बकुळीची फुलं ( भाग - 9 ) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

बकुळीची फुलं ( भाग - 9 )

रूमची आवराआवर करता करता प्रितमच्या एकट्याची तारांबळ उडाली होती . सर्व पसारा त्याने सोफ्याच्या खाली भिरकावला . खिडक्यांचे पडदे ओढले . त्यावर परफ्युम मारला . साऱ्या रूमभर परफ्युमचा घमघामाट ....

दोन , तीन दिवसांचा मुकामी असा पंधरवाड्याचा पसारा मांडून ठेवेल ह्याची कोणी कल्पना न केलेली बरी .

बाहेर दाराची बेल वाजत होती . आली असावी ही म्हणून प्रितम दार खोलायच्या आधीच काचेतून बघू लागला .
" बापरे सहा वर्षाने भेटतोय आपण .... अजूनही तशीच आहे तू .... बारीक झाली एवढंच ..... का ग नवरा खायला देत नाही की मारझोड करतो .... "

आदिती मात्र कितीतरी वेळ प्रितमकडे बघत होती , किती बदलला होता तो ... आधीचा प्रितम आता राहिलाचं नव्हता . दाढी वाढलेली ... डोळे थोडे खोल गेलेले ... हाताच्या बाह्या ढोपरापर्यंत दुमडलेल्या ... चष्म्याची सक्त नफरत असलेला प्रितम त्या चौकोणी भिंगाच्या ग्लासने एखाद्या तत्वज्ञानी सारखा भासत होता तिला .

" आत ये म्हणशील का मला .... "

" हो .... हो ये आत .... "

" अरे वा .... कोणत्या इंजिनिअरची रूम एवढी नीट & clean असते रे , पसारा वैगरे सारा सोफ्या खाली लोटला वाटतं .... "

" यार आदे तुझी नजर अजूनही आहे तशीच तीक्ष्ण आहे .... तुला आल्या आल्या साऱ्या गोष्टीची खबर तरी कशी लागते ."

" लॉजिक अँड माय ओब्सेर्वेशन इस स्ट्रॉंग ... "

" लॉजिक ते कसं .... "

" आधी पासून पसारा मांडायची सवय होती रे तुला ती सवय गेली असावी का आताशा .."

" कसली भारी आहेस ना यार तू .... मला वाटलं खूप काही बद्दल झाला असावा . "

" माणसं बदलतात का रे ? "

" माझ्या माहितीप्रमाणे तरी ..... बदलतात ... "

" रेवा आणि मालती बदल्यात ना ! "

" परिस्थितीने बद्दलवल त्यांना .... "

" अशी कोणती परिस्थिती आली त्यांच्यावर ? लग्नच तर झालं त्यातच खूप काही बद्दल ... लोक अमाप पैसा आल्यावर बदलतात ... पैश्या सोबत अहंकारही येतो ना रे ! पण रेवा आणि मालती विसरूनच गेल्यात ..."

" तू सुद्धा लग्न झाल्यावर त्याना एकवर्षं कुठे विचारलं होतं ....."
ह्याला काय माहिती त्या एक वर्षात माझ्या आयुष्यात काय घडलं ... कितीतरी वेळ काहीच न बोलता आदिती शांत बसलेली होती .

" काय घेणार चाय कॉफी ? "

" कॉफी .... चल मी बनवते ...."

" नको तू बस्स .... मी आणतो बनवून .... " प्रितम किचन मध्ये गेला कॉफी बनवायला ,

" ये प्रितम तुला माहिती आहे , मी आणि अण्या आज आपल्या कॉलेजच्या टपरीवर चाय पिलो ..."

प्रितम किचन मधूनच ओरडला , " गुड गुड .... मला पण न्यायचं होतं .... ",

" मला कुठे माहिती होतं तू इथे आहेस ते .... नाहीतर तुला घेऊनच गेले असते तिकडे ...."

आदितीची नजर भिंतीवर लावलेल्या चित्राकडे गेली . सोफ्यावरून उठतं आदिती त्या चित्रासमोर उभी राहून चित्र बरक्याव्याने टिपत होती .

" प्रितम अरे साखर थोडी जास्त घालशील .... "

" हो , हो ...... हे घे . " कॉफीचा मग प्रितमने आदिती समोर ठेवला .

" झाली पण लवकरच ..... "

" हो , असा किती वेळ लागतो कॉफी बनवायला .... "

" by the way .... प्रितम , nice पैंटिंग्ज ..... कुणाची आहे रे ही पैंटिंग ? "

" यू नो दॅट .... द ग्रेट ग्रीक पेंटर निकोलस गायजींस ... त्याची पेंटिग आहे ... आणि त्यांच्या ह्या पेंटिग खुप महागड्या देखील आहेत . इथे आल्यावर मी ही पैंटींग बघून नवल वाटून घेत होतो . म्हटलं ही पैंटींग इथे आलीच कशी . काहीतरी चुकीचं कनेक्शन असावं कुणाचं ह्या पैंटींग सोबत .. "

" काय कला असते ना एखाद्यात ..... खरचं खुप कोरीव आणि शिलेदार वळणं घेतली आहेत त्यांनी .... "

" कोरीव आणि शिलेदार काय म्हणतेस .... त्याची ही पेंटिग म्हणजे ग्रीक राष्ट्राची ओळख आहे . जी आता ह्या वॉलची शोभा आहे . "

" बरं बरं मला काही कळतं नाही त्यातलं .... "

" बाकी कसा आहेस ... आणि हा काय अवतार करून घेतलास स्वतःचा . अगदी जंगली विभागात रिसर्च करतो म्हणून जंगली व्हायचं का ? " फटकळ आदिती कशाचा विचार न करता मनात आलं ते बोलली .

तो हसतच ,

" अगं वेळ नाही मिळाला दाढी बनवायला , आय नो ..... तुला अशी दाढी वाढलेली माणसं म्हणजे एखाद्या गुंढ्यासारखी वाटतात .... एकदा म्हटली होती तू मला असं .... "

" हो रे ..... पण तू चेहऱ्यावरून दाढी वाढलेली असली तरी सज्जनच वाटतो दिसायला .शोभतो तुला हा लूक .... असाच राहूदे ..."

" हो आता असाच राहू दे म्हणून सल्ला नको देऊ .... नाहीतर मला त्या जंगलातच संन्यास घेऊन बसायची वेळ येईल .... " दोघेही हसले .

" रिसर्च काय म्हणतो तुझा ..... आणि कशाला रे आदिवासी जीवनावर पीएचडी करण्याच्या भानगडीत पडलास , आयआयटी चा स्टुडंट ना तू ! .... "

" आयुष्यात माणसाला हवं ते ज्ञान मिळवायला कोणत्याच क्षेत्राच लेबल नाही लागत ग ... कला शाखा काय वाणिज्य काय आणि विज्ञान काय देतात माणसाला ज्ञानच .... आपण अश्या मतभेदाने जखडून बसलो ... मला हे जग अनुभवायचं आहे .... कार्पोरेट सेक्टरमध्ये मन नाही लागत माझं ... नको ते पॅकेज नको ती नोकरी .... "