Julale premache naate - 32 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३२

या तिघी तर चांगल्याच दचकल्या... "काय मूर्ख आहे ती हर्षल. अरे अस प्रेम हिसकावून मिळत का..! ते मुळात दोघांच्या मनात असावं लागतं." प्रिया तर चांगलीच चिडली होती. मागून अभि आणि वृंदाने ही सुरात सूर मिसळले.. मी तिघींना शांत केलं..."अरे, तुम्ही आता चिडू नका.. झालं ते कधीच. आणि प्रेमात माणसाला नाही कळत आपण चुकीचं वागत आहोत की, बरोबर.. त्याला फक्त हवं असत ते प्रेम... आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्यावर केलेलं प्रेम. तसच काहीस हर्षुच होत." मी एक स्माईल देत समजावलं. तेव्हा कुठे तिघी शांत झाल्या."अग पण एवढं झालं तरीही काही बोलली नाहीस मला.." अभि जरा रागातच बोलली. "मॅडम तुम्ही नाशिकला होतात. शिफ्ट झालेलीस ना तु. आणि तसही निशांत होताच म्हणुन काही जास्त बोलले नाही.." मी समजावण्याच्या सुरात बोलले. ती जरा रागावलीच होती. अभि माझी लहानपणापासूनची मैत्रीण. तीच आणि माझं जरा जास्तच पटायच.

हा तर पूढे काय झालं ते ऐका तरी.... तशा तिघी शांतपणे ऐकू लागल्या.
मी कॅन्टीनमध्ये एकटीच बसले होते की निशांत आला. त्याच्या हातात काही समान होते ते तो बाजूच्या चेअरवर ठेवत माझ्या समोरच्या चेअरवर बसला.. तो आला म्हणुन मी लगेच स्वतःच्या गालावर हात ठेवला होता. नाही तर हा काही तरी वाईट करायचा.."हनी-बी.. माझे लेक्चर्स संपले आहेत. तुझं काय.??? म्हणजे काही लेक्चर्स आहेत का आता रिसेस नंतर.???" त्याने माझ्याकडे बघत विचारले. मी मानेनेच नकार दिला. खरतर होते, पण आजच्या घटनेने मी चांगलेच शॉकमध्ये असल्याने परत क्लासरूमध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती. मी स्वतःच्या गालावर हात ठेवुनचं बसले होते. किती तरी वेळ. हे निशांत बघत होता."काय ग., ही कोणती नवीन स्टाईल. गालावर हात ठेवून का बसली आहे." निशांतने शेवटी विचारलच. मी एक मोठी स्माईल देत बाथरूमध्ये जायला पाळली. कारण मला ते निशांतला दाखवायच नव्हतं. मी बाथरूम आले तेव्हा माझ्या क्लासमधल्या काही मुली मला बघून कुचबुजल्या...
"अग ही तीच आहे ना.. हर्षलची बेस्ट फ्रेंड. पण तिच्या बॉयफ्रेंडला हिने तिच्यापासून वेगळं केलं म्हणे. त्या हर्षल ला कळलं तेव्हा तिचे मघाशी हिच्या कानाखाली लगावली होती. कशा असतात ना ग, आधी फ्रेंड बनतात आणि नंतर दुसऱ्यांचे बॉयफ्रेंड चोरतात." एवढं बोलून त्या निघून गेल्या. अस काहीसं माझ्या कानावर पडल आणि मला तर आता चक्कर यायची बाकी होती."काय होऊन बसल आहे हे सगळं." मी स्वतःशीच बोलत होते. डोळ्यात पाणी ही साचलं होत. ते खाली न येऊ देताच मी माझा चेहरा थंडगार पाण्याने धुतला. बर वाटल जरा. आणि बाहेर आले. निशांत कॅन्टीनमध्ये बसला होता. मी स्वतःचे डोळे पुसले आणि जाऊन त्याच्या उभी राहिली. हसण्याचा हकला प्रयत्न केला...."चला निघुया का आपण..??" मी हसुन बोलले असता त्याने माझ्याकडे पाहिलं. एक क्षण तो बघतच राहिला. एक क्षण मला वाटली की, त्याला कळलं की काय...? मी हसुम स्वतःची बॅग घेतली आणि निघाले. मागे निशांत समान घेऊन आलेला. मग ते सगळं सामान माझ्या हातात देऊन त्याने बाईक काढली आणि आम्ही निघालो. अधुन मधून तो त्याच्या उजव्या मिरर मधून मला बघत होता.


मग आम्ही त्याच्या बंगल्याजवळ पोहोचलो. आज आजी-आजोबा डॉक्टरकडे गेले असल्याने आम्ही दोघेच आणि एक मावशी ज्या यांच्याकडे काम करायला यायच्या त्याच होत्या. त्यांनीच दरवाजा उघडला. आम्ही आत जाताच त्यांनी पाणीही आणुन दिल. मग आम्ही निघालो निशांतच्या रूमध्ये. खरतर आमचं टेरेसवर ठरलं होतं प्रॅक्टिसच. पण ऊन बघून आम्ही निशांतच्या रूममधे प्रॅक्टिस करणार होतो.


मला फ्रेश व्हायचं म्हणून मी नेहमी ज्या रूममधे जाते त्या रूमध्ये जाऊन फ्रेश झाले. तोपर्यंत निशांत ही फ्रेश झाला त्याच्या रूममधे. मग मी त्याच्या रूममधे गेले.


"करायची का सुरुवात." निशांतने रेकॉर्ड सॉंग लावत विचारल. मी मानेनेच होकार दिला. मग आम्ही ठरल्या प्रमाणे डान्सची प्रॅक्टिस सुरू केली.. तो जेव्हा जेव्हा माझ्याकडे बघत होता मी माझा चेहरा दुसरीकडे करत होते.. कारण माझ्या चेहऱ्यावर हकल्या हाताच्या खुणा उमटल्या होत्या.. आणि त्या ला निशांत ला दाखवायच्या नव्हत्या.माझा प्रॅक्टिसमध्ये लक्ष नाही हे निशांतने ताडल. मधेच थांबवला डान्स. "का.., काय झालं डान्स का थांबवला..??" मी आश्चर्याने पाहिलं.
"मॅडम आता कोणती स्टेप केलेली आठवतेय का तुला..???" तो जरा चिडतच बोलला."काय झालं आहे नक्की.. तुझं लक्ष नाहीये डान्समध्ये... अग तुला कळतय का नेक्स्ट वीकमध्ये आपलं कॉम्पेटेशन आहे. आणि मला जिंकायचं आहे. दर वेळी मी जिंकत आलो आहे आणि मला यावर्षीही तसच जिंकायचं आहे." तो जरा रागावून बोलला. त्याच ही बरोबर होत म्हणा.. कॉलेजमध्ये सर्वांना माहीत होतं..


To be continued....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED