नवा अध्याय - 6 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवा अध्याय - 6

ईकडे सुंदराबाईच्या डब्यानी मीनाच्या ऑफीस मधे जोर धरला होता . जवळ जवळ 15 डबयाण्ची ऑर्डर मीनाला मिळाली होती . मीना आता फार खुश होती .सकाळी लवकर उठून मीना आणि सुंदराबाई सगळी तयारी करत मग मीना दुपारी कोणाला तरी सांगून डबे मागवून घेत . अस करत दोन महिने निघून गेले होते .सुंदराबाईही खुश होत्या .त्याना पैसे सोबत त्यांच्या कलेला प्रतिसाद ही मिळत होता . ' ' आणि आपण ही काहीतरी करू शकतो ही जाणीव ' ' . घरात कोणालाही ह्या पैकी काही माहीत नव्हते
मीनानि आताएक मोबाइलवर ग्रूप सुध्दा चालू केला होता .ज्या मधे अनेक महिलांना तिनेजोडले होते , ज्या ग्रुहीणी होत्या .त्यांच्या मार्फत तिने ' ' सुंदराबाई मसाले ' ' अशी एक छोटीशी कंपनी चालू करायचे ठरवले .आणि त्या कंपनीची जबाबदारी सुंदराबाई वर देणार होती . पण हे सगळ करताना तीने अतूल्ला सांगायचे ठरवले . घरातील तरी हे सगळ कोणालातरी माहीत असाव ,
म्हणून . आणि अतुल शिवाय जवळच आणि विश्वासाच अस कोण होत ? पण हे सगळ घरी बोलता येणार नाही .त्यासाठी त्याला कुठेतरी बाहेरच घेऊन गेल पाहिजे . झाल तर मग आपण त्याला शेजारच्या हॉटेल मधे घेऊन जाऊ .
मीना ऑफीस मधून आल्यावर अत्यंत लडिवाळपणे अतुलशी बोलू लागली . मीनाचा ...हा सूर बघून तो ही खुश झाला . ' ' मीनू ....आज खूप खुश दिसतेस .ऑफीस मधे काय चांगली बातमी वेगेरे मिळाली की काय .' ' त्याला मधेच थांबवत मीना म्हणाली .' ' नाही रे , असच आज आपण बाहेर जाऊयात ना जेवायला .' ' मीना हसत हसत म्हणाली . यावर अतुल म्हणाला , ' ' मी , म्हणालो , की तुला काम असत ' ' . आज , तू हे बोलतेस , आज काही काम नाही , तुला ? पण चला , काही असू दे , तो बोललीस ना मग हे होणारच .चल आवर , आपण जाऊ हॉटेल मधे .
मीना आणि अतुल हॉटेल मधे आले होते . मीना अतुलला म्हणाली , आज तू ऑर्डर द्यायची .आणि मी पैसे देणार . ही मेजवानी माज्याकडून तुला . ' ' अरे .....वा ....मीनू , आज नक्की काही तरी तुज्या मनात चालू आहे ' ' .तुला काही मला सांगायच का ?अतुल म्हणाला . अतुल च्या ह्या बोलण्यावर , मात्र मीना थोडीशी घाबरली . आपल्या मनातल अतुलला कस कळल ? ' ' अग अशी घाबरतेस काय ? मी तुजी गंमत केली .' '
आता मीनाच आणि अतुलच जेवण झाल .आता योग्य वेळ बघून मीनानी बोलायचे ठरवले . ' ' मीना अतुलला म्हणाली , अतुल मला तुला काही तरी सांगायचय ' अग , मग सांग ना ? , अतुल घाई घाईत म्हणाला . तेवढ्यात मीना म्हणाली , पण तू ही गोष्ट शांततेत ऐकशील आणि वेळ आल्यावर मला ती गोष्ट करण्यासाठी साथ ही देशील . तिला मधेच थांबवत , अतुल म्हणाला आणि ही गोष्ट , आई विषयी आहे . त्याच बोलण ऐकून मीनाचे शब्द तोंडातल्या तोंडातच राहिले .म्हणजे अतुल , तुला हे सगळ माहीत होत ?
हो , अतुल म्हणाला , मला सगळ माहीत होत .एक दिवशी तुज आणि आई च बोलण मी ऐकल .खरतर ,आईच हे डब्बा वेगेरे करन मला पसंतच नव्हत .मला ह्या गोष्टीचा फार राग आला होता . मी ह्या गोष्टी विषयी आईला बोलणार ही होतो .