नवा अध्याय - 11 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवा अध्याय - 11

सुंदराबाईच बोलण ऐकून त्यांचे पती थबकले .खरच आपण खूप वाईट वागलो . आपण तिचा कधी विचारच केला नाही .तिच्यामुळे आज आपण एथे आहोत हे कस विसरलो आपण . तिने जर त्यावेळी कष्ट केले नसते .तर आज आपण पण अडाणीच राहिलो . आणि खरच आपण तिच्या अडाणीपणाच कारण सांगून तिच्या मुलांच्या लग्नाला पण येऊन दिल नाही . आपण तिच्या बाबतीत खूप स्वार्थी वागलो . आणि एवढ सगळ होऊन सुद्धा आज आपण तिलाच जाब विचारतोय , तिने हे सगळ आपल्याला का सांगितल नाही .
सुंदराबाई पुढे बोलू लागल्या , तुम्ही आणि अजय नि निशा दिलेल्या स्वतंत्रपानाचा तिने खूप गैरफायदा घेतलाय.तिचे मुलांकडे लक्ष नाही .घराकडे लक्ष नाही . शिवाय तिच्या सारख्या पार्ट्या करणे मला पसंद नाही . मुले अजून लहान आहेत त्याना आईच प्रेम मिळाव, एव्डिच माजी ईछ्या आहे .तिच्या नोकरी करण्याच्या मी आड नाही .पण उरलेला वेळ तरी तिने मुलांना द्यावा .आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतला . की तिने मुलाचे आणि अजयच़ जेवण बनवावे . शिवाय आपल्यानंतर तिलाच हे घर सांभाळयाचाय .अतुल आणि मीनाला सांभाळयाचाय . मी बरोबर केल ना , ईतका वेळ शांत असणाऱ्या पतिकडे बघत सुंदराबाई बोलल्या . पण श्रीरामराव वेगळ्याच कसल्या तरी विचारात गढ्लेले . त्यांच्याकडे बघून , सुंदराबाई त्याना म्हणाल्या .' ' हे सगळ सोडा , तुम्ही दमला असताल .' ' आपण उद्या बोलू ह्या विषयी . रात्र पण खूप झाली . झौपा आता . एवढ बोलून सुंदराबाईनी दिवे घालवले .
दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदराबाई देवपूजा आवरून स्वयंपाक घरात आल्या . त्यांच्या मागोमाग मीना सुध्दा आली .दोघी स्वयंपाक घरात काम करत होत्या , आतून हसण्याचा आवाज येऊ लागला . सुंदराबाईच्या पतीने तो आवाज ऐकला . त्याना आनंदच़ झाला . नाश्ता करण्यासाठी सगळे जमले . निशा , अजय , मीना , अतुल , सुंदराबाई , मुले पण सुंदराबाईचे पती काही आले नाहीत . सुंदराबाईना काळजी वाटू लागली त्यांची तब्बेत तर बरी असेल ना .....वेळ एवढी काटेकोर पणे पाळणारे आज नाष्टाला कसे आले नाहीत .त्याना जाऊनच बोलवावे म्हणून सुंदराबाई निघाल्या . तेवढ्यात ते येतानाच दिसले . नाष्टयाच्या टेबल जवळ येताच ते म्हणाले , ' ' सॉरी , यायला थोडा उशीर झाला ' ' . सगळ्यांनी हसत हसत नाष्टयाला सुरवात केली . ईट्कयात सुंदराबाईचे पती त्यानाम्हणाले .
निशा तू उद्या पासून स्वयंपाक घरात काम करयचेस . सगळे नाष्टा करायचे सोडून बाबाना पाहू लागले. तेवढ्यात निशा त्याना म्हणाली , पण , बाबा मुले , ऑफीस बघून मला नाही जमत स्वयंपाक घरात काम करायला . त्या पेक्षा आपण एक कामवाली ठेवू .ती करेल सगळ काम . यावर सुंदराबाई म्हणाल्या , अग निशा कामवाली नाही करत व्यव्सतीथ काम . आणि तू पर्यंत करून बघितले ना .....काय झाल .आणि आपण तीन बायका .सगळ्यांनी मिळून केल तर होऊन जयील सगळ . आणि ह्या नंतर तुलाच सगळ सांभाळायचाय .ह्यावर अजय म्हणाला .आई पण खरच़ खूप दमछाक होते ग निशाची .
सुंदराबाई अजयच्या बोलण्या वरून पुढे बोलू लागल्या . म्हणूनच मी काही ठरवलंय .सर्व पुन्हा सुंदराबाईकडे पाहू लागले . सुंदराबाई पुढे बोलू लागल्या . अजय तू आणि निशा सकाळी उठून मुलांचे सर्व अवरताल . निशा तो पर्यंत मी आणि मीना आह्मी दोघी मिळून स्वयंपाक घरात काम करू . मग अतुल तू मुलांना शाळेत सोड्व्शिल . मग सगळे ऑफीस मधे जातील .सुंदराबाई म्हणाल्या मी मुलांसाठी लवकर घरी येयील .आणि संध्याकाळी अजय आणि अतुल तुम्ही दोघे ही मीना आणि निशा ह्याना किचन मधे मदत करताल .