novhel - Jivlaga - 2 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग - २

लेखक- अरुण वि.देशपांडे

क्रमशा : कादंबरी -

जिवलगा ..

भाग - २ रा

----------------------------------

शुक्रवारी रात्री ऑफिस संपवून आलेली नेहा ,सोमवार सकाळपर्यंत तिच्या सुधामावशीच्या घरी अगदी निश्चिंत मनाने राहायची . ऑफिस आणि ऑफिसचे काम ,त्यातली

दगदग , त्यामुळे मनावर येणारा ताण " हे सगळ ती या सुट्टीच्या दिवशी पूर्णपणे विसरून जायचे " हे ठरवून टाकायची, कारण, ऑफिस मधून येतांना तीच काय आपल्यासारखे

इतर देखील .अगदी मरगळून गेलेल्या मनाने आणि थकून गेलेल्या शरीराने घरी येत असतात हे ती रोजच पाहत असे.

घरी आपल्या माणसात आल्यावर मनाला थोडे बरे वाटते , अस्थिर चित्त थाऱ्यावर येते.

आणि मग घरात आणि आपल्या आजूबाजूच्या जगात काय चालू आहे सध्या ?, हे जाणून घेण्यास मन भानावर येते .

असेच यांत्रिक जीवन आपण जगणार आहोत का ?

आपले आयुष्य या पुढे असेच एकसुरी असणार आहे का ?

नेहाच्या मनात असे निगेटिव्ह विचार आले की ते अधिकच अस्वथ होऊन जायची.

आता दोन वर्षे झालीत , आपल्या गावाला , आई-बाबांना सोडून ,घराला सोडून या शहरात येऊन .या महानगरीत लाखोंच्या संख्येत आपली पण नगण्य अशी भर पडली .

नोकरीच्या निमित्ताने या शहरात आलोत आपण. किती लवकर इथल्या सगळ्या गोष्टी आपल्या सवयीच्या होऊन गेल्यात , इथे येण्या अगोदर वाटले नव्हते ,उलट वाटायचे आपण तसे छोट्याच गावातून आलेलो आहोत , इथल्या भूल-भूलायेय्या दुनियेत, चटपटीत ,हुशार ,स्मार्त लोकांच्या सोबत आपला निभाव कसा लागणार ? मनात खूप भीती होती , कमी झाली आता भीती ,पण,

पूर्णपणे मनातून गेली नाही हे पण तितकेच खरे.

आपल्या मनात कायम एक कोम्प्लेक्स असतो, आपण या सगळ्यांच्या मनाने कमी पडतो.

आपल्या सोबत काम करणाऱ्या समवयस्क मुली, मोठ्या स्त्रिया ,किती धीटपाने वागतात ,कुठे

लाजत नाहीत की बुजत नाहीत , बोलण्यात किती सफाईदारपणा आहे, समोरच्या माणसावर

पटकन इम्प्रेशन पडेल असे आकर्षक राहणे , किती म्हणून नव्या गोष्टी आपल्याला या पुढे

शिकाव्या लागणार आहेत.

नेहाला कधी कधी कॉलेजचे दिवस आठवायचे ..

आजोबांच्या जुन्या आणि आग्रही मताकडे दुर्लक्ष करून ,तिच्या बाबंना तिला दुसरीकडे कोलेजसाठी म्हणून पाठवणे जमणे शक्य नव्हते

पण त्यातल्या त्यात एक झाले की ..आपल्याच गावातील इंजिनीयारिंग कोलेज मध्ये प्रवेश घेतला तर, नेहाच्या पुढील शिक्षणाला आमचा विरोध नाही ", असे आजोबांनी निक्षून सांगितले ,

त्यांचे ऐकून सर्वांना वाईट वाटण्यापेक्षा आनंदच झाला. की,हे तर ठीक आहे ,

मोठे कॉलेज नाही तर नाही , इथेच राहून बी. ई तर करता येईल , बाबंना पण शिक्षणासाठी फार खर्च करावा लागणार नाही ", हे पण खरे होते.

नेहाने तिच्याच शहरात असलेल्या कोलेज मध्ये प्रवेश घेतला ,हे कोलेज सुद्धा चांगलेच होते . गेल्या पिढीतील तिच्या काकांनी आणि आताच्या पिढीतील तिच्या चुलत भावंनी

याच कॉलेजातून तर बी .ई केलेले होते..

आज ते चांगल्या कंपनीत जॉबला होते. पण , म्हणतात ना.. जे दुसरे करतील -तेच आपल्याला पण करावे वाटते. नेहाच्या इतर मैत्रिणी आणि मित्रांनी .पुणे, मुंबई गाठले ,

सुरुवातीला नेहाला -आपल्याला असे मोठ्या कोलेज मध्ये शिकायला मिळणार नाही या गोष्टीचे वाईट वाटले ..पण, मग हळू हळू तिला या गोष्टीचा विसर पडला

आजकालच्या पद्धती प्रमाणे शिक्षण पूर्ण झाले की ..नोकरी करणे आवश्यक झाले आहे , मुली नोकरी करून ,स्वतःच्या लग्नासाठी पैसे साठवतात , स्वतःचे लग्न सुद्धा स्वतःच

जमवतात ", या गोष्टी आजोबांच्या कानावर येतच असत . पण, मते जुनी असली तरी ,नेहाचे आजोबा बुरसटलेल्या विचारांचे नव्हते , नव्या बदलांना स्वीकारले पाहिजे ,

जे हिताचे असते ,ते स्वीकारून पुढे जाणे "त्यातच आपली प्रगती असते ", हे गोष्ट ते नेहाला सागत असत.

त्यामुळे नेहाला नोकरीसाठी म्हणून मोठ्या शहरात येण्यास तसा कुणाचाच विरोध नव्हता .

बी ई,नंतर नोकरी करीत करीत एमबीए .पण करू या , त्याचा पुढे करियरसाठी मोठा उपयोग होतो , नेहाला या गोष्टीचे महत्व पटले होते . सर्व संमतीने नेहा आपले गाव सोडून जाणार

हे नक्की झाले , मुंबईला तिची मोठीमावशी -सुधामावशी आणि रमेशकाका रहात होते . त्यांच्याकडे नेहाच्या राहण्याची सोय होणार होती, त्यामुळे नेहाच्या आजी, आणि आई दोघी

अगदी निर्धास्त झाल्या होत्या . आपल्या तरुण-पोरीवर .अनुभवी मावशीची नजर असणार , वडिलधारे माणूस म्हणून रमेशकाकांचे लक्ष असणार ", या भावनिक आधाराने नेहाच्या

घरातील माणसांचे मन खूप हलके हलके झाले होते आणि नेहाच्या मनावर अजिबात दडपण नव्हते .

कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करणे , ती करीत असतांना मनाला खूप आवरावे लागते ,

सावरावे लागते तरच समजून उमजून मार्ग काढणे आपल्याला जमत असते “,

नेहा “, तू तुझ्या स्वभावला आवर बाई, सगळ्या गोष्टींची फार घाई असते तुला . समोरच्या माणसावर लगेच विस्वास बसतो तुझा . असे नको करू बरे का .

पत्येक गोष्टीची खात्री करून घे , मग ती चांगली की वाईट “,हे ठरव .

कारण या पुढे निर्णय घेणे तुझ्या हातात असणार आहे .

तुझ्या मनात काही गोंधळ झाला तर, सुधा मावशी आणि रमेश काकांना विचारीत जा.

नेहाची आई तिला समजावून सांगत होती.

ती मोठ्या आनंदाने सुधामावशीकडे जाण्यास , राहण्यास तयार झाली , तिथे गेल्यावर जॉब मिळेपर्यंत मावशीकडे राहयचे , मग पुढचे पुढे ठरवू ", नेहाने हा स्वतःचा निर्णय

मात्र मनातच ठेवला . याची चर्चा आता नकोच. ...

आणि सर्व तयारी पूर्ण करून नेहा आपल्या आयुष्य -प्रवासातील एका नव्या वळणावर उभी राहिली..पुढे काय ? आज तरी काही कल्पना नव्हती नेहाला ....

..........---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढील भागात...

भाग - तिसरा ..लवकरच येतो आहे.

क्रमश : कादंबरी - जिवलगा ..

ले- अरुण वि.देशपांडे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED