धारावाहिक कादंबरी -
जिवलगा ....
भाग- ३ रा
-------------------------------------------------
सर्वांचा निरोप घेऊन नेहा नोकरीच्या शोधार्थ मावशीच्या शहरी- मुंबईला निघाली खरी, पण, तिच्या मनात प्रचंड धाकुधुक सुरु झालेली होती. वरकरणी ती
सगळं काही नॉर्मल आहे असे दाखवत होती , पण मनातून घाबरून गेली होती . तिथे गेल्यावर आधाराला आपली माणसे होती ,
पण, शेवटी घराच्या बाहेर पडल्यावर तर सगळीकडे एकटीलाच फिरायचे होते ,
.त्याचे नाही म्हटले तरी तिच्या मनावर टेन्शन आलेले होते . पण, ही अवस्था आपल्या चेहेऱ्यावर दिसू नये याची काळजी घेणे तिला भाग होते, नाहीत तर
आई आणि आज्जी दोघी आणखी काळजी करीत बसल्या असत्या .
आज निघण्याच्या अगोदर ,नेहाच्या आई-बाबांचे सुधामावशी आणि रमेश काकांशी अगदी सविस्तर बोलुन झाले होते . त्या दोघांनी नेहाच्या घरच्यांना पुन्हा पुन्हा सांगितले..
तुम्ही अजिबात काळजी करायची नाही ,तुमच्या नेहाची. आम्ही दोघे ही तिला छान सांभाळू.
सकाळी सकाळी बस पोन्चेल तेव्न्हा स्वतः रमेशकाका नेहाला घेण्यासाठी साठी बस standvar वर येणार , हे ऐकून नेहाच्या घरचे सगळे एकदम टेन्शन-फ्री झाले.
खरे म्हणजे ..नेहाची सुधामावशी आणि रमेशकाका मुंबईला राहतच नसायचे , ठाण्याला त्यांचे घर होते . नव्याने विकसित झालेल्या ठाणे शहराच्या नव्या भागात मावशीच्या
मोठ्या मुलाचे रो-हाउस होते , त्यातच सुधामावशी राहत होत्या .
मुंबईपासून दूर राहणाऱ्या लोकांना आजूबाजूची उप-नगरे आणि ठाणे सारखे मोठे शहर सुद्धा मुंबईतच असल्या सारखे समजून बोलतात.
कार्य-प्रसंगाच्या निमित्ताने कधीतरी सुधामावशी माहेरच्या गावकडे येत असे ,त्यावेळी नेहाच्या आई-बाबांच्या गावी त्याचा काही दिवस मुक्काम असायचं , या अशा येण्यात
दरवेळी कमीत कमी ५ वर्षांचे अंतर होत असे , आता तर वयोमानाप्रमाणे प्रवास सोसत नाही " हे कारण देऊन ते आता सहसा आपले शहर सोडून जात नसत.
इथून पुढे तर, नेहाच्या आई-बाबांच्या चकरा सुधामाव्शीकडे होणार होत्या . त्यामुळे भेटी होणार "या गोष्टीचा सर्वांना आनंद होत होता.
आज काल बहुतेक सगळ्याच तालुका -आणि जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गावावरून, मुंबई, ठाणे , पुणे या साठी एसटी बास आणि प्रायव्हेट कोच हमखास असतात ,कारण
जवळपास सगळ्याच छोट्या आणि मोठ्या गावातली नवीन पिढी .आय टी. फिल्ड मधल्या नोकरीसाठी कार्पोरेट जॉब..आणि कंपनी जॉबसाठी या मोठ्या शहराकडे मोठ्या संख्येने जात आहेत.
साहजिकच नेहाच्या गावाहून सुद्धा मुंबई, पुणे , ठाणे .या ठिकाणी जाणार्या अनेक प्रायव्हेट लग्झरी स्लीपर कोच बसेस होत्या.
आतापर्यंत या गोष्टीची माहिती असण्याची कधी गरज पडली नव्हती , या नवीनं गोष्टी आपल्या गावापर्यंत कधी आल्यात ? माहिती सुद्धा नव्हते. या गोष्टीवर
नेहसाहित सगळ्यांचे एकमत झाले होते.
रात्री १० वाजता निघणारी एसी स्लीपर बस साठी ९.३० वाजताच सगळे stand वर आले , नेहाची बस रेडी होती . रात्रीच्या प्रवासात स्लीपर कोच मध्ये कुणी लेडीज नसतील तर कसे ?
या प्रश्नाचे उत्तर बस समोर उभे राहिल्यावर मिळाले ..नेहाच्या वयाच्या ..तिच्याच कॉलेजमध्ये असलेल्या ,तिच्या मैत्रिणी नेमक्या आजच या बस ने निघाल्या होत्या ,
त्यांचे आई-बाबा पण आलेले पाहून, नेहाच्या घरच्या माणसान्न मोठा धीर आला .
हे बाकी बरे झाले, नेहा एकटीच नसणार बस मध्ये आहेत सोबती बर्याच लेडीज.
नेहाच्या एका मैत्रिणीचे बाबा तर सांगत होते , अहो, ही बस कायम फुल असते , अगोदरच बुकिंग करून त्वतो आम्ही तर, नाही तर ,फजिती होते.
नेहाचे बाबा म्हणाले ..इतके दिवस या गोष्टीशी आपला काहीच संबंध येत नव्हता , आता होईल सगळी माहिती आणि सवय.
अगदी राईट टाईम- बस निघाली . सगळ्यांना बाय बाय , टाटा करून झाला , आणि नेहा आपल्या बिर्थ वर आडवी पडली ..
नवा प्रवास , नवी सुरुवात .. कसे होईल आपले , जमेल का आपल्याला ?
एक न शेकडो प्रश्न , अधीर मनाला कसा आणि किती धीर द्यावा ?
नेहा स्वतःच्या मनाला सावरीत होती.
सकाळी ८ -९ वाजता बस ठाण्याला पोंचणार होती.. रमेशकाका येणार होते , त्यामुळे एक मोठी काळजी तर मिटली होती..
डोळे मिटून पडलेल्या नेहाच्या मनात अनेक नव्या स्वप्नांचा पिंगा सुरु झाला ...
------------------------------------------------------------------------------------------------
बाकी..पुढच्या भागात ..भाग - ४ था ..लवकरच येतो आहे.