बकुळीची फुलं ( भाग - 7 ) (3) 273 220 " अरे ती काय आदिती ..... इकडेच येत आहे ..... " निखिल आदितीच नाव घेताच अनुज क्षणांचा विलंब न करता मागे वळतो ...." अरे वा ! तुम्ही सर्व इथे पाणीपुरीचा आस्वाद घेताय ..... "" ओहहह ..... सॉरी आदि ..... अगं आम्ही तुझ्यासाठी थांबलो नाही .... "" सॉरी काय त्यात मालती .... मला यायला वेळ झाला थोडा ..... "" इट्स okay ना ..... चल आता खाऊन घे ..... "" नाही , मी just .... जेवण करून निघाले घरून ...."प्रितमला आदितीच्या हातात कसले तरी कार्ड दिसत होते , उत्सुकतेने तो तिला विचारायला गेला ," आदिती , तुझ्या हातात कसले कार्ड आहे का ? "चेहऱ्यावर उसनं हास्य आणतं ती ," अरे हो ..... बघ विसरलेच सांगायच .... माझं लग्न ठरलंय ..... "आदितीच्या तोंडून हे शब्द ऐकताच अनुजच्या पायाखालची जमीन सरकली ..... त्या गुलाबीसर पारदर्शी बॅगेतून तिनं पत्रिका काढत आधी रेवाच्या हातात ठेवली , मग मालती .... प्रितम , निखिल ... आणि शेवटी ती अनुजच्या समोर येऊन उभी राहिली अनुज कितीतरी वेळ तसाच उभा होता निःशब्द ... हातही त्याचे पत्रिका घ्यायला थरथरत होते ... डिग्री हातात यायचा आधीच आदितीच्या लग्नाची पत्रिका त्याच्या हातात स्थिरावली होती ... कार्ड न बघताच त्याने बॅग मध्ये घातलं ..... रेवा , मालती मात्र निरखून निरखून कार्ड बघत होत्या ... " ये कसा आहेस तो ..... यार कमाल केलीस ग अस अचानक धक्काच दिलास आम्हा सर्वांना ..... हो ना रे अण्या .... " अनुजच मात्र लक्षच नव्हतं मालतीच्या बोलण्याकडे . " हो हो ..... अचानक झालं ना ! आधी सांगायच होत ..... " अनुजच असं बोलणं ऐकून मनात आदिती स्वतःशीच पुटपुटली ... मग काय आधी सांगून तरी तू स्वतः बोलायला पुढाकार घेतला असता का ? म्हणे आधी सांगायच होत ... अनुज ही स्वतःच्या मनात एकटाच गुंतला होता , तू जरा पण थांबू शकत नव्हती का ग , सांगणारच होतो माझ्या मनातलं पण इतकी घाई केलीस तू .... आता सर्व काही गेलं हातातून .... आदिती त्याच्याकडे बघत मनातच बोलत होती , अजूनही वेळ नाही गेली रे , मी वाचते आहे तुझ्या चेहऱ्यावरचे भाव ..... आता तरी हो म्हण ना ! फक्त एकदा मनातलं बोल .... एकदा तुझ्या तोंडून ऐकू दे मला .... मला माहित्ये तू खूप प्रेम करतो माझ्यावर .... पण आजही बोलणार नशील तू तर मी खूप दूर निघून गेली असेल तुझ्या , कायमची ..... मला असं दुरावू नको तुझ्यापासून .... प्लिज , असं म्हणतच ... अनुज तिच्याकडे न बघता तिथून बाहेर पडला ... आदितीच्या मनातले सारे भाव विरून गेले ... तो असा अचानक का निघून जातोय म्हणून निखिल धावतच त्याच्या मागे गेला . " अण्या , अण्या ...... अरे थांब ना ... आपण अजून ऑफिसमध्ये गेलो कुठे , तुला डिग्री नकोय का ? "" अरे मला खूप महत्त्वाचं काम आठवलंय .... मी नंतर भेटतो .... ", असं सांगून अनुजने निखिलला टाळलं ... निखिलला तर कल्पना झाली ह्याचं काहीतरी बिनसलं . पण नेमकं काय कळतं नव्हतं . अनुजने अख्खा दिवस स्वतःला रूमची दार बंद करून कोंडून घेतलं होतं ... सायंकाळची वेळ होती अनुजचा फोन खणानला ..... नको म्हणत त्याने पहिल्यादा फोनकडे बघितलं देखील नाही ... परत फोन आला ... स्क्रीनवर प्रितमच नाव फ्लॅश होताना दिसत होतं ..." Hello .... Hello ..... Hello अण्या ..... " " थांब अरे थोडा बाहेर निघतो .... रेंज नाहीये .... ", अनुजच्या तोंडून शब्द फुटत नव्हते , प्रितम सोबत बोलायची मुळीच मानसिकता नव्हती त्याची . एकांत हवा होता त्याला . " हा .... बोल आता .... येतोय का आवाज ? "" का रे .... गळल्या सारखा का बोलतोय .... रेंज नाहीये .... कॉलेजमधून पण तसाच काही न सांगता निघून गेलास ..... तू आताच्या आता मला भेटणार आहे ? ""काय वेड्या सारखा बोलतो .... आता ? "" हो आताच ..... फक्त आपण दोघेच भेटू .... "" कुठे पण ? "" चौपाटीला ये .... "" चौपाटीला ?? "" हे बघ आता मी भेटू शकणार नाही , वैगरे .... वैगरे मला कारण सांगत नको बसू तू निघतो आहे .... " " अरे पण ....... " प्रितमने त्याचं हो नाही ऐकून घेण्याच्या आधीच फोन कट्ट केला होता . सायंकाळचे सात वाजले होते तेव्हा ... शर्टच्या बाह्या दुमडून अनुज ओंजळीने लाटासोबत खेळत होता . स्वतःला तो असा हरवून घेण्याचा प्रयत्न करत होता .... पण मन कुठेच रमत नव्हतं .... किती स्वर्गीय ठिकाण आहे हे , कातरवेळची निरभ्र शांतता , निस्तेज समुद्र .... खवळणाऱ्या लाटा .... खरचं प्रितमचे लाख लाख आभार .... तरी देखील अश्या उसळणाऱ्या लाटात मी स्वतःला शोधतोय की तिला ? हा प्रश्न माझ्याच मनाला भेडसावतो .... पायाखालून जाणाऱ्या लाटासोडून निरुत्तर नजरेने अनुज दूरवर बघत बसला होता . त्याला त्या पायाला विळखा घालून जाणाऱ्या लाटांचाही स्पर्श होत नव्हता . " अण्या .... आलास पण तू ? सॉरी वाट बघावी लागली तुला ..... " " ..... मी तुझी वाट नव्हतोच बघत , समुद्राला दूरवर न्याहाळत होतो ... किती अथांग असतो रे हा , खोल खोल अरूंद .... नदीच्या संगमाने बनलेला महाकाय समुद्र .... "" हो .... माझ्या एका प्रश्नाचं उत्तल देशील ..... "" कोणता प्रश्न ..... "" अजूनही वेळ गेलेली नाही आहे ..... जाऊन सांग तिला . "" कशाची वेळ ..... आणि कुणाला काय सांगू ? "," अण्या .... तू ना आता मार खाशील हा .... समजून न समजल्या सारखा नको करू ... "," सोड रे तो विषय .... "," ऐवढे दिवस कधी हा विषय तुझ्या समोर मांडलाच नाही मी , पण आज वाटतयं बोलावं ... मला माहिती आहे तुझं आदितीवर खुप प्रेम आहे .... ", " हो .... पण आता खुप उशीर झालाय .... तिचं लग्न अश्या मुलासोबत होत आहे ज्याची मी एक टक्का बरोबरी नाही करू शकत .... आता पत्रिका देखील छापल्या ... "," आणि तू ती पत्रिका बँग मध्ये न बघताच टाकून दिली न तसाच तडक घरी जायला निघाला , ती तरी तुला जाताना बघत राहिली .... पण आजही थांबवू शकली नाही .... ", " तुला माहिती आहे , सगळ्यात अवघड क्षण कोणता असतो ? आपल्याला आवडणारी व्यक्ती स्वतः आपल्या हातात तिच्या लग्नाची पत्रिका ठेऊन जाते ना .... तो क्षण .... असा क्षण माझ्या सारख्या एखाद्याच्याच वाट्याला यावा , त्या क्षणाला सावरून घेणं देखील किती गरजेच असतं.... नाहीतर प्रेमही मुठीतून निसटलेल्या वाळूच्या कणासारखं निसटत जातं .... आणि ते निसटून गेलयं ....." " अण्या हेच सांगण्यासाठी मी तुला इथे बोलावून घेतलं ..... अजूनही वेळ गेलेली नाही ...तू बोल रे तिला .... तीही प्रेम करते तुझ्यावर .... डिप्लोम्याटिक आहेस यार तू ... ऐकायला पण तयार नाही .... "" सर्व संपल रे ... तिने माझ्यावर प्रेम केलं असतं तर लग्न जुळायचा आधी एकदा कॉल करून सांगितलं असतं , आलीही तर पत्रिका घेऊन लग्नाच्या .... तुला आठवतंय ? "" विपिनला नकार दिला होता तिने , मलाही तसाच नकार दिला तर .... तिचा नकार पचवण्याएवढं माझं साहसी हृदय नाही ..... "" तुझ्यावर प्रेम करत होती ती , म्हणूनच विपिनला नकार दिला तिने .... "" तुला कोणी सांगितलं हे ..... "" तिनेच ....."" माझ्यावर प्रेम करते असं म्हणाली का ? "" नाही , पण म्हणण्याचा उद्देश तोच होता ..... "" सोड यार ...... पण , खूप प्रेम करतो रे तिच्यावर ... तिला एकदा तरी खूप आठवण येईल माझी आणि येईल ती माझ्याकडे .... माझी आठवणच तिला माझ्याकडे घेऊन येईल ..."" तेव्हा पर्यंत प्रतिक्षा कर ती येण्याची ..... नाही आली म्हणजे आपलं अख्ख आयुष्य वाट बघण्यात घालवं .... "" मी बघेल वाट ..... "" कमाल आहेस यार तू ..... आणि तीही .... जसं मी तुला समजवून समजत नाहीये तसं आदितीलाही काय समजवू ... ती मनातून खुश नाही वाटत ह्या लग्नासाठी , ती हे लग्न तिच्या घरच्यांची मर्जी राखण्यासाठी करत आहे ..... "" हो .... "" भ्याड आहेस तू अण्या ...... ऐकलं भ्याड ......"" हो ..... निघायचं ..... "" इथे थांबून पण काय करायच आता .... चल .... " वाळूतून चालतांना अनुज भरल्या चांदण्याकडे आकाशात बघत होता .... रात्र गडद होत चालली होती .... तो दिवस अनुज आजही विसरू शकला नव्हता ..... म्हणून की काय जुन्या आठवणींना तो उजाळा देत होता .... ================================================================================== *** ‹ पूर्वीचा प्रकरण बकुळीची फुलं ( भाग - 6 ) › पुढील प्रकरण बकुळीची फुलं ( भाग - 8 ) Download Our App रेट करा आणि टिप्पणी द्या टिपण्णी पाठवा Surekha 4 महिना पूर्वी Radheya 4 महिना पूर्वी khup chan.. Tejaswini Choudhari 4 महिना पूर्वी इतर रसदार पर्याय लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने Komal Mankar फॉलो करा शेयर केले तुम्हाला हे पण आवडेल बकुळीची फुलं ( भाग - 1 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 2 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 3 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 4 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 5 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 6 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 8 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 9 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 10 ) द्वारा Komal Mankar बकुळीची फुलं ( भाग - 11 ) द्वारा Komal Mankar