भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १९) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १९)

सई आकाशकडे पाहत होती. किती रमला होता तो त्या मुलांमध्ये. किती गूढ माणूस आहे हा... स्वतःच अस्तित्व माहित नाही.. तरी किती आनंदात, स्वतः पेक्षा दुसऱ्याचं सुख बघणारा... असा पहिलाच व्यक्ती बघितला मी. त्या बाई बोलल्या ते अगदी बरोबर, पाऊसच आहे हा... सतत भटकत राहायचे.. वाऱ्यावर स्वार होऊन... वाट मिळेल तिथे. वारा नेईल जिथे.... कोणताही अटकाव नाही, बंधन नाही.. फक्त भटकत राहायचे आणि बरसत रहायचे. सईच्या मनात काही जाणवू लागलं होतं आकाश बद्दल.


==================================================


" तुमच्या दोघांचे कधीपासून relation आहे रे .. ? " सुप्री खोटा राग चेहऱ्यावर आणत विचारत होती. आकाश बुचकुळ्यात पडला. " कोणाबद्दल बोलतो आहेस तू... " आकाश सुप्रीकडे पाहू लागला. एका उंच ठिकाणी बसले होते दोघे. समोर डोंगरांच्या रांगा होत्या. तिथून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ढग एकामागोमग एक चालले होते. त्यांचेही ट्रॅफिक जॅम झालं असावं.. एक नदी वाहत होती, उगम स्थान त्याचं डोंगराच्या रांगेतील एका दरीत. लाल रंगाचे पाणी... लालेलाल सापच जणू... पुढे जाऊन गडप होत होती कुठेतरी. " तुमच्या दोघांचं.... पाऊस आणि तू... " सुप्री हसायला लागली. आकाशला हि हसायला आले त्यावर.


" पाऊस !! ..... पाऊस ना, खूप जिव्हाळ्याचा आणि तेव्हढाच कमजोरीचा विषय आहे माझा... जास्त करून 'कमजोरी 'च आहे असं म्हणालीस तरी चालून जाईल. चारचं महिने येतो वस्तीसाठी, पण पूर्ण वर्षभरासाठी डोक्यात काही ना काही भरवून जातो. त्यातलं बरंचसं चांगलंच असते, तरीदेखील काहीतरी वेगळं.. नेहमीच्या जगण्यापेक्षा अगदी भन्नाट करायला सांगतो.. दरवेळेस आला कि... मग काय, "मित्राचं" ऐकावंचं लागतं. त्यात, बोलणारं आणि अडवणारं कोणी नसेल.. सोबतीला, पाठीवरची सॅक आणि जमवून ठेवलेला अनुभव असला ना... नाही थांबवता येतं स्वतःला... निघून जातो मी ...कधी कधी अनोळखी वळणं , वाटा मिळतात. हरवतो कुठेतरी... पण मला काय वाटते सांगू, हरवलेलं बरं असते कधी कधी... त्याशिवाय , नवीन वाटा कश्या सापडणार ना... कसं ना.. उरलेल्या दिवसात , मन तुडुंब भरलेलं असते भावनांनी.. त्यांना मोकळी वाट मिळते ती "हा मित्र" आला कि.. आजूबाजूला कोण नसलं तरी चालेल, तसंच बसून राहायचं पावसात... ऐकायचं त्याला... प्रत्येक थेंबातून तो एक वेगळीच कहाणी सांगत असतो... त्याची आणि दुसऱ्यांची सुद्धा... भिजणारे खूप असतात, त्याही पेक्षा 'मित्राला' नावं ठेवणारे अधिक.. तरी, आयुष्यात एकदातरी... काहीच ठरवायचं नाही, मनात फक्त वारा भरून घेयाचा, पाठीवर सॅक चढवायची आणि या "मित्राचा" हात पकडून निघून जायचं, तो घेऊन जाईल तिथे.. ओळखीच्या वाटा अनोळखी करण्यासाठी आणि स्वतःला हरवून जाण्यासाठी... "


सुप्रीला अचानक आठवलं ते. समोर तसंच दृश्य होते ना काहीस. एकटीच येऊन बसली होती कधीची. पावसाला मित्र मानणारा, असा जाऊच शकत नाही सोडून, त्या पावसाला तरी कसं जमणार होते ते.... मित्राला अडचणीत टाकायला. पण इतका वेळ आकाश का समोर आला नसेल. रागावला तर नसेल ना माझ्यावर... नाही, त्याला तर राग येतंच नाही कधी.. मग काय कारण असेल... सुप्री रात्र झाली तरी तेच ते विचार करत बसली होती.


पुढचे २ दिवस असेच फिरण्यात गेले. सुप्री आणि तिचा ग्रुप , पुढे पुढे जात होते.. प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी.. तिला आकाशच्या खुणा सापडत होत्या. गावातले सांगायचे... भटक्या असा होता , तसा होता... बोलण्याची पद्दत.. कसा सर्वाना मदत करतो.. वगैरे. आता तर १०० % पक्के झाले होते कि ती आकाशच आहे. पण संजना जरा चिंतेत होती... कारण अमोल....... २ दिवस तर तो तिच्यासोबतच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत. सुप्री तर नेहमीसारखी वागत होती त्याच्याबरोबर... परंतु अमोल मात्र वेगळा वाटतं होता संजनाला.
" सुप्री !! जरा बोलायचं आहे तुझ्याशी.. " रात्रीचं जेवण झालं तर अमोल सुप्री सोबत गप्पा मारत बसला होता.
" येते... या अमोल सरांना राजा-राणी ची गोष्ट सांगते आहे.. नाहीतर झोप येतं नाही त्यांना... " सुप्रीच्या या डायलॉग वर अमोलसुद्धा हसला.
" हसू नकोस... चल बोलायचं आहे " ,
" बसा.. ओ संजना मॅडम... किती छान वातावरण आहे... ",अमोल ....
" नको... नंतर, उद्या बोलू... आता जरा सुप्री बरोबर पर्सनल बोलायचं आहे... " ,
" ok ok ... जा तुम्ही... आहे मी इथेच... वाट बघतो तुमची... ",
" उद्या ... जमल्यास लवकर निघू... जमलं तर पहाटे ६:३० ला. तर आज सगळ्यांनी लवकर झोपा... " कोमलने आधीच सांगितलं. त्यामुळे सगळेच लवकर झोपायला गेले.

अमोल मात्र २ दिवस खूष होता. सुप्रीला आणखी समाजवे , असं त्याने ठरवलं होते. म्हणून तिच्यासोबतच रहावं हे त्याने ठरवलं आणि केलं सुद्धा. खूप छान होती ती फीलिंग. २ दिवसात त्याने तिला खूप मदतही केली होती. सुप्रीसुद्धा आकाशचे कळल्यापासून जरा मोकळी झाली होती मनाने... खुलली होती. तिच्यातला बदल आपल्यामुळेच आहे, असं वाटतं होते अमोलला. ती आपल्यासोबत किती खुश असते, हे अमोलच्या मनात कुठेतरी कोरलं जातं होतं. तिला आपण आवडतो, आपली सोबत तिला सुखावते, असा समज अमोलला झाला. त्या स्वप्नातच तो झोपी गेला.


" काय करते आहेस तू ... " संजना जवळपास ओरडलीच सुप्रीला.
" काय होतंय नक्की तुला.. " सुप्रीला प्रश्न पडला.
" दोन दिवस झाले... बघते आहे मी. अमोल सर तुला सोडतच नाही आहेत. त्याच्या मनात काय आहे माहित आहे ना तुला.. तरी तुही का अशी वागते आहेस.. " ,
" संजना,... आधी शांत हो... " सुप्रीने संजनाला शांत केलं.
" मला माहित आहे अमोल सरांच्या मनात काय आहे ते... ते तर आधीपासूनच माहित आहे मला. ",
" मग ? " ,
" त्यांना आकाशबद्दल काहीच माहित नाही. आणि त्यांना माझ्या बद्दल हि माहित नाही. त्यांना सांगायचे होते. आता वेळ आली आहे असं वाटते आहे... " ,
" मग सांगून टाक ना.. त्यांच्या मनात काही वेगळं येण्याआधी... बघ, आता आकाशसुद्धा आला आहे.. कसं सांभाळणार आहेस दोघांना तू... " संजना बरोबर बोलली. सुप्री रात्रभर विचार करत होती.



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: