कादंबरी - जिवलगा ..भाग- १ ला Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - जिवलगा ..भाग- १ ला

क्रमशा कादंबरी -

जिवलगा

भाग-१ ला

-----------------------------------------------------

नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून गेलेले आहे की ,ऑफिस-ड्युटी करतांना सगळे वातावरण

सतत तणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती ,नेहाच्याच ऑफिस मध्ये काय, तर सगळीकडे आहे . कारण कुठे ही जावे -तिथे असेच वातावरण पहायला मिळते .

आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत , नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे .

सकाळी ऑफिस मध्ये आले की समोर असण्याऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी ,आपण एक यंत्र-मानव बनून "नोकरी" नामक काम करू लागतो . सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत.नेहाने स्वतःच्या मनाशी ही गोष्ट कबुल केली .

"खूप पैसे देणारी-पगारी नोकरी "देणे आणि नंतर जणू या माणसांना आपण जणू खरेदीच केले आहे "अशा थाटात या कंपन्या आणि त्यांची ऑफिस चालू असतात. साहेब असो ,किंवा सोबतचे सहकारी असो, एकच घाई, गडबड चालू असते , दिवस नाही , रात्र नाही , खाजगी जीवन नाही , ऑफिसचा फोन म्हटले की घरा-घरात कर्फ्यू लागल्या सारखे चिडीचूप वातावरण असते .

मिटिंग ,कॉल, प्रोजेक्ट , टार्गेट , ही सगळी कामे ,याचा आणि घड्यातील वेळेचा काही एक संबंध नसतो. जो तो फक्त यातच गुरफटून गेलेला असतो, आपण कधी या यातलेच एक होऊन गेलोत "

काही कळालेच नाही.नेहाला स्वताच्या या अवस्थेची कधी कधी खूप चीड येत असायची , पण,असे चिडून काही एक उपयोग नाही, हे वास्तव ,स्वीकारून शांतपणे कामे करणे "एवढेच आपल्या हाती आहे

असे विचार मनात आले की .."आपण अधिकच थकून जातो " हे नेहाला जाणवत असायचे, मग मोठ्या काशोशीने ती हे विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करीत असे.

या रोजच्या सवयीने ती आता ही बस-स्टोप वर येऊन थांबली होती. रस्त्यावरच्या गर्दीत स्वतःच्या वाहनाने येण्पेक्षा बसमध्ये बसून घरी येणे तिला अधिक बरे वाटे . त्यामुळेच ..गर्दी असली तरी ,

बसण्यासाठी जागा नाही मिळाली तरी , ती बस-मध्ये न बसता ",उभ्याने प्रवास करण्याची तिची तयारी असायची...

बसमध्ये उभे राहून प्रवास करणे म्हणजे "स्त्री साठी किती मोठे दिव्य असते ", ही गोष्ट आता काय सांगण्याची थोडीच राहिली आहे.एखादी स्त्री,एखादी तरुणी ..बस मध्ये उभी असलेली पाहून,

तिच्या भोवती ,मागे-पुढे उभे राहून ..नेत्र-सुख , स्पर्श-सुख ..अगदी ओरबाडून घेतल्यासारखे करणारे लबाड-लांडगे ..टपलेले असतात. अशा लोकांच्या नजरा , होणारे लागट स्पर्श ,जाणवू लागले की मनात संताप साचू लागतो , तिथल्या तिथे .त्या वासुगिरी करणार्याच्या तोंडात एक खाडकन मारून मोकळे व्हावे "असे तीव्र इच्छा व्हायची, पण, असे काही करून स्वतःची अजून मानहानी करून घेण्य पेक्षा सगळ गिळून प्रवास करणे बरे..असा सामान्य विचार करून इतर महिला-प्रमाणे नेहा देखील शांतपणे घरी येत असे.

शुक्रवारची ड्युटी संपली की ..मग दोन दिवस..शनिवार आणि रविवार ..ती स्वताच्या लेडीज होस्टेल-रूम वर न जाता .त्याच शहरात असणार्या तिच्या मावशीकडे मुक्कामास जाते , त्या प्रमाणे नेहा आज तिच्या सुधामावशीच्या घरी आली. मावशीच्या घरी आल्यावर तिला खूप हलके-हलके वाटायचे . मनावरचा ताण कमी झाल्या सारखा वाटायचा . सुधामावशीचे घर म्हणजे तिच्यासाठी तर

"आपल्या माणसाचे घर होते. त्यात रहाणारे तिची माणसे म्हणजे ..सुधामावशी आणि त्यांचे मिस्टर रमेशकाका , या दोघांच्या सहवासात , आणि सोबतीत नेहाला खूप सुरक्षित आहोत असे वाटायचे ,त्यामुळे दर आठवड्याच्या ..शनिवार आणि रविवारची ..ती मोठ्या आतुरतेने वाटपाहत असते .

नेहाची सुधामावशी, आणि रमेशकाका दोघेही सिनियर सिटिझन्स, आपापल्या नोकरीतून निवृत्त होऊन , अगदी सुखाने, समाधानाने निवृत्तीनंतरचे आयुष जगत होते. त्यांना दोन मुले ,ही दोन्ही मुले आपापल्या फमिली सहित ..नोकरीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात स्थायिक झालेली होती. मावशी-काका दरवर्षी काही महिने त्यांच्याकडे जाऊन राहतात ,तिथे ही ते मोठ्या आनंदात राहतात . मुलांनी देश सोडून, ते परदेशी झालेत " अशी तक्रार ते कधीच करीत नाहीत ..हे नेहाला आता माहिती झाले होते मावशी-काकांच्या समाधानी वृत्तीचे नेहाला खूप कौतुक वाटत असे..

सुधामावशीकडे ती आली तो पहिला दिवस नेहाला नेहमी आठवतो ..आणि मनोमन ती मावशी-आणि काकांचे आभार मानते..त्या दिवशीचा प्रसंग ..जसाच्या तसा आज ही डोळ्या समोर उभा राहिला

त्या दिवशी ...

बाकी..वाचा पुढच्या भागात ..भाग -२ रा .लगेच येतो आहे.