Julale premache naate - 26 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२६

"लेट तुझ्यामुळे होईल माझ्यामुळे नाही कळलं.. तुम्हा मुलींना लागतो वेळ.." थोडा कुस्तीत निशांत बोलला. तस मी त्याच्या पाठीत धपाटा घातला.. "आई ग.., लागलं ना हनी-बी." स्वतःची पाठ चोळत तो ओरडला.. "एवढं काही नाही लागत.., नाटकी नुसता.." मी उठुन स्वतःच्या रूमध्ये जाता जाता बोलले.



मी आईला बोलवून घेतलं कारण तीच माझी आज तय्यारी आणि हेअरस्टाईल करून देणार होती. मी आधी ड्रेस घालून घेतला. नंतर केसांची आईने छान हेअरस्टाईल केली. समोरून थोडे हेअर बाजुला काढून कर्ल केले. मागे राहिलेल्या केसांचा बन बनवुन काही केसांना कर्ल करून तिने पिनअप करून त्यावर सिल्वर आणि डायमेंटचे हेअर एक्ससर्सरीज लावले. आज तिनेच माझा मेकअप हिंद द्यायचं ठरवल होत. तिने कॉलेजमध्ये असताना पार्लर चा कोर्से केला असल्याने तिला याची सवय होती आणि आवड ही...


डोळ्यांना आयलाईनर, त्यावर सिल्वर ग्लिटरच लायनर.. आणि डार्क पिंक लिपस्टिक. बस एवढाच पण उठुन दिसेल असा मेकअप तिने केला होता. एका हातात सिल्वर ब्रेसलेट, दुसऱ्या हातात घडाळ्या. आईने तिच्या जवळचे डायमेंटचे कानातले दिले.. अगदी त्या ड्रेस ला सूट होतील असेच ते होते. गळ्यालगत सिल्वर चैन त्यात एक डायमेंट. आवडता टायटन चा परफ्युम मारून मी तय्यार झाले.. मी शेवटचं टचप देण्यासाठी थांबले असता आणि बाहेर गेली. निशांतच ही आवरलं होत. मी तो ड्रेस संभाळतच बाहेर आले आणि माझी नजर निशांतवर गेली..



त्याने आत घातलेल्या शाई कलरच्या शर्ट ची दोन-तीन बटन उघडी होती. त्यावर घातलेला डार्क नेव्ही ब्लु कलरचा ब्लेझरमुळे त्याची जिममधली बॉडी दिसत होती.. खाली व्हाईट पॅन्ट. हातात एक सिल्वर टायटनच घड्याळ. फ्रेश करणारा परफ्यूम. जेल लावुन सेट केलेली त्याचे ते केस.. उफ...!! कोणी ही प्रेमात पडेल तसा तो दिसत होता.
तो इतका हँडसम दिसत होता की, कोणी ही त्याच्या प्रेमात पडेल. अगदी मी सुद्धा...




त्याच हातातल्या मोबाईल सोबत खेळणं चालूच होत. जशी मी त्याच्या समोर जाऊन बसले.. त्याच काही माझ्यावर लक्ष नव्हतंच... हातात चहाचा ट्रे घेऊन आई अली आणि तिनेच त्याला चहा द्यायला माझ्या कडे कप दिला. तो कप मी त्याच्या समोर धरला... "चहा घे निशांत.." मी बोलताच त्याने स्वतःच डोकं वर केलं आणि..... वेळ तिथेच थांबली. त्याने माझ्याकडे बघत तो कप घेतला आणि मला बघतच राहिला..


मी किती केलं त्याला हाक मारत होते पण त्याच काही लक्ष नव्हतं.. "अरे..., घे तो चहा नाही तर पडेल अंगावर." पण ऐकू तर जायला हवं ना... त्याला कुठे काही ऐकू जात होतं.. थिजल्या सारखा तो मला बघत बसला होता.



मग आईच मागून बोलली... "अरे निशांत बाळा घे चहा. नाही तर गार होईल. आणि तुम्हाला निघायचं देखील आहे ना..!"
तेव्हा कुठे तो घेतला. गरम चहा घेतला आणि मला बघतच त्याने तो तोंडाला लावला. त्यामुळे बिचाऱ्याच तोंड ही भाजल थोडं.. "बाळा हळु पी.., चहा गरम आहे.." आई लगेच बोलली. यासर्वात मी मात्र त्याला बघून हसत होते.. पण दाखवत नव्हते....... "कसे जाणार आहात..??" आई ने चहा पित विचारल.




"आम्ही ते कॅब करून जाऊ.." निशांतच बोलला. "नाही नको..., म्हणजे हे बोलले की, आपली गाडी घेऊन जाऊदे. तुला येते ना निशांत गाडी चालवता...?" आईने निशांतकडे बघत विचारलं. "हो येते आई." त्याने ही लगेच उत्तर दिलं.



"मग झालं.. तुम्ही तीच घेऊन जावा. हे आज तुमच्यासाठी ठेवून गेले आहेत. कालच टाकी फुल केई आहे गाडीची. सो टेंशन नाही. तारीहीबेकड निशांत तु चेक जर हो." सर्वांचे कप घेत आई बोलली..




यासर्वात मी मात्र गालातल्या गालात हसत होते... कारण निशांतच लक्ष माझ्याच कडे होता. "आणि हो मला कॉल करत राहायचं प्राजु.., आणि लेट होणार असेल तर तिकडेच थांबा. आणि तस मला कॉल करून सांगा. पण शक्यतो निघा. निशांत आलास की इकडेच रहा आपल्या घरी." सूचना देऊन आई किचनमध्ये निघून गेली. यावर आम्ही फक्त माना डोलावल्या.



मी माझ्या नवीन हिल्स घातल्या आणि निशांतने त्याचे ब्लॅक शूज.. मी हातात एक क्लज आणि माझा मोबाईल घेतला. सगळं एकदा चेक करुन आम्ही दोघे निघालो. आईने मग जाताना आम्हचा का कोण जाणे पण एकत्र असा छान फोटो काढला.. तो ही तिच्या मोबाईलमध्ये. मग आम्ही तिला भेटुन निघालो असता तिने थांबवलं... "कार ची चावी नको का.???" यावर आम्ही तिघे ही छान हसलो आणि आम्ही तिला बाय करून निघालो... लिफ्टमध्ये ही निशांत मला बघत होता...



"काय एवढं बघत आहेस..? चांगलं नाही वाटत आहे का..??" "सुंदर व्यक्तीला बघणारच ना... माझी नजर नाही हटत तर मी काय करू..??" नकळत त्याच्या तोंडुन हे वाक्य आल.. मी तर त्याच्याकडे आश्चर्याने बघताच राहिले. त्याने नजर दुसरीकडे करत स्वतःची जीभ चावली.



खरतर मी सुद्धा त्याला चोरट्या नजतेने बघत होती. आज तो दिसतच एवढ्या हँडसम होता की, मीच त्याला सारख बघत होते. आम्ही खाली आलो. मी त्याची वाट बघत उभी राहिली. तो गाडी घेऊन आला तशी मी त्याच्या बाजुला जाऊन बसले.. त्याने गाडीमध्ये गाणी चालू केली. त्यावर रोमॅंटिक अशी गाणी लागली होती...



स्वप्न कि आभास हा , वेड लावी ह्या जीवा,
वेगळी दुनिया तरीही ओळखीची,
तू हवीशी मला, तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी.....


भास सारे कालचे आज कि झाले खरे,
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी, तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले मला तू हवीशी


हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा चा शहारा श्वास का गांधालती
सोबतीने चालते भोवतीने वाहते,
बंध जुळले या मनाचे त्या मनाशी .


तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी


रेडिओ वर हे गाणं लागलं होतं.. आणि माझ्या मनात काही तरी होत होतं. मला कळत नव्हतं.. निशांतच्या एका नजरेने माझ्या मनात असंख्य फुलपाखरे उडत होती... मी चोरून त्याला सारख बघणं कदाचित त्याला ही कळलं असावं म्हणुन की, काय तो गालातल्या गालात हसत होता. आम्ही गाडीने हायवेवर लागलो होतो....



संध्याकाळचा सूर्य ही आता घरी जायच्या तय्यारी होता.. ते बघुन सर्व पक्षी आप-आपल्या घरी पळत होते.. कारण त्यांना ही लवकर घरी परतायचं जे होत. सूर्याची ती पिवळी, सोनेरी कवडसे आमच्या कारच्या काचेवर आलेले... मी माझं डोकं खिडकीवर टेकवले... रेडिओवर गाणी चालूच होती. मजल दर मजल करून आम्ही लोणावळा गाठला.. तोपर्यंत संध्याकाळचे साडे सात वाजले होते. लोण्यावल्यात पोहोचताच मी खिडकीची काच खाली केली. तोच थंड हवेचा एक झोत आत आला.. छान वाटलं त्याने. आम्हाला हॉटेल म्हाहित नसल्याने निशांतने राज ला कॉल केला.



"हेय ब्रो.., निशांत हिअर. अरे ते हॉटेल कुठे आहे नक्की..?" त्याने गाडी चालवतच कॉल केला होता. तिकडून काही बोलण झाल आणि निशांतने कॉल ठेवला. दहा- पंधरा मिनिटांनी आम्ही हॉटेल समोर होतो. आम्ही जाताच राज ला कॉल केला. कारण त्यानेच सांगितलं होतं. पोहोचलात की, कॉल करा मी घ्यायला येईन. निशांतनेच कॉल केला.आम्ही उभे असता मी आईला कॉल करून घेतला आणि आम्ही पोहोचलो हे कळवलं. काही वेळाने राज आम्हाला घ्यायला आलेला. त्याने ही ब्लॅक कलरचा ब्लेझर घातल होत.. तो देखील हँडसम दिसत होता.



तो येताच त्याने मला कॉम्प्लेमेंट दिली.., "ओह प्रांजल युआर लुकिंग अमेझिंग टुडे... खूप सुंदर दिसत आहेस." मला हात मिळवत राज बोलला. तो अजून ही मलाच बघत होता. त्यामुळे कोणीतरी जेलस ही होत होत.. राजने निशांतला ब्रो हग केली. "निशांत हँडसम दिसत आहेस..


आज पार्टी मधल्या सगळ्या मुली फिदा आहेत तुझ्यावर." त्याने निशांतला डोळा मारत सांगितलं. हे ऐकून निशांत आधी हसला.. "डोन्ट व्हरी.., मला जिला इंप्रेस करायचं आहे ती ऑलरेडी इम्प्रेस झाली आहे. आणि हो तु देखील हँडसम दिसत आहेस राज. माझ्यावर फिदा होतील की नाही म्हाहित नाही. पण तुझ्यावर मात्र नक्कीच झाल्या असतील आतापर्यंत." यावर आम्ही सगळेच हसलो.



"आता सगळ्या गप्पा इथेच करणार की काही आत सुद्धा जायचं आहे." मी त्यांना विचारले असता त्यांनी लगेच माना डोलावल्या आणि आम्ही आता जायला निघालो. सोबत तीच गिफ्ट ही घेतलं. आम्ही आत जाताच मी हर्षुला भेटायला तिच्या रूमध्ये गेले..




दरवाजा वाजवता तिच्या आईने उघडला... "अरे प्रांजल ये ये..." कशा आहेत काकु" मी आत जात त्यांना भेटले. "अग मी मस्त एकदम, तु कशी आहेस.?? छान दिसते आहेस या ड्रेसमध्ये" त्या सोफ्यावर बसत बोलली. " थँक्स काकु, मी पण छान आहे.. आपली बर्थडे गर्ल कुठे आहे..?" मी देखील सोफ्यावर जाऊन बसले. "अग ती बाथरूमध्ये चँगे करते आहे. येतील इतक्यातच." स्वतःच्या मोबाईल मध्ये डोकं घालत त्या बोलल्या.



मी तिथे बसून काही स्वतःचे सेल्फी काढले.. तोच हर्षु आली. तिने डार्क रेड कलरचा गाऊन घातला होता.. "हेय बर्थडे गर्ल.." मी जवळ जाऊन मिठी मारली. "विश यु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे" मी तिला घट्ट मिठी मारत बोलले. त्यानंतर तिच्यासाठी आलेल्या पार्लरवालीने तिचा छान असा मेकअप ही करून दिला..



मग ज्वेलरी घालून मॅडम तय्यार झाल्या. हे सगळं करण्यात आठ वाजले तसे आम्ही सगळे, म्हणजे हर्षु आणि मी खाली आलो.. सिड्यांवरून तिला एकटीला पाठवुन मी मागे राहिले. कारण तसच सांगितलं होतं. ती जशी खाली उतरत होती.. तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकण्यात आलेल्या.. पूर्ण सिड्या रेड कार्पेटने सजवला होता. मध्यभागी येऊन हर्षल थांबली तशी मी देखील खाली उतरले..




समोर उभी असलेल्या हर्षलच्या समोर एक भला मोठा. फौंडेड केक आणण्यात आलेला.. सोबत श्याम्पियनची बॉटल हातात घेऊन तिचे बाबा आले. त्यांच्या एका हातात ती बॉटल होती तर दुसऱ्या हातात माईक..आणि ते बोलु लागले... "हॅलो.., ऑल माय फ्रेंड्स... थँक्स फॉर कमिंग... माझ्या बेबी चा म्हणजेच... हर्षल सरनाईक हिचा आज अठरावा बर्थडे आहे. सो तुम्ही सर्व वेळात वेळ काढुन आलात. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. तुम्ही तिला आशीर्वाद द्या एवढच म्हणेल.."




त्यांनी त्यांचं वाक्य संपवलं. तसा एका बाजुला व्हायोलिन वैगरे वाजवण्यात आला. त्यात बर्थडे सॉंग होत.. मग आम्ही ही सर्वानी ताल धरला आणि गाऊ लागलो... तिने समोर असलेला केक कापला. तो कापताच काही फोटोग्राफर ने फोटो काढले.




केक कापल्यावर तिच्या वडिलांनी श्याम्पियन ची बॉटल ओपन केली आणि ग्लास मध्ये भरत ती हर्षु ला दिली. मग सर्वत्र वेटर ते घेऊन फिरू लागले.. मी जिथे उभी होती तिथे निशांत ही होता. "पिणार का..???" हातात दोन ग्लास घेऊन राज माझ्यासमोर उभा होता.. "नो, थँक्स राज. मला नाही आवडत. माझं ऑरेंज ज्यूसच ठीक आहे." मी ऑरेंज ज्यूसचा ग्लास त्याच्यासमोर केला.



त्याने मग तो निशांतला देण्यासाठी पुढे केला असता त्याने ही त्याच्या हातातल्या ऑरेंग ज्युस चा ग्लास दाखवला. हे बघून जाणाऱ्या वेटरच्या डिश मध्ये राजने दोन्ही ग्लास ठेवली आणि त्यातलं ऑरेंज ज्युस घेतला.. यावर आम्ही तिघांनी चेअर्स केलं आणि ऑरेंज ज्युस च ग्लास ओठांना लावला.




तिकडे हर्षुला सगळे गिफ्ट्स देत होते.. मी देखील जाऊन तिला गिफ्ट दिल आणि तिला ते आवडल. "थँक्स प्राजु मला खूप आवडल तुझं गिफ्ट." एवढं बोलून तिने मला मिठी मारली. तोच निशांत आला आणि त्याने तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट दिल... "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डिअर." त्याने तिचा हात पकडून तिला विश केलं. आणि एक गिफ्ट पुढे केलं. त्यानेही सेम गिफ्ट दिल होत.. "निशांत तुझं गिफ्ट किती मस्त आहे.." तिला ते जरा जातच आवडल. आवडणारच होत निशांतने जे दिल होत. मला सॉरी बोलत तिने ते लगेच घातल आणि निशांतचे आभार मानले...



हर्षुने निशांतचा हात धरला आणि तिच्या बाबांना भेटवायला ती घेऊन गेली.. हे बघुन मी जरा रागावलीच. आणि निघून टेबलावर जाऊन बसले. मी एकटे बसले होते तिथे राज आला.. "काय मग.., कंटाळलीस वाटत पार्टीमध्ये...?" तो बसत बोलला. "नाही रे तस काही नाही... मस्त आहे पार्टी." मी जरा नाखुषीनेच म्हटलं. "अग आज माझे डॅड येणार होते पण त्यांना जमल नाही. मला त्यांना तुझी भेट घालवून घ्यायची आहे." राज बोलत होता. पण माझं लक्ष काही राजच्या बोलण्याकडे नव्हतं. मी बघत होते ते हर्षु आणि निशांतकडे.



हर्षु आपल्या सगळ्या फ्रेंड्स ला निशांतची ओळख करून देत होता. आणि निशांत काही ही न बोलता सगळं सहन करत होता. कदाचित त्यालाही आवडल असेल. मी मनातल्या मनात बोलले... "अग काय ग.., लक्ष कुठे आहे.?? मी विचारलं काही..??" राज काही तरी बोलत होता.... "हा बोलं ना ऐकते आहे मी." अजून ही माझं लक्ष काही त्याच्या बोलण्याकडे नव्हतं. थोड्या वेळाने निशांत येऊन आमच्या टेबलावर बसला. तो यायला आणि राज जायला एकच वेळ.. "अरे तुझी ती मैत्रीण जरा डोक्यावर पडली आहे का.???" मी लगेच डोळे मोठे करून दाखवत हळू बोलायला सांगितलं.



"अरे ती मला तिच्या बाबांना भेटवायला घेऊन गेली आणि फ्रेंड्सला. सगळ्या त्या मुली मला जीजू का बोलत होते. खरच मंद आहे जरा." "अरे बाबा हळू बोलं ना तु.. ऐकल कोणी तरी." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले.



त्यांनतर सगळे डान्स कायु लागले. हर्षु धावत आली आणि तिने निशांतला घेऊन गेली.. माझा तर मुडच गेला. मग एक हात समोर आला.. "मॅम कॅन यु प्लीज डान्स विथ मी..??" तो राज होता. मी त्याला नाही बोलु शकले नाही आणि आम्ही ही डान्स करू लागलो. सगळे डान्स करत होते. पण माझी आणि निशांतची नजर एकमेकांवरच होती.



निशांतच माझ्याकडे बघणं मला हॅप्पी फिलिंग देत होत. डान्स करता करता सगळ्यांनी पार्टनर बदलला. आता माझ्यासमोर निशांत होता.. माझी तर नजर वर उचलत नव्हती.. हे सगळं करून आम्ही खायला गेलो. यासर्वात आम्हाला दहा वाजले हे देखील कळलं नाही. सगळे पाहुणे निघत होते. "निशांत मला तुझ्याशी थोडं बोलायच आहे. माझ्या रूमध्ये येशील का. मला बोलायच आहे जरा??" हर्षुने आम्ही तिघांसमोर त्याला विचारल. "ठीक आहे. पण मग सोबत प्रांजल आणि राजला ही येऊदे." त्याने ही त्याची अट सांगितली. हो, नाही करत आम्ही चौघे तिच्या रूमध्ये गेलो.



"हा बोल आता हर्षल.." निशांत बेडवर बसत बोलला. मी आणि राज सोफ्यावर बसलो होतो. "निशांत तुला तर म्हाहित आहे.. तु मला आधी पासून आवडतोस. जेव्हा मी तुला पहिल्यांदा कॉजेलमध्ये पाहिलं होतं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे निशांत... आय लव्ह यु." हर्षल ने सरळ सांगून टाकलं. हे ऐकून कोणी तिथे शोक मध्ये नव्हतं. निशांत ही नाही. जस की त्याला आधीच माहीत होतं की, हर्षु हे बोलणार आहे.



"हर्षल, मी तुझ्या फिलिंग ची कदर करतो. पण मी आधीच सांगितलं होत पिकनिकच्या वेळी. मी कोणाला तरी पसंद करतो. माझं एका मुलीवर प्रेम आहे. सॉरी हर्षल मला माफ कर. पण मी तिच्याशिवाय नाही राहू शकत." एवढं बोलून तो शांत झाला.



हे सगळं मी आणि राज फक्त बघत होतो. हर्षु बु लागली.. "निशांत मला वाटलं ती मुलगी मी आहे.. त्या दिवशी मी तुला माझ्या भावना सांगितल्या आणि त्यात तु ते बोललास तेव्हाही माझ्याकडे पाहिलं होतं. म्हणुन मला वाटलं की, तुझं माझ्यावर प्रेम आहे. निशांत प्लीज मला स्वीकार.. मी खूप प्रेम करेन तुझ्यावर. तु म्हणशील ते करेन, तुला आवडेल तशी वागेन.. पण मला अंतर नको देऊस." हर्षु अक्षरशः रडत बोलत होती.


"हे बघ हर्षल आपण यावर नंतर बोलूया.आज तुझा चांगला दिवस आहे आणि तो मला खराब नाही होऊ द्यायचा." निशांत शांतपणे बोलत होता.... "नाही, मला उत्तर हवं आहे आणि ते देखील होकाराच.." ती देखील ऐकून घ्यायला तय्यार नव्हती.



शेवटी मी उठुन तिला समजावायला गेले.. "हर्षु आपण नंतर बोलु हवं तर आता नको.." मी तिच्या जवळ जात बोलले. "नाही प्राजु.., मला आताच उत्तर हवं आहे. अस काय आहे मुली मध्ये जे माझ्यात नाहीये निशांत. माझ्याकडे लुक आहे, पैसा आहे, तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. अजून काय हवंय. खरच कोणी आहे का निशांत की, खोट बोलतो आहेस आमच्याशी."


यावर निशांत जरा चिडत उठला.. "आहे ती.., हर्षल प्रेम, लुक, पैसा सगळं आहे तुझ्याकडे.., परंतु तिची जागा कधीच घेऊ शकत नाही. ती माझा जीव आहे. आणि नेहमी राहील." त्याने हे वाक्य सरळ तिच्या डोळ्यात बघत पूर्ण केलं. " मला माहित आहे निशांत कोणी आहेच नाही अशी मुलगी. असती तर आम्हाला का नाही दाखवलीस..? खरच आहे की स्वप्नात आहे.??" हर्षुने मिश्किल हसून विचारलं.



यावर मात्र निशांत चांगलाच चिडला होता.. "तुम्हाला काय वाटत खोट सांगतो आहे ना.. खर तर तिला मी आमच्या डान्स नंतर प्रपोज करणार होतो... पण मला वाटत की, आता सांगणे जास्त गरजेचे आहे." एवढं बोलून तो उठला.. आणि आम्ही उभे होती तिथे येऊन उभा राहिला.




"माझ्या लाईफमध्ये तु आलीस आणि सगळं बदललं. कधी माझी मैत्रीण झाली. तर कधी आई. दर वेळी मला समजून घेतलंस..." तो समोर आल्याने हर्षल ला वाटत की, आधी तो मस्करी करत होता.. म्हणुन ती हसुन बोलली. " मला म्हाहित होत निशांत तु मस्करी करत होतास ना..? तुझ माझ्यावर प्रेम आहे ना..?" यामुळे सर्वात जास्त वाईट मला वाटत होतं.. कारण आता कुठे मला निशांत बद्दल काही वाटू लागलं होतं आणि त्याच्या मनात हर्षल होती. हे ऐकून मी जाणार होते की त्याने माझा हात धरला..




सॉरी हर्षल.. पण माझं प्रेम तुझ्यावर नाही. माझं प्रेम प्रांजल वर आहे.." हे ऐकून तर आता मी शॉक मध्ये होते... "तु मस्करी करत आहेस ना निशांत..??" बिचारी हर्षु रडक्या स्वरात विचारत होती. "नाही हर्षल माझं खूप प्रेम आहे तिच्यावर" निशांतने माझ्या हातावरची पकड घट्ट करत सांगितलं. "कशा वरून तुझं तिच्यावर प्रेम आहे. मला प्रूव्ह करून दाखव." हर्षु डोळ्यातले अश्रु पुसत बोलली...


To be continued...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED