एडवर्ड MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

एडवर्ड

एडवर्ड गुडघ्या एवढ्या चिखलतना वाट काढत होता...काळोख होण्याच्या आत त्याला.. त्या जंगलात आसरा शोधायचा होता...फक्त एकट्यासाठी नाही तर ५ ते ६ माणसांसाठी... तेवढ्यातच वादळी पाऊस सुरु झाला...विजा कडाडत होत्या ...मोठमोठी झाडे उन्मळून पडत होती..जेवणाच तर विचारूच नका .. एवढ्या आत काय मिळणार..अंगावर वीज पडण्याच्या आत शेवटी एडवर्डने डोंगरावर एक गुहा शोधली आणि सर्व त्यात आसऱ्याला आले...

अहो नाही मी कथा लिहीत नाही आहे ... पण एखाद्या हॉलिवूड चित्रपट सुरु आहे असे वाटले ना... पण नाही तसे नाही ....हा एक रिऍलिटी शो आहे... आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हा एडवर्ड कोण ??? त्याचे पूर्ण नाव एडवर्ड मायकल ग्रील ...नाही कळले... बेअर ग्रील (सतत उचापत्या चालू असायच्या म्हणून बहिणीने त्याचे नाव "बेअर" ठेवले )....आता समजले !! तोच तो man VS Wild वाला ... हा भटक्या जवळ जवळ सर्व जग फिरून झाला आहे... पण हा तिथली प्रेक्षणीय स्थळ सोडून... जंगलातच जातो ... सर्व दर्या, गर,समुद्र ,आडवाटा पालथ्या घालतो.. कुठे ट्रेकिंग करताना अडकलात तर कसे जगायचे ते शिकवतो ....बेअर ची फिरायची ठिकाणे जेवढी हटके आहे तसेच त्याचे राहत्या घराचे ठिकाण पण हटके आहे... तो थेम्स नदीच्या काठावर एका बार्जवर... म्हणजे एका मोठ्या बोटीवर आणि कधी कधी वेल्स ला एक बेटावर आपल्या बायको आणि तीन मुलांसह राहतो... पूर्ण भटक्या जमातीचा हिरो आहे... त्याने भारतीय सैन्यात भरती होण्याचा त्याचा मानस होता...पण ब्रिटिश नागरिकत्वामुळे कदाचित त्याला ते शक्य झाले नाही.. पण त्याचे खरे स्वप्न होते हिमालयात भटकंती करण्याचे...त्यासाठी तो भारतातही एक ते दोन महिने राहिला होता..

मरणाच्या दारातून अनेक वेळा माघारी फिरला आहे... १९९६ मध्ये झाम्बिया मध्ये पॅराशूट ने उतरताना १६ ००० फुटावरून त्याने उडी मारली पण पॅराशूट पूर्णपणे उघडले नाही काय झाले ते समजले नाही आणि बेअर जमिनीवर आदळला...पाठ तीन ठिकाणी मोडली.. हो हो तीन ठिकाणी डॉक्टरांनीं साफ सांगितले पुन्हा कधी चालता येणार नाही...पण ऐकतो आहे तो बेअर कसला ... त्याने फक्त एक ते दीड वर्ष हॉस्पिटल मध्ये काढले आणि १९९८ ला पुन्हा आपल्या मस्तीतच एव्हरेस्ट चढून गेला ते पण वयाच्या २३ व्या वर्षी... असे अनेक धक्के याने पचवले आहेत.

स्वतःहून संकटात चालून ज़ातो... त्याचे खाणे पाहाल तर तुमच्या पोटातले जे काही आहे ते बाहेर यायला वेळ नाही लागणार...किडे,मुंग्या,साप,विंचू आणि न सांगता येण्यासारखे बरेच काही... एका एपिसोड मध्ये तर तो वाळूच्या वादळापासून बचाव करण्यासाठी मेलेल्या उंटाचे पोट फाडून त्यात लपला हो ता...मधमाशीच्या पोळ्याला हात घातला आणि मधमाशीने थोबाडं सुजवून ठेवलेंना .. कित्येकवेळा तर जंगली प्राणांच्या हातून मरता मरता स्वतः आणि इतर क्रू मेंबर पण वाचले आहेत ..कधी ऍमेझॉन च्या महाभयाण जंगलात...कधी कधी हाड गोठवणाऱ्या थंडीत.. कधी ज्वालामुखी च्या तोंडावर ..अस्सल जंगली आहे तो..एपिसोड मधला सर्वात आवडीचा माझा भाग म्हणजे तो जेव्हा तिथे स्वतः साठी घर बनवतो ते... आणि सर्व झाल्यावर तो आपल्या बुटाच्या तळव्यांतून आपल्या कुटुंबाचा फोटो काढून बघत बसतो... ह्या सर्व धावपळीमागे जी काही ऊर्जा मिळते ती आपल्या कुटुंबाकडून हे तो नेहमी सांगतो... आणि स्वतःला तो नशीबवान हि समजतो जी आवड आहे तीच नोकरी करायला मिळते म्हूणन सर्व काही करतो तो लेखक, मोटिव्हेशनल स्पिकर , जगातल्या सर्व स्काउटचा प्रमुख आणि बरेच काही... .

किती सांगणार एक अवलिया आहे तो भन्नाट आयुष्य जगतो आहे तो आणि धावतो आहे.. घरापेक्षा जास्त वेळ तर हॉस्पिटल मध्ये घालवत असेल... त्याला अश्याच धावत्या आयुष्यासाठी शुभेच्छा..

त्याच्या वेबसाईटला एकदा जरूर भेट द्या

http://www.beargrylls.com/