जुळले प्रेमाचे नाते - भाग-२८ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२८

आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेल च नाव होतं.., "ड्रीम हाऊस". आम्ही आत जाताच निशांतने रिसेप्शनवर चौकशी केली असता एकाच रूम असल्याचं कळलं. त्यामुळे निशांतने रूम बुक केली. आज आम्हाला एकाच रूममध्ये ऍडजस्ट करावं लागणार होत. ती दुसऱ्या मजल्यावरची शेवटची रूम होती.




ती देखील हनीमून स्पेशिअल.. काय करणार दुसऱ्या हॉटेल मध्ये ही जागा नसेल तर. म्हणून आम्ही जास्त विचार न करता आमच्या रूममधे गेलो. त्यांनी विचारला असता आम्ही बाबांना कॉल लावून दिला. कारण वय लहान असल्याने आम्हाला ते देत नव्हते. पण नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे बाबांनी समजावलं तेव्हा त्यांनी आम्हाला रूम दिली.



लिफ्टमध्ये मी, निशांत आणि एक वेटर सोबत आलेला. आम्ही पोहोचताच त्याने रूम ओपन करून दिली.. आम्ही जाताच त्याने लाईट लावून दिल्या आणि तो निघुन गेला. मी आत जाऊन बेडवर बसले.. प्रशस्त असा तो बेड होता..


माझी नजर पूर्ण रूमभर भिरभिरली.. वर लावलेलं छोटस पण आलिशान वाटेल अस झुंबर होत.. मऊदार असा त्या बेडवर स्वतःच अंग झोकुन द्यावस वाटत होतं.. पण फ्रेश होण्यासाठी मी बाथरूमध्ये गेले. भलामोठा असा तो काचीचा बाथरूम एखाद्या रॉयल घरातल्या बाथरूम सारखा होता.. रिफ्रेश करणारे फ्रेशनर स्वतःचे काम चोख पाड पाडत होते.


त्या बाथरूम मधला बाथटप बघुन कोणी ही सांगेलं की, हा स्पेशिअली कपल साठीच असेल. खरच सुंदर होत ते सगळं. ते न्याहाळतच मी फ्रेश होऊन बाहेर आले. निशांत समोरच्या सोफ्यावर बसून काही तरी मोबाईल मध्ये करत होता.




त्या व्हाईट फॉल्ट केलेल्या शर्टात तो एवढा गोड दिसत होत की, माझं राहून राहून लक्ष त्याच्या वर जात होतं. मग ती देखील फ्रेश होऊन आला.. तोपर्यंत मी माझे हेअर मोकळे केले. ज्वेलरी काढून ठेवून टेबलावर ठेवून दिली. "अरे निशांत, आपण याच कपड्यांवर झोपायचं का.??" माझ्या या प्रश्नावर खरतर तो आधी हसला. पण माझा अवतार बघून काही तरी करतो एवढं बोलुन बाहेर गेला. मी बसले वाट बघत. जेव्हा आला हातात एक पिशवी होती.



"हे घे.., जस जमल तर घेऊन आलो." निशांतने माझ्या हातात देत म्हटलं. मी त्या पिशवीत घाट घातला तर त्यात एक सिम्पल असा नाईट सूट होता. मी लगेच निशांतला बाहेर जायला सांगितलं कारण बाथरूमध्ये काच असल्याने मी तिकडे काही चेंज करू शकत नव्हते. मग तो काही तरी खायला म्हणुन ऑर्डर देऊन येतो बोलून गेला. आणि मी चेंज करून घेतलं.


थोड्यावेळाने निशांत ही आला आणि सोबत खायला ही घेऊन आला. पण मला काही भूक नसल्याने त्यानेच खाल्लं. काही तरी बोलायच म्हणून मीच सुरू झाले... "निशांत थँक्स हा.." यावर त्याने खात खातच हाताने प्रश्न केला.. "अरे ते ड्रेस घेऊन आलास ना त्यासाठी. त्या लॉंग गाऊन वर कसे झोपले असते ना." मी हसतच बोलले. हे ऐकून त्याला ही बर वाटल. त्याच जेवुन झाल्यावर आम्ही गप्पा मारू लागलो.


"एक सांग निशांत... तुला कधी वाटलं की, तुझं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे मी तुला कधी पासुन आवडू लागले." मला हे सगळं जाऊन घ्यायचं होत. त्याने माझ्याकडे बघत एक छानशी स्माईल दिली आणि तो बोलु लागला तेव्हा..



"जेव्हा पहिल्यांदा तु माझ्याशी भांडली होतीस... त्या वड्या-सांबरसाठी. तेव्हा पासुन तु माझ्या मनात घर केलस. म्हणजे कधी वाटलं नव्हतं की, एवढ्या लवकर तुझ्यासारखी कोणीतरी येईल आयुष्यात. त्यानंतर आपलं एकाच बुक वरून झालेलं भांडण. तुला माझ्यामुळे झालेला त्रास.. नंतर माझं तुला डान्ससाठी विचारणं. त्यावरून झालेला वाद.



तुझ्या घरी आलेलो ना तेव्हा तुझ्या आई सोबत झालेली ती मैत्री. खरच खूप काही दिलास मला तू. त्यात तु आलेलीस ना घरी आणि आजोबांना समजावलेस ते तर सर्वात भारी होत. तुझ्यामुळे माझे आजोबा मला परत मिळाले." तो सगळं हसुन आनंदाने सांगत होता.



"ए ते आता माझे हि आजोबा आहे हा." मी मधेच तोडत बोलले. यावर लगेच त्याने स्वतःचे हात वर केले. "हो ग.., तुझे ही आहेत. पण खरच तु समोर असलीस ना की मला कोणाची तरी आठवण येते." त्याच्या या वाक्यावर मी आश्चर्याने पाहिलं.??




"कोण..?? पहिली गर्लफ्रेंड.???" मी मुद्दाम विचारल. "नाही ग..., माझी कोणी गर्ल फ्रेंड नव्हतीच." त्यानेही ही हसुन सांगितलं. "मग.??" मी त्याच्या उत्तराची वाट बघत होते. "माझ्या आईची. ती पण तुझ्यासारखी होती. एकदम मस्त., काळजी घेणारी, जीव लावणारी." हे बोलताना नकळतच त्याचे डोळे भरले. हे बघुन मी त्याच्या हातावर स्वतःचे हात ठेवले. आणि स्माईल दिली. त्यानेही ते अश्रु खाली पडू दिले नाही.


"मग मी का बरं आवडतो तुला..??" लगेच त्याचा प्रश्न आला. मी जरा विचार करण्याच नाटक करत बोलले.



"म्हणजे खरच कळलं नाही... नक्की कधी पासुन तु मला आवडू लागलास. तुझं मला मनवन. माझी काळजी घेणं. मी कोण दुसऱ्या सोबत असताना जेलस होणं. हे सगळं मला आवडत. ते नाही का राज माझ्या सोबत असायचा तेव्हा तुझा झालेला चेहरा आठवतो. खुप हसायला यायच मला. पण सोबत आनंद ही वाटायचा." मी हसुन त्याला सांगत होते.


"आणि ते माझ्यासाठी पाणी पुरी खाल्लेलीस ना. ते तर कधीच नाही विसरणार मी.." हे मात्र मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलले. "निशांत थँक्स. खुप काही दिल आहेस तू. मला मरणाच्या दारातून वाचवलं आहेस. नंतर कळू लागलं होतं की, तुला मी आवडते. पण तुझं होत ना तुझी "ती" मग वाटायचं आपण नसू." हे बोलताना मी लगेच स्वतःचे नाक मुरडले. हे बघुन निशांतला गंमत वाटली. "काय केलंस आता...? छान होत ते तुझं नाक मुरडन." तो माझ्या जवळ सरकत बोलला.



To be continue.....