Nava adhyay - 3 books and stories free download online pdf in Marathi

नवा अध्याय - 3

सुंदराबाईना पाहून मीना थोडी थबकलीच . , आणि त्याना आपली ओळख करून देत .ती म्हणाली , ' ' मी मीना , अतुलची मैत्रीण शब्द तोंडातल्या तोंडात रेंगाळत ती म्हणाली .तुम्ही कोण ? तिला पाहून सुंदराबाई म्हणाल्या मी अतुलची आई . आई शब्द कानावर पडताच ती नमस्कार करण्यास वाकली . ' ' असू दे ' ' सुंदराबाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले . त्या पुढे बोलू लागल्या .काल अतुल तुज्याविश्यी बाबांना सांगताना मी ऐकले होते . तू अगदी त्याने वर्णन केल्याप्रमाणे सुंदर , सुशील आहेस .बाबांनी तुमच्या लग्नाला परवानगी सुधा दिली . काही काळजी करू नकोस . हे घर तुला आपलस करून घेयील .' ' ह्या घरात तू सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून राह्शील . त्यांचे बोलणे ऐकून तिला बर वाटल . पण तिला त्यांच कौतुकच वाटल . अतुलच्या आईने खर खूप सुंदर ठेवल होत . प्रत्येक वस्तू अगदी व्यव्सतीथ ठेवलेली घरात खूप स्वच्छता .आणि हे सगळ त्या ईकट करत होत्या .कोठेही कामवाली बाई नाही . पण अतुलने आपल्याला आधी आई विषयी का सांगितल नसेल .
ईत्क्यात तिचा फोन वाजतो . ' ' अग कोणाचा ? ' ' सुंदराबाई म्हणाल्या . .......अ .....अ .....आईचा ? मीना म्हणाली . ' ' अग काळजीत असतील , आईच ती , घरी जा . अतुल आल्यावर मी सांगते त्याला भेटायला .' ' आणि हो ....आह्मी लवकरच येऊ घरी बोलण करायला . त्या हसत म्हणाल्या .
मीना ही हसत उठली आणि घरी निघाली . येताना तिच्या मनात अनेक शंका होत्या पण आता सगळ्या शंकाच निरसन जाल होत .
मीना घरी आली आणि जेवण करून झोपी गेली . तिला आता झोपेत गोड गोड स्वप्ने पडू लागली . अतुल आणि त्याच घर त्या दोघांचा संसार ..छे ....छे ...संसार कधी दोघांचा नसतो .ती मनाशीच म्हणत .संसार म्हंटल की सगळे येतात , सगल्याण्ची काळजी घ्याची .सगळ्याना हव नको ते पहायचे . अगदी आई सारख ..परत स्वतःशीच म्हणत ...नाही अतुलच्या आई सारख पण .त्या किती करतात सगळ्यांसाठी .आपण पण तसाच वागायचं . हो ...ठरले . आणि ईट्क्याट फोन ची रिंग वाजली .आणि मीना जागी जाली . अरेच्चा ....हे तर स्वप्न होत ......स्वयंपाक घरातून फोन आला .अग मीना फोन उचल ..हो , आई ...आईला उत्तर देत मीना म्हणाली .
मीना ने फोन उचला .समोरून अतुलचा आवाज आला . हेलो ....मी अतुल बोलतोय , आज आह्मी तुज्या घरी बोलणी करायला येतोय .तू तयार रहा . आणि त्याने घाईत फोन ठेवून दिला . मीनाने ही बातमी घरात सांगितली . सगळेजण तयारीला लागले .मीना ही तयारी करायला निघून गेली .
थोड्यावेळाने मीनाच्या दारासमोर मोठी गाडी थांबली . गाडीतून अतुल , अतुलचे बाबा , अतुलची वाहिनी , दादा बाहेर पडले . आणि गाडीचे दार लावले गेले . अतुलची आई काही गाडीतून बाहेर पडली नाही .मीनाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले .त्या का आल्या नसतील. ईत्क्यात मीनाच्या आईने मीनाला आवाज दिला .आणि बाहेर पाहूनाच्या समोर यायला सांगितले . थोड्यावेळाने हळूच दबकत मीना बाहेर आली . लाल साडीत मीना खूपच सुंदर दिसत होती . अगदी लक्ष्मी सारखी . मीनाला पाहताच अतुलच्या बाबांनी तिला बसायला सांगितले .आणि तिला ते शिक्षणाविषयी , नोकरी विषयी विचारू लागले . पुढे त्यानी तिला लग्नझल्यावर नोकरी करू शकते . शिक्षणही ते घेऊ शकते .असे सांगितले .पण त्यांच्या बोलण्याकडे तिचे लक्षच नव्हते .तिचे लक्ष तर अतूल्च्या आई कडे होते .त्या का आल्या नसतील .
ईकडे दोन्ही घरातल्यानी मिळून लग्न दोन दिवसात सोप्या पध्तीने करायचे ठरवले . पुढील कथा वाचण्यासाठी भाग -4 वाचा .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED