निशांत
(8)
दुसर्या दिवशी सकाळ नेहेमीप्रमाणे उगवली.
चहा नाश्ता करून सुमित बाहेर सटकला
सोनाली पण अनयाचे आवरणे.तिची वेणी फणी डबा या गोष्टींच्या तयारीला लागली..
शाळेत सुद्धा कोणत्याही पुरुष व्यक्तीशी कारणाशिवाय बोलायचे नाही आणि मैत्रीणीना सोडुन पण जायचे नाही असे तिने कालच अनयाला बजावले होतेच
आजही परत ती आठवण केल्यावर अनयाने मान डोलावली
दप्तर घेऊन अनया मैत्रिणीसोबत शाळेत निघुन गेली.
दुपारी जेवण वेळेला सुमित आला आणि काहीही न बोलता जेवण करून परत बाहेर गेला.
इतका सारखा कुठ जात असतो आणि काय करीत असतो हे सोनालीला समजतच नसे.
त्याच्या परीक्षेचे काय ,अभ्यास करतोय का या गोष्टी तर आजकाल बोलायचा प्रश्नच नव्हता.
सोनालीसोबत सेक्स याशिवाय तो आजकाल काहीच विचार करीत नव्हता.
मग सोनालीने स्वतः जेऊन घेतले आणि आवरून बाहेर टीवी पहात होती.
काय चित्र टीवी वर चालली होती याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते.
डोक्यात फक्त विचार चालले होते तिच्या
आता तिला जास्त थांबुन चालणार नव्हते.
अन्वयाचे “भविष्य” संकटात होतेच आणखी अनयाला संकटात टाकायचे नव्हते तिला.
तिच्या स्वतःच्या आयुष्याची तर आता “माती“च झाली होती
सुमित सारख्या पशु सोबत या घरात रहाताना अनयाच्या सुरक्षितततेची “खात्री” देता येत नव्हती.
काय तो “निर्णय” तिला लवकरात लवकर घ्यायला हवा होता.
संध्याकाळी अनया शाळेतुन यायची ती वाट पाहत बसली.
आज तिने अनयाच्या आवडीची खीर पुरी आणि बटाटेवडे केले होते
अनया आल्यावर खमंग वासाने अगदी खुष झाली.
तिने ओळखले तिच्या मम्मा ने काय बनवले असेल
“मम्मा आज इतके सारे माझ्या आवडीचे कसे काय केलेस तु ?
सोनाली फक्त हसली..आणि तिने अनयाचा एक गोड पापा घेतला
जा बेटा हातपाय धुवुन कपडे बदला आणि बोर्नव्हिटा प्या.
नंतर नेहेमीप्रमाणे तिच्यासोबत गप्पा करून ,दोघी माय लेकीनी मिळुन अनयाचे होमवर्क पुरे केले.
जेवताना अनया खुपच खुष होती.
“मम्मा उद्या पुन्हा करशील न माझ्यासाठी बटाटेवडे ?”
उद्याचा काहीच भरवसा नव्हता आता..सोनालीच्या डोळ्यात पाणी आले.
तरीही तिने अनयाला हसुन होकार दिला
मग तिला आपल्या हाताने अनयाला घास भरवले.आणि मग खोलीत जाऊन गोष्टी गाणे म्हणत थोपटत झोपवले..
खुप दिवसांनी मम्माने तिच्या आवडीचे सगळे केले होता ,तिला भरवले होते, तिच्यासाठी गाणी पण म्हटली होती याचे सुख तिच्या चेहेर्यावर दाटले होते.
झोपलेल्या मुलाचा पापा घेऊ नये म्हणतात पण सोनालीला राहवले नाही
ती निष्पाप गोंडस कलिका निर्व्याज हास्य तोंडावर घेऊन झोपी गेली होती.
रात्री नेहेमीप्रमाणे उशिरा सुमित आल्याचे तिला जाणवले
थोड्याच वेळात दारावर टकटक झाली..
आणि ठरलेल्या शिरस्त्याप्रमाणे सोनाली दार बंद करून सुमितच्या खोलीकडे गेली.सुमितची वासना शमल्यावर सोनाली आपल्या खोलीकडे परत आली.सुमित अजुन जागाच होता.
दारूची बाटली तोंडाला लाऊन पीत होता.
रोज सोनाली परत गेली की परत दारू पिऊन झोपणे त्याची सवय होती.
तासाभराने सोनाली उठली आणि खोलीतुन बाहेर आली.
हळुच तिने सुमितच्या खोलीत डोकावले.सुमित “अस्ताव्यस्त” झोपला होता.
ती आत गेली आणि टेबलवर ठेवलेला त्याचा मोबाईल घेऊन खोलीबाहेर आली.
त्याच्या खोलीचे दार लाऊन घेऊन ती स्वयंपाकघरात गेली.
तिने त्या मोबाईल मधील सिमकार्ड काढुन त्याचे बारीक बारीक तुकडे केले.
आणि मग तो मोबाईल एका मोठ्या बत्त्याने फोडुन टाकला.
त्याचे अक्षरशः बारीक तुकडे केले.तिच्या कृतीत खुप राग भरला होता.
मग हे सगळे तुकडे तिने एका कागदात घेतले आणि टोयलेट मध्ये जाऊन संडासच्या पाण्यात तिने ते फ्लश करून टाकले.
मग शांतपणे ती बाहेर आली आणि तिने हात स्वच्छ धुऊन टाकले.
आणि आपल्या खोलीत जाऊन झोपली.
आता तिच्या मुलींचे भविष्य सुरक्षित होते त्याच बरोबर इतर अनेक अनोळखी मुलींचे पण भविष्य कोणीच खराब करू शकणार नव्हते.
तिचे मन समाधानाने भरून आले.
गेले कित्येक महिने असलेला तिच्यावरचा “ताण” आता दूर झाला होता.
तिचे स्वतःचे भविष्य काय होते तिला माहित नव्हते ,पण घराची अब्रू सुरक्षित होती.
ती आता उद्या सकाळ पर्यंत शांतपणे झोपणार होती.
पुढे काय घडेल तिला माहित नव्हते.
पण तिला इतकेच माहित होते की सुमित आता कधीच उठणार नव्हता
कारण काल सुमित येण्यापूर्वी तिने तिच्या झोपेच्या गोळ्यांची पुर्ण बाटली त्याच्या दारूच्या बाटलीत रिकामी केली होती.
आयुष्यातील अचानक आलेल्या भयानक निशेचा तिने “अंत” केला होता.
समाप्त