Kadambari - Jivlagaa - 8 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - जिवलगा .. भाग - ८

कादंबरी - जिवलगा ...

भाग - ८ वा .

ले- अरुण वि.देशपांडे
----------------------------------------------

मावशीच्या घरी येऊन आता नेहाला सहा महिने झाले होते . सुरुवातीच्या दिवसातील काही आठवणी , इथे सेटल होण्यास लागणारा उशीर ,याचेच विचार नेहाच्या मनात येत असत. मधुरिमाच्या सोबतीने इथल्या वातावरणात रुळण्यास तशी तर तिला खूप मदत होत होती . एका अर्थाने मधुरिमामुळे तर तिचे हे नवे आयुष्य -फार अडचणी न येता सुरळीत सुरु झाले होते . इथे आल्याच्या पहिल्याच दिवशी मावशी आणि काकांच्या हॉस्पिटल मध्ये असण्याने खरे तर नेहाला मधुरिमा सोबत राहावे लागले ,ते तिच्या पुढच्या दृष्टीने खूपच उपयोगाचे ठरत होते.


साधारण दोन-तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल ही ..त्यादिवशी ..मावशी आणि काका .कुठल्याश्या कार्यक्रमाला जायचे आहे म्हणून ,दिवसभर बाहेर असणार होते.त्यांच्या जेष्ठ नागरिक संघाचा काही विशेष कार्यक्रम होता ",म्हणून त्या दोघांना जायचे होते. ती दोघे बाहेर पडली आणि आता दिवसभर नेहा आणि मधुरिमा एकमेकींना सोबत करणार होत्या.
दिवसभर घरीच असणार्या मधुरीमा बद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता नेहाला कधी पासूनची होती ,त्यांची मैत्री तशी नवी-नवीच असल्यामुळे मधु कितपत सांगेन याची शंका होती म्हणून, नेहा त्याबद्दल काही बोलत नव्हती ..पण, आज तिच्याबद्दल जाणून घ्याचे असे नेहाने मनोमन ठरवले होते.

मावशींच्या रो-हाउसमधल्या वरच्या ३ रूममध्ये मधु राहत होती ..आणि खालचा पूर्ण भाग मावशीच्या घराचा होता .
काही नोकरी न करणारी , दिवसभर घरीच असणारी रीमा , नेहाच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय ठरली होती ..ही नेमके काय करते,?

रीमाच्या फमिली-लाईफ बद्दल काहीच अंदाज करता येत नव्हता , ही लग्नाची आहे की -बिन-लग्नाची ? इथे एकटीच का आणि कशासाठी राहत असावी ?

एक न अनेक प्रश्न नेहाच्या मनात गर्दी करून होते.


मावशी आणि काका बाहेर पडले , नेहाने घरातली आवारावर केली आणि टीव्ही समोर बसली , तोच,

रीमा आत येत म्हणाली ..काय नेहा , आज तू घर सांभाळणार आहेस दिवसभर , म्हणजे, आता माझी जबाबदारी शेअर करू शकणारी सोबत मला मिळाली आहे ,
आज खूप मोकळा वेळ आहे खूप बोलता येईल, खूप काही सांगता येईल ,इत्के दिवस मी एकटीच असायचे ,पण यापुढे तुझी सोबत असणार आहे.

नेहा - एकटेपणा फार घटक असतो , मन पोखरून टाकत असतो , अशावेळी सोबतीला कुणी असणे "हाच सर्वात मोठा आनंद असतो बघ.
यावर नेहा म्हणाली -रीमा - माझ्या सोबत असण्याने तुला इतका आनंद झालाय, हे सांगितलेस ,मला खूप आनंद झाला हे ऐकून.

आज आपण एकमेकी बद्दल बोलू या ..तू मला विचार , मी तुला विचारेन ..चालेल ना असे ?
अग,का नाही चालणार नेहा , मला तर आवडेल , तुला माझ्याबद्दल आपलेपणा वाटतो आहे हे जाणवतंय मला ,

सहवासात माणसे आले की हे असे सगळे जाणवायला लागत बघ नेहा .


रीमा - तू तुझ्या बद्दल सांग मला .. नेहा म्हणाली

जरूर सांगेन नेहा - पण त्या साठी अगोदर समोर खाण्यासाठी छान छान तयार करून इथे ठवू या.

.म्हणजे पोटभर खाता खाता .आपल्या गप्पात रंग भरू या.रीमाने फर्माईश केली .

ओके रीमा - छान गरमा गरम पोहे करते मी, गावाकडे करायची सवय आहे मला .

माझ्या हातचे कांदे -पोहे आज खाऊन तर बघ ,खूप आवडतील तुला ,आत्ता करते ,


ओहो नेहा - मला वाटत होते ..तुला फक्त खाण्याची आवड आहे, आज कळले- तुला खाण्याचे -करण्याची आवड पण आहे .

.तुला सांगते नेहा - जी बाई किचनमध्ये रमते ,तिला जगात कुठे करमत असते. आणि

ज्याला ,इतर माणसांना गोड बोलून ,प्रेमाने खाऊ घालता येते ..त्याला माणसांना कसे जिंकायचे ",हे शिकवावे लागत नसते .

तुझे हे खास इन -हाउस रुपडे खूप आवडले .


थांक्यू रीमा - इतक्या मोकळेपणाने ,मनभरून कुणी कौतुक करते " हे गोष्ट माझ्यासाठी नवीनच आहे.

आमच्या घरात "घरातल्या माणसांचे कौतुक, घरातल्या माणसांनी करायचे असते ",ही पद्धतच नाहीये.

वर्षानु-वर्षे .आमच्या घरातील स्त्रिया ,माझी आज्जी ,माझी आई , माझ्या आत्या .. या सगळ्या जणींचा सुगरणपणा ,

घरातील गृहिणींचा कर्तबगारपणा ,याबद्दल घरातील पुरुषांनी कधी कौतुकाचे शब्द , एखादी दाद दिलीय .असे मी तरी अजून पाहिलेच नाही...


घरातील बायकांनी हे असे असलेच पाहिजे " हे गृहीत धरूनच घर-गृहास्ती चालते आमच्याकडील बहुतेक घरात .

कितीही मनापासून करा , जीव ओतून करा , त्याबद्दल "छान झाले बरे का , बेत फक्कड जमलाय , असे शब्द कधीच कुणाच्या तोंडातून बाहेर पडत नाहीत .

बाहेरच्या जगात याच पुरुषांना त्यांच्या शब्दांबद्दल पैसे मिळतात , त्यांनी आपल्यासाठी बोलावे म्हणून लोकांना पैसे मोजावे लागतात , फीस आहे ती त्यांची .

पण, हीच माणसे घरातल्या त्यांच्या जवळच्या माणसासाठी एक शब्द कधी कौतुकाचा बोलत नाहीत .

रीमा .आज तुझ्या कौतुकांच्या शब्दाने मला आनंद झाला आहे हे ठीक,

पण, माझ्या आईला ,आज्जीला हे असे कधीच ऐकायला मिळाले नाही " त्यांना किती वाईट वाटत असेल ",त्या त्यावेळी हे मला आज उमजते आहे.


नेहा - पळसाला पाने तीन " ही म्हण माहिती आहे न तुला , सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच वातावरण आहे घराघरात ,

स्त्री-पुरुष .या नात्यात ..स्त्रीच्या वाट्याला असेच उपेक्षित स्थान देण्यातच पुरुषांनी कायम आनंद मिळवला आहे .

प्रत्येकघरात .स्वरूप वेगवेगळे असते ..पण साम्य एकच ..चार भिंतीचे जग तिच्यासाठी.

आज भले ही स्त्रीचे जग खूप विस्तारलेले दिसते आहे, सगळीकडे तिच्या अत्य्युच यशोगाथा ऐकू येतात, वाचायला आणि पाहायला मिळतात

.पण, अजून ही ..अशी घरे आहेत ज्यात स्त्री .बंदिनी आहे...

.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचा ..पुढील भागात .

.भाग -९ लवकरच येत आहे.

---------------------------------------------------

कादंबरी - जिवलगा ...

भाग - ८ वा .

ले- अरुण वि.देशपांडे - पुणे.
9850177342

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED