Bakulichi Fulam - 10 books and stories free download online pdf in Marathi

बकुळीची फुलं ( भाग - 10 )


" सॉरी ..... तुला दुखवण्याचा उद्देश नव्हता माझा .... "

" तुझ्या बोलण्याने दुःखी कधीच नाही होत ग मी .... एक सांगू .... "

" हा सांग की , सांगायला काय परवानगी घेतो आहे ... "

" आयुष्य म्हणजे खडतर प्रवास का ग ? निवळ आपल्या वाट्याला येईल तसा जगावा , आठवड्या पूर्वीचा प्रसंग आहे .... इथे यायला निघालो तेव्हा , एक आदिवासी बाई ST मध्येच बाळंत झाली . तिच्या त्या कांठाळ्या बसवणाऱ्या कळानी मलाच गहिवरून आले ... तुला सांगू त्यावेळी मनात असंख्य प्रश्नाने गर्दी केली होती मनात असा कोलाहोल झाला होता प्रश्नांचा . अश्या आदिवासी स्त्रिया डोंगरकपारीत, झाडाझुडुपांमध्ये बाळंत होतात . घनदाट जंगल असो की मुसळधार पावसाळा . त्यांची कुठे सरकारी हॉस्पिटलमध्ये सोय होते ग . अश्याच जमिनीवर लोळत नवा जीव जन्माला घालतात त्या . त्यात एखादीनेच सरकारी रुग्णालयाचा बेड पाहिला असेल ह्याची शाश्वती देखील देता येणार नाही . ती बाई त्या दिवशी विव्हळत होती अक्षरशः बसमध्ये .... मला कळत नव्हतं तीच हे विव्हळण बाळंतपणाच्या यातना होत्या की मरणयातना . म्हणतात , डिलिव्हरी म्हणजे बाईचा दुसरा जन्म ..... यार तिच्या नशिबात नसेलच ग तो दुसरा जन्म .... "

हे सारं ऐकून घेताना आदितीचा अंगावर शहारे आले .... काय झालं असावं त्या बाईचं ,

" म्हणजे , मग ती बाई ...... "

" हो .... मुलाचा रडण्याचा आवाज यायला लागला आणि तिच्या कळा बंद झाल्या ... तिने डोळे मिटले ते कायमचे .... "

" यार , विशींन्न आहे हे .... एक बाईच असते ती निसर्गाच्या फलश्रुतीना झुंज देते ... किती भयान वास्तविकता आहे ही .... "

आदितीे पहिल्यादाच प्रितमला असं भावुक झालेलं बघत होती . ह्या वास्तविकतेने आपल्या मित्राला पार बदलवून टाकलंय असं तिला प्रतिमकडे बघून वाटत होत .

" माणुसकीला धरून ठेवण्याची नाळही त्याच्यातच बघायला मिळाली मला , एकदा शिकारी करणाऱ्या एका इसमाला मी बघितलं आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणालो , '
ऐसे प्राणियों की हिंसा करना गलत बात है .... ' तर तो मला काय म्हणाला माहिती आहे ...."

" काय ? "

" क्या आपने कभी मुर्गी का मांस या उसके अंडे खाये है ? मी आधीतर निशब्द झालो नंतर म्हणालो , ' हा खाये है .... " त्यावर तो बोलला .... " ऐसेही जिंदा रहने के लिए हम ये खाते है .... "

" खूप कठीण जीवन जगतात ते .... "

" हो , आपण कोणत्या बदलांची अपेक्षा करायची त्यांच्याकडून ? भाषा सुद्धा धड हिंदी ना धड मराठी .... मला खूप उशिरा लक्षात आलं त्या बाईच्या मृत्यच कारण . ते लोक हॉस्पिटलमध्ये जात का नाहीत .... "

" पैसे नसतात म्हणून ना ! "

" तेही एक कारण आहे ग पण त्यांची भाषाही डॉक्टरला समजणार नाही . अगं तरुण तरुण मुली लग्न व्हायच्या आधीच गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्युमुखी पडतात . अशिक्षितपणा . आरोग्याची काळजी नाही . आणि त्यांना कोणी समजून घ्यायला तयार नाही . "

" हो यार , त्यांना मुबलक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत ... "

" दोन महिने मी त्यांच्यात राहून त्यांची रहणं , सहन एकूणच बोली भाषा शिकायला लागलो ... थोड कठीण गेलं आधीतर , खायचं ताटातील अन्न समोरचा भुकेला आहे म्हणून ते आपल्या ताटात टाकतील ... त्यांना आपली भूक बाजूला ठेऊन आपल्याला देताना काही वाटणार नाही पण आपल्याला ते खातांना मनात शंका निर्माण होईल , हे पशुच मांस आपण कसं खायचं ? म्हणून ... एका धर्तीवर राहणाऱ्या माणसात एवढा फरक बघायला मिळतो .... "

" अरे , ऐकूनच तर ही परिस्थिती बदलावता येईल आपल्याला.... आणि हा बद्दल आपणच घडून आणवू शकतो... ते कसं बघ...."

" मला माहित्ये... आणि मी तेच करतोय... माझा थेसिस तयार आहेत रिसर्च पूर्ण झाला तरी देखील मी तिथे जात रहाणार आहे... भावनिक ओढीने म्हणून नाही तर त्यांच्या सारखी माणुसकी कुठे तरी मलाही जपता यावी म्हणून ."

" गुड यार... सोबत मलाही घेऊन चल कधी... "

" हो तू येणार अशील तर.... पुढच्या महिन्यात निख्या आणि अण्या येत आहे सोबत . "

" मी पण जमेतो तुला तसं कळवते , निख्याला पण भेटून किती वर्षे झालीत... "

" हो , पण तुझा नवरा वाट बघत असेल तुझी तिकडे.... "

त्याच्या ह्या वाक्यावर आदिती काहीच बोलली नाही ,

" अगं अशी गप्प का आहेस , भांडून आलीस का त्याच्यासोबत... "

" भांडायला तो माझ्या सोबत कुठे असतो.... "

" सोबत नसतो म्हणजे.... तुम्ही वेगळी रहाता का ? "

" डिओर्स झालाय आमचा... " प्रितमला ऐकून धक्काच बसला .

" कधी आणि का ? तू हे आता सांगते आहे मला.... "

" हो , तुला काय सांगू रे.... "

" का मित्र नाही का मी तुझा.... काय झालं होतं डिओर्स घ्यायला ?"

" त्याचं आधीच अफेर्स चालू होतं... "

" बापरे.... हे तुला कधी कळलं ? "

" लग्न झाल्यावर सहा महिन्यांने... तो घरी खूप उशिरा यायचा नीट वागायचा नाही माझ्याशी . खुप वैतागले होते मी त्याच्या अश्या वागण्याला... एका छत खाली राहण्याला तरी काय अर्थ होता ? म्हटलं डिओर्स देऊन मोकळा हो.... मला ही ह्या बंधनातून मुक्त कर.... "

" म्हणजे ...... लग्न झाल्यावर सहा महिन्यातच डिओर्स घेतला का ? "

" हो .... "

" मग एवढी दिवस होती कुठे तू ? "

" कॉलिफोर्नियालाच...... तिथेच जॉब बघितला आणि स्थायी झाले ."

" इंडियात का नाही आली परत....."

" काय केलं असतं इथे येऊन तरी , बाबाला मनासारखा जावई मिळाला होता.... निघालाही तो तसाच..... नाही जायचं म्हटलं होतं मला बाहेर देशात इथेच राहायचं होतं ... पण , नाही... शेवटी त्यांच्या मताने लग्न करून मी एकटेच पडले.... आजही एकटीच रहाते तिथे.... फावल्या वेळात एका NGOसाठी काम करते.... म्हणून एकटे पण कसं तरी जाणवत नाही.... आता ह्या एकटे पणाची भीती वाट्याला लागली आहे ."

" मग लग्न करून घे ना....."

" लग्न.... अजून विचार नाही केला ."

" एकटं जगणं खूप कठीण असतं गं....."

" रीतिरिवाज आणि परंपरांच्या बंधनाने बांधून केलेल लग्न टिकेलच , ह्याची शाश्वती कोण देईल ?? "

" कोणीच देऊ शकत नाही..... परस्परांशी जुळवून घेण्याचा खेळ म्हणजे लग्नगाठ आहे ..."

" हो प्रितम..... "
काहीवेळ शांततेत निघून गेल्यावर ,

" अण्याच तर खूप मोठं कुटुंब आहे म्हणाला तो . "

" हो सुखी आहे तो त्याच्याच कुटूंबात...... "

" तू देखील..... पण ती सोबत नसते रहात का तुझ्या ? "

" मी कुठे सोबत नको राहू म्हणतो तिला...."

" तुझं पटतं ना तिच्याशी ?"

" हो अगं..... पण तिचे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नाच्या आडे येणारा मी कोण ? आणि एक सांगू का आदि तुला..... लग्न झाल्यावर मी तिला कधीच बंधनात नाही ठेवलं , तुला जे वाटते ते कर . सोबतच रहायला पाहिजे असंही काही नाही.... ती माझ्या आईबाबांना घेऊन इटारसिला रहाते . तिचा जॉब तिकडे आहे . ती मी जिथे जाईल तिथे येऊ शकत नव्हती म्हणून म्हणाली , तू तुला जिथे जायचं तिथे जा आई बाबांना माझ्याजवळ असू दे ! ठीक आहे म्हटलं मग मी......"

" किती understanding आहे रे तुमच्यात ...."

" असायलाच पाहिजे .... प्रत्येक नात्यात , तेव्हाच नातं टिकतं . "

" फार तर नाती तुटतात ती अट्टहासानेच आणि इगो .... एखाद्याचा इगो हर्ट झाला तर झालं दावनीला अडकलेल्या गोऱ्या सारखा तो पेटून उठतो .... कशी टिकेल मग नाती ?"

" सोपं नसतं रे नातं टिकवणं आणि ते पूर्णत्वास नेणं....."

" हो.... तुला माहिती आहे कधी कधी खूप फस्ट्रेट होतो ग मी.... सर्व सोडून द्यावं वाटतं....कशाची कमी नाही जीवनात कुठेही नोकरी करून राहू शकलो असतो . पण मी माघार घेतली तर त्या उन्ह , पावसात ज्यांनी अजून पर्यंत घराचं छत बघितलं नाही त्यांचं कसं होईल . "

" तेही खरयं प्रितम , तुला तशी साथ देणारी जीवनसाथी मिळाली तिच्या सहयोगाने तू खूप सामोरे जा..... परत मागे वळून बघू नको.... तुझा प्रवास कोसो मैलाचा आहे , तेव्हा थांबून जाऊ नकोस.... आणि ह्यात तुला कधी माझ्याकडून मदत हवी असल्यास बिनधास्त सांग ..."

" तू आज एवढ्या वर्षांनी मला भेटली तेच काही कमी आहे का माझ्यासाठी.... पण भेटत रहा ग .... आणि हो इकडे शिफ्ट हो आता , काय तो एकटेपणा .... NGO मध्ये इथे ही काम करता येईल तुला.... नाहीच कोणतं NGO मिळालं तर मला जॉईन होऊन जा ! न संपणारी काम असतात माझ्यासभोवती गरडा घालून.... मला वाटतं कधी कधी मी PHD करतोय की नुसता PHD जगतोय ...."

" आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्याकडून आज खुप मोठं इन्स्पिरेशन घेऊन जातेयं.... हा जन्म आणि दिवसाची चोवीस तास माणसाला धडपाड्याला खूप झालीत... जॉईन व्हायचंय तुला , पण यार तू ज्या विभागात रिसर्च करतो तिकडे तुझ्या खाण्याची गैरसोय होत असणार राहतो कुठे तू मग तिकडे खातो काय ? नाही म्हणजे मी तुझ्यासोबत आले तिकडे तर माझी सोय नाही लागणार ना ! "

" ते जे खातात तेच खातो त्याच्या ताटात जे असेल ते.... तिथे आपली मिजास चालत नाही . केळीच कालवण जरी पात्रात वाढलं असलं तरी मुकाट्याने खायचं असतं . कधी रानटी हरीण असो की मग सस्याच मास..... खावच लागत.... तिथे तुला खिचडी त्यावर साजूक तूप , बेसनाचे लाडू कधीच खायला मिळणार नाही..... पण तुला यायचं असेल तर एवढ्या तयारी निशी यावं लागेल..... आणि हो तिकडे बाया नदीवर अंघोळ करतात ."


"कोणी बघितलं तर ?" आदितीला खूप मोठा प्रश्न पडला .

" बावळट..... तुला अजून त्यांची संस्कृती नाही माहिती , जंगलात रहाणारी लोक असलीत तरी खूप सभ्य आहेत ती . कधी कोणत्या बाईकडे वाईट नजरेने बघणार नाहीत , कधी कुणाचं देणं अंगावर ठेवत नाहीत ."

" किती सालस जीवन आहे रे त्याचं..... "

" हो , सुविधा नसल्या त्यांच्याकडे तरी सालस जीवन नक्कीच आहे..... "

" मी दोन महिन्यात इंडियाला सेटल व्हायचा प्रयत्न करते..... नंतर परत ह्याविषयीची सखोल माहिती दे मला .... इथल्या आदिवासी संस्कृतीवर तू जे काही मला सांगितलं ते लिहायचंय टाईम्स एक्स्प्रेसाठी तुझी परवानगी असेल तरच हा.... परदेशीयाना देखील आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटायला हवा..... "

" अगं तू लिहिते आहे हेच खुप भारी फिलिंग आहे माझ्यासाठी , मला असं कोणत्याच प्रसंगाचं वर्णन करून लिहिता येत नाही ते काम तुझं आणि अण्याचं .... आहात तुम्ही दोघे writers लिहा त्याच्याबद्दल आणि मला मेल नक्की कर लिहून पूर्ण झालं की .... आणि काही घटना अगदी जश्याचा तश्या नमूद कर..... "

" हो , तू जे सांगितलं तेच लिहणार .... चल आता निघू का ? खूप वेळ झाला रे घरी जाऊन मला सायंकाळी कॉन्फरन्ससाठी जायचं आहे ....."

" OK व्यवस्थित जा...... आणि पोहचली की टेक्स्ट कर ...."

आदितीला निरोप द्यायला प्रितम तिच्या कार पर्यंत आला . आदिती गाडीत बसली .
प्रितमला एकदा सांगव वाटलं.... अण्या अजूनही तुझ्या प्रतीक्षेत आहे . पण तो तिला असं काही सांगू शकला नाही .

" काही रहालय का..... "

" Okay मी बघून येऊ का एकदा.... "

" नाही थांब .... साधं कळतं नाही तुला ....कुठेतरी हरवलाय तू म्हणून म्हटलं ."

" ओहहह ..... कुठे नाही ..... "

" चलो..... "

" नेक्स्ट टाईम ड्रायव्हर आण सोबत..... "

" का मला येत ड्राइव्ह करता..... उगाच फुकटचे सल्ले नको देत जाऊ ... "

" अगं ड्रायव्हर म्हणजे 'तो' समजली नाहीस का......"

" प्रितम तू पण ना ! okay बाय...... भेटला तर घेऊन येईल जरूर...."


=========================================================


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED