Gladiator books and stories free download online pdf in Marathi

ग्लॅडीयेटर्स

"ग्लॅडीयेटर्स " म्हणजे रोमन योद्धे आज त्यांच्या विषयी थोडे जाणुन घेऊया.

आपण काही जणांनी रसेल क्रो (हॉलिवूड अभिनेता) ह्यांचा ग्लॅडीयेटर हा चित्रपट पहिला असेलच...त्यात बऱ्यापैकी ह्या "ग्लॅडीयेटर्स" बद्दल त्यांचे जीवन, राहणीमान दाखवण्यात आले आहे...

१) जसे कि आपल्याला माहित आहे..ग्लॅडीयेटर्स रोमच्या कॉलोसीअम (एकप्रकारचे बंदिस्त मैदान त्यात एकावेळी अंदाजे ६० ते ७० हजार प्रेक्षक बसत असत) मध्ये झुजंत असत...ते बहुतेक वेळा एकटे किंवा एका संघामध्ये म्हणजेच ग्रुप मध्ये लढत असत..जो जिंकेल त्याला भरभरून सोने आणि इतर बक्षिसे दिली जात..पण जो योद्धा पराभुत होई आणि जिंवत असे..तो तेथील प्रेक्षकांच्या मर्जीवर किंवा तिथे लढत पाहण्यासाठी हजर असलेल्या राजाच्या किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मर्जीवर जिवंत राही...जर प्रेक्षकांना किंवा राजाला वाटले तो शुरपणे लढला तर..तो राजा हाताचा अंगठा वर करे म्हणजे त्या पराभुत योद्धाला जीवनदान मिळे..पण जर का त्याने हाताचा अंगठा खाली केला तर मात्र जिंकलेला योद्धा त्या पराभुत योद्धाची मान उडवत असे.

२) जर का लढता लढता शूरपणे मृत्यु झाला..तर मात्र त्या योद्धयाला सन्मानाची वागणुक मिळत असे... त्या कॉलोसीअमला असलेल्या एका खास दरवाजातुन त्याला नेला जाई..दरवाजाचे नाव असे "पोर्टा लिबीटीनेसिस" पोर्टा म्हणजे दरवाजा आणि लिबीटीनेसिस म्हणजेरोमन देवी जी मृत्युनंतरचे सोप्सकर पूर्ण करते..

३) पण जरा का एखादा योद्धा घाबरला तर मात्र मृत्युनंतर त्याला असा सन्मान मिळत नसे...एक तर त्याला ओढत नेले जाई किंवा तसेच ठेवले जाई..कारण तो घाबरला होता..आणी तो भित्रा होता..असे रोमन समाज मानत असे आणि अश्या लोकांना जगण्याचा काही हक्क नसतो अशी त्यांची धारण होती.

४) एकदा का "पोर्टा लिबीटीनेसिस" मधुन नेले कि..त्या योद्धाला एका विशिष्ट् खोलित नेले जाई.. तिथे त्याचे ढाल,तलवार आणि इतर काही शस्त्र असतील तर काढून घेण्यात येई..पण जर का तुम्हाला वाटत असेल जर का त्या पराभूत योध्याने मेल्याचे नाटक केले तर ?? त्याची सुटका होत असेल का ??... तर नाही..एकदा का त्याला मृत घोषित केलं कि..त्या राजाचे गुलाम येत असत आणि तेव्हा तो पूर्ण मेल्याची खात्री करण्यासाठी एकतर त्याच्या मानेवर सुरी फिरवली जाई किवां डोक्यात मोट्टा दगड टाकला जाई.

५) जे योद्धे शुरपणे लढून मृत्यू पावत त्यांना हि इजिप्तशियन ममी सारखे अगदी सन्मानाने पुरले जाई..योद्धा कसा लढला त्यावरून त्याची कबर ठरवली जाई ..जे शूर योद्धे असत त्यांना एकटयाने पुरत असत मात्र जे कोणी घाबरत असत त्याना शहराच्या बाहेर नदी नाल्यात टाकले जाई

६) फक्त गुलामच ग्लॅडीयेटर्स म्हणुन लढत नसत.. तर किती तरी स्वतंत्र माणसे स्वखुषीने ग्लॅडीयेटर्स होत असत..कारण त्या ग्लॅडीयेटर्सना रोमन समाजात मानाचे स्थान होते आणि दुसरे म्हणजे मिळणारा पैसा आणि मानमरातब..पण जे कोणी ग्लॅडीयेटर्स होण्यासाठी येत असत त्यांना एकदम कोणी लढाईसाठी मैदानात आणून उभे करत नसत...त्यांना अतिशय खडतर प्रशिक्षण दिले जाई

७) प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार असत..जसे शस्त्रे कशी वापरावे, कसे चालावे, तिथल्या प्रेक्षकांनासमोर जिंकल्यावर किंवा हरल्यावर कश्या प्रकारे उभे राहावे.. आणि जर येनकेनप्रकारे पराभूतच एखादा योद्धा झाला तर त्याने हि अगदी निर्भीडपणे तिथल्या प्रेक्षकांच्या नजरेला नजर द्यावी जेणेकरून..त्याला जीवदान मिळे आणि पुढे तो अजून लढाया करू शके.

८) आणि रोमन लोकांची अजून एक धारणा होती..ग्लॅडीयेटर्स चे रक्त आजारांवर गुणकारी असे त्यामुळे एखादा योद्धा मारला गेला कि काही लोक त्याचे रक्त पिण्यासाठी धावत असत.

९) जसे पुरुष योद्धे असत तसेच स्त्री योद्धे म्हणजे ( Woman Gladiators ) पण होत्या...

१०) कधी कधी रोमन राजे पण मैदानात ग्लॅडीयेटर्स म्हणून येत असत पण अगदी शस्त्रसज्ज होऊनच आणि त्यांचा प्रतिस्पर्धी असे एखादा नवखा योद्धा.. रोमन राजे अश्या लढाईत मारले जाऊ नये म्हणुन अशी काळजी घेतली जाई.

११) ग्लॅडीयेटर्स फक्त माणसांबरोबर लढत नसत तर वाघ, सिंह ,अस्वल का तर आकर्षण आणि काहीतरे वेगळेपणा...पण हि लढत नेहमी होत नसे कधीतरी एकदम खास प्रसंगी होत असे..आणि ती लढत पाहण्यासाठी तिकीट पण इतरवेळेपेक्षा खूप महाग असे.


१२) ह्या ग्लॅडीयेटर्स मध्ये पण काही श्रेणी होत्या जसे कि रेटरीस ( शस्त्रे : त्रिशूळ , जाळी आणि हलके शिरस्त्राण ), मूर्मिल्लो ( शस्त्रे : तलवार,ढाल,मजबुत शिरस्त्राण अंगावर कवच) अजूनही काही आहेतपण मला तरी येवढेच माहित आहेत.

१३) आता आपल्या कामाच्या ठिकाणी जश्या कामगार संघटना असतात तश्या त्या ग्लॅडीयेटर्सच्या पण होत्या...पण त्यासाठी त्या ग्लॅडीयेटर्सना काही विशिष्ट् रक्कम भरून सभासद व्हावे लागे.. ग्लॅडीयेटर्सना पगार होता तसेच लढती दरम्यान त्यांना जे बक्षीस आणि नजराणे भेटत ते पण त्यांना ते स्वतःकडे ठेवण्याची मुभा असे..जर अशा सभासद ग्लॅडीयेटर्सना ना लढती दरम्यान मृत्यु आला तर त्यांची शेवटच्या प्रवासाची काळजी हि संघटना घेत असे..तसेच त्यांचा कुटूंबाच्या पालनपोषणासाठी काही विशिष्ट् रक्कम दरमहा दिली जात असे... जर कोणि असे सभासद नसे आणि त्याचा लढती दरम्यान मृत्यु झाला तर त्यांना प्राणांच्या तोंडी जावे लागे.

असे हि ग्लॅडीयेटर्स रोमन साम्राज्याचे प्रमुख घटक होते..जवळ जवळ ७०० वर्षे हि क्रुर परंपरा चालू होती...

अजून आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर खालील लिंक वर टिचकी मारा..

https://en.wikipedia.org/wiki/Gladiator


समाप्त

हा लेख ऐकीव आणि वाचलेल्या माहितीवर आधारित आहे..काही चुका निश्चितपणे असतील..त्यासाठी माफ करावे आणि चुका निदर्शनास आणुन द्याव्यात

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED