अपूर्ण बदला ( भाग १० ) Dipak Ringe ।बोलका स्पर्श। द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण बदला ( भाग १० )

तू मला नाही थांबू शकत. मी ह्याला घेऊन जाणार, तूच काय वरून परमेश्वर जरी आला तरी मला काही करू शकणार नाही. चक्क देवाला आव्हान केलं. घोगऱ्या आवाजात आणि ह्यावेळी आवाजात सामर्थ्य आणि क्रूरतेची भावना दिसत होती. गुरुजींनी मंत्र चालू ठेवले. प्रत्येक लांडग्याला वाटत आपण श्रेष्ठ पण त्याला कुठे माहिती होत कि पाठीमागे वाघ पण आहे.गुरुजींच्या मंत्राबरोबर घरामध्ये जोर जोरात विचित्र रडण्यासारखे, गहिवरण्याचे आवाज येऊ लागले. गुरुजींच्या मंत्राचा आणि त्या भुगुतीचा चांगलाच परिणाम त्या वाईट शक्तीवर होऊ लागला. जस जसे गुरुजीनी मंत्रांचा आवाज वाढवला तसतसा रव्याच्या म्हणजेच त्याच्या आतमध्ये प्रवेश केलेल्या त्या वाईट शक्तीवर तीव्र वेगाने वार झाल्यासारखे झाले. आणि त्यांनी त्या वाईट शक्तीला आपल्या ताब्यात घेतले.

त्यांनी त्या वाईट आणि अनावर येईल अशा दृष्ट शक्तीला आपल्या लाकडी चौकटीमध्ये (लहान पेटी) बंद केले .पण त्यांनी त्याचबरोबर सर्वाना सूचित केले कि हि दृष्ट शक्ती पूर्णपणे नाश नाही झाली आहे. ती फक्त आपल्या ताब्यात आली आहे जर हि चुकूनसुद्धा सुटली किंवा सुटका झाली. तर मात्र वापस येईल. ह्या अघोरी शक्तीला पूर्णपणे मारले नाही जाऊ शकत . ह्यासाठी त्यांच्याच प्रजाती मधील पण चांगली शक्ती असेल तीच ह्या अघोरी शक्तीचा नायनाट करेल. असे बोलून त्यांनी ती लाकडी चौकट रव्याच्या बाबांच्या हातात दिली. त्यावर सांगितले त्याच आंब्याच्या झाडाच्या परिसरात जाऊन ह्या चौकटीची विल्हेवाट म्हणजेच पुरायला लागेल.

गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे रव्याच्या बाबानी रव्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी आले. तो बेशुद्ध होऊन तसाच पडून होता, तेवढ्यात हरीच्या बाबानी त्यांना खुणावले आणि म्हणाले चला मी पण तुमच्या बरोबर येतो आणि ते निघाले.आपल्या मुलाच्या मृत्यूला घेऊन. तो रव्यासाठी एक प्रकारचा मृत्यूचं होता.

सांजवातीला सुमारे सातच्या दरम्यान रव्याचे बाबा आणि हरीचे बाबा ती मृत्यूची पेटी (चौकटी) घेऊन निघाले.वाटेत त्यांना आजूबाजूला कुठेही न बघता जायला सांगितलेले त्यामुळे त्यांची संपूर्ण नजर समोर चालण्यावर होती. गुरुजींनी सांगितलेले जर तुम्ही थांबलात नाहीतर पाठीमागं बघितलं तर काहीतरी अघटित घडू शकते, त्या वाईट शक्तीला दुजोरा मिळेल, त्यामुळे त्यांनी ध्यानपूर्वक ती चौकटी त्याच्या आवश्यक घटनास्थळी आणली. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आंब्याच्या झाडाजवळ परिसरातच तिला (चौकटीला) पुरायचे होत म्हणून त्याने झाडाच्या नजदिक कुदळीने खड्डा खणला. ती चौकटी त्यामध्ये पुरली आणि घरी निघताना वापस गुरुजींचे शब्द आठवले पुरल्यानंतर निघताना मागे फिरून त्या चौकटीकडे बघायचं नाही त्यामुळे ते सरळ घरी निघाले.

गुरुजी सुद्धा निघून गेलेले , घरी आल्यानंतर रव्याची आई आणि हरीची आई रव्याच्या बाजूला त्याची शुद्ध येण्याच्या आशेने तोंड पाडून बसलेल्या. डोळ्यातून आसवे टिपत होती. रडून रडून तोंड सुजलेले, डोळे सुजलेले, बाबा घरी आल्यावर हरीच्या आईने त्यांना हातपाय धुवायला पाणी दिल. आणि ते आतमध्ये आले. तसे रव्याच्या आईला आजून गहिवरून आले. तिच्या एकुलत्या एका मुलाबरोबरच का असं घडत होत? त्याने काय कुणाचे वाईट केलेले ? तशी रव्याची आई त्याच्या कुशीमध्ये रडू लागली. आपला रव्या ठीक होईल ना हो ? काही होणार तर नाही ना ?आणि ती दृष्ट शक्ती कोण होती? जी आपल्या मुलाला घेऊन जायला आलेली ? काय बिघडवलंय आपण तीच ? तिला असे खूप प्रश्न पडलेले, पण रव्याचे बाबा शांतच होते. अजूनही त्यांना आता ह्या परिस्थितीमध्ये काही सांगता येणार नव्हतं.

ह्या प्रकरणाचा त्यांनाही तेवढाच त्रास झालेला, तो फक्त समोर दिसत नव्हता एवढाच. कोणत्या बापाला आपल्या मुलाच दुःख कळणार नाही, त्यांना सर्व कळत फक्त ते आई सारखं रडून रडून व्यक्त नाही करत. भक्कम राहून त्याच्यावर तोडगा काढतात. आपला मुलगा एकटाच घरी होता त्या कारणानं हरीचे आई बाबा त्यांच्या घरी गेले. रव्याचे आईबाबा रव्याच्या उषाशी अश्रुना मोकळीक देत त्याची शुद्ध येण्याची वाट पाहत होते.

क्रमशः