव्ह यु आणि तू .......” अनिशने शेवटी पोटातली गोष्ट ओठावर आणली.रम्या त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली.तो तिच्या उत्तराची प्रतीक्षा पाहत होता ती काहीच बोलत न्हवती.तिच्या चेहऱ्यावर तणाव सहज दिसत होता.स्ट्रॉबेरीच्या एका-एका घासासोबत म्हणता-म्हणता तिने तीन ग्लास वाईन संपवली.तिसऱ्यांदा मोकळा झालेला ग्लास भरण्यासाठी तिने वाईनची बाटली उचलली.पण अनिशने तिला अडवले.तो जागेवरून उठला आणि तिच्या खुर्ची जवळ आला.

“मी काहीतरी विचारले तुला आत्ता ” त्याने दोन्ही हात टेबलावर ठेऊन तिच्या चेहऱ्या समोर त्याचा चेहरा धरून विचारले.ती जागेवरून उठली.तिने तिच्या बॅगेतले सिगारेटचे पाकीट काढले ,तिचे हात थरथरत होते. लाईटरने सिगारेट पेटवून ती काचेच्या भिंती जवळ गेली.बांधलेलेल केस मोकळे सोडले. एक हात काचेवर ठेवला .दुसऱ्या हातात सिगारेट धरून ती समुद्राकडे पाहत सिगरेटचा झुरका घेत होती,धूर सोडत ताण कमी करायचा प्रयत्न करत होती..पण निशब्दच होती .पाठमोऱ्या तिला तो काहीवेळ तसाच पाहत राहिला.मग तिची ती शांतता त्याला असह्य झाली.तो तिच्या जवळ गेला.त्याने तिचा खांदा धरून तिला स्वताकडे वळवले.ती काचेला पाठ लाऊन उभी राहिली. त्याने तिच्या हातातील सिगारेट काढून फेकून दिली.

“मी एकटाच वेड्या सारखं बडबडतोय का इथे” त्याने दोन्ही हाताने तिचे खांदे हलवत रागाने विचारले.

“आय लव्ह यु टू अनिश..... पण आपण चुकतोय आपण आपल्या पार्टनर्सला धोका देतोय ”तिने त्याचे खांद्यावरचे हात झटकले. आणि दूर जाण्यासाठी ती उजव्या बाजूला सरकली अनिशने उजव्या हाताने तिला अडवले.ती डाव्याबाजूला जाऊ लागली त्याने डाव्या बाजूला हात लाऊन अडवले.दोन्ही हाताच्या मध्ये जणु त्याने तिला कैद केले होते आणि प्रश्नांची उत्तरे भेटल्याशिवाय तिची त्यातून सुटका न्हवती.

“धोका आणि त्या लोकांना जे कधीच आपल्याला सुखी ठेऊ शकत नाही”अनिशने वैतागून तिला म्हणाला.

“कसेही असले तरी आपलं लग्न झालाय त्यांच्या सोबत , मी हे नाही करू शकत मला वाटत मी इथे न्हवत यायला पाहिजे ” ती त्याच्या कचाट्यातून सुटायचा प्रयत्न करत होती. पण तो आणखीन जवळ येऊ लागला आणि तिचा जोर कमजोर पडू लागला.त्याने तिला घट्ट मिठी मारली. रात्र अन दिवस ज्याचा विचार डोक्यात असतो आणि ज्याच्या भारदार शरीराची भुरळ पडली आहे, ज्याच्या मध्ये एवढे मन गुंतलेआहे त्याच्या मिठीत आता ती आली होती. ती बोलत असलेल्या गोष्टी तिला पाळणे आता अशक्य झाले.आगी जवळ लोणी वितळलं होतं. तिचे सर्वांग शहारले आणि झटापट करणारे तिचे हात शांत झाले आणि तिनेपण त्याला मिठी मारली.शब्दांच्या विचारलेल्या प्रश्नाचे अनिशला तिच्या वाढलेल्या श्वासाने उत्तर मिळाले. त्याने काचे वरचे पडदे सोडले.शाररीक आकर्षणा पुढे नैतिकता शरण गेली.पण त्यांच्यासाठी तेच प्रेम होते.

रात्री जेवताना जेवणाच्या मेजवर रम्या गप्पच होती.

“काय गं ऑफिस मध्ये काही झालं का आज गप्प वाटतेस खूप”पराठ्याचा एक घास खात पराग बोलला.

“नाही रे जरा डोकं दुखतंय ”बऱ्याच वेळ विचारात हरवेली आणि चमच्याने ताटातील भाताशी खेळत बसलेली ती परागच्या बोलण्याने भानावर आली.मन अपराधीपणाच्या भावनेने हरवलं होतं का अनिशच्या आठवणीने ते तिलाच कळत न्हवतं.

“पोटभर जेवतरी आधी मग बरे वाटेल ,ताटात भात तसाच आहे ” पराग बोलला आणि ती पटापट चमच्याने भात खाऊ लागली.पाच मिनिटांनंतर तिचा फोन व्हायब्रेट होऊ लागला.अनिशचाच फोन होता.तिने फोन कट करून ऑफ केला.पुढच्या पाच मिनिटात ताटातला सगळा भात संपवला आणि लगबगीने पानावरून उठली.

“आय नीड अ फ्रेश एअर , मी टेरेस वर जाते ”असे बोलत ती परागच्या उत्तराची वाट न पाहता टेरेसवर जाण्यासाठी निघाली .

“विमला साहेबांच झालं की फ्रीज मध्ये ठेव जेवण ” जाता-जाता तिने विमलाला सुचना दिली. ती हॉलमध्ये आली.त्याचं घर दुमजली रोहाउस होतं.त्याच्या टेरेसवर जायला हॉल मधून जिना होता.वर जाताच तिने टेरेसची आतून कडी लावली आणि फोन चालू केला.मिसकॉल अलर्टचा मेसेज आला होता अनिशचे बारा मिसकॉल होते.तीने पटकन त्याला फोन केला.रिंग वाजली, अनिशने फोन उचलला.

“हेलो सॉरी अनु अरे पराग होता समोर ”

“एक मिनिट फोन उचलून परत कॉल करते असे सांगू शकली असतीस तू , कमीत कमी एक मेसेज तरी टाकायचा ”

“तो समोरच होता आणि आधीच तो मला काही झालंय का असं विचारात होता आणि त्याच्या समोर मेसेज लिहित बसू का ”

“नाही नकोच लिहूस मला तुझ्या फोनची वाट पहावी लागली तरी चालेल ”

“भांडायचच आहे का पूर्ण वेळ ”

“आय मिस्ड यु , वेड्या सारखी वाट पाहत होतो तुझ्या फोनची म्हणून चिडचिड झाली सॉरी ”

“ठीक आहे जाऊदे जेवलास का ”

“हो तू ”

“जेवणच गेल नाही आज काय माहीत का ”

“रम्या आपण काही चुकीच करत नाही आहोत , आपलं एकमेकांवर प्रेम आहे ”

“पण आपण सीमा ओलांडायला नको होती ”

“प्रेम म्हणजे या सगळ्या गोष्टी आल्याच ”

“या नात्याला जग काय म्हणत माहितीये ना ”

“तुला सगळा वेळ असाच घालवायचं का ,राधाला सांगून आलोय सिगारेट ओढायला चाललोय तिचा फोन येईलच इतक्यात ”

“ओके सॉरी नको तो विषय पण तू इतके फोन का करत होतास काही महत्वाच सांगायचं होतं का ”

“हो महत्वाचच होतं एक खुश खबर आहे ”

“अरे वाह काय रे ”

“अग तुला माझा मुंबईचाचा कॉलेज ग्रुप माहितीयेना त्यांच्या पैकी चार कपल्स पुढच्या महिन्यात मोरीशिअसला जायचा प्लान करतायत सात दिवसांसाठी आणि तू पण येतीये सोबत , राहवलं नाही म्हणून लगेच सांगायला फोन केला ”

“वेडा आहेस का तू , तुझ्या ग्रुप मधले सगळे राधाला चांगलेच ओळखतात आणि कोणत्या नात्याने नेणार आहेस तू मला त्यापेक्षा राधाला घेऊन जा ”

“ती बोअरका त्याच्यापेक्षा मीच नाही जात ”

“अनिश तूच विचार कर आपण कसे वावरणार आहोत त्यांच्या समोर मित्र म्हणून का कलीग्स म्हणून आणि या गोष्टी लपून नाही राहत ”

“तू काय मला सांगती तो सौरभ स्वता त्याच्या बायको सोबत न येत गर्लफ्रेंड सोबत येणार आहे , राहता राहिला प्रश्न वेदांत , शिवांगी आणि राघवचा मी त्यांना आधीच तुझ्याविषयी सांगितलाय ते त्यांच्या पार्टनरशी बोलतील आणि आपल्याला काहि वेगळं वाटणार नाही त्यांच्यात विश्वास ठेव ”

“अनिश तू मूर्ख आहेस का, तू माझ्या विषयी असं गावभर कसं बोलू शकतोस काय विचार करतील ते माझा विषयी ”

“कोणी काहीच बोललं नाही बरका फक्त शिवांगी तेवढी फुकटचा सल्ला देत होती पण गप केलं तिला पण ”

“मला वेळ दे मी सांगते ”

“ठीक आहे वेळ घे पण सांग ”

“ठीक आहे ”

“चल ठेवतो आय लव्ह यु ”

“आय लव्ह यु टू ”

“बाय ”

रम्या टेरेस वरून खाली आली .तिने पाहिलं पराग हॉल मध्ये सोफ्यावर बसून ड्रिंक्स घेत होता.

“बर वाटतय का आता ” रम्याला पाहतच त्याने विचारले. त्याला नशा चढली होती हे सहज दिसत होते.

“हो बरी आहे तू पि ” असे बोलत ती विनाकारण चिडून बेडरूम मध्ये गेली आणि बेडवर आडवी झाली.

दहा पंधरा मिनिटांनने अनिशचा पिंग आला तिने मेसेज उघडला आणि चॅट करू लागली

अनिश : ‘झोपलीस ’

रम्या : ‘नाहीरे अजून आता झोपेल ’

अनिश : ‘लवकर झोप ’

रम्या : ‘hmm ’

अनिश : ‘आजचा दिवस माझा आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता एका सुंदर मुली सोबतचा ’

रम्या : ‘फिल्मी नको मारुस हा आता ’

अनिश : ‘काय फिल्मी त्यात आय रियली मीन इट ’

अनिश : ‘आणि आज तर तू अजूनच सुंदर दिसत होतीस ’

अनिश : ‘आय लव्ह यु रम्या मी नाही राहू शकणार तुझ्या शिवाय’

रम्या : ‘आय लव्ह यु टू पण पुढे काय अनिश ’

अनिश :‘पुढचं पुढ बघू तू प्लानच मला सांग मला ’

रम्या बोलत असताना पराग दार उघडून आत येऊ लागला तो पूर्ण नशेत होता.

“रम्या तू जेवली नाहीस ना, सगळा स्वयपाक तसाच पडलाय, तू बोलतपण नाही माझाशी आज , कट्टी घेतलीस का माझाशी ” तो झोकांड्या देत रम्याकडे येऊ लागला ती बेड वरून उठली.

“पराग तुला कितीदा सांगितलाय पिलास की बेडरूम मध्ये येत जाऊ नकोस म्हणून ” ती त्याचा हात धरून त्याला बेडरूम बाहेर काढू लागली

“मी पिलो नाहीये आई शप्पत ” तो जागचा हलायला तैय्यार न्हवता.

“पराग बाहेर जा प्लीस ”असे म्हणत सर्व ताकद लाऊन तिने परागला रूम बाहेर काढले आणि आतून कडी लाऊन घेतली.

दारू पिल्यावर परागला कसलेच भान राहत नसे आणि त्याची बडबड ऐकायची रम्याची आजतरी तयारी न्हवती

तिने पुन्हा फोन हातात घेतलं आणि मेसेज वाचू लागली.

अनिश : ‘हेलो ’

अनिश : ‘कुठे हरवलीस ’

अनिश : ‘झोपलीस का ’

रम्या : ‘नाही रे अरे पराग आला होता चढलीये त्याला खूप, मी म्हणलं आज बाहेरच झोप मग ’

अनिश : ‘आय विश तो रोज प्यावा आणि तू त्याला असाच रोज बाहेर काढाव ’

रम्या : ‘हो का मग तू आणि राधा पण रोज वेगळेच झोपत जा ’

अनिश : ‘लगेच चिडतेस ,राग तर नाकावर आहे ’

रम्या : ‘ तुला नाही कळणार मी कुठल्या फेस मधून चालली आहे’

रम्या : ‘मी ती मुलगी नाही जिला नवऱ्याला काहीच नाही कळाल यातूनच समाधान मिळेल.त्याच्यापासून सगळं लपून असलं तरी मला आतून खूप अपराधी असल्या सारखं वाटतय , आजपर्यंत मी कोणाला फसवलंत नाही आणि आता माझ्या नवऱ्याला फसवतीये , शिवाय तुला एक बायको एक मुलगा आहे त्यांच सुख हिरवून घेयचा मला काय हक्क आहे, मी इतकी स्वार्थी झालीये का , हे सगळे विचार छळतायत मला शिवाय हे सगळं मला आधी माहीत असून सुद्धा मी पुढे पाउलं टाकत गेले तुझ्या प्रेमापोटी,किती स्वार्थी झाले मी L L L ‘

अनिश : ‘रम्या आपल्यालापण खुश राहायचा अधिकार आहे , हो राधा माझी बायको आहे आणि पराग तुझा नवरा. पण हि अशी लोक आहेत ज्यांच्या सोबत आपण कधीच खुश नाही राहू शकत , तुला मी एक गोष्ट सांगितली नाही , माझं लग्न ठरलं तेव्हा मी राधाला कॉल करून सांगितलं होतं की या लग्नाला नकार दे कारण मी स्वतः आईवडिलांना नाही म्हणू शकत न्हवतो पण तिने नाही दिला नकार आणि आमचं लग्न झालं.तिने केला का तेव्हा विचार माझा ? जेव्हा तुझं लग्न ठरलं तुला परागने विचारलं का की तू या लग्नाला तैय्यार आहेस का ते ? नसेलच विचारलं , या दोन महिन्यात तुझ्या सोबत मला जे सुख आणि समाधान मिळालं आहे ते गेल्या आठ वर्षात कधीच मिळालं नाही आणि हे सुख मला आयुष्यभर हवं आहे, तुझ्यात मी एक कंपॅनिअन पहातो एक लाईफ पार्टनर पाहतो ’

रम्या : ‘सगळं खरं आहे पण असं किती दिवस चालणार’

रम्या : ‘तू मला आधी का नाही भेटलास अनु , हा सगळा गुंता झालाच नसता ’

अनिश : ‘करू आपण सोर्ट आउट, एक गोष्ट तर पक्की आहे की मी नाही राहू शकणार तुझ्या शिवाय ’

रम्या : ‘मी पण ’

अनिश : ‘चल झोप वेडू आता उद्या सकाळी ऑफिसला जायचंय gn ’

रम्या : ‘hmm gn bye tc ’

रम्याने फोन नाईट लॅम्पच्या टेबलवर ठेवला.तिचा फार उशिरा डोळा लागला.

त्यानंतर महिनाभर दोघांचे बोलणे भेटणे वाढतच गेले.त्याच्या सोबत मोरीशिअसला जायला रम्या तैय्यार झाली. ऑफिसचा ग्रुप सोबत मोरीशिअसला चाललीये अशी थाप तिने परागला मारली होती

शेवटी जायचा दिवस उजाडला सकाळचे दहा वाजले होते. एक हॅन्डबॅग आणि एक ट्रॅव्हलिंग बॅग भरून झाली होती.

“सगळं समान घेतलं का ” परागने विचारले.

“हो ”

“हे घे ” पराग क्रेडीट कार्ड पुढे देत म्हणाला.

“हे कशाला ”

“अग हे इंटरनॅशनल क्रेडीट कार्ड आहे तिथे गरज लागू शकते” ते कार्ड पराग कडून घेताना तिला त्याचे उपकार घेतोय असं वाटू लागलं.

"मिस करेल मी तुला खूप” असे म्हणून त्याने तिला मिठी मारली आणि त्याच्या मिठीत तिला अवघडल्या सारखे होऊ तिने त्याला हळूच दूर केलं

“चल निघू का उशीर होतोय अरे ”

“हो निघ गाडी थांबलीये बाहेर , शंकर आधी तुला सोडवून येईल मग मला शोरूम वर नेईल ,मी येतो गेट पर्यंत ” तो बॅग उचलू लागला

“अरे नको नको...नको येउस तू , तू अजून नाश्तापण केला नाहीस मी जाते हलकीच बॅग आहे , आणि वेळेवर खा पी आणि प्लीज जास्त ड्रिंक्स नको घेऊस ”

“नाही घेणार ग , एन्जोय कर काळजी नको करूस मी घेईल काळजी माझी”

“बाय ” म्हणत रम्या निघू लागली .

“थांब ” असे म्हणत त्याने तिला थांबवले ती मागे वळली. त्याने तिच्या कपाळावर कीस केले .

“असचं ” तो बोलला आणि तीला पाउलं थोडं जड झाल्यासारखं वाटू लागलं.दोन्ही हातात दोन बॅग धरून ती त्याच्या कडे पाहत-पाहत पुढे जाउ लागली .

“अग पुढे बघून चाल ” पराग हसत म्हणाला.ती निघून गेली.अचानक परागला घर मोकळ मोकळ वाटू लागलं खुर्चीवर बसून तो सिगारेट ओढू लागला.दोन वर्षात पहिल्यांदाच रम्या त्याच्या पासून इतक्या दिवसांसाठी लांब चालली होती.परागला रम्या मनापासून आवडायची तिला खुश ठेवायचा तो पुरेपूर प्रयत्न करायचा पण हवातसा बंध त्यांच्यात कधीच त्यांच्यात निर्माण झाला नाही.

रम्या अनिशने बोलावलेल्या ठिकाणी पोहचली.तिने गाडी थोडी अलीकडेच थांबवली.शंकर तिला drop करून निघून गेला.रम्याने लांबून पहिले दोन तवेरा थांबल्या होत्या.बाकीचे सर्व लोक त्या मध्ये बसले होते.फक्त अनिश गाडी बाहेर उभा होता.तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याने रम्याला हातानी खुणावून बोलावले.खर तर अनोळखी लोकांमध्ये पहिल्यांदा जाताना तिला थोडं अवघडल्या सारखं वाटत होतं पण ती जाऊ लागली.गाडीतले मधले दोन सीटस मोकळे होते .रम्या आणि अनिश आत बसले.गाडी सुरु झाली .

“रम्या हि माझी गॅंग हि शिवांगी आणि हा नील , हे वेदांत आणि गौरी बाकी सौरभ-अनया आणि राघव मेधा त्या गाडीत आहेत होईलच ओळख हळू हळू ”गाडीच्या पाठीमागील समोर-समोर असलेल्य सीटवर बसलेल्या चौघांचा त्याने तिला परिचय करून दिला.ती बळच हसली. हे लोक आपल्याविषयी काय विचार करत असतील हा प्रश्न तिला पडला.

“मग अन्या नक्की कुठे-कुठे जायचय काय प्लान आहे ” शिवांगीने अनिशला विचारले.

“हे बघ आता दोन तासात मुंबईला पोहचू तिथून थेट मोरीशिअसची फ्लाईट आहे, आजचा दिवस प्रवासातच जाईल तिथे पोहचलो की विमानतळावरून मिनीबस आपल्याला ब्लू बे बीच जवळच्या हॉटेल मध्ये सोडेल त्याच बुकिंग झालय , मग चार दिवस नुस्ता भटकायचं ”

“यार आपण टूर सोबत जायला हवं होतं ” शिवांगी बोलली

“जाम बोर आहेस तू शिवे,आपलं-आपलं गेलंकी कसं , हवं तसं भटकता येत” अनिश बोलला.

“जर तू प्लान फ्लोप झाला तर बघच तुझ्यावर आहे सगळं आणि काय काय पॉईंट्स ठरवलेत ”

“ब्लू बे बीच , नकलूआ बीच , कोह लर्न बीच, मग वोल्कनो शिखर, बरेच धबधबे आणि मग रिव्हर जॉर्ज नेशनल पार्क मध्ये ट्रेकिंग ” अनिशने टीचकि वाजवून प्लान सांगितलं

“होणार ए का सात दिवसात एवढ ”

“होणार गं काय रे वेदया ”

“तिथे गेल्यावरच कळेल आता कसा एक्सेक्युट होतोय ते ” वेदांत बोलला . गप्पा टप्पा चालत राहिल्या.ते मुंबईला पोहचले फ्लाईट वेळेवर आली आणि ते ठरल्या वेळेत मोरीशिअसच्या सर सीऊसागर रंगुलाम विमानतळावर पोहचले आणि तेथून हॉटेलकडे जायला निघाले.सगळ्यांना खूप भूक लागली होती त्यामुळे सामानासकटच ते एका रेस्तोरेंट मध्ये गेले जेवण झाल्यावर हॉटेल कडे निघाले.हॉटेलं समुद्राच्या किनाऱ्यावर बांधले होते.एका मोठ्या पट्ट्यात एकाला लागून एक अशा रो हाउस प्रमाणे एकमजली जवळ-जवळ तीस एक रूम्स होत्या.कंपाउंडच्या आत जलतरण तलाव आणि बगिचा देखली होता.हॉटेल मध्ये पोहाचाताच सगळे आप-आपल्या रूम मध्ये गेले.रम्या आणि अनिश त्यांच्या खोलीत आले. तळमजल्यावरील त्या खोलीची बीच कडची भिंत अख्खी काचेची होती. दुसऱ्या बाजूने बगीचाच्या बाजूला जाता येत होते.बाकीच्या दोन्ही बाजूला साध्या भिंती होत्या.रम्या थांबून खोली न्याहाळू लागली , अनिश ने तिला पाठीमागून मिठी मारली.

“खूप वाट पहिली मी ह्या ट्रीपची ”अनिश म्हणाला.

“मीपण.... थँक्स अनु मस्त वाटतय इथे ”

“मलापण ” तो मिठी आणखी घट्ट करून म्हणाला.

“पण मला खूप कसतरी वाटतंय बाकीच्यांसोबत फिरायला ”

“तू माझ्यासोबत फिर त्यांना इग्नोर कर ”तिने लावलेलं क्लच काढून त्याने तिचे केस मोकळे केले.त्याचे पोटाभोवती ठेवलेले हात तिने सैल केले आणि त्याच्या कडे वळाली.

“आय लव्ह यु ” रम्या तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेऊन म्हणाली.अनिशने त्याचे हात तिच्या कंबरे भोवती लपेटले आणि त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकवले.मग समुद्रच्या लाटांच्या आवाजात.श्वासांचे आवाज विरत गेले.

दुसऱ्या दिवशी सगळे जण बीच वर आले.

“या मुलींना तैय्यार व्हायला किती वेळ लागतो ना आता बीच स्पोर्ट्ससाठी पण मेकअप करतायत वाटत आपलं बराय एक बर्मुडा टाकला झालं काम ” वेदांत म्हणाला

“होऊदेरे उशीर तसपण इथे बगण्या सारखं कीतीतरी आहे , हिरवळ बघून दिल गार्डन-गार्डन होगया एकदा ओन्ली बोय्स ट्रीप प्लान करायला हवी ” सौरभ म्हणाला.

“सौऱ्या तू कधी नाही सुधारायचा तुझं दोघांवर पण समाधान नाही होतं ” वेदांत म्हणाला

“उलट भेटत जातं तसं , आणखी वाढत जातं काय रे अन्या आता तूच सांग ह्याला ”सौरभ ने अनिशला प्रश्न विचारला आणि त्याला कुठेतरी ते लागलं.

“सौरभ तुझात आणि माझात फरक आहे ,एकदा कमीटमेंट दिली की मी इथ तिथं तोंड नाही मारत तुझ्यासारखं ”

“काय म्हणालास कमीटमेंट ” असे म्हणून सौरभ हसू लागला.

वातावरण गरम होतंय हे वेदांतला कळाल .

“अरे ते पहा आलं आपल महिला मंडळ ” वेदांत दोघां मधला तणाव कमी करण्यासाठी तो येणाऱ्या मुलींकडे बोट दाखवून म्हणाला .अनिश तरीही सौरभकडे रागाने पाहत होता.मग तो मागे वळला त्याला रम्या दिसली .तिने निळ्या रंगाची टू पीस बिकनी घातली होती. तो तिच्याकडे पाहताच राहिला ती त्याच्या जवळ आली.

“रम्या , यु आर स्मोकिंग ”

“शट अप ”

“अरे कोई तो रोकलो ”

“अनु गप बस ते बघ सगळे गेलेपण पराशूत राईडला ”

“हो चल चल , मी विचार करतोय कधी राधाला बिकनी घालायला लावली तर काय करेल ती ”

“त्यात काय एवढ तिलापण हळू हळू सवय होऊ शकते जर शिकवलस तर ”

“शक्य नाही ते जाऊदे चल ” दोघे हि मोठ्या आनंदाने आणि उत्सुकतेने राईडस चा आनंद घ्यायला गेले. तीन दिवस सगळ्यांनी मनसोक्त भटकंती , खरेदी आणि मौज केली.चौथ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ट्रेकिंगचा बेत होता दिवसभर जंगलात भटकून झाल्यावर रात्रीरात्री सगळे तंबूमध्ये मुक्कामला आले.रात्रीच जेवण झाल्यावर सगळे शेकोटी भोवती गोळा झाले.

गप्पान सोबत दारूच्या बाताल्यापण मोकळ्या होत गेल्या.

“चला आता ट्रुथ आणि डेअर खेळूया” .सौरभ रिकामी केलेली बाटली जमिनीवर गोलाकार फिरवत बोलला.

“ज्याच्याकडे बाटलीच तोंड जाईल त्याने एक तर ट्रुथ सांगायचं किवा दिलेली डेअर पूर्ण करायची ”

सगळे राजी झाले . एक-एक जण बाटलीचे तोंड त्यांच्याकडे फिरेलं तसे ट्रुथ किवा डेंअर घेत होते, शेवटी बाटली सौरभ कडे आली

“मला ट्रुथच द्या मला एक कबुली द्यायची आहे ” सौराभला भरपूर चढली होती.

“नाही दिलं तरी तू बळच घेशील बोल आता ” शिवांगी म्हणाली.

“अनया आधीच सॉरी डार्लिंग ” तो त्याची गर्लफ्रेंड अनयाकडे बघून म्हणाला.

“मला इथे आल्यापासून कोणावर तरी खूप इंटेन्स क्रश झालं आहे , ती व्यक्ति बिकनी मध्ये खूप हॉट दिसते ओळखा बर कोण ” हसता खेळता माहोल पूर्णच बदलून गेला.सौरभला सावरायला अनया त्याच्या जवळ गेली.

“सौरभ काय बोलतोयस चल इथून ” अनया त्याला तिथून निघण्यास बोलू लागली.

“अग थांब अरे ओळखा ना ... जाऊदे मीच सांगतो , रम्या रम्या आय हवं ह्यूज क्रश ओन यु , यु आर हॉट ” असे बोलून त्याने रम्याला सगळ्यान समोर अपमानित केले होते.ति टेंट मध्ये निघून गेली.अनिश जागेवरून उठला त्याने बाजूला पडलेली दारूची बाटली उचलली, फोडली आणि सौरभ वर धावुन गेला.त्याला बाकीचांनी अडवले

“बा***, तू तिच्याविषयी असं कसा बोलू शकतोस तुझ्या बायको विषयी असं बोललं तर चालेल का ”

“तुझी बायको नाही ए ती , आय रिस्पेक्ट राधा वैनी पण हि तर .....” सौरभ दारूच्या नशेत बोलतच गेला. ते सगळे बोलणे टेंट मध्ये रडणाऱ्या रम्याच्या कानावर जात होते .इतका अपमान तिझा कधीच झाला न्हवता.अनिशच्या हट्टाने ती इथे आली होती.

“तुला त्याचाशी काय घेण देन , परत तिच्या विषयी काही बोललास ना तुला जिवंत सोडणार नाही ” अनिश त्याच्या अंगावर धावुन जायचा प्रयत्न करत होता पण सगळ्यांनी त्याला धरून ठेवल्यामुळे त्याला हलता येत न्हवते.अनिश चा जोर जोरात आवाज येत असल्याने डोळे पुसून रम्या पुन्हा बाहेर आली .अनिशचा तो अवतार पाहून ती घाबरली ती त्याच्या जवळ आली

“ए अन्या खूप प्रेम असल्याच नाटक करतोस ना मग लग्न करणार आहेस का फक्त फिरवणार आहेस ......” सौरभ गप्प बसायला तैय्यार न्हवता.

“हो करीन मी तिच्याशी लग्न आय लव्ह हर , तुमच्या सगळ्यान समोर सांगतोय बास ” अनिश बोलला आणि रम्याला घेऊन परत गेला.

“उद्याच्या फ्लाईटने परत चालोय आपण , सॉरी रम्या मी तुला ट्रीपला यायला फोर्स केलं मला न्हवतं माहीत असं होईलं ”तो दोन्ही हातात तोंड लपवत म्हणाला.

“हि तर फक्त सुरुवात आहे अनु ,उद्या ऑफिस मधले मग शेजार पाजारचे मग अख्ख जग मला त्याच नजरेने बघणार आहे , असाच बोलणार आहे ”

“मी असं होऊन नाही देणार रम्या आय लव्ह यु , आपण लग्न करूया ”

“पण राधा..... आणि तुझा मुलगा ”

“मुलगा तर माझ्या जवळच राहील राधाच बघता येईल, आधी इथून परत जाऊयात ” अनिश म्हणाला आणि त्या क्षणी सामान घेऊन ते हॉटेलवर गेले. दुसऱ्या दिवाशी घरी परतले.ट्रीप वरून परत आल्यापासून दोघे पहिल्यापेक्षा जास्त फोन वर बोलू लागले ,भेटू लागले .एक दिवस रम्याच्या फोन मधला दोघांचा फोटो परागला दिसला आणि त्याचं नातं त्याच्या समोर आलं.

रम्याने आपण लग्न करणार आहोत असं स्पष्ट सांगितलं.खूप वाद आणि भांडण झाले .परागने तिला सहा महिने अनिश असून लांब राहून दाखवलं तर तो घटस्पोट द्यायला तैय्यार होईल असे सांगितले.तिने ते मान्य केले.त्या रात्री पराग खूप पिला आणि दारूच्या नशेत रम्या सोबत जबरदस्ती केली.आपण खरच चुकीच्या माणसासोबत लग्न केलाय याची तिला जाणीव झाली.

सकाळचे नऊ वाजले होते रम्या ड्रेससिंग टेबलवर तयार होत होती शनिवार असल्याने ती निवांत होती .आवरून झाल्यावर अनिशला भेटायला जायचा तिचा बेत होता. दरवाजा उघडल्याचा तिला आवाज आला . पराग आत येत होता त्याच्या चेरहऱ्यावर गिल्ट सहज दिसत होती . त्याला पाहून ती ड्रेसिंग टेबले वरून उठली , तिने खुंटीला लावलेली हॅन्डबॅग उचलली तिथून निघून जायचा निघाली .

परागने तिला थांबवण्यासाठी तिचा हात पकडला

“कालसाठी आय एम सॉरी रम्या , थोडं बोलायचं होती तुझ्याशी "

“मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही ” त्याचा हात झटकत ती म्हणाली .

“तुला माहिती आहे ना ग मी दारू पिलो कि मला कसलाच भान राहत नाही ” तो काताकुळीला येऊन बोलला .

“दारूच्या नशेत केलस का जाणून बुजून तुलाच माहित” रम्या रागाने बोलली . परागची नजर जमिनी कडे झुकलेली होती तो काहीवेळ गप्पच होता मग त्याने रम्याकडे पहिले . त्याचे डोळे भरले होते .

“मला एकदा बोलायचं चान्स देशील प्लिज ” तो केविलवाणा चेहरा करून बोलू लागला . त्याच्या डोळ्यात पाणी पाहून रम्याने हातातली बॅग खाली टाकली आणि ती पराग जवळ गेली

“आर यु ओके ”तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारले . काल पराग चुकला होता तर आपण वागतोय ते देखील बरोबर न्हावतेच हे तिला माहीत होते .दोघे बाल्कनी मध्ये बसले आपण एक तास उशिरा येऊ असा मेसेज तिने अनिशला केला .परागच्या समोरील खुर्चीत रम्या बसली होती .त्याला काय बोलायचे असेल या विचारात ती बसली होती .पराग दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवळी. हाताचे दोन्ही कोपरे मांडीवर ठेऊन थोडा खाली झुकला .खाली पाहताच त्याने बोलायला सुरवात केली .

“प्रत्येकाला खुश राहायचा अधिकार आहे , पण दुसऱ्याला फसवून नाही ”

“मी तुला फसवलं नाही पराग , आणि माझी चूक झाली मी मान्य करते मी तुला आधीच सगळं सांगायला हवा होता ,तू मला त्या गोष्टी कधीच देऊ नाही शकलास ज्या मला अनिश कडून मिळाल्या मी खूप खुश असते त्याच्या सोबत आय लव्ह हिम ”

“तू कधी मला तुझ्या जवळ येऊन दिलस का , नेहमीच एक अंतर बनवून ठेवलास दोघांमध्ये आणि तू जे प्रेम समजतीस ना ते प्रेम असूच शकत नाही , त्या अनिशने स्वतःच्या बायकोला तर धोका दिलाच आहे पण माझ्या नकळत तुला माझ्यापासून तोडलंय प्रेम असत तर निर्भिडपणे पुढे येऊन थांबला असता भेकड सारखा लपून छपून नाही ”

“तुला नाही कळणार प्रेम काय असता तू कधी प्रेम केला नाहीस ना ”

“एवढं तर नक्कीच माहितीये कि दुसऱ्याच सुख हिरवण नसतं ,आकर्षणापोटी त्याने स्वतःच्या बायको मुलाचा विचार नाही केला तर दुसऱ्याच्या बायकोचा का करेल ”

“तो तिला घर घेऊन देणार आहे आणि बऱ्यापैकी रक्कम देणार आहे , मला माहितीए कि तिच्या सोबत हे योग्य होतं नाहीये पण ती त्याला नाही खुश ठेऊ शकत या समीकरणात कोणाला तरी बॅक आऊट घ्यावाच लागणार ”

“जर एखाद्या स्त्रीचा नवरा तिला मारझोड करत असेल किंवा , एखाद्या पुरुषाची बायको त्याला टॉर्चर होईल असे वागत असेल असेल तर त्यांना नक्कीच विलग व्हायचा अधिकार आहे ,पण तुमच्या बाबतीत फार वेगळा आहे . ना त्याची बायको वाईट आहे ना मी इतका वाईट आहे ”

“फक्त याच गोष्टी पुरेश्या नसतात , त्याच्या पलीकडे जाऊन कोणी तरी आपल्याला जाणून घेणारा किंवा , स्पेशल फील करवणार हवं असतं ”

“मी मानतो पण हे जे काही अनिशच स्पेशल फील करवण आहे ना ,तुला वाटतं का तो तुला आयुष्यभर तसं वागवेलं ”

“अर्थातच ही लव्ह्स मी ”

“त्याच तस वागणं होतं कारण तुम्हाला सगळं अनुकूल वातावरण मिळालं आहे , जेव्हा अडथळे येतात ना तेव्हाच खऱ्या नात्याची आणि खऱ्या माणसाची ओळख होते एवढं लक्षात ठेव ”

“आणि मला खात्री आहे हा जो सहा महिन्याचा अडथळा तू निर्माण केलाय ना त्याला अनिश सहज पार करेल ”

“तुला माहितीए मी का सहा महिने लांब राहून दाखवा म्हणालो"

“आमच्या प्रेमाची परीक्षा घ्यायला “

“फक्त त्यासाठीच वाटतंय तुला आणखी दुसरा काही कारण नसू शकता "

“मला तरी नाही तस वाटत ”

“कारण आहे , कारण तू मला आवडतेस अगदी मनापासून , तुझं दिसतच नाही तर तुझा स्वभाव पण , स्वतःच्या बायकोच एक्सट्रा मरेटियलअफेर आहे ही जाणून देखील मला तू हवी आहेस कारण संसार म्हणजे एकमेकांच्या चुका पोटात घालणं देखील असतं , या गोष्टीचा त्रास तर खूप होतोय मला पण त्या त्रासा पेक्षा तू महत्वाची आहेस , जर एकमेकांना समजून घेतला नाही तर संसार होऊच शकत नाही , फक्त कोणासोबत स्पेशल वाटत असेल म्हणून लग्न यशस्वी होतं असते तर प्रेम विवाह करणाऱ्यानेचे कधीच घटस्फोट झाले नसते .एकमेकांना समजून घेत सावरत , समजावत सोबत घेऊन प्रवास करावा लागतो ”

“आज अचानक हे सगळं, या आधी तर कधीच तुला असा बोलताना ऐकलं नाही मी ”

“रादर तू माझं कधी ऐकलंस नाही रम्या , तुला काय वाटतं मला कधी हे अस सगळं करूशी वाटलं नाही का अगं तुझ्या पेक्षा किती तरी सुंदर मुली स्वतःहून गळ्यात पडतात माझ्या , पण मला माहिती कि ते सगळं माझा पैश्यामुळे आहे , मलाही क्षणिक आकर्षण होतं त्यांचं पण तुझा चेहरा आठवतो आणि मी थांबवतो स्वतःला , मला हवतस तुझ्या नकळत मी वागलो असतो आणि तुला कळलं पण नसतं , पण मला माहितीए कुठे थांबायचं ते , एका प्रश्नच उत्तर देशील ? “

“हम्म ”

“सीमा पार करायच्या आधी एकदा तरी माझा चेहरा तुझ्या डोळ्या समोर आला का ग ?” ते वाक्य ऐकून रम्या जागची उठली आणि नजर चोरत ती बाल्कनीचा रॉड वर हात ठेऊन बाहेर पाहत राहिली . तिला तो हॉटेलच्या दारातील प्रसंग आठवला, जेव्हा परागच्या चेहऱ्या आठवल्यामुळे तीच पाऊल जड झालं होतं.मग थोडा वेळ कोणीच कोणाशी काही बोललं नाही .

“शांत का आहेस बोलना ”

“या सगळ्या गोष्टी सोड आणि मुद्द्याचं बोल ” रम्या रागावली खरी पण आतून तिला गिल्टी वाटत होतं .

“मी तुला ६ महिने थांबायला सांगितलं आणि तू राजी झाली याचा अर्थ तू मला थोडी तरी व्हॅल्यू देतेस असा होतो , आणि या महिन्यात तू माझ्या नकळत त्याला भेटण्याची गरज पडली तर तुमचं नातं किती कमकुवत आहे ते तूच ठरवायचंस मी काही तुझ्यावर पहारा नाही ठेवणार ”

“माझा विश्वास आहे आमच्या नात्यावर , नाही गरज पडणार आम्हाला.”

"ह्या सहा महिन्यात जर तूला तूझ्या चुकीची जाणीव झाली आणि तू माझ्याकडे परत आलीस तर तूझा स्विकार करेल मी पण त्या नंतर नाही कारण मी ही माणुस आहे ,तूला एक संधी देण्या इतकी मी माझ्या मनाची तयारी करु शकलोय "

रम्याने त्याच्या कडे पाहिलं ती काहिच न बोलता निघून गेली.

तीन महिने तसेच गेले .एके दिवशी सकाळचे नऊ वाजले असताना .अनिश ऑफिसला जाण्यासाठी गाडीत बसला होता . तो गाडी सुरु करणार होता तितक्यात त्याजा फोन वाजला.स्क्रीनवर रम्याचे नाव दिसले.त्यानं फोन उचलल.

“गुड मॉर्निंग रम्या ”

“अनिश मला भेटायचं ”

“काय गं ? सगळं ठीक तर आहे ना ”

“दुपारी , दोन वाजे पर्यंत येते तुझ्या घरी ”

“हो ये तू ,पण अचानक काय झालं इतके दिवस तर तूच म्हणाली भेटायचं नाही म्हणून ”

“आल्यावर सांगते.... बाय ”

दुपारी दोन वाजता अनिशच्या दाराची बेल वाजली.त्याने दार उघडले.रम्या आत येताच त्याने दार लाऊन घेतले.

“आय मिस्ड यु सो मच ” असे म्हणत अनिशने रम्याला मिठी मारली.तिने दोन्ही हातांनी त्याला दूर केले. आणि सोफ्यावर जाऊन बसली.अनिश तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला.

“पराग काही बोलला का ”

“नाही ”

“तू तुझा निर्णय तर नाही बदललास ना” अनिशने त्याची भीती व्यक्त केली

“नाही ”

दोघांन मध्ये एक तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.घरात पूर्ण शांतता पसरली.अनिश रम्या काय आणि कधी बोलतीये याची वाट पाहत होता.

“मी तीन महिन्याची प्रेगनेनट आहे अनिश ” रम्या एका श्वासात बोलली.आणि समोर बसलेला अनिश जागेवरून उठला.त्याच्या चेहऱ्यावर भीती , राग , चिंता हे सगळे भाव एकसाथ दिसत होते. त्याला फार मोठा धक्का बसला होता.रम्या त्याची प्रतिक्रिया पाहत होती.

“रम्या तू मला फसवलस गेल्या तीन महिन्यात आपण एकदा देखील भेटलो आणि तू........ ”अनिश डोक्याला हात लाऊन बसला

“माझ्या मर्जीने काही नाही झालं अनिश ”

“रम्या तुझ्यासाठी मी माझी बायको घालवून बसलोय आणि तू काय केलंस ”तो घरात येरझाऱ्या घालू लागला.

“तुला परत सांगतीये मी माझा यात दोष नाही ”

“ठीक आहे, मी अजूनही तूझा स्वीकार करेल पण मला त्या परागच मुल नकोय”अनिश विचार न करता बोलला.

“अनिश तुला लाज वाटायला हवी होती असं बोलायाच्या आधी , फक्त परागच मुल नाही ए ते माझा पण अंश आहे त्याच्यात आणि तू सरळ जीवावर उठलास त्याच्या ”रम्या बोलली , अधिक ताण घेतल्याने रम्याला चक्कर आल्यासारखे झाले.ती सोफ्यावर बसली.अनिशने टेबलवरील ग्लास उचलला आणि तिला पाणी पाजू लागला . तिला अचानक कालचा दिवस आठवला.काल दुपारी रम्या परागच्या बेडरूम मध्ये गेली तो खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होता. ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.ती कधीच त्याच्या बेडरूम मध्ये जात नसे तिला आलेलं पाहून तो आश्चर्याने तिला पाहू लागला.

“पराग आय एम प्रेगनेन्ट ” तीने निर्विकारपणे त्याला सांगितले.

“काय खरच ” तो खुर्चीवरून उठला आणि त्याने आनंदाने तिला मिठी मारली.त्याचे डोळे हलकेशे पाणावले.पण वास्तवाची जाणीव होताच त्याने त्याची मिठी सैल केली.

“खूप खुश आहे मी आज खूप खुश आहे ” तो बोलला त्याला आसव सांभाळन अशक्य होत होतं तो बाहेर निघून गेला.कालची परागची प्रतिक्रिया आणि आजही अनिशची.

ती विचारच करत राहिली.जेव्हा तिने परागला हि बातमी सांगितली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निव्वळ आनंद होता.त्याच्या नकळत ती अनिशला भेटत असेल आणि त्याचे पण हे मुल असू शकते असल्या शंका कुशंका अजिबात न्हवत्या.स्वतःचाच अपत्य असून त्याने त्याची मालकी सोडायचा हे सहज कबुल केले, पितृत्वाचा हक्क सोडायचा हे कळताच तो तुटून गेला. आणि आज अनिश एका आईच्या काळजाला छिद्र पडावी असं बोलला.

रम्या जागेवरून उठली.अनिश पाहताच राहिला.

तिने परागला फोन लावला.

“पराग”

“कुठे आहेस मी जेवायला घरी आलोय ”

“तुला काहीतरी विचारायचं ”

“बोलना ”

“जर तुला कधी कळाल की पोटात वाढणार मुल अनिशच आहे तर तूला काय वाटेल ”

“हे अचानक काय रम्या , तू ठीक तर आहेस न ”

“तू फक्त मी विचारलेल्या प्रश्नच उत्तर दे ”

“रम्या ,तुझ्या पोटात आहे म्हणजे तुझा अंश आहे ,त्याचा पिता कोण आहे यावरून तुझ्या मातृत्वा मध्ये बदल होणार नाही मला तुझ्या मातृवाचा तेवढाच आदर राहील ”पराग बोलला आणि रम्याला मनामनाच ओझ उतरल्या सारखं वाटतल .

लख्ख प्रकाशन पडल्या सारखं वाटलं .पराग बोलला होता कठीण प्रसंगी तग धरून राहत तेच नातं.अनिशच आणि तिझ नात किती कमकुवत आहे हे तिला जाणवलं.

“अनिश तुझं खर रूप आत्ता कळतंय मला , मी नाही माझ्या बाळाला मारू शकत ”

“रम्या , मग मला विसर ”

“चालेल, मलापण तुझ्या सारख्या कमकुवत पुरुषासोबत राहायचं नाही ”

“तू मला धोका देत आहेस तुझ्या भरवश्यावर बायको पोराला घरा बाहेर काढलाय मी ”

“उद्या तू मला पण बाहेर काढायला कमी नाही करणार”रम्याच्या अशा बोलण्याने अनिशनची तळ पायाची आग मस्तकात गेली त्याने रम्याला चपराक लगावली.

“तुझ्या मुळे संसाराची वाट लावली मी , मधूनच सोडायचं होतं तर कशाला प्रेमाच नाटक करायचं ,तुझ्या पेक्षा माझी राधा दहा पटींनी बरी आहे , भलेही तिला टापटीप राहता नाही येत पण तुझ्या सारखं विवाहित परपुरुषाबरोबर फिरायला एका पायावर तैय्यार नाही होत, खानदानी आहे ती ” अनिश विचार न करता बोलत होता.

“तू माणूस नाही जनावर आहेस ,जो पर्यंत माझ्याकडून तुला सुख लुटता आल तू लुटत गेलास , आता जवाबदारीची वेळ आली तर तुझी मनगट कमजोर पडली ,तुझ्या उलट माझा पराग बघ प्रत्येक पावलावर सांभाळून घेतलं त्याने मला , हाच फरक असतो अफेर असणाऱ्या पुरुषामध्ये आणि नवऱ्या मध्ये, पळकुटा आहेस तू ,मला इथे एक क्षण पण थांबायचं नाही हि आपली शेवटची भेट होती ” रम्या तिथून निघून गेली आणि तिने मागे पहिले नाही.

प्रत्येक पावलावर साथ देण्याऱ्या राधाची अनिशला राहून राहून आठवण येऊ लागली.हात धरून बाहेर काढलेल्या राधाला मनवणे तसे फार अवघड होते तरीही चुकीची माफी मागायला आणि राधाला परत आणायला तो वेळ न घालवता थेट गावी निघून गेला.

रम्या घरी आली पराग घरी न्हवता तो शोरूमला गेला होता. आज तिला परागची जितकी ओढ वाटत होती तितकी कधीच वाटली नाही.ती लग्नापासूनच सगळं आठवू लागली.त्याने घेतलेली छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी , त्याचा प्रामाणिकपणा , समजूतदारपणा , त्याची परिपक्वता तिला घडलेल्या विविध प्रसंगानमधून जाणवू लागली.ती त्याची आतुरतेने वाट पाहू लागली. संध्याकाळचे सात वाजले आणि दारावरची बेल वाजली तिने दार उघडले.पराग घरात आला.आणि ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. हाच का तो पराग हो हाच आणि हा माझा होता पण मीच कधी किंम्मत केली नाही .

“कधी आलीस ” बॅग टेबल वर ठेऊन तो टाय ढील्ला करत बोलला ,त्याच्या बोलण्याने ती भानावार आली.तिने त्याला टेबलवरील पाण्याचा ग्लास दिला.ती त्यालाच एकटक पाहत होती.तो सोफ्यावर बसला.

“रम्या उद्या तुझी अपोईनटमेंट घेतलीये मी , डॉक्टर शिंदे आहेत एक ओळखीच्या गायनॅक आहेत तुझा वेळ ठरव आणि जा तीन महिने इथे ट्रीटमेंट करणार आहे असं मी सांगितलय त्यांना ” रम्याला आता तिची आसव रोखण अशक्य झालं ती परागच्या जवळ गेली.परागला क्षणभर काय चाललाय ते कळालच नाही .ती त्याच्या आणखी जवळ गेली.तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले.मग जमिनीवर बसून त्याच्या मांडीवरआपली डोक ठेऊन ढसा-ढसा रडू लागली.

“मला माफ कर पराग..... अनिशने ... मी आता नाही जाणार त्याज्याकडे ......तो खूप .........” पुढे शब्द फुटत न्हवते फक्त हुंदकेच येत होते.ती खूप वेळ रडत होती.मग परागने तिला पाणी पाजले तो सोफ्याला टेकून जमिनीवर तिच्या शेजारी जाऊन बसला.तिने त्याच्या खांद्यावर तिचे डोके ठेवले.तो तिला थोपटू लागला.

“काय झालं ते मी तुला विचारणार नाही ,पण तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली हेच महत्वाच खरतर तुझ्या चुकीची जाणीव होण्यापेक्षा तू चुकीच्या व्यक्तिसोबत होतीस हि जाणीव झाली ते महत्वाच ”

“मी कधीच तुला समाजावून नाही घेतलं कारण जेव्हा आपलं लग्न ठरला माझ्या मनाची तयारी न्हवती त्यामुळे तुझ्याविषयी मी पूर्वग्रह बनवला आणि माहीत नाही कसं त्या .......”

“श्श्स झालं गेलं विसरून जायचा आता आणि स्वताची आणि माझ्या बाळाची काळजी घेयाची तो तिच्या पोटावर हात ठेऊन बोलला ”

“आणि तुला वचन देतो आज पासून दारू कमी करेल ज्याच्या मुले आपल्यात बरेच गैर समाज झाले ” पराग बोलला मग बराच वेळ दोघे तसेच बसले होते.

प्रत्येकालाच खुश राहायचा अधिकार आहे .ज्याच्या सोबत आपल्याला आपल्याला स्पेशिअल वाटतं त्याच्या सोबत आयुष्यभर जगायचं अधिकार आहे.पण क्षणभराचे सुखद क्षण देणारी व्यक्ति आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात साथ देईलच असे नाही. कपटाने किंवा बाकीच्यांना अंधारात ठेऊन लुटलेले क्षण कधीच प्रेम होऊ शकत नाही.आणि असं करायला राजी करणारी व्यक्ति कधीच खर प्रेम करू शकत नाही.ती अनैतीकताच असते.ज्यांचे प्रेम असते ते त्याच्या साठी लढायची किवा वेळ आलीच तर त्याग करायची देखील तयारी ठेवतात.

पराग आणि रम्याचे नाते आता आणखीन घट्ट झाले होते.दोन्ही कडून दोन टोके ओढल्या नंतर घट्ट झालेल्या गाठी प्रमाणे.

**************** समाप्त **************

© धनश्री साळुंके.