कादंबरी- जिवलगा ... भाग - ४ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा ... भाग - ४

धारावाहिक- कादंबरी -

जिवलगा ...

भाग - ४ था

.ले- अरुण वि.देशपांडे

------------------------------------------------------

आज सुरु झालेला हा प्रवास अनेक अर्थाने नेहाच्या आयुष्याला नवे वळण देणारा ठरणार होता . आतापर्यंत घरातल्या माणसांच्या सोबत प्रवास करण्याची सवय असलेल्या नेहाला , पहिल्यांदा एकटीने प्रवास करायचा होता , नाही म्हणायला तिच्या गावाहून निघणारी ही बस असल्यामुळे , आज तिच्या सोबत असणारे प्रवासी खूप ओळखीचे नसले तरी ,बहुतेकांची तोंड ओळख नक्कीच होती. कारण ही तिच्या गावातलीच माणसे होती , आणि लेडीज -प्रवासी म्हणून आलेल्या मुली तिच्याच शाळेतल्या, कॉलेजमध्ये शिकलेल्या होत्या . यामुळे तसे भीतीचे दडपण मनावर येण्याचे काही कारण नव्हते.इतर सह-प्रवासी नेहाला जरी फारसे ओळखत नसले तरी त्यांना कल्पना होती ही मुलगी आपल्याच गावातली आहे.लहान गावात राहण्याचा हा खरे म्हणजे खूप मोठा आधार असतो. पण आजच्या बदलत्या परिस्थिती मुळे माणसे असलेल्या ओळखी ..दाखवायच्या की नाहीत हे अगोदरच ठरवत आहेत , याचा फटका आता कुठे ही आणि कोणत्या ही ठिकाणी राहा ,एखादे वेळी नक्कीच बसतो.
आता प्रवास करतांना नेहाला झोप येत नव्हती , स्लीपर कोच असल्यामुळे बस मध्ये अंधार होता .आपापले फोन सुरु करून जो तो त्यात गुंगून गेला असणार हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. नेहाला आत या वेळी तरी फोन चालू करून पाहण्याचा , मेसेज करण्याचा अजिबात मूड नव्हता, कारण मन अस्थिर होते तिचे.त्यामुळे काहीच न करता , डोळे मिटून शांतपणे पडून राहणे हाच उत्तम उपाय करण्याचे तिने ठरवले .


आणि तिला तिच्या शाळेतील मराठी शिकवणाऱ्या बाईंची आठवण झाली ..

त्या वर्गात शिकवतांना नेहमी प्रवासा बद्दल भरभरून बोलत असायच्या . त्या म्हणत ..प्रवास करणे म्हणजे ..अनुभव-संपन्न होण्याची दरवेळी मिळणारी एक नवी संधी असते . प्रवास छोटा असो- मोठा असो, दूरचा असो- जवळचा असो , प्रत्येक प्रवासात सोबतची माणसे , प्रवासात घडणारे प्रसंग , घडणाऱ्या घटना , अचानक उद्भवणारे प्रश्न , अडचणीच्या प्रसंगावर कशी मात करायची असते ?या अशा अनेक गोष्टींचे व्यावहारिक ज्ञान ..आपल्यातील माणसाला अनुभव-संपन्न करणारे असते.


प्रवास म्हणजे आपल्या कक्षा विस्तारित करण्याचा प्रयत्न करणे , नित्य नव्या रुपात जग आपल्याला पाहायला मिळत असते , आपल्या देशातील, संस्कृतीतील विविधता ,अनेकता मे एकता " " ही ओळख किती सार्थ आहे , हे जाणवून घायचे असेल तर आपण आपला देश अगोदर पाहायला हवा , हा प्रवास खूप आनंदायी आहे" असे नक्की म्हणाल.
बाईंचे हे सांगणे तिला इतक्या वर्षानंतर आठवले ..

खरेच .. आज आपण ज्या प्रवासास आरंभ केला आहे ..तो काही हौशी प्रवासी म्हणून नाहीये , तर ..एका अर्थाने पोटा-पाण्याच्या उद्देशाने आपण बाहेर पडलो आहोत , नोकरी करून , पुढे खूप शिकून ..काही मिळवायचे आहे आपल्याला ..त्या साठी हा प्रवास आहे आपला .नेहा विचारतच गुंगलेली असतांना तिला तिची
बस थांबते आहे असे जाणवले ,आणि आतले लाईट्स पण लावले गेले . बस सोबतची क्लीनर वगेरे माणसे .मोठ्या आवाजात सर्वांना सांगू लागली ..अर्धा तास थांबणार आहेइथे ,जेवण, चहा -पाणी ,करून घ्या , ज्यांना फ्रेश व्हायचे त्यांनी फ्रेश होऊन यावे.


सगळ्या प्रवाशांच्या सोबत नेहापण बस खाली उतरली . रात्रीचे बारा वाजत आलेले , इतक्या रात्री खायचे ? तिला तर अजिबात भूक नव्हती , रिकाम्या खुर्च्या होत्यात्यातील एक खुर्ची घेत ते बसली , या रस्त्या वरून जाणर्या प्रवासी बस थांबण्यासाठी हीच जागा जास्त सोयीची असावी,असे थांबलेल्या बस पाहून वाटत होते . कमीत कमी १५-२० बस तरी थांबलेल्या दिसत होत्या , काही मुंबई -पुणे जाणाऱ्या ,तर ,काही तिकडून आलेल्या ,सगळ्याच बस प्रवाशांनी भरलेल्या नसाव्यात बहुदा , कारण खाली दिसणारे प्रवासी चारशेच्या आसपास तरी नक्कीच होते .

इतक्या बस एकाच वेळी थांबत असल्यामुळे हे हॉटेल जोरात चालत आसवे , हे तर दिसत होते , शिवाय इथली फूड -क्वालिटी पण छानच असणार ,त्याशिवाय का प्रवासी इतके खाणार इथे ?
नेहा हॉटेल मध्ये बसलेल्या माणसांकडे पहात होती..इतक्या रात्री सुद्धा ..मनोसक्त जेवण करणारी मंडळी दिसत होती.. आणि भट्टीवर तयार होणारे पदार्थ , त्याचा सगळीकडे पसरलेला - सुटलेला खमंग वास ,पाहूनच खाण्याची इच्छा होत असणार.
दाल फ्राय , रोटी, अंडा करी , तंदूर रोटी , मसाला बैगन , प्लेन राईस , व्हेज -बिर्याणी ..
अशा ऑर्डरी कानावर येत होत्या ,आणि ते ऐकून भट्टीवर काम करणारी माणसे ,समोरच्या शेगडीवरील तयार होत असलेले गरमा गरम पदार्थ प्लेट मध्ये देऊन..वेटर ला सूचना देत होते

हे भाऊ ,निस्ते बघत काय राह्य्लास ? ..कस्टमर कडे ध्यान दे जरा..मग

ते तरबेज वेटर पटापट - १ नंबर ५ नंबर , १२ नंबर .अशा टेबलावर डिश ठेवत होते.ज्यांना जेवायचे नव्हते असे प्रवासी रंगी-बेरंगी पाकिटे घेऊन .खमंग पदार्थ खात खात इकडे तिकडे फिरत होते.रात्रीच्या वेळी चहा हवा असणारी चहाबाज पब्लिक .गरमा गरम घोट घेत , आपापल्या बसच्या आजू बाजू भवती फिरत होते .
एकेक ड्रायवर गाडीत येऊन बसल्यावर दोन तीन वेळा होर्न वाजवत प्रवाशांना आवाज देत होता , तसे तसे एकेका बस मधले प्रवासी बसले याची खात्री करून घेतली की बस स्पीड मध्ये आपल्या रस्त्याला लागायची.
सगळ्यांचे कसे मस्त आणि आरामात चालू होते ..

नेहा पण तिच्या बस मध्ये जाऊन बसली, पाठोपाठ इतर प्रवासी येत आहेत असे तिला जाणवत होते ..पण .अचानक ,बाहेर आपल्या बस भवती काही गोंधळ सुरु झाला आहे, मोठ्या आवाजात

खुपजण एकाच वेळी बोलत आहेत , काय झाला असावे ? काही तरी मेजर प्रोब्लेम नक्कीच झालेला आहे, त्याशिवाय बस निघण्यास उशीर झाला नसता ..

अरे देवा ..आता काय हे ? कधी निघणार बस ?

खाली उतरून पाहायला हवे..,तरच डिटेल कळतील ..असे ठरवून नेहा बस खाली उतरली ..

आणि पाहते तो काय ?......

-------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी..वाचा पुढील भागात ..

भाग - ५ वा लवकर येतोच आहे.