अपूर्ण बदला ( भाग ८ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग ८ )

आपली कर्म आपल्यालाच भोगायला लागतात ह्या जन्मात नाहीतर भविष्यात का फुकट त्या देवाला कोसताय. आत्ता भोगा म्हणावं केलेली कर्म. आजी पुटपुटु लागली. रम्या तू आतमध्ये झोप जा. आईच्या एका आवाजात रम्या बाबाच्या पुढ्यात जावून आडवा झाला.आपलीच कर्म म्हणजे काय हो आई? रम्याच्या आईने आश्चर्याच्या भावात आजीला म्हणजे तिच्या सासुला विचारले.आपलीच कर्म नाहीतर काय बोलू आजीचा आता पारा सुटला, रम्याच्या पंजोबाच्या वेळेचं हे गूढ आता बाहेर येतंय. आणि त्यावेळच गुन्हा! ह्या बारीक मुलांना त्यांची काहीही चूक नसताना भोगाव लागतंय.

आई काय बोलताय तुम्ही? कसल गूढ? आणि काय प्रकरण आहे हे ? काय केलय त्यांनी ? मंगेशचे (रव्याचे वडील) आजोबा आणि सुरेशचे (हरीचे वडील) आजोबा त्यांच प्रकरण बाहेर निघतंय आत्ता. कसलं प्रकरण? मी तुला आता काही सांगू शकणार नाही पण वेळ आल्यावर नक्कीच ह्याचा उलगडा होणार आहे आणि आता वास्तवात ते प्रकरण बाहेर आलाय हे बघतोच आहोत आपण. रव्याची काय गत झाले बघतेस ना? आजीच्या बोलण्याने रम्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. त्यांना आता जरा जास्तच काळजी वाटू लागली होती. त्यांना आजीने म्हणजे सासूने प्रश्नांच्या घोळक्यात भडीमार करून सोडलेलं. तुला आता झोपायला पाहिजे सगळेच झोपलेत तशीही रात्रही खूप झाले असं म्हणून आजी झोपायला गेली.

रम्याच्या आई घराच्या आड्याकडे नजर करून त्याच विचारामध्ये मग्न झाली तिला काही केल्या झोप लागत नव्हती. मनामध्ये खुप प्रश्न होतेच तेवढेच डोक्यामध्ये घोंगावत होते.काय प्रकरण होते? काय केलं असेल त्यांनी? तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. मात्र तिज डोकं खूप ठणकू लागलेलं त्यामुळे त्याच विचारामध्ये ती झोपून गेली.

सकाळी कोंबड्याच्या आवाजाने हरी जागा झाला तसही रात्रभर त्याला नीट झोप नव्हती मिळाली .कुत्रांचे भीतीदायक रडणे ऐकून तो जरा घाबरलेलाच. त्याला सारखा रव्याचा विचार येत होता.रात्रीचे कुत्री रडायला लागली कि कायतरी अघटित घडत असं माणसं म्हणतात. आणि असं पण ऐकलंय कि कुत्रांना रात्री यमदेव माणसाचा मृत्यू घ्यायला येताना दिसतात. त्यामुळे ते रडायला लागतात. त्यांना पुढचं भविष्यच त्यांच्या डोळ्यासमोर दिसतं असच वाटतं. त्या रात्रीसुद्धा कुत्री अशीच रडत होतीत त्यामुळे हरीला नीट झोप नव्हती लागली.

सकाळी घरी कोणी नाही हे त्याला कळायला वेळ नाही लागला. घराचे दार तसेच उघडे होते आणि घरातही कुणाचा आवाज येत नव्हता वेळ न दौडता हरी तसाच घरातून बाहेर आला. बघतोय तर रव्याच्या घरी कसलीतरी गर्दी जमलेली रव्याच घर समोरच होत म्हणून त्याला समजलं त्याची आई सुद्धा समोरच रव्याच्या घरी गेलेली.

आज रव्याची तब्बेत खूपच बिघडलेली. तो एकदम नको तसे वागत होता. हरी जरा घाबरलाच रव्या त्याला त्याच्या भावापेक्षा कमी नव्हता त्यामुळे तो त्याच्या बाबतीत हलवाच होता. नकळत कधी त्याच्या डोळ्यांनी रडायला सुरुवात केली त्यालाच कळले नाही. डोळे पुसतपुसत समोरच्या घरात घुसला. रव्याच त्याच्यावर नियंत्रण राहिलं नव्हतं तो पाय आपटत होता. त्याची नजर सर्वाना घेरत होती. पण ती नजर तीव्र क्लेशकारक आणि संतापलेली होती डोळे लालभडक झालेले डोळ्यांचा खालचा भाग पूर्ण काळसर झालेला. रक्ताळले डोळे बघून सर्वेच चरकून निघालेले.

त्याचं शरीर गार पांढर पांढर झालेलं त्याच्या आईचे रडून रडून हाल झालेले. एकुलता एक मुलगा त्याची अशी अवस्था त्यांना बघवत नव्हती, बाबानी तर कपाळाला हातच लावलेला. रव्याला कसला आजार नाही काही नाही पण त्याच्या वागण्यावरून आणि नकळत बदलेला आवाज घोगरा असा आणि त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून त्याच्या बाबांचा एकच निष्कर्ष निघाला आणि तो स्वाभाविकच होता. तो म्हणजे रव्यावर वाईट शक्तीचा ताबा आहे. त्याला दृष्ट शक्तीने काबुज केले आहे. त्याला ती वाईट शक्ती प्रवृत्त करते, त्यामुळे रव्या अशी वर्तवणूक करत आहे. त्याच्या मनाविरुद्ध त्यामध्ये रव्याची काहीच चूक नव्हती .पण म्हणतात ना "आलिया भोगासी असावे सादर " तशी गत झालेली.

जे समोर संकट आलंय त्याला स्विकारल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता मार्ग नव्हता. जे समोर आहे त्याच निरासन करण भाग आहेच.त्यासाठी त्यांनी गुरुजींना म्हणजेच( मांत्रिक) ला बोलावलं होत.

क्रमशः