Nishant - 6 books and stories free download online pdf in Marathi

निशांत - 6

निशांत

(6)

सकाळी सकाळीच तिचा फोन वाजला.

फोनवर अन्वया बोलत होती.

बाबांची खुप आठवण येतेय म्हणत होती

आजी आजोबा मामा मामी कीती प्रेम करतात ,कीती काळजी घेतात हे सांगत होती. आई तु पण तिकडे ठीक आहेस ना ?

स्वतःची काळजी घेते आहेस ना ?असे विचारत होती.

मी ठीक आहे ग माझी काळजी नको करू असे सांगताना

तिचे मन भरून आले ,

मुलीना आजोळचा चांगला आधार आहे हे पाहुन समाधान वाटल तिला.

नंतर अनया होती फोनवर

“अग मम्मा आम्ही इथे इतकी मज्जा करतोय न बस..
चिंकी आणि मुन्ना तर मला सोडतच नाहीत

पण बघ ना..

आता परवाच्या दिवशी तरी मला तिकडे यायला लागेल.

शाळा सुरु आहे न सोमवारपासून.
मामा येतो म्हणलाय सोडायला “

त्या “अजाण” लेकराला वडलांच्या मृत्यूचे गांभीर्य तितकेसे समजलेच नव्हते

“मजा आहे आमच्या पिल्लूची
ये मामा सोबत परत आता, मैत्रिणी सगळ्या वाट पाहत आहेत इकडे तुझ्या “,

मग भावाबरोबर बोलली सोनाली..आणि अन्वया सध्या तिथेच राहू दे असे सांगितले त्याला.

“ताई तु काळजी नको करू अन्वया इतकी रुळली आहे इथे आणि मामीची आणि तिची तर गट्टी आहेच .

तिची मामी तिला इथेच राहा म्हणते शिकायला “

“हो का..बर ते बघू नंतर

तु ये अनयाला सोडायला असे म्हणून सोनालीने फोन ठेवला.

तिला मनातून बरे वाटले ,अमितच्या अकस्मात मृत्युच्या प्रसंगानंतर तिच्या घरच्यांनी मुलींची चांगली काळजी घेतली होती.

या सगळ्या भयंकर गोंधळात पोरीची शाळा जवळ आली आहे हे लक्षातच नव्हते राहीले तिच्या.
आता तिला आपल्या पुढची विवंचना सध्या बाजूला ठेवायला हवी होती.
.अमित गेल्यापासून तिचे घराकडे आणि घराच्या टापटीपीकडे लक्षच राहिले नव्हते
गेल्या महिन्याभरात घराचा नुसता उकिरडा झाला होता.
अमितच्या खोलीत पण भरपुर कचरा करून ठेवला होता त्याने
तो आवरून त्याच्या दारूच्या बाटल्या, सिगारेटी त्याच्या कपाटात ठेऊन दिल्या
चुकुन अनयाने त्या पाहिल्या असत्या तर सतरा प्रश्न केले असते.
तिची आणि अमितची खोली पण स्वच्छ करून तिने बंद करून ठेवली.
खोली साफ करताना त्या खोलीच्या अनेक आठवणी दाटून आल्या.
आता ती मुलींच्या खोलीत अनया सोबत झोपणार होती.
मग पुढच्या दोन दिवसात तिने घराची सगळी साफसफाई केली.
बाहेर बाजारात जाऊन थोडी खरेदी केली
अनयाच्या शाळेची पण थोडी तयारी करून ठेवली.
मधल्या काळात अनया पण चांगल्या मार्कांनी पास झाली होती व आता ती सहावीत गेली होती.
अनयाच्या आवडीचे खायचे दोन तीन कोरडे पदार्थ करून ठेवले.
खाण्याच्या बाबतीत फार चोखंदळ होती ती.!!
मुलींची खोली त्या गावाला गेल्या पासुन बंदच होती ,ती उघडून तिथे पण आवरा आवरी केली.त्यांचे कपडे धुऊन इस्त्री करून ठेवले
वस्तु जागच्या जागी ठेवल्या..
आता घर जरा नेहेमीसारखे वाटूलागले होते.
तिसर्या दिवशी अनया मामा सोबत घरी आली...
आणि समोर मोठा हार घातलेल्या अमितच्या फोटोकडे पाहून
तिने सोनालीला घट्ट मिठी मारली आणि
“मम्मा बाबा कसा गेला ग आपल्याला सोडुन ?
मला त्याची खुप आठवण येतेय असे म्हणून रडु लागली..
तिची समजुत काढणे खुप कठीण गेले सोनालीला
सोनालीच्या भावाने तिला पाहिले तेव्हा तो चकितच झाला
“ताई काय अवस्था करून घेतली आहेस ग स्वतःची ?
चेहेरा किती काळवंडला आहे..तब्येत पण उतरली आहे
काही होतेय का तुला ?”
त्याची काळजी पाहुन सोनाली “कसनुस” हसली
काय सांगणार होती ती हे घरात जे “महाभारत” चालले होते त्याविषयी ?
स्वतःला सावरून डोळ्यातले पाणी परतवून ती म्हणाली
“ मला काही झालेले नाही रे..जरा किरकोळ तब्येतीच्या तक्रारी इतकेच.
“ताई अशी हेळसांड नको ग करू..
आता मुलींच्याकडे तुलाच पाहायला हवे न ?
तुला असे पाहुन त्या कशा बरे सावरतील या दुख्खातून?
आईबाबाना पाठवु का तुला सोबत म्हणून ?”
हे ऐकुन सोनाली एकदम दचकली..आणि म्हणाली
“नको रे नको..मी घेईत आता माझी आणि मुलींची काळजी
तु निर्धास्त राहा “
“सुमित कुठ दिसत नाही बरे
कुठे गेलाय? भावाने विचारले
“अरे मित्रासोबत गावाला गेलाय तो.
येईल उद्या परवा.”
भाऊ निघून गेल्यावर सोनालीला “हायसे” झाले..
भावाची समजूत पटली असे वाटत होते
आता तिच्या आईवडीलाना इकडे आणणे अशक्यच होते..
नंतर दोन दिवस सुमितचा काहीच पत्ता नव्हता.
सोनालीने स्वतः अजिबात फोन केला नाही..
तिला अगदी निर्धास्त वाटत होते
नाहीतरी त्याने घराचा अक्षरशः “कोंडवाडा “केला होता.
दोन दिवस पुर्ण वेळ तिने अनयासोबत आनंदात घालवला.
चार दिवसांनी सुमित परतला.
त्याला पाहून अनयाला आनंद झाला ,

खुप दिवसांनी काकाला भेटत होती ती
काका दिसताच ती बिलगली त्याला..
तिला कस समजणार होते आत्ता तिच्या काकाच्या अंगात“सैतान” आलाय ते दुसर्या दिवशी पासुन अनयाची शाळा सुरु झाली.
तिचे रुटीन, तिचे क्लास ,मैत्रिणी या गडबडीत दोन चार दिवस निघुन गेले.
या अवधीत सोनालीला सुमीतच्या रोजच्या अत्याच्रारातुन सुटका मिळाली होती.
आणि एके रात्री सोनाली झोपेत असताना खोलीच्या दारावर टकटक ऐकु आली दार उघडुन पाहते तो बाहेर सुमित उभा होता.
“गेले आठ दिवस झाले उपाशी आहे मी.चल लवकर माझ्या खोलीत.”
“अरे पण तनया जागी झाली तर काय म्हणेल ?’सोनाली म्हणाली
“नाही ती कारणे नको सांगु दार बंद कर आणि चल माझ्या खोलीत “
सुमितचा आवाज चांगलाच चढला होता.
तनया जागी होऊ नये म्हणुन सोनालीने चटकन तिच्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी घातली.
तिला समजले की यातून आता तिची सुटका नव्हती.
खोलीत सुमित तिच्यावर अक्षरशः तुटून पडला होता..
चुपचाप आवाज न करता सोनाली सहन करीत राहिली.
रात्री कधीतरी ती आपल्या खोलीत परत आली.
सुमितने तिला आता बजाऊन ठेवले की रात्री त्याने बोलावले की ताबडतोब यायलाच हवे..चालढकल चालणार नाही.
आता रोज मध्यरात्री हा प्रकार चालु झाला.
कधी कधी दिवसा तनया घरी नसताना पण सुमितची “लहर” तिला पुरवावीच लागे.
त्या दिवशी महिनाअखेर होती ,

अनयाची सकाळची शाळा होती.
साडेनऊ दहा वाजेपर्यंत परत येणारी अनया एक वाजला तरी आली नव्हती.
आता शाळेत जाऊन पहावे की तिच्या मैत्रिणीच्या घरी जावे अशा विचारात सोनाली होती तोच दाराची बेल वाजली.
दारात अनया होती आणि मागे सुमित..
अनया खुशीत होती “मम्मा आज काका मला शाळेत आणायला आला होता मग आम्ही दोघे “जंगल बुक” सिनेमा पाहायला गेलो होतो
इतका मस्त होता सिनेमा आणि मला काकाने माझ्या आवडीचे स्लाईस आईस्क्रीम आणि पावभाजी खायला घातली “
असे म्हणत म्हणत अनया दप्तर घेऊन उड्या मारत आत निघुन गेली.
तिने सुमितकडे एक नाराजीची नजर टाकली..
“वहीनी..हो अनया घरी आल्यापासुन सुमित तिला फक्त अनयासमोर वहीनी म्हणायला लागला होता
“मी तिकडून चाललो होतो मग लक्षात आले आज तिची अर्धी शाळा असेल मग थांबलो शाळा सुटेपर्यंत.
मग तिनेच हटट केले सिनेमा पाहूया म्हणुन..मी विचार केला दादा गेल्यापासुन पोरीचे काहीच लाड झालेले नाहीत..
मग तिला आवडीचे खायला घालुन घेऊन गेलो सिनेमा बघून येताना .
बघितलेस न किती खुष आहे ती..”
असे बोलुन सोनालीच्या बोलण्याची काहीच अपेक्षा न करीत सुमित शिळ घालत त्याच्या खोलीकडे निघुन गेला.
सोनालीला अतिशय राग आला पण तिचे बोलणे ऐकायला सुमित थांबलाच कुठे
आजची ही गोष्ट मात्र सोनालीला बिलकुल रुचली नव्हती..
तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली होती

क्र्मशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED