Nava adhyay - 4 books and stories free download online pdf in Marathi

नवा अध्याय - 4

ईकडे मीनाचे आणि अतूल्चे लग्न पार पडले .देवदर्शन , पूजा ही व्यव्सतीथ पार पडले .पाहुणे ही आपापल्या घरी निघून गेले . आणि मीना आणि अतुल च्या आयुष्याचा नवीन अध्याय चालू झाला . ईकडे दुसऱ्या दिवशी लवकरउठून मीनाने गोड शिरा बनवला .सगळे नाश्तासाठी जमले .मीनाने सगळ्याना शिरा दिला . सगळे आवडीने शिरा खाऊ लागले . पण पहिल्याच घासाला कोणी तोंड वाकड केल . तर कोणी तब्येतीच निमित्त करून निघून गेल . अतुलतर तिला स्पष्टच म्हणाला , अग ...मीनू ...हे सगळ का करत बसली .हे सगळ करायला आई आहे की , तू नोकरीच कर ....ही शुल्क कामे का करत बस्तेस तू .... त्यापेक्षा तू कोणतातरी क्लास लावून वेळ सत्कारणी लाव . एवढ बोलून तो त्याच्या खोली कडे निघून गेला .
त्याच बोलण ऐकून मीना थक्कच झाली . हे काय बोलतोय अतुल , ' ' ही शुल्क कामे ' ' . तिने एकदा सुंदराबाई कडे पाहिले .
त्यांच्या डोळ्यात तिला पाणी दिसले . तरीही तिच्याकडे पाहत हसत त्या म्हणाल्या .' ' अग तू एवढी शिकलेली , हुशार कशाला ही कामे करतेस .मी आहे ना .अतुल म्हणतोय ते बरोबरच आहे .तू नोकरीच कर .ह्या कामात लक्ष नको देऊस . आणि हो , कोणाचा ही राग न ग मानू . आणि त्या निघून गेल्या .
आता मीनाच्या सगळ हळू हळू लक्षात येऊ लागल . अतूल्च्या आईला ह्या घरात काहीच किंमत नाही .कारण त्या कुठे नोकरी करत नाही म्हणून .पन गेली कितेक वर्ष त्या हे घर उत्तम सांभाळत होत्या . पन ते सगळ शुल्क आहे .
काहीतरी मनाशी निश्चय करत मीना आपल्या खोली कडे वळली . तीने ठरवल अश्या कितीतरी महिला असतील .ज्याना काही कारणामुळे नोकरी करता येत नसेल .त्यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे .एक ग्रुहीणीने जर ठरवले तर ती काहीही करू शकते . जर ती एका खोलीला घर बनवू शकते , आणि घराला स्वर्ग तर ती काहीही करू शकते . पण त्यासाठी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्री कडे सन्म्माने बघितले पाहिजे .तरच जग तिच्याकडे सन्मानाने बघेल . पण काय करायच अश्या महिलांसाठी ? अश्या, आपण ही त्यातीलच एक आहोत .याची तिला जाणीव झाली .
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली . आपण काल मीनाला फार बोललो .ह्याची अतुलला जाणीव झाली . तिच्या साठी आज आपण काहीतरी केल पाहिजे .तिला पिक्चरला घेऊन जाऊ .तिथून मस्त फिरायला घेऊन जाऊ .मस्त मजा करू . त्याने लगेच मीनाला आवाज दिला .मीना बाहेर बागेत झाडाणा पाणी घालत होती . अतुलचा आवाज ऐकून ती घरात गेली. अतुल त्यांच्या खोलीत बसला होता . म्हणून ती खोली कडे वळली .
मीना खोलीत येताच अतुलनी तिला जवळ घेतले . आणि तो म्हणाला ,' ' मीनू , कालबदल सॉरी , पुन्हा मी अस नाही बोलणार ' ' . चल आवर , आपण बाहेर जाणार आहोत . आधी पिक्चरला , मग मस्त बाहेर फिरायला .चल चल आवर लवकर. एवढ बोलून , तीच काहीही न ऐकता तो बाहेर निघून गेला .
मीना विचार करू लागली , की सॉरी त्यानी तिला नाही तर त्याच्या आईला बोलायला हवय .कारण त्यानी अपमान तिचा नाही तर त्याच्या आई चा केलाय .आज पर्यंत ती करत असलेल्या कष्टाचा केलाय . ' ' आई जरी काही करत नसली तरी ती तिचा रोज मुलांसाठी , तिच्या कुटुंबासाठी खर्च करत असते .' ' पण हे सगळ अतुलला आणि घरच्यांना कस पटवून द्यायच ?
आपण हे पटवून द्यायचच , काहीही जाल तरीसुद्धा .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED