Kadambari - Jeevalga - 11 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ... भाग - ११

कादंबरी - जीवलगा ...

भाग - ११ वा .

ले- अरुण वि.देशपांडे
-------------------------------------------------------------------------

मावशींशी बोलून झाल्यावर ,नेहा विचार करू लागली , हे पुढचे तीन महिने, एक अर्थाने आपल्या नव्या आयुष्य-पर्वाची सुरुवात असणार आहे.गेले काही दिवस आपण मावशी आणि काकांच्या सोबत अगदी निर्धास्त होऊन राहत होतो , कसची काळजी नव्हती.आला दिवस मस्त जातो आहे .मधुरिमा या मैत्रिणीच्या सहवासात आपल्यात बदल होण्यास सुरुवात होते आहे , आपण असे का आहोत ? हे आता आपण स्वतः सांगितल्याशिवाय कुणाला कसे कळणार ,? म्हणून सांगतेच आज तुम्हाला .हे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल -नेहा - यु आर राईट , असेच असायला हवे, जैसा देस वैसा भेस ".
एका लहानश्या गावात कायम राहून, घरच्या सुरक्षित तरीही ,कडक ,कठोर नियम पालन करीत आपण कोलेज शिकलो, इंजिनियर झालोत ,हे सगळे खरे असले तरी .आपल्यातील ."बाळबोधछाप युवती ",ठळकपणे जाणवते . पण ,मी तरी काय करणार ..मी कोणत्या घरातली आहे ,माझ्या घरातील सर्व माणसांना आमच्या गावातील लोक ओळखत असत .धड मोठे शहर नाही की की छोटेसे खेडे " असे हे माझे गाव .
मोठ्या प्रतिष्ठित कुटुंबातील मी एक मुलगी , मीच नव्हे तर ..माझ्या सोबत आमच्या परिवारातील म्हणजे माझ्या चुलत बहिणी ,गावातील आमच्या नात्यातील वेगवेगळ्या वयोगटातील मुली , स्त्रिया ", या सार्यांना आमच्या मोठ्या-प्रसिध्द कुटुंबाचे वलय होते , मोठा आदर आणि सन्मान होता आम्हाला आमच्या गावात . .माझे आजोबा , माझे मोठे काका ,माझे बाबा , मोठे चुलत भाऊ ,माझा मोठा भाऊ ..सगळी पुरुष मंडळी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी असल्यामुळे गावातील सर्व लोकात त्यांची उठ-बस असायची ,आमच्या घरातली बाहेरची मोठी बैठक .म्हणजे गावासाठी हक्काची सार्वजनिक जागा होती , सतत माणसे येत .आजोबा,काका ,बाबा ..कायम लोकांच्या गराड्यात चर्चेत व्यस्त असलेले आम्हाला पाहण्यास मिळे.


आता तुम्हीच सांगा - अशा वातावरणात ..माझ्या सारख्या मुलीने गावभर फिरणे , रस्त्याने इतर मुली-मुलांच्या सोबत मोठ्याने हसत -खिदळत जाणे ", हे आमच्यापेक्षा गावातील लोकांना खटकले असते ,आणि काही मिनिटात ..सगळा रिपोर्ट वडीलधार्या माणसांच्या पर्यंत पोंचला असता ..,

आम्ही असे वागायचे नाही , हे लहानपणापासून माझ्या कानावर पडत गेले ..आज्जी,आई,काकू ,मोठ्या बहिणी , गावातील इतर स्त्रिया सतत आम्हा मुलींना हेच बजावत असत . "तुमच्या चूक वागण्याने आपल्या कुणावर मान खाली घालण्याची वेळ आणू नका पोरींनो ",मीच काय ,पण, कोणत्याही घरातील मुलींनी असे वागायचेच नसते ", अशी सरसकट अपेक्षा आमच्या सभोवाटली राहणर्या सर्वांची असायची .
अति धाकामुळे , मोठ्या माणसांच्या भीतीने म्हणा - आमचे काही धाडस झाले नाही ,आम्ही आपले ठरवून दिलेल्या चौकटीत राहिलो ",विरोध करणे ठरवून ही जमले नसते ,कारण माझ्या भवती माझ्याच भावांचा असलेला पहारा , त्यांचे मित्र ,ते देखील माझ्याशी खूप सभ्यपणे बोलत वागत ,

एखादा कुणी आगाऊ आहे असे नुसते जाणवले तरी ..आमचे बंधुराज किंवा त्याचे इमानदार दोस्त -अशा मुलाचा बंदोबस्त करीत .असे असल्यामुळे ..शाळेत काय नि कोलेजात काय , कोण मुलगा माझ्याशी बोलणार ?, हसणे -बघणे तर कोसो दूर.


एकंदर एक रुक्ष मुलगी "असे मधुरिमा मला म्हणते , ते फारसे चुकीचे वाटले नाही मला .मी आहेच अशी, दिसते पण अशीच,

म्हणूनच ती मला अधून-मधून "ओ नेहाकाकू ",म्हणून चिडवते ,त्याचा सुद्धा मला राग येत नाही. आणि राग का बरे यावा ?


जे आहे ते आहेच ..आणि मला यात काहीही कमीपणाचे वाटत नाही . आहे मी काकूबाई छाप ,

नसेल स्मार्ट शहरीमुली सारखी ,याचा अर्थ मी काहीच नाही ? असा कसा होईल ?

एक मात्र आहे.. आता या पुढे मला माझ्यात खूप बदल घडवून आणयचे आहेत , त्यासाठी मधुरीमाची मदत घायची आहे.तिच्या सोबतच आता काही दिवस राहायचे आहे,

मावशी परदेशातून येई पर्यंत.
नेहाने घड्याळात पाहिले ..बापरे ..संध्याकाळचे ६ वाजत आले होते .

.चला ,बाहेर बागेत बसू या ,मावशी आणि काका वाट पाहत असतील ,त्यांच्यासाठी कोफी घेऊन जाऊ या ,

गप्पा रंगवण्यात कॉफी खूप मदत करते ...

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढील भागात .

.भाग -१२ वा , लवकरच येत आहे...

-------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी - जीवलगा ... भाग - ११ वा .

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

.९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED