अपूर्ण बदला ( भाग ९ ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग ९ )

गुरुजीना पोहचायला अजून वेळ लागणार होता, दुसऱ्या गावात असल्यामुळे त्यांना चांगलाच वेळ लागणार होता, त्यांनी भल्या भल्या भूताना आपल्या बॉक्स( लहान पेटी) मध्ये भरून त्यांना नाहीसे केले होते. त्यांची चांगलीच महती होती. बारा गावाच्या भूतांना पाणी पाजलं होत. रव्याची अवस्था बिकट होत होती तो जोर जोरात ओरडत होता. हरीला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे काय होतंय त्याच्या मित्राबरोबर? त्याला रडू आवरेनासे झालेलं. आपल्या भावासारख्या मित्राची अशी अवस्था कुणाला बघवेल .आणि तो जोरजोरात हुंदके देऊन रडू लागला हरीला असं रडताना पाहून हरीची आई जरा जास्तच काळजीत दिसत होती .तिला चांगलाच माहिती होत रव्या हरीला सख्या भावासारखा होता. म्हणून ती त्याला धीर देत आपल्या घरी घेऊन गेली आणि हरीला समजाऊ लागली.

आई आपला रव्या ठीक होईल ना? त्याला काही होणार नाही ना? तो काकुळतीला येऊन आईला विचारू लागला. आपल्या मुलाला एवढ रडतानां बघून आईच्या पण डोळ्यात पाणी साचले आणि रडत रडतच म्हणाली होरे बाळा. होईल आपला रव्या ठीक. तू रडू नको.आत्ता गुरुजी येतीलच आपल्या रव्याला बघायला मग तो ठीक होईल.तू नको जास्त काळजी करू हा.

मुलाला सांत्वनादेत त्याला रव्या बरा होईल अशी आशा दाखवून आई वापस रव्याच्या घरी गेली. ती पण त्याच भ्रमात होती कि रव्या ठीक होईल पण नियतीने पुढे काय वाढून ठेवलंय हे तरी कुणाला माहिती आहे.जर प्रत्येकाला समजलं कि आपला भविष्यात काय होणार आहे? आणि प्रत्येक माणूस जर दुसऱ्याच भविष्य बघायला लागला तर तो तर मग ह्या सृष्टीचा मालकच होयला पाहिजे. भविष्य सांगणार्यांना स्वतःचंच भविष्य माहिती नसतं आणि ते दुसऱ्याच भविष्य सांगायला रस्त्यारस्त्यावर बसलेले असतात. आणि आपण वेड्यासारखं आपल्या भविष्यच काय होणार आहे आणि भविष्यात काय घडणार आहे हे पाहायला त्या भोंदू ज्योतिषाकडे जातो. जर त्याला आपले भविष्य माहिती होणार असेल तर तो स्वतः रस्त्यांवर दुसऱ्याच भविष्य सांगायला का बसतो? का त्याच्याकडे ऐसपैस गाडी बांगला नाही आहे? हा एवढा कॉमन सेन्स आहे आणि तोच आपल्या लक्षात येत नाही जर आंबानी,टाटा,बिर्ला,हे जर ज्योतिष बघायच्या नादात पडले असते तर इथवर आले असते का? ज्यांना मुलं होत नाहीत ते पण भोंदू बुवांकडे जातात मार्ग काढायला आणि sexually harass होतात. जर तुम्हाला मुलं होत नसतील तर ऍडॉप्ट करा तेवढंच पुण्य लाभेल पण जे काही होत ते आपल्या हातात नसत ते सगळं नियतीवर अवलंबून असत आणि हरीची आईसुद्धा त्याच भ्रमात होती कि रव्या ठीक होईल पण पुढे काय होणार हे तिला तरी कुठे माहिती आहे.

गुरुजी घरी पोहचले होते आणि रव्याचे बेडवर अशा पद्धतीने पडून बघून ते थबकलेच. पण ते डगमगले नाहीत. मगाचपासून त्यांने केलेली हरकते बघून त्यांनी पहिले त्याचे हात पाय बांधले नंतर पुढची प्रक्रिया सुरु केली.

रव्याच्या माथ्याला भुगुती लावली तसे त्याचे डोळे उघडले. आणि तो एकदम चौतालला हात मोडण्याचा प्रयत्न करू लागला पाय आपटण्याचा प्रयत्न करू लागला. सगळीकडे भयाण शांतता झालेली. त्या शांततमध्ये फक्त आणि फक्त गुरुजींचे मंत्र ऐकायला येत होते. प्रत्येक मंत्रावर वातावरणात बदल होत होता.

सगळीकडे अंधार झालेला, जोरजोरात वारा सुटू लागलेला, घराचे दार खिडक्या आदळू लागल्या, घरातील भांडी जमिनीवर आपटू लागली, घरात घोगरा आवाज घुमायला लागला, ए कोण आहेस तू ?आणि काय करतोय इथे? संपुर्ण खोलीमध्ये तो आवाज पसरला. रव्याच्या तोंडातून रक्ताचा फेस येऊ लागला. डोळ्यातून रक्तासारखे पाणी वाहू लागले. चेहरा काळा पडलेला आणि जोरजोरात ओरडू लागला.

त्याची अशी अवस्था पाहून रव्याच्या आईला गरगरल्या सारखं झालं आणि त्या जागीच कोसळल्या.त्यांना सावरण्यासाठी हरीची आई समोर गेली आणि त्यांना घेऊन त्या बाहेर आल्या. मात्र रव्याचे बाबा आणि हरीचे बाबा आतमध्ये त्या गुरुजींच्या मदतीलाच थांबले.

क्रमशः