Julale premache naate - 27 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२७

हे ऐकून निशांतने मला जवळ खेचलं.. एवढया की त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा ही आवाज मला ऐकू येत होता. त्याने जवळ घेतलं आणि..... त्याचे मऊदार ओठ माझ्या गुलाबी ओठांवर टेकवले... हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. स्वतःला बाजुला करत त्याने हर्षलकडे पाहिलं.. "पटलं तुला आता.. माझी पहिली किस आणि शेवटची किस फक्त आणि फक्त तिच्यासाठी असेल." एवढं बोलून त्याने माझा हात धरला आणि मला खेचत घेऊन खाली आला.. आम्ही लगेच आमच्या गाडीमध्ये जाऊन बसलो आणि काही ही न बोलता निशांतने गाडी स्टार्ट केली..
रात्रीच्या अकरा वाजता आम्ही निघालो होतो. गाडीमध्ये दोघेही शांत.. कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं. मी तर शरमेने अर्धी झालेली. थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली.. तो खाली उतरला आणि समोर जाऊन गाडीला टेका देऊन उभा राहिला... मग मी देखील उतरले आणि त्याच्या बाजुला जाऊन उभे राहिले. मी जाताच त्याने माझ्याकडे पाहिलं.. "हनी-बी... माफ जर मला. माझ्या मूर्खपणा मुळे तुला आज एवढं सहन कराव लागलं. मी भावना शून्य चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं.."तु आज बरोबर नाही केलंस निशांत.. आज फक्त तिला पटवून दवण्यासाठी तु माझा वापर केलास. किती वाईट वाटलं मला." आणि मी रडु लागले. यावर निशांतला कळेनाच नक्की काय झालं ते... "प्लीज हनी-बी रडु नकोस. आणि काय बोललीस तु मी तुझा वापर केला.. नाही यार.. का करू अस मी." तो आपल्या गुडघ्यावर खाली बसला आणि स्वतःचे कान धरले...."हनी-बी.. खरच मी डान्स नंतर तुलाच प्रपोज करणार होतो. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे.. खूप जीव आहे तुझ्यावर... मी नाही ग राहू शकत तुझ्याशिवाय.. हे सगळं मी तुला नीट सांगणार होतो. पण त्या मूर्ख हर्षलमुळे हे अस झालं. प्लीज मला माफ कर." एवढं बोलून तर तो रडायला लागला. हे बहुन मी देखील खाली बसले.."खरच प्रेम करतोस माझ्यावर...?" मी खाली बसत विचारले. " म्हणुन का तुला घर घरी घेऊन गेलेलो. मी बोललो होतो ना एक दिवस सांगेल मी का, मी कोणाला नाही घेऊन जात. खरतर मला माझ्या घरी तिलाच न्यायचं होत जिच्या सोबत मला माझं आयुष्य काढायचं आहे. आणि तुझ्याशिवाय कोणी दुसरी अजून चांगली मिळूच शकत नाही. तु जशी काळजी घेतेस, मला समजून घेतेस. तस कोणीच कधी भेटलच नाही. तु जशी माझी, आजी-आजोबांची काळजी घेतेस ना त्यामुळेच माझं तुझ्यावरच प्रेम वाढत गेल. मी मनापासून प्रेम करतो तुझ्यावर." एवढं बोलून तो अजुन रडू लागला.
"नको रडुस प्लीज ना.." मी त्याचे डोळे पुसत बोलले. "आज जे मी केलं त्यासाठी तुला माझा राग आला असेल ना तु माझ्या कानाखाली मार" एवढं बोलून त्याने स्वतःचा गाल पुढे केला. "मी पाहिलं आणि.... जवळ जाऊन आपले ओठ त्याच्या गालावर टेकवले." आता निशांत शॉक मध्ये होता..
"म्हणजे हनी-बी तुझं ही..., म्हणजे..माझ्यावर.., म्हणजे तु.." त्याला एवढा आनंद झाला होता की, काय करू नि काय नको असं त्याला झालं होतं." आम्ही दोघेही उठुन उभे राहिलो...


"हनी-बी आय लव्ह यु... डु यु लव्ह मी.????" त्याने माझ्या डोळ्यात बघत विचारल असता मी स्वतःची मान फिरवली.. "अच्छा बच्चू म्हणजे नाहीये प्रेम. ठीक आहे मग मी जातो त्या मुर्ख हर्षलकडे आणि होकार देतो तिला.." त्याने ही मागे फिरत आपलं बोलण संपवलं.तशी मी त्याच्या पाठीत धपाटा घातला. "काय बोललास.., जा हर्षु कडे माझं काय.. नंतर तूच रडत येशील." एवढं बोलुन मी पण मागे फिरली.. हे बघून निशांतने मला जवळ खेचलं आणि घट्ट मिठी मारली.... "वेडी आहेस.. पण फक्त माझीच आहेस.. आता एकदा तरी कन्फर्म सांग." त्याने तर हातचं जोडले. हे बघून मी हळूच त्याच्या कानात.. "आय लव्ह यु खडूस.." म्हटलं आणि लाजून एक घट्ट मिठी मारली.. "त्याने तर आनंदाने मला गोल फिरवल.."अरे बस बस पडेल.. एवढं ही प्रेम नको." यावर आम्ही दोघेही हसलो.. "चला मॅडम घरी जाऊया." यावर मी एक स्माईल दिली आणि आम्ही गाडीत जाऊन बसलो. त्याने गाडी स्टार्ट केली.. काही अंतरावर जाऊन ती गाडी मधेच बंद झाली.... "अरे यार.., या गाडीला काय झालं मधेच..??" तो बाहेर उतरत बोलला. मी पण बाहेर आले. पण मेजर वाटत असल्याने आम्ही आजूबाजूच्या हॉटेल मध्ये राहायचं ठरवल... तसा मी कॉल करून घडलेलं सांगितलं. आईही नकोच बोलली रात्रीचा प्रवास.


मग आम्ही बाजुच्या हॉटेल मध्ये गेलो. खरतर दोन रूम घेणार होतो. पण रूम नसल्याने आम्हाला एकाच मध्ये ऍडजस्ट करावं लागणार होतं......पुढे नक्की काय घडलं हे नक्कीच बघू पुढच्या भागात.....


to be continued........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED