स....टा ....क ... दोन चार कानाखाल्यांचा आवाज घरामध्ये घुमला आणि अजून पाठीवर धपके पडणार तेवढ्यात बाबांनी आईचा हात पकडला. त्याला काय मारूनच टाकणार आहेस का? होते चूक प्रत्येकाकडून त्यांना कुठे माहित होत कि असं काही होणार आहे. हरी तू बाहेर जा रे हातानेच इशारा करून बाबांनी हरीला बाहेर धाडले.
अहो पण ह्यांच्या चुकीमुले त्या निष्पाप जीवाचा काय बरं वाईट झालं तर.
तू नको असा नकारात्मक विचार करू. आणि मनात जागाहि करू नको. तसाही त्यांना जर माहिती असत तर ते तिकडे फिरकले असते का? त्यांना अगोदरच ह्याची कल्पना देऊन ठेवायला पाहिजे होती. हरीचे बाबा मनातच कुजबुजले. काळ वेळ काही सांगून येत नाही ते तिला त्यांच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करू लागले.
रात्रीच्या जेवणानंतर सुमारे साडेआठ च्या दरम्यान हरी आणि बाकी सगळे एकत्र भेटले ते रम्याच्या घरी. गावाकडे सगळे कष्टाळू माणसे दिवसभर मेहनत करतात त्यामुळे संध्याकाळी लवकरच जेवण आटोपतात आणि झोपायची तयारी करतात. सगळे एकदम नाराज होते एकमेकांची नजर प्रत्येकाला घेरत होती.काय बोलायचे कुणालाही समजत नव्हते त्यांना त्यांनी केलेल्या चुकीवर पश्चाताप होत होता.
अरे आपण ऐकायला पाहिजे होत रव्याच. गहिवरून येऊन गोटयाने आपले पश्चातापाचे उद्गार उच्चारले. तो खूप दुखी झाला होता, कारण स्वतः आंब्यावर जाण्यासाठी खूप उत्सुक होता त्याच्या हट्टापाही हा दिवस बघायला भेटला होता. आपण ऐकायला पाहिजे होत यार रव्याचे, का गेलो आपण? त्याला खूप पश्चाताप होता, त्याला रडू आवरेनासे झालेले, त्याला करुणा देण्यासाठी हरीने त्याची पाठ थोपटली, अरे तूच एकटा नाही आहेस, कुठेतरी आम्हीही ह्या गोष्टीला कारणीभूत आहोत. जर आम्ही पाठींबा नसता दिला तर एवढ घडलच नसत.
नाही यार तुमची ह्यात काहीच चूक नाही आहे. मी जर तेव्हाच समजलो असतो की रव्याला कसलातरी भास होत आहे, नाहीतर त्याला कोणीतरी दिसत आहे तर घडलच नसत. तरीही तो मला सावध करत होता, जेव्हा वादळ आलेल तेव्हा पण मला काय माहित ते वादळ संकाटापुर्वी येणारी सूचना होती. आपल्याला तेव्हाच तेथून निघून यायला पाहिजे होत. रम्याने त्याला रव्या बोलेला ते सगळच सांगून टाकलं.
मलासुद्धा आपण घरी आल्यावर रव्या थोडा घाबरल्यासारखा वाटत होता. आणि तू सांगतोय तसही तो बोलला. नकळत आलेलं वादळ आणि त्याला कोण तरी दिसलेलं म्हणजे काहीतरी हालचाल झालेलं त्याला जाणवलेल. पण मला त्याने काही सांगितलं नाही. मला वाटलं त्या वादळामुळे घाबरला असेल. हरीने सुद्धा त्याची दुविधा संदर्भासह स्पष्ट केली. आत्ता चुकी कुणाची होती? तर सगळ्यांनी थोडी कुठे ना कुठे तरी चूक केलेली रव्याला समजण्यात. त्याचाच पश्चातापात ते आपल्या आसवांना मोकळीक देत होते.
जे होत ते आपल्या हातात नसत बाळानो, तो वरती देव आहे ना तो सगळ पाहतोय. सगळ्यांनाच त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळतात. हलक्या व नाजूक आवाजात घरातून बाहेर येत असताना आवाज आला. त्या आजी होत्या. रम्याची आजी. पांढरे केस, नाकावर चष्मा पाठीचा कणा वाकलेला, त्यामुळे उंची सुधा बारीक झालेली, हातात काठी आणि त्यांच्या त्या पांढर्या चेहऱ्यावरील आणि शरीरावरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. हाताचे मांस नरमून गेलेले त्यामुळे त्याच्या हातावर पांढर्या पट्ट्या पडलेल्या. तसं त्याचं वयही तेवढ झाल होत ९० वर्षे पार केलेले आजी तरीपण धडधाकड वाटत होती. मी लहानपणापासून ऐकत आलोय पहिल्या काळातली माणसे ही खूप कष्ट करून घाम गाळून केलेल्या कष्टाचं अन्न खाऊन जीवन जगत. कितीही दूरवरचा प्रवास असो पायी चालत त्या प्रवासाला कठीण परिस्थितीला कधीही दोन हात करण्याची जिद्द होती त्यांच्यात. त्यामुळेच त्यांना एवढ जीवन जगण्याच सुख लाभलं आहे. तयांच्या घामच आणि कष्टाचं चीज म्हणून त्या सर्वांसमोर धष्टपुष्ट दिसत होत्या. आजी बाहेर आल्या आणि मुलांना धीर देऊ लागल्या.
तुमचीतरी काय चूक म्हणा! तुम्ही निघाले तरणीताठी मुले तुमच्या वयानुसार तुमच्या मनाला येईल ते तुम्ही कराल. रम्याची आई तशी फटकळ होती पण वेळ सांभाळून मुलांना सावरण्याचा प्रयत्न करत होती.चला आता खूप वेळ झालाय तुम्हाला आता झोपायला पाहिजे. श्यामच घर रम्याच्या घराच्या बाजूलाच होत त्यामुळे तो लगेच गेला गोट्या आणि हरी दोघे एकत्रच वरच्या अलीला घरी गेले.
क्रमशः